Aardwolf Animal Information In Marathi विविधतेत अग्रेसर असणाऱ्या आपल्या या भारत देशामध्ये अनेक प्राण्यांमध्ये देखील विविधता आढळते. भारतामध्ये अनेक सस्तन प्राणी आढळतात, तसेच जलचर, उभयचर, पक्षी यांच्याही विविध प्रजाती आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये जरासा दुर्लक्षित असलेला प्राणी म्हणजे तरस याचा देखील समावेश होतो. साधारणपणे हा प्राणी दिसायला कुत्र्यासारखा असतो. हा प्राणी सस्तन असून खाण्यापिण्याच्या सवयीच्या बाबतीत मांसाहारी आहे. भारतामध्ये या प्राण्याचा पट्टेवाला तरस हा प्रकार आढळतो. महाराष्ट्रातील तरस हे सायाळ, मुंगूस, वाघ असणाऱ्या परिसरात आढळून येतो.

तरस प्राण्याची संपूर्ण माहिती Aardwolf Animal Information In Marathi
तरस दिसायला अतिशय बेढब असा असतो. लांबीला १५० से. मी. तर उंचीला ९० से. मी. असणारा हा प्राणी वजनानेही हलका म्हणजेच केवळ ३० ते ४० किलोग्राम इतकाच असतो. मळकट रंग आणि अंगावर पट्टे ही भारतातील तरस प्राण्यांची ओळख होय. हिवाळ्याच्या कालावधीमध्ये तरस प्राण्याच्या अंगावर मोठमोठे आणि दाट केस उगवतात. त्यामुळे त्याच्या शरीरावरील पट्टे झाकले जातात. ही केसं थंडीपासून संरक्षणासाठी उगवतात.
तरस हा प्राणी समोरील बाजूस रुंद, तर पाठीमागील बाजूस निमुळता अशा स्वरूपाचा असतो. कोल्ह्यासारखे याचे कान टोकदार असतात. तरसाचे मागील पाय जोमदार नसल्यामुळे तो खुरडत खुरडत चालतो. चला तर मग आजच्या भागात तरस या प्राण्याबद्दल माहिती पाहूया…
नाव: | तरस |
इंग्रजी नाव: | Aardwolf |
शास्त्रीय नाव: | हायना हायना |
शरीररचना: | कुत्र्यासारखी |
आकार: | समोर रुंद मागे निमुळता |
चाल: | खुरडत खुरडत |
रंग: | मळकट राखाडी |
आकारमान: | उंची ९० सेमी तर लांबी १५० सेमी |
वजन: | ३० ते ४० किलो |
कातडी: | पट्टेरी |
वरील परिच्छेद आपण तरस या प्राण्याबद्दल सामान्य माहिती घेतली. हायनीडी कुळातील हा सस्तन प्राणी आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. तरस हा प्राणी मांसाहारी असून हाडे खाण्यात त्याचा हातखंडा आहे, या कामी त्याचा जबडा अतिशय मजबूत बांध्याचा असतो. खुरडत खुरडत चालणे हा त्याचा स्वभाव गुणधर्म, तसेच या प्राण्याच्या शेपटीखाली एक ग्रंथी असते त्यामधून नेहमी एक स्त्राव स्त्रवत असतो.
तरस हा प्राणी मांसाहारी असल्यामुळे तो नेहमी लपून राहण्यास प्राधान्य देतो. तो ओढ्याच्या किनारी, झाडाझुडुपांमध्ये, डोंगरकपारीत, बिळांमध्ये किंवा गुहांमध्ये आपला मुक्काम ठोकतो. दिवसभर आराम करून हा प्राणी रात्री मांस भक्षणासाठी बाहेर पडतो. हा प्राणी शक्यतो जोडीने शिकार करण्यास प्राधान्य देतो.
एकट्याने शिकार करणे हे त्याच्या शरीराच्या ठेवणीनुसार त्याला शक्य होत नाही. त्यामुळे एकटा असताना तो इतर प्राण्यांची शिकार करून उरलेल्या मांसावर हा प्राणी आपली गुजरात करतो. तरस या प्राण्याला मांस च हवे असते असे काही नाही. तो इतर प्राण्यांनी खाऊन उरलेली हाडे आणि या हाडांवर थोडेसे राहिलेले मांस यावरही आनंद मानून घेतो. हाडे खात असल्यामुळे तरसाची विस्ठा देखील हाडांप्रमाणेच निघते.
तरस हा प्राणी आपली शारीरिक क्षमता ओळखून असतो, त्यामुळे तो कधीही इतर मोठ्या प्राण्यांसोबत भांडण करत नाही. इतर प्राण्यांनी त्याच्यावर हल्ला केला तर तो शक्यतो पळून जाण्यास प्राधान्य देतो. मात्र पळून जाण्याचा पर्याय उपलब्ध नसेल तर तो अचानक स्वतःला कोसळवतो आणि मेल्याचे सोंग घेतो. या मेलेल्या प्राण्यावर दुसरे प्राणी हल्ला करत नाहीत. आणि दूर निघून जातात परिणामी या हल्ल्यातून तरस प्राण्याची सुटका होते.
