Ajinkyatara Fort Information In Marathi महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत, ज्याचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जोडला गेलेला आहे. त्यातीलच अजिंक्यतारा हा किल्ला आहे. याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडला गेलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथ्या राजधानीचे ठिकाण अजिंक्यतारा हा किल्ला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता कायम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते आणि 1699 मध्ये औरंगजेब व त्याच्या सैनिकांनी अजिंक्यतारा या किल्ल्याला वेढा घातला होता.
अजिंक्यतारा किल्ल्याची संपूर्ण माहिती Ajinkyatara Fort Information In Marathi
अजिंक्यतारा हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील सातारा या जिल्ह्यामध्ये येतो आणि सातारा जिल्ह्यातील सातारा गावातच हा किल्ला वसलेला आहे. हा किल्ला प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामलोणी रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. अजिंक्यतारा या किल्ल्याकडे जाण्यासाठी सातारा या शहरापासून अनेक रस्ते उपलब्ध आहेत तसेच हा किल्ला इतिहासकालीन घटना आजही आपल्याला सांगत उभा आहे असे म्हटले तरी चालेल.
18 व्या शतकातील मराठा साम्राज्याची ही चौथी राजधानी होती. अजिंक्यतारा हा किल्ला सातारचा किल्ला म्हणून सुद्धा ओळखला जातो. सह्याद्री पर्वत रांगेवर आपल्याला अनेक किल्ले पाहायला मिळतात परंतु या किल्ल्यापासून दुसऱ्या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी मात्र तिथे कोणतेही रस्ते उपलब्ध नाही. किल्ला महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये येतो. या किल्ल्याची उंची 4400 फूट असून दक्षिणेकडे हा किल्ला 600 मीटर विस्तारलेला आहे.
किल्ल्याचे बांधकाम 1190 मध्ये शिलाहार वंशातील दुसरा राजा भोज याने बांधला असे म्हटले जाते. किल्ल्यावरून चंदन वंदन किल्ला कल्याणगड यातेश्वराचे पठार पश्चिमेकडील सज्जनगड आणि जरंडा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. या किल्ल्यावर महाराणी ताराबाई राजवाडा, महादेवाचे मंदिर, मंगळाई देवीचे मंदिर किल्ल्यावर असलेले साततडे, हनुमानाचे मंदिर व मंगळाई बुरुंज पाहायला मिळतो.
अजिंक्यतारा या किल्ल्याचा इतिहास :
अजिंक्यतारा हा किल्ला भूतकाळात घडलेल्या अनेक घटनांविषयी आजही आपल्याला जाणीव करून देतो. हा किल्ला वंशातील दुसरा भोज राजा याने बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1673 मध्ये स्वराज्यामध्ये सामील करून घेतला होता.
त्याचबरोबर या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना वर सुद्धा आला होता. त्यावेळी महाराज या किल्ल्यावर दोन महिन्यांसाठी राहिले होते हा किल्ला चढण्यासाठी अतिशय सोपा आहे. 1699 मध्ये औरंगजेबाच्या सैनिकांनी अजिंक्यतारा या किल्ल्याला वेडा हातला होता आणि हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला होता.
ज्यावेळी हा किल्ला औरंगाबादच्या ताब्यात गेला तेव्हा या किल्ल्याचे नाव अजमतारा असे त्यांनी ठेवले होते. ज्यावेळी मराठी साम्राज्य तारा राणीच्या ताब्यात होते, त्यावेळी सरदार परशुराम त्र्यंबक आणि सैनिकांनी हा किल्ला परत स्वराज्यामध्ये सामील केला आणि त्यावेळी ताराराणी या किल्ल्याचे अझमतारा हे नाव बदलून अजिंक्यतारा हे नाव ठेवले.
काही काळानंतर हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला त्यानंतर 1708 मध्ये हा किल्ला शाहू महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि तेथेच राज्य अभिषेक करून सातारा हे शहर वसवले दुसऱ्या शाहू महाराजांच्या निधनानंतर हा किल्लापुन्हा इंग्रजांच्या ताब्यात गेलात.
औरंगजेबाचा अजिंक्यतारा किल्ल्याला वेढा :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता कायम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते आणि 1699 मध्ये औरंगजेब व त्याच्या सैनिकांनी अजिंक्यतारा या किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी या किल्ल्याचे किल्लेदार प्रयागजी प्रभू हे होते.
13 एप्रिल 1700 या दिवशी सकाळी औरंगजेबाचे सैनिक किल्ल्याजवळ सुरुंग लावण्यासाठी दोन भुयारे खाण्याला सुरुवात केली. भुयारी करून झाल्यानंतर त्यामध्ये सुरंग लावण्यात आले सुरंगांची बत्ती देतात. मंगळाई बुरुज आकाशामध्ये उडून खाली जमिनीवर कोसळली आणि यामध्ये मराठ्यांचे काही सैनिक सुद्धा मृत पावले.
