आंबा घाटची संपूर्ण माहिती Amba Ghat Information In Marathi

Amba Ghat Information In Marathi आंबा घाट हा महाराष्ट्र राज्यातील डोंगराळ प्रदेशांमध्ये येतो. हे एक सह्याद्री पर्वतरांगेमध्ये वसलेले तसेच निसर्गरम्य सौंदर्य लाभलेले असे एक सांस्कृतिक समृद्ध वारसा लाभलेले पर्यटन स्थळ आहे. आंबा घाट हे नाशिक शहराजवळील शहरी जीवनातील गजबलेल ठिकाण.

Amba Ghat Information In Marathi

आंबा घाटची संपूर्ण माहिती Amba Ghat Information In Marathi

जर आपल्याला बाहेर किंवा निसर्गरम्य ठिकाणी जायचे असेल तर त्या पर्यटकांसाठी आंबा घाट हे एक पर्यटन स्थळ आहे. जिथे आपण येऊन मनमोकळेपणाने निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतो. आंबा घाट मध्ये हिरवीगार जंगले डोंगररांगा आणि आजूबाजूच्या पर्वतांच्या सौंदर्यदृष्टीचे वर्णन शब्दांमध्ये केले जाणार नाही असे ते दृश्य आपल्या डोळ्यांनी टिपू शकता.

येथे हिरवेगार जंगले असून त्या जंगलांमध्ये विविध वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत. तेथे अनेक पक्षी आणि संस्थन प्राण्यांच्या अनेक प्रजाती आपण पाहू शकतो. हे जंगल म्हणजे त्यांचे माहेरघर आहे. निसर्गप्रेमीसाठी तर हे एक खूप सुंदर असे पर्यटन स्थळ आहे.

आंबा घाटाचे नैसर्गिक सौंदर्यता :

आंबा घाट हा एक नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असा पर्वतीय प्रदेश आहे. या घाटाला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. या प्रदेशाचा एक मोठा इतिहास आहे, ज्या इतिहासामध्ये आपण अनेक प्राचीन मंदिरे स्मारके पाहू शकतो. त्यांना ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. हा प्रदेश त्यांच्या दोलायमान सांस्कृतिक परंपरा आणि चालीरीतींसाठी सुद्धा ओळखला जातो. हा एक कलात्मक आणि सांस्कृतिक क्रियाकल्पांचे केंद्र मानले जाते.

आंबा घाट येथे पाहण्यासाठी ठिकाणे :

आंबा घाटाचे सौंदर्य आपण पाहून त्यावर नक्कीच मोहित होऊ आणि स्वतःला ते पाहण्याशिवाय राहू शकणार नाही. या घाटामध्ये काही मुख्य तीर्थक्षेत्र आहे, जेथे आपण पाहू शकतो. घाटामध्ये तुम्हाला सुरुवातीला हॉटेल लागतील परंतु त्यानंतर तुम्हाला हॉटेल मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला जेवण स्वतः सोबत घेऊन जावे लागेल. या घाटामध्ये अनेक पॉईंट तसेच पर्यटकांकरिता निसर्ग सौंदर्याने लाभलेले असे अनेक ठिकाणी आहेत ते आपण पाहूया.

विशाल गड : हा त्याच्या नावाप्रमाणेच विशाल आहे. कातळ खडकाचा बनलेला हा गड आहे. यावर जाण्यासाठी एकमेव वाट आहे. गडाच्या मुख्य दरवाजाच्या समोर मोठी खोल दरी आहे. तिथे दोन नद्यांचा उगम आहे, एक उजवीकडे कोकणात जाते तर दुसरी डावीकडे पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरकडे जाते.

ही दरी ओलांडल्यानंतर तुम्हाला एक मंदिर दिसते. हे मंदिर खोकलाई देवीचे मंदिर आहे. पुढे गेल्यानंतर सरळ आपल्याला एक दर्गा चौक पाहायला मिळतो. हा दर्गा म्हणजे हजरत मलिक रिहान सुफी संतांची अतिशय सुंदर स्थान आहे, तुम्ही पाहू शकता. येथे मुस्लिम बांधव तसेच हिंदू सुद्धा मोठ्या प्रमाणात येतात. दर्ग्याचे वातावरण स्वच्छ सुंदर व अप्रतिम आहे.

पन्हाळा पावनखिंड :

विशालगडाच्या पूर्व दिशेला दहा किलोमीटर अंतरावर पावनखिंड आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी गजापूरच्या खिंडीला पावनखिंड असे नाव दिले होते. पन्हाळा म्हटलं की, डोळ्यांसमोर जलद गतीने जाणाऱ्या ट्रेन सारख्या काही गोष्टी समोर येतात.

ते म्हणजे सिद्धी जोहरच्या चाळीस हजार सैनिकांचा वेढा हाती तलवार न घेता प्राणाची आहूती देणारे शिवा काशीद स्वराज्याचा निर्माता सुकृत रहावा, यासाठी प्राणाची आहुती देणारे बाजीप्रभू देशपांडे पन्हाळा गडाच्या मागच्या बाजूने उघड उतरल्यानंतर मसावी पठार लागते.

हे पठार पूर्णतः हिरव्यागार गौवतानी घडलेले आहे. पावसाळ्यामध्ये या पठाराचे सुंदर रूप अतिशय निसर्गरम्य वाटते. पन्हाळा ते पावनखिंड हा प्रवास तुम्ही करत असाल तर तुम्हाला डोंगराचे दर्शन मात्र होते. ही डोंगररांग खूप लांब पसरलेली तुम्हाला दिसेल तसेच तुम्हाला या डोंगरावरून स्वच्छ पाण्याची वाहणारे सौंदर्य दिसेल.

मर्लेश्वर धबधबा : मार्लेश्वर धबधबा हा मारळ गावाजवळ आहे. मार्लेश्वर डोंगराच्या कपारीतून आणि शेताच्या बांद्याच्या मधून हे पाणी वाहताना आपल्याला दिसते. मार्लेश्वर डोंगराच्या थोडे पुढे गेल्यानंतर तुम्हाला वाघाडी पॉईंट दिसतो. मारळ गावाजवळ मारलेश्वर धबधबा आहे आणि तेथे सुद्धा पर्यटकांची गर्दी आपल्याला दिसते. या धबधब्यातून नदीच्या रूपाने मारळ या गावांमध्ये उतरणारे पाणी अगदी मन आनंदित होऊन जातो. हे दृश्य पाहिल्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला शिवमंदिर दिसते.

मानोली धबधबा : मानोली धबधबा हा येथील एक सौंदर्यपूर्ण धबधबा आहे. विशाल गडापासून हा धबधबा तीन किलोमीटर अंतरावर आहे तसेच हा धबधबा उंच डोंगरावरून हिरव्यागार शालिनीचे आपल्याला दिसतो. मनालीचा धबधबा प्रत्येकाचे मन आकर्षित करतो व हा धबधबा मानोली धरणाच्या 50 फूट अंतरावरून खाली पडतो. येथे सुद्धा पर्यटकांची गर्दी आपल्याला दिसते.

घनदाट जंगलातील जैवविविधता :

आंबा या घाटामध्ये घनदाट असे जंगल आहे. हे जंगल खूप मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे या घाटामध्ये फिरताना आपल्याला लक्षात येईल की, दक्षिणेकडील बावडा मार्गे हे जंगल राधानगरी अभयारण्याला जोडलेले आहे. तर उत्तरेकडे चांदोली राष्ट्रीय उद्यान मार्गे कोयना अभयारण्य व महाबळेश्वरला जोडले आहे.

या घाटामध्ये वन अभयारण्याचा आपल्याला जवळून अभ्यास करता येतो असे हे सुंदर जंगल आहे. या जंगलामध्ये अनेक मिश्र सदाहरित वने तसेच दमट पानझडी वृक्ष व जंगलातील विविध प्राणी, पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. या जंगलामध्ये सांबर, गवा, बिबट्या व भेकर इत्यादी प्राणी ही राहतात.

आंबा घाट येथे कसे झाले जाल ?

आंबा घाट हा वर्षभर पाहण्यासाठी खुला असतो येथे दरवर्षी अनेक पर्यटक येत असतात पावसाळा उन्हाळा हिवाळ्यामध्ये सुद्धा हा घाट पाहण्यासारखा आहे येथील वातावरण नेहमी थंड वातावरण असते व थंड वातावरणापासून येथील विशेष म्हणजे सौंदर्याने नटलेली साधन संपत्ती आहे, जे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. या घाटामध्ये सकाळच्या वेळी धुके पडलेले असते, त्यामुळे समोरून येणारी गाडी आपल्याला सरळ दिसत नाही, त्यामुळे येथे अनेक अपघात सुद्धा होतात.

आंबा घाट येथे तुम्हाला जर मुंबई गोवा हायवेने यायचे असेल तर तुम्हाला संगमेश्वर नंतर डावीकडे वळून साखरपामार्गे 40 किलोमीटर अंतर पार करून आंबा घाट पर्यंत जाता येते. जर तुम्हाला कोल्हापूर कडून यायचे असेल तर पन्हाळा चांदोली मार्गे हा घाट 70 किलोमीटर अंतरावर आहे.

जेवणाची व्यवस्था :

तुम्हाला आंबा घाटाचे संपूर्ण दर्शन करायचे असेल तर जेव्हा सुरुवातीला लागतो तेव्हाच तुम्हाला हॉटेल दिसतील. त्या हॉटेलमध्ये तुम्ही जेवण करू शकता. त्यानंतर जेव्हा तुम्ही घाटामध्ये जायला सुरुवात करतात. त्यानंतर तुम्हाला हॉटेल दिसणार नाही, त्यामुळे पर्यटकांनी निसर्ग सौंदर्य पाहण्याचा आनंद लाभदाय ठरवायचा असेल तर आधीच हॉटेलमध्ये जेवण करून किंवा सोबत घेऊन जावे लागते. घाटामध्ये अनेक घनदाट जंगल आहे. तेथे अनेक प्राणी पक्षी आहेत. त्यामुळे आपण पुढचा प्रवास करायला पाहिजे.

FAQ

आंबा घाट कोठे येतो?

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी जवळ आहे.

आंबा घाटाची उंची समुद्रसपाटीपासून किती आहे?

1700 फूट उंच आहे.

आंबा घाटामध्ये कोणती धबधबा आहे?

मार्लेश्वर धबधबा, मानोली.

आंबा घाटाचा रस्ता कोणी शोधला होता?

आंबा घाटाचा रस्ता हा एका मेंढपाळाने शोधला व एका ब्रिटिश अभियंत्याने या मार्गाची पाहणी करून तो रस्ता उघडकीस आणला.

आंबा घाट हा कोणत्या पर्वतरांगेमध्ये बसलेला आहे?

सह्याद्रीच्या पश्चिम पर्वतरांगांमध्ये.

Leave a Comment