बैलाची संपूर्ण माहिती Ox Information In Marathi

Ox Information In Marathi आपल्या सर्वांना माहीतच आहे की बैल हा एकमेव प्राणी आहे जो शेतकऱ्याला शेतामध्ये शेतामध्ये मदत करतो म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा वाघ असे म्हटले जाते. तसेच शेतामध्ये पिकलेल्या धान्यामध्ये ही त्याचा वाटा असतो .बैल हा शेतकऱ्याचा एकदम जवळचा आणि जिवाभावाचा सोबती आहे. बैलाचे शास्त्रीय नाव ‘एगल मार्मेलोस’ असे आहे.त्याला इंग्रजीमध्ये OX (ऑक्स) असे म्हणतात.

Ox Information In Marathi

बैलाची संपूर्ण माहिती Ox Information In Marathi

बैलाचा वापर शेतामध्ये मशागत करण्यासाठी, नांगर करण्यासाठी व शेतातील निघालेले पिक घरी नेण्यासाठी, ओढ काम करण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. त्याच बरोबर बैल हा घोड्यासारखा धाऊ शकतो. त्यामुळे बैलांना शर्यतीमध्ये उतरवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. चांगल्या खिलार जातीची जनावरे सोलापूर, पंढरपूर, पुसेगाव, आटपाडी आणि अकलूज येथे मिळतात. बैला बद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

बैलाचे वर्णन

हा मुख्यतः आकाराने मोठा, चार पाय, दोन डोळे, दोन कान, एक नाक ,चेहरा आखूड, मानेखाली पोळी, मध्यम उघडी त्वचा, दोन मोठे शिंग, पांढरा रंग, एक शेपूट आणि शेपटीचा गोंडा काळ्या रंगाचा.

बैलाचा आहार

बैल हा शाकाहारी प्राणी असल्यामुळे त्याला गवत, शेतातील हिरवा पाला ,मक्याची आणि ज्वारीची वाळलेली वैरण, धान्य या प्रकारचा आहार बैलाला दिला जातो .

बैलाचे वैशिष्ट्ये

बैलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्या धन्या बरोबर एकनिष्ठ असतो. तो सामर्थ्य आणि सामर्थ्याचे प्रतीक देखील आहे .बैल हा आपल्या धन्यासाठी आपला जीवही धोक्यात घालतो अशा भरपूर घटना आतापर्यंत आपल्या दिसून आल्या आहेत. 26 सप्टेंबर 2017 ची वर्धा मधील कारंजा तालुक्यातील मेट येथील शेतकरी मनोहर कुळमेते यांची गोष्ट आपणास माहीत आहे.

ते आपल्या बैला बरोबर शेतात काम करत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला होता .पण ते वाघाशी जास्त वेळ झुंज देऊ शकले नाही. वाघ त्यांना ओढुन नेऊ लागला .तेव्हा त्यांच्या बैलाने आपल्या जीवाची पर्वा न करता त्या वाघाशी झुंज करून आपल्या धन्याचे प्राण वाचवले व त्या वाघाला पळून लावले .अशा भरपूर घटना घडलेल्या आहेत. या गोष्टीवरून बैल हा आपल्या धन्याशी किती एकनिष्ठ असतो हे दिसून येते.

बैलपोळा सण

कृषिप्रधान संस्कृतीतील हा एक महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा. सदैव बैल आपल्या साठी कष्ट करतो व अशा मुक्या प्राण्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. हा सण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये साजरा केला जातो. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. बैलपोळ्याला कर्नाटक मध्ये कर्नाटकी ‘बेंदूर’ असे म्हणतात. बैलपोळ्याला शेतकऱ्याचा सण म्हणूनही ओळखले जाते.