या स्फोटामध्ये या किल्ल्याचे किल्लेदार प्रयागजी प्रभू सुद्धा होते; परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. मंगळाई बुरुज उडून पडल्यामुळे त्या बुरुंजा जवळचा तट मोघलांच्या सैनिकांच्या अंगावर पडून त्यामध्ये 1500 मोगलांचे सैन्य मारले गेले. या किल्ल्यावर ही लढाई खूप दिवस चालू असल्यामुळे गडावरील दाणा गोटा आणि दारुगोळा सुद्धा संपला होता. हा किल्ला औरंगजेबाच्या हाती गेला. पण तारा राणीच्या सैनिकांनी हा किल्ला परत स्वराज्यामध्ये सामील केला होता.
अजिंक्यतारा या किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :
महादरवाजा : अजिंक्यतारा या किल्ल्यावर गेल्यानंतर एक मोठे आणि भव्य असे प्रवेशद्वार दिसते तेच म्हणजे महादरवाजा आहे. या प्रवेशद्वाराला दोन्ही बाजूंनी मोठे बुरुंज आहे आणि या दरवाजाला एक छोटी दिंडी दरवाजा सुद्धा आहे. त्याची उंची खूप मोठी आहे, या दरवाजातून हत्ती अंबारीसहित जाऊ शकतो. एवढा मोठा हा दरवाजा आहे.
दक्षिण दरवाजा : किल्ल्याच्या दक्षिणेला एक दार आहे, ज्याला दक्षिण दरवाजा म्हणून ओळखले जाते. हा दरवाजा पूर्वीच्या काळी दक्षिणेकडून येणाऱ्या किल्ल्यांमध्ये लोकांसाठी वापर केला जात होता.
महादेवाचे मंदिर : या किल्ल्यामध्ये प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर काही पायऱ्या चढूनवर गेले की, एक छोटेसे महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. शांतीस्वरूप आपल्या मनात जागृत होतो आणि थोडे मनाला शांतता लागते.
हनुमानाचे मंदिर : किल्ल्यावर महादेवाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. जर किल्ल्यावर मुक्काम करायचा असेल तर या मंदिरामध्ये राहण्याची सुद्धा सोय उपलब्ध होते.
तलाव : अजिंक्यतारा या किल्ल्यावर सात तळे आहेत. जे आपल्याला पावसाळ्यामध्ये अतिशय निसर्गरम्य वाटतात.
मंगळाई देवीचे मंदिर : अजिंक्यतारा या किल्ल्यावर पूर्वेकडील टोकाला मंगळाई देवीचे मंदिर पाहायला मिळते.
ताराराणी राजवाडा : या किल्ल्यावर गेले असता चारा राणीच्या वर्चस्वाखाली असताना त्यांनी हा वाडा बांधला होता. आज हा किल्ला आपल्याला पडक्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतो.
अजिंक्यतारा किल्ल्यावर कसे जाल:
अजिंक्यतारा या किल्ल्याकडे तुम्हाला रेल्वे बस उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे तुम्ही रेल्वेने जात असाल तर सातारा हे प्रतापगड जवळचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. येथून तुम्ही साताऱ्याहून गडावर टॅक्सी भाड्याने घेऊन जाऊ शकता. जर तुम्हाला या किल्ल्याकडे बसने जायचे असेल तर तुम्ही साताऱ्यापर्यंत बसने येऊ शकता आणि तेथून भाड्याने टॅक्सी घेऊन किल्ल्याकडे जाऊ शकता.
राहण्याची व जेवणाची सोय :
जर तुम्हाला या किल्ल्यावर मुक्कामासाठी जायचे असेल तर आणि जेवणाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पहायची असेल तर या किल्ल्यावर कोणतीही सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे तुम्हाला शहरातूनच पाणी आणि जेवण सोबत घेऊन जावे लागेल.
FAQ
अजिंक्यतारा हा किल्ला कोठे आहे?
अजिंक्यतारा हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये सातारा या गावात असलेला आहे.
अजिंक्यतारा हा किल्ला कधी बांधला?
अजिंक्यतारा हा किल्ला 1190 मध्ये राजा भोज यांनी बांधला.
अजिंक्यतारा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात कधी आला?
27 जुलै 1673 रोजी.
अजिंक्यताराला वेढा दिला तेव्हा किल्ल्याचे किल्लेदार कोण होते?
प्रयागजी प्रभू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधान्यांपैकी अजिंक्यतारा हा एक किल्ला होता काय?
होय, छत्रपती शिवाजी महाराजांचे राजधान्यांपैकी अजिंक्यतारा ही एक राजधानीचे ठिकाण होते.