Amboli Ghat Information In Marathi आंबोली घाट अतिशय सुंदर तसेच निसर्गरम्य वातावरण आणि नटलेला आहे. महाराष्ट्रातील सह्याद्री हा तर निसर्गरम्य वातावरणाचा खजिनाच तेथे दडल्याचे आपल्याला दिसते. सह्याद्रीमधील वळणावळणाचे घाट हे पर्यटकांना मोहित करतात. महाराष्ट्र मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील येणारा आंबोली घाट पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तेथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे तेथील हवामान थंड असते आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील आंबोली घाट हा पर्यटकांचा सर्वाधिक प्रिय असलेला पर्यटन स्थळ आहे.
आंबोली घाटची संपूर्ण माहिती Amboli Ghat Information In Marathi
पर्यटकांना पावसाळ्यामध्ये आकर्षित करतो याचे कारण म्हणजे या घाटामध्ये पार्पोली गावाजवळ एक मोठा धबधबा आहे. हा धबधबा तेथील सर्वात मोठा धबधबा असून पावसाळ्यामध्ये अनेक धबधबे तेथे वाहू लागतात व महाराष्ट्रातील महत्त्वाचा असा हा घाट मार्ग असून पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा या घाटातून प्रवास करावा लागतो. हा प्रवास त्यांचा आनंदीमय होतो, त्यामुळे बरेचसे लोक या आंबोली घटना भेट देत असतात.
आंबोली घाटाची भौगोलिक स्थिती :
आंबोली घाट हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये येतो, त्यामुळे हा घाट म्हणजे एक जादुई नगरी सारखाच आपल्याला वाटतो. हा घाट 690 मीटर उंच टेकडीवर वसलेला आहे. या घाटाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. हे एक जैवविविधतेच्या जगातील उत्तम हॉटस्पॉट पैकी आठव्या क्रमांकाचे एक आहे.
या प्रदेशाचा भूगोल घनदाट जंगल व उंच टेकड्या तसेच धबधब्यांनी नटलेला आहे. ही एक येथे परिसंस्था निर्माण होते. हा घाट कोकणाचा किनारी प्रदेश व महाराष्ट्राचा अंतर्भाग म्हणून एक पर्यावरणीय फुलच आहे. जो किनारी आणि डोंगरी जैवविविधतेचे एक मिश्रण आहे .
आंबोली घाट येथे पाहण्यासारखी स्थळे :
आंबोली घाटातील प्रसिद्ध धबधबा :
आंबोली घाटामध्ये जास्तीत जास्त लोकप्रिय असलेला हा धबधबा आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील हे आंबोलीत सर्वाधिक पाऊस पडतो तसेच पावसाळ्याच्या जुलै महिन्यामध्ये हा धबधबा पाहण्यासारखे पर्यटकांची गर्दी होते. तेथे पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे गाड्यांचा वेग सुद्धा कमी असतो. आंबोली येथील हा धबधबा पर्यटकांसाठी खूप मोठे पर्वणीच आहे.
हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक येतात वाहनांची तेथे गर्दी होते. त्यामुळे पोलीस निरीक्षक सुद्धा तेथे हजर असतात. हा धबधबा पाहण्यासाठी आंबोली घाटात पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. या घाटाच्या बाजूला खूप मोठी दरी आहे आणि दुसऱ्या बाजूला डोंगरकडा आहेत. जे पाहण्यासाठी अतिशय निसर्ग रम्य जणू काही डोळ्याचे पारणे खेळण्यासारखे दृश्य आहे.
रस्त्याच्या कडेला असलेल्या गोठड्यावर आपल्याला माकडे सुद्धा बसलेली दिसतात. तसेच त्यांची छोटी छोटी पिल्लं त्यांच्यासोबत असतात. धबधब्याकडे जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून धबधबