अळूवडी रेसिपी मराठी Aluvadi recipe in Marathi

अळूवडी रेसिपी मराठी Aluvadi recipe in Marathi अळू वडी ही भारतातील पारंपारिक रेसिपी आहे खास करून ती सणासुदीला बनवली जाते. ही रेसिपी पूर्वीपासूनच बनवली जाते. आजही तीच पद्धत वापरून अळूवडी तयार केली जाते व आनंदाने खाल्ली जाते. गौरी गणपतीच्या सणाला या अळूवडीला खूप महत्त्व दिले जाते. कारण अळूवडी आणि भाकरीचा नैवेद्य गौरी गणपतीला दाखविला जातो. अळूवडी खाण्यासाठी खूपच चविष्ट व कुरकुरीत लागते. तुम्हीही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. अळूच्या पानांमध्ये बरेच पौष्टिक घटक आहेत. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, तसेच ते वजन कमी करण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. म्हणून अळूवडी तयार करून खाल्ली पाहिजे. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी विषयी सविस्तर माहिती.

Aluvadi

अळूवडी रेसिपी मराठी Aluvadi recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

अळूवडी हा महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आहेत. ही रेसिपी ग्रामीण भागात जास्त प्रमाणात केला जातो. अळूची पाने दोन प्रकारचे असतात, आपल्याला जर अळू वडी तयार करायची असेल तर लाल देठाचीच पाने घ्यायची. ती खाण्यायोग्य असतात, अळूवडी रेसिपी दोन प्रकारे केली जाऊ शकते. एक म्हणजे वाफवलेली अळूवडी आणि दुसरी म्हणजे तळलेली अळूवडी. तर आज आपण तळलेली अळूवडी रेसिपी बघणार आहोत. अळूवडी बनवण्याकरता फारसे जास्त साहित्यांची गरज नसते. अळूची पाने अळूवडी बनवण्याकरता लागतात ती बाजारातही उपलब्ध असतात. चला तर मग जाणून घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य व पाककृती.

ही रेसिपी किती व्यक्तींकरता बनणार आहे ?
ही रेसिपी चार व्यक्तींकरता बनणार आहे.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

अळूवडी तयार करताना आपल्याला पूर्वतयारी करावी लागते त्याकरता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

अळूवडी कुकिंग करण्याकरता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

अळूवडी रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला एकूण 35 मिनिटे एवढा वेळ लागतो.

अळूवडी तयार करण्याकरता लागणारे साहित्य :

1) लाल देठ असलेल्या अळूची आठ पाने
2) एक वाटी हरभरा डाळीचे पीठ
3) एक चमचा कॉर्नफ्लॉवर
4) दोन चमचे जिरे
5) पांढरे तीळ एक चमचा
6) चवीनुसार मीठ
7) चिंचेचा कोळ पाव वाटी
8) दोन चमचे गुड
9) तळण्यासाठी तेल
10) अर्धी वाटी ओले खोबरे
11) दोन चमचे लाल तिखट
12) पाव चमचा हळद
13) कोथिंबीर
14) चिमूटभर हिंग

पाककृती :

 • डाळीच्या पिठात कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, मीठ, तीळ, जिरे, हळद, हिंग, चिंचेचा कोळ, गूळ घालूनसर्व मिश्रण एकत्रित करून घ्यावे.
 • नंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे मिश्रण घट्टसर भिजवून घ्यावे. हे मिश्रण जास्त पातळ करू नये.
 • अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. नंतर पानाचा देठ कापून घ्यावा. पानाच्या मागील बाजूवर मिश्रणाचा पातळ थर हाताने पसरवून घ्या.
 • नंतर त्यावर पुन्हा दुसरी पान उलटे ठेवून पुन्हा त्यावर मिश्रण पसरवून घ्यावे.
 • अशाप्रकारे एकावर एक अशा चार पानांचे मिश्रण पसरवून दोन्ही बाजूने आत पान दुमडून छान रोल तयार करावा.
 • अळूच्या पानांचा रोल करत असताना मध्ये मध्ये मिश्रण थोडे थोडे करून लावावे.
 • कुकरच्या भांड्याला तेल लावून रोल ठेवून कुकरमध्ये शिट्टी न लावता दहा मिनिटे वाफेवर शिजवून घ्यावा.
 • जर आपल्याकडे कुकर नसेल तर ढोकळ्याप्रमाणे बाहेरही आपल्याला हा रोल शिजवता येतो.
 • हा रोल शिजल्यानंतर बाहेर काढून थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्यानंतर त्याचे उभे काप करून घ्या.
 • आता एका कढाई मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा व एक एक करून हे अळूची वडी तेलामधून तळून घ्या.
 • अळूवडी तळताना मध्यम आचेवर तळून घ्या. जेणेकरून ते कुरकुरीत होईल व नंतर त्यावर ओले खोबरे व कोथिंबीर पसरवून द्या.
 • अशाप्रकारे गरमागरम कुरकुरीत व चटपटीत अशी अळूवडी तयार आहेत. तर मित्रांनो तुम्ही रेसिपी नक्की करून बघा.

पोषक घटक :

आळूची पाने आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. अळूच्या पानांमध्ये विटामिन ए, बी, सी, कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट व पोटॅशियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आपल्या बऱ्याच पोषक तत्त्वांची गरज भागवते. अळूच्या पानांचा आहारामध्ये नक्कीच समावेश करायला पाहिजे.

फायदे :

आहारात अळूच्या पानांचा समावेश केल्यामुळे पानांमधील पोषक तत्वे शरीरामधील रक्तदाब नियंत्रित करतात व तणावापासून मुक्ती मिळते.

अळूच्या पानांमध्ये विटामिन ए भरपूर प्रमाणात असते. जे आपल्या डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर असते. डोळ्यांच्या मास पेशी अळूची पाने खाल्ल्यामुळे मजबूत होतात.

अळूची पाने खाल्ल्यामुळे पोटांच्या समस्या दूर होतात. तसेच पोटांचे विकार थांबतात व पचनक्रिया देखील सुरळीत होते.

अळूची पाने खाल्ल्यामुळे आपले वजन कमी होऊ शकते कारण त्या पाण्यामध्ये फायबर हे आपले पचनक्रिया सुधारते त्यामुळे आपले वजन नियंत्रित राहते.

तोटे :

अळूची पाने कच्ची खाऊ नये कारण ती खाल्ल्याने घशात जळजळ होऊ शकते. त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो.

ज्या लोकांना दमाची शिकायत आहे त्यांनी देखील अळूच्या पानांचे सेवन करू नये. ज्यांना गॅसची शिकायत आहे त्यांनी देखील आमचे पानांचे सेवन करू नये.

ज्या लोकांना गुडघा दुखणे किंवा खोकल्याची समस्या आहे अशा लोकांनी देखील अळूची पाने खाणे टाळावे कारण हे त्यांच्याकरिता हानिकारक ठरू शकते.

तर मित्रांनो तुम्हाला अळूवडी रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment