वायु प्रदूषणची संपूर्ण माहिती Air Pollution Information In Marathi

Air Pollution Information In Marathi वायु प्रदूषण हे एक पृथ्वीच्या वातावरणात असलेल्या हवेमध्ये हानिकारक पदार्थांच्या मिक्सीकरणामुळे होत असते. हे प्रदूषण सूक्ष्मकण आणि जैविक कण जे हवेपर्यंत पोहोचतात ते रोग ऍलर्जी किंवा मृत्यूसाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकतात. नैसर्गिक वातावरणामध्ये अनेक सजीव प्राणी वनस्पती आरोग्यावर आणि मानवनिर्मित वातावरणावर नकारात्मक परिणाम करतात. प्रत्येकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकते.

Air Pollution Information In Marathi

वायु प्रदूषणची संपूर्ण माहिती Air Pollution Information In Marathi

वायु प्रदूषण मानवी कृत्यांमुळे सुद्धा होते. कारखान्याबाहेर लावलेल्या जमिनीतून पडणारा धूर ही सुद्धा वायु प्रदूषणासाठी कारणीभूत ठरते. तसे पाहिले तर वायुप्रदूषणाचे अनेक स्त्रोत आहेत. ज्याला मानव कारणीभूत आहे तसेच काही नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा वायू प्रदूषण होत असते. जर आपण प्रदूषित हवेच्या संपर्कामध्ये राहिले तर त्यामुळे अनेक रोग उद्भवतात जसे डोळ्याची रोग त्वचारोग इत्यादी बाधा पोहोचते.

वायु प्रदूषण म्हणजे काय?

जेव्हा शुद्ध हवेमध्ये इतर दूषित किंवा अशुद्ध तसेच अनावश्यक घटक नैसर्गिकरीत्या मिसळले जातात तेव्हा त्या क्रियेला हवा प्रदूषण असे म्हणतात. वायु प्रदूषण मानवी कृत्यांमुळे सुद्धा होते. कारखान्याबाहेर लावलेल्या जमिनीतून पडणारा धूर ही सुद्धा वायु प्रदूषणासाठी कारणीभूत ठरते.

वायु प्रदूषणाचे प्रकार कोणते आहेत?

हवा प्रदूषणाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात त्यामध्ये एक नैसर्गिक प्रदूषण व दुसरे म्हणजे अनैसर्गिक किंवा मानवी प्रदूषण असे सुद्धा म्हटले तरी चालेल.

नैसर्गिक हवा प्रदूषण :

नैसर्गिक हवा प्रदूषण यामध्ये प्रचंड येणारी वादळे हवेमध्ये धुळीच्या सूक्ष्म कणांचे प्रमाण वाढते तसेच उल्कापातांमुळे ज्वलन क्रिया घडते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन-डा-ऑक्साइडचे प्रमाण वाढते. ज्वालामुखीमुळे वातावरण दूषित होते. अमोनिया व गंधकाची वाफ यांचे प्रमाण वाढते. हवा दूषित होते हे सर्व कारणे नैसर्गिक प्रदूषणाचे आहेत.

अनैसर्गिक हवा प्रदूषण :

नैसर्गिक हवा प्रदूषणा म्हणजेच मानवनिर्मित हवा प्रदूषण होय. त्यामध्ये वाहने नायट्रोजन ऑक्साईड कार्बन डाय-ऑक्साइड यांसारखे विषारी वायू हवेत सोडले जातात. तसेच कार्बन मोनॉक्साईड सूक्ष्म व अतीसूक्ष्म धूलिकण कारखाने, कार्बन-डाय-ऑक्साइड वीजनिर्मिती व सिमेंट प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणावर कार्बन डाय-ऑक्साइड सल्फर डायऑक्साइड नायट्रोजन डायॉक्साईड हवेमध्ये पसरतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवा दूषित होते.

हवा प्रदूषणाची कारणे :

रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांमधून जेव्हा इंधन जळते. तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन- डायऑक्साइड उत्सर्जित होत असतो. आपण खाजगी वाहने वापरतो. त्याचबरोबर विमान, रेल्वे, जहाज यांसारख्या सार्वजनिक वाहनांमधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नायट्रस ऑक्साईड व कार्बन डाय-ऑक्साइड चे उत्सर्जन होत असते. हवा प्रदूषणासाठी कारणीभूत ठरते. कारखान्यामधून सल्फर डायऑक्साइड सारखे वायू नेहमीच उत्सर्जित होत राहतात.

जेव्हा कोळसा आणि रॉकेल गंधक म्हणजेच सल्फर जळते. तेव्हा त्याचे ऑक्सिजन सोबत रासायनिक प्रक्रिया होत असते आणि त्यापासून सल्फर डायऑक्साइड तयार होते. जेव्हा हे वातावरणामध्ये मिसळते. तेव्हा हवा दूषित होते. भोपाळमध्ये झालेली विषारी वायू गळती सर्वांना माहीतच असेल अशा वायू गळतीमुळे सुद्धा वायु प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते.

वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे हवेतील कार्बनचा स्तर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे कार्बन मोनाऑक्साइड या विषारी वायूचे प्रमाण सुद्धा वाढते आहे. त्यामुळे हवा प्रदूषित मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच अस्वच्छता, उघडी गटारे, सांडपाणी तसेच मिथेन यासारख्या विषयी वायूंमुळे हवा प्रदूषित होते. युद्ध महायुद्ध यामुळे मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले, दारू गोळा वापरला जातो तसेच यामधून मोठ्या प्रमाणात जीवित वित्तहानी होते. तेव्हा यापासून सुद्धा वायु प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असते.