हा सण श्रावण महिन्यामध्ये पिठोरी अमावस्येला साजरा केला जातो. या दिवशी बैलांचा थाट असतो. बैलांना नदीवर किंवा ओढ्यावर नेऊन स्वच्छ आंघोळ घातली जाते .त्यांच्या पाठीवर नक्षीची झूल घालतात, डोक्याला बाशिंग, गळ्यात फुलांचा हार ,पायात चांदीचे किंवा करदोडयाचे तोडे घालतात .तसेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच वाजंत्री आणि ढोल ताशे वाजवत गावभर मिरवणूक काढली जाते. त्या दिवशी बैलांकडून काम करून घेतले जात नाही त्यांना पूर्णपणे आराम दिला जातो.

बैलांच्या विविध जाती

भारतीय बैलांच्या वेगवेगळ्या जाती खाली दिल्या आहेत

१) खिलार

चांगल्या खिलार बैलांची जात महाराष्ट्रातल्या सोलापूर ,सीतापुर, पंढरपूर ,पुसेगाव ,आटपाडी ,औंध कारागामी आणि अकलूज या भागांमध्ये मिळतात. या जातीची जनावरे खूप ताकदवान, वेगवान आणि चपळ असल्यामुळे यांचा उपयोग शर्यतीमध्ये केला जातो. या जातीतील बैलांची शिंगे लांब आणि राखाडी ,पांढरा रंग असतो.

२) अमृतमहल

अमृतमहल या जातीचे बैल आकाराने मोठे, चेहरा आखूड पण गाल फुगलेले, माने खालचा पोळीचा आकार लहान,खांदा मोठा आणि करड्या रंगाचा असतो. अमृतमहल या जातीचा बैल कर्नाटक मध्ये चिक्कमंगळुरू आणि चित्रदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात. या बैलांची शिंगे लांब व टोकदार असतात.या बैलाचा रंग राखाडी असतो.

३) हल्लीकर

हल्लीकर ही जात कर्नाटक भागांमधल्या विजय नगर मध्ये आढळते. गडद राखाडी रंग,लांब शिंगे,ठळक कपाळ आणि मजबूत पाय, पण मध्यम आकाराचा असे या हल्लीकर बैलाचे वर्णन आहे .

४) पुलिकुलम

प्रकारच्या जाती तामिळनाडूमधील मदुराई जिल्ह्यातील कुंबम खोऱ्यामध्ये आढळतात .लहान आकाराचा गडद राखाडी रंगाचा, सुविकसित कुबडी असणारा असे या पुलीकुलम बैलाचे वर्णन आहे. पुलीकुलम या बैलाचा शक्यतो वापर नांगरणीसाठी केला जातो. या जातीचा बैल वेगवान नसल्यामुळे याला शर्यतीमध्ये उतरवता येत नाही. पोली कलम या बैलाला जलीकट्टू, माडु किंवा कीडाई माडु असे म्हणतात.

५) कांगायम

बैलाला कोंडणाड किंवा कोगनू असेही म्हणले जाते. या बैलांच्या जाती कोयंबटूर जिल्ह्यामध्ये कांगायम ,पेरूदडुरे आणि धरापूर या भागांमध्येआढळतात. आकाराने मोठे ,तसेच लांब आणि सरळ शिंगे पण किंचित वक्र असतात .

६) अलंबडी

या बैलाचा ही रंग गडद राखाडी असतो आणि त्याच्या कपाळावर पांढऱ्या रंगाचे डाग असतात. हा बैल तामिळनाडूतील धर्मापुरी जिल्ह्यात अलंबडी येथे आढळतात हे बैल दिसायला जवळजवळ हल्लीकर बैलासारखे असतात. या बैलांना बिटास असेही म्हणतात.

७) कृष्णा

कर्नाटकातील कृष्णा नदीच्या भागात आणि महाराष्ट्राच्या डोंगराळ सीमा भागात या बैलांच्या जाती आढळतात. हे बैल पांढरा रंगाचे, शरीराने मोठी ,शिंगे मध्यम आकाराचे आणि पोळा लहान असतो।. या बैलाचा उपयोग शेतातील कामांसाठी होतो.