तरस हा प्राणी शिकार करत नसला तरी देखील त्याच्या टप्प्यात आल्यास दुबळ्या प्राण्यांना तो मारून खाऊ शकतो. शिकारीच्या वेळी गावाच्या जवळ आल्यास तेथील शेळ्या, मेंढ्या, कुत्र्याची पिल्ले किंवा जनावरांची लहान वासरे यावर तरस एकट्याने किंवा जोडीने हल्ला करतात. आणि आपल्या पाठीवर टाकून या प्राण्यांना पळवितात. शिकारीच्या बाबतीत आफ्रिकन तरस जरा जास्तच सरसावलेले आढळून येतात.
हे प्राणी नेहमी कळपाने फिरतात. आणि मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करतात. एकत्रित हल्ला करून हे बैलासारखा प्राणी देखील मारून खातात, तर काही प्रसंगी वाघ आणि सिंहासारखे हिस्त्र प्राणी देखील म्हातारे झाल्यानंतर तरसाच्या कळपाद्वारे शिकार करून खाल्ले जातात.
तरस हा प्राणी शक्यतो आवाज न करता शांततेत आपले कार्य करत राहतो. मात्र आवाज काढायचा झाल्यास हे प्राणी माणूस ज्याप्रमाणे रडतो किंवा हसतो त्या प्रकारचा आवाज काढतात, त्यामुळे काही वेळा माणसांना देखील बुचकाळ्यात पडल्यासारखे होते.
शक्यतो तरस हा प्राणी शिकार न करण्यालाच प्राधान्य देतो, तसेच जोपर्यंत आयते मांस कुजलेले किंवा सडलेले हाडे मिळत राहतात तोपर्यंत ते शिकारीच्या नादी सहसा लागत नाहीत. त्यांनी हे उघड्यावर पडलेले मांस खाल्ल्यामुळे निसर्गात स्वच्छता राखण्यास मदत होते. म्हणून तरसाचे देखील परिसंस्थेमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व अधोरेखित केले जाते.
तरसाच्या पुनरुत्पादनाबाबत बोलायचे झाल्यास तरस हा सस्तन प्राणी असल्यामुळे तो सरळ सरळ आपल्या पिलांना जन्म देतो. सुमारे १६ वर्ष जगणारा हा प्राणी आपल्या हयातीत अनेक पिल्लांना जन्म देतो. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरावर दाट केस आल्यानंतर या प्राण्यांमध्ये गर्भधारणा होते. आणि त्यानंतर पुढील ऋतूत म्हणजेच उन्हाळ्यात या प्राण्याची पिल्ले जन्माला येतात. एकावेळी तरस तीन ते चार पिल्ले जन्माला घालते. जन्म झाल्यानंतर ही पिले आपल्या आईसोबत फिरतात.
निष्कर्ष:
निसर्गाची परिसंस्था ही एक अतिशय जटिल आणि सहसा लक्षात न येण्याजोगी सिस्टम आहे. त्यामध्ये प्रत्येक प्राण्याचे एक अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यातच तरस या प्राण्याचा देखील समावेश होतो. कुत्र्यासारखा दिसणारा आणि शरीराने अतिशय बारीक असणारा तरस एक मांसाहारी प्राणी असून, तो शिकार करून आपले पोट भरतो. त्याच्या दातांची रचना अशी असते की तो हाडे देखील सहज फोडून चघळून खाऊ शकतो. समोरील बाजूस मजबूत असलेला हा प्राणी मागच्या पायांनी मात्र थोडासा दुबळा असतो.
FAQ
तरस हा प्राणी कुठल्या प्राण्यासारखा दिसतो?
तरस हा प्राणी कुत्रा या प्राण्यासारखा दिसतो.
तरसाची साधारण उंची किती असते?
तरसाची साधारण उंची ९० सेंटीमीटर म्हणजेच तीन फुट इतकी असते.
तरस साधारणपणे किती किलो वजनाचा असतो?
तरस हा साधारणपणे ३० ते ४० किलोग्रॅम इतका वजनाचा असतो, मात्र यातील नर हे ४० किलो च्या पुढे देखील असू शकतात.
तरस हा प्राणी शाकाहारी आहे की मांसाहारी?
तरस हा प्राणी शाकाहारी नसून मांसाहारी आहे.
तरस प्राणी कुठे राहतो?
सायाळ या प्राण्याने खोदलेल्या बिळांमध्ये किंवा गुहेमध्ये तरस हा प्राणी राहतो.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण तरस या प्राण्याबद्दल माहिती पाहिली. ती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा. तसेच आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही तरस विषयीची माहिती शेअर करायला बिलकुल विसरू नका.
धन्यवाद…