हवा प्रदूषणाचे परिणाम :

हवा प्रदूषणाचे आपल्या शरीरावर व इतर प्राण्यांवर सुद्धा घातक परिणाम होत असतात. वायू प्रदूषणामुळे जीवित व त्याचबरोबर वित्तहानी सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते. आपण पाहिले असेल विमान, रेल्वे किंवा इतर वाहने यांसारख्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड नायट्रेस ऑक्साईड सारखे विषारी वायू बाहेर पडतात.

ही खूप हानिकारक वायू असतात. ज्यामुळे श्वसन संस्था बिघडू शकते किंवा फुफ्फुसाचे आजार सुद्धा निर्माण होऊ शकतात. नायट्रस ऑक्साईडमुळे डोळे चुरचुरणे, डोळ्यांची आग होणे तसेच त्वचेचे इतर आजार तयार होतात.

रेल्वे किंवा कारखाना जेव्हा कोळसा आणि रॉकेल जळून गंधक मुक्त होतो तेव्हा गंधक ऑक्सिजन बरोबर संयोग पाहून सल्फर डायऑक्साइड तयार होते. सल्फर डायऑक्साइड पावसाच्या पाण्यात मिसळून सल्फ्युरिक आम्ल तयार करते. त्याचा विघातक परिणाम जमिनीवर होत असतो. याला आपण आम्ल पर्जन्य असं सुद्धा म्हणतो. यामुळे शेतजमिनी नापीक होतात.

इमारतीचे मटेरियल उरलेले असते, त्याची गुणवत्ता कमी करते. त्यामुळे इमारतीचे आयुष्य सुद्धा कमी होते आणि तेथे तर मानव राहतात, त्यामुळे त्यांच्या जीवाला सुद्धा हानी होते. अस्वच्छता सांडपाणी, हरितगृह यामुळे मिथेन क्लोरोफारो कार्बन नायट्रस ऑक्साईड यासारख्या वायूचे उत्सर्जन होते. मिथेन हा कार्बन डाय-ऑक्साइड पेक्षाही 21 पटीने अधिक हानिकारक असतो. हा वायू अगदी सतत प्रमाणात श्वसन नलिकेमध्ये गेला तर माणसाला मृत्यू सुद्धा ओढवू शकतो.

वायु प्रदूषण कमी करण्याचे उपाय : आपली स्वास्थ चांगलं राहण्यासाठी आपल्याला वायू प्रदूषण प्रतिबंध करावे लागेल. त्याशिवाय ही समस्या आणखीनच वाढत जाईल. वायू प्रदूषण कमी करण्याच्या काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे.

जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे : जर वायू प्रदूषण कमी करायचे असेल तर सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे जीवाश्म इंधन आहे. हे जर आपण कमी केली तर त्या ऐवजी हवा कमी प्रदूषित होईल. प्रायव्हेट वाहन चालवण्याऐवजी सार्वजनिक वाहतूक वाहनांचा उपयोग करणे फायदेशीर ठरते किंवा मग इलेक्ट्रिक वाहने वापरणे फायदेशीर ठरेल.

औद्योगिक व कृषी सुधारणा करणे : औद्योगिक आणि कृषी सुधारणा करणे खूप महत्त्वाचे असे कारण त्यांच्या मधून हानिकारक रसायनांचा वापर झाल्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते.

नियम आणि धोरणांचा योग्य वापर करणे : सरकार वायू प्रदूषण कमी करण्यासाठी नियम आणि धोरणे लागू करतात. त्यामध्ये आपण हस्तक्षेप करू नये तसेच वाहने व औद्योगिक प्रक्रियांसाठी उत्सर्जक मानके लागू केली जातात. त्याचा अवलंब कंपन्यांनी करायला पाहिजे.

वैयक्तिक कृती : व्यक्ती वायू प्रदूषणात स्वतःची योगदान कमी करण्यासाठी कृती सुद्धा करू शकतात यामध्ये ऊर्जा वाचवणे, कचरा कमी करणे आणि पर्यावरणास अनुकूल असलेला उत्पादनांचा वापर करणे.

FAQ

वायू प्रदूषण केव्हा होते?

जेव्हा हानिकारक असलेले घटक हवे मार्फत मिसळतात तेव्हा वायू प्रदूषण होते.

वायु प्रदूषण यासाठी जबाबदार घटक कोणते आहेत?

उद्योग वाहने आणि इतर घरगुती वापरातून निर्माण होणारा धूर इत्यादी घटक वायू प्रदूषणासाठी जबाबदार असतात.

वायु प्रदूषण म्हणजे काय?

मानवी क्रियाकल्पांमुळे विविध प्रकारचे वायू तसेच विविध प्रकारच्या नैसर्गिक घटकांची निर्मिती होते, त्यामुळे हे घटक वातावरणातील हवेमध्ये मिसळले जातात, त्यामुळे वायू प्रदूषण होते.

मानवामुळे होणाऱ्या वायु प्रदूषणासाठी कोणते घटक जबाबदार असतात?

लाकूड, कोळसा, शेणाची पोळी, रॉकेल, गॅस तसेच वाहने व मानवनिर्मित उद्योग कारखाने इत्यादी वायू प्रदूषणासाठी घटक जबाबदार असतात.

वायु प्रदूषणामुळे मानवी जीवनावर कोणते परिणाम होतात?

वायु प्रदूषणामुळे दमा, खोकला, कर्करोग, डोकेदुखी, डोळ्यांचे आजार, एलर्जी, हृदयविकार यांसारखे आजार उद्भवतात.

Leave a Comment