८) बरगुर

बरगुर बैल हा तामिळनाडूमधील इरोड जिल्ह्यातील भवानी तालुक्यात डोंगराळ भागात आढळतो .डोंगराळ भागात काम करण्यासाठी विकसित झालेला आहे .हा बैल पांढरा आणि तपकिरी रंगाचा असतो .

९) कंकरेज

बैल हे गुजरात आणि राजस्थानमध्ये आढळतात. या बैलाला वेगवान आणि सामर्थ्यवान जात म्हणून ओळखले जाते. या जातीच्या बैलाला मोठी आणि नागमोडी शिंगे असतात .कंकरेज बैलाला वाडियार किंवा वागेड या नावानेही ओळखले जाते.

बैलाचा वापर

सध्याची परिस्थिती बघता आता सर्व शेतकरी शेतीची मशागत करण्यासाठी आधुनिक यंत्राचा वापर करतात. तसेच शेतातील माल घरी नेण्यासाठी,नांगरणीसाठी ट्रॅक्‍टरचा वापर करतात. पण ज्यावेळी साधने नव्हती त्यावेळी बैलांचा वापर शेतीची मशागत करण्यासाठी केला जायचा.

नांगरण्यासाठी ,अवजड उपकरणे, वाहतूक असणाऱ्या गाड्या आणि व्यापाऱ्यांची सामानाची किंवा वस्तूंची वाहतूक करण्यासाठी, लष्करी वाहतूकीसाठी बैलांचा वापर केला जात होता. काही शेतकरी अजूनही बैलांचा वापर शेती करण्यासाठी करतात कारण काही शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रे परवडत नाही. त्यामुळे ते बैलांचा वापर करतात .

बैलगाडी शर्यतीवरील बंदी आणि सात वर्षाचा लढा

ग्रामीण भागातील यात्रेत बैलगाडा शर्यतीला जास्त महत्त्व दिलेले असते. बैलगाडा शर्यत असल्याशिवाय यात्रेला शोभा येत नाही. परंतु 2011 मध्ये बैल या प्राण्याचा संरक्षण प्राणी (प्रोटेक्टेड एनिमल )या यादीत समावेश झाला. त्यामुळे सप्टेंबर 2011 मध्ये महाराष्ट्र सरकारने या यादीच्या आधारे बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली 2017 साली मुंबई हायकोर्टाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक रामकृष्ण टाकळकर यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी सात वर्ष लढा दिला. आता राज्यात बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. 7 वर्षानंतर या निर्णयामुळे बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरू झाल्या. 16 डिसेंबर रोजी राज्यात बैलगाडा शर्यती ला सशर्त परवानगी देण्यात आली.

बैला बद्दल काही तथ्य

  • बैल हा एक चतुष्पाद पाळीव प्राणी आहे.
  • ज्याची अनेक प्रजाती आढळतात त्यातील एक कस्तुरी बोलू देखील आहे.
  • आपल्या शरीरावर असलेल्या कुब आणि शिंगांमुळे हा प्राणी ओळखला जाऊ शकतो .
  • बैलाच्या वजनाबद्दल बोललो तर त्या प्राण्याचे वजन सुमारे ३०० ते ५०० किलो आहेत.
  • लाल रंग पाहिला की बैल स्वतःचे नियंत्रण गमावतो.
  • हिंदू धर्मात नंदी भगवान शिव ची सवारी देखील एक वळू आहे .
  • हा वृषभ प्रतिक आहे .
  • बैलाच्या आयुष्याबद्दल बोललो तर बैलाचे आयुष्य साधारण २० ते २५ वर्ष असते.

तर मित्रांनो बैल विषयी तुम्हाला माहिती मिळाली असेलच आणि हि आवडली सुद्धा असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला अवश्य share करा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment