मी पाहिलेली सर्कस | visit to circus paragraph

मी पाहिलेली सर्कस | visit to circus paragraph

सर्कस हे सुद्धा एक मनोरंजनाचे साधन आहे. ज्याला सर्व वयोगटातील लोक पसंत करतात. सर्कस मध्ये विविध पराक्रम दाखवले जातात. आजच्या आधुनिक काळात मनोरंजनासाठी अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. परंतु काही वर्षांपूर्वी आपण जर पाहिलं तर अशी काही साधन त्यावेळी उपलब्ध नव्हती. तेव्हापासून सर्कस खूप प्रसिद्ध आहे. आजच्या या लेखामध्ये आपण मी पाहिलेली सर्कस (visit to circus paragraph) या विषयावर निबंध पाहणार आहोत.
 
दरवर्षी आमच्याकडे यल्लमा देवीची खूप मोठी यात्रा असते. आणि या यात्रेच्या निमित्ताने अनेक लोक एकत्र येत असतात. तेव्हा सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सुट्टी असते. आम्ही असेच जत्रेतून फिरत असताना आम्हाला सर्कस दिसली. त्यानंतर मी आणि माझ्या सर्व मित्रांनी ती सर्कस पाहण्याचा निश्चय केला. सर्कसची तिकिटे काढून आम्ही सर्कस पाहायला गेलो.

वर्तमानपत्राविषयी निबंध | essay on newspaper in marathi येथे वाचा


जवळजवळ संध्याकाळी सात वाजता सर्वांचे स्वागत करून ही सर्कस सुरू झाली. सर्कशी साठी अनेक वस्तू मांडून ठेवल्या होत्या त्या पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. सर्वात पहिल्यांदा एका लहान मुलीने एका लहान दोरीवर चालून दाखवले. तिचं धाडस बघून खरंच आम्हाला आश्चर्य वाटलं. कारण आम्ही याचा कधी विचारही करू शकणार नाही. 

यानंतर आम्ही सर्कस मध्ये अनेक कार्यक्रम पहिलो. एका माणसाने एक चार चाकी गाडी आपल्या दाताने ओढून नेली. हे सुद्धा खरंच खूप धैर्याचे काम होतं. एका मुलाने सायकली बरोबर अनेक कार्यक्रम करून दाखवले. त्यामध्ये एक जोकर सुद्धा होता. तो नेहमी लोकांचे मनोरंजन करत होता. 

त्यांच्याकडे अनेक प्राणी होते. त्यामधील माकडाने अगदी सहजपणे सायकल चालवून दाखवली. एका स्त्रीच्या अंगावरून एक मोटर सायकल चालवून त्यांनी दाखवली. मला अजून सुद्धा त्यांच्या कामाचं खूप नवल वाटतं. त्यातील एका पुरुषाने जमिनीमधील नांगर आपल्या दातांनी उचलून पूर्ण शंभर मीटरच्या जागेमध्ये वेढा घातला. 

या सर्कस मधील दोन पराक्रमांनी माझं लक्ष वेधून घेतलं. त्यातील पहिला म्हणजे एका महिलेला एका खोदलेल्या जमिनीत पुरल गेलं. आणि जवळजवळ एका तासानंतर काढण्यात आलं, तोपर्यंत ती महिला जिवंत होती. दुसरा पराक्रम म्हणजे एका पुरुषाने एक मोठा असा दगड आपल्या हातांनी फोडला होता. जवळजवळ दोन तास कसे निघून गेले हे मला कळलेच नाही. 

आता जरी सर्कसची लोकप्रियता कमी झाली असली तरीही, लहान मुलांमध्ये सर्कस अजूनही लोकप्रिय आहे. मला सुद्धा लहानपणी सर्कस पाहायला खूप आवडत होती. तुम्हालाही नक्कीच आवडत असणार. सायकल चालवणारा माकड, रिंगणामध्ये नाचणारा वाघ हे आजही आठवत. 

परंतु जेव्हा मला कळलं की कलाकार आपला जीव धोक्यात घालून हे कार्यक्रम करतात आणि या बरोबरच जनावरांना प्रशिक्षण देताना त्यांना खूप मारलं जातं, तेव्हापासून मी सर्कस पहायचं सोडून दिलं. 

निष्कर्ष :

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण मी पाहिलेली सर्कस (visit to circus paragraph) या विषयावर निबंध पाहिला. हा निबंध तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. भेटूयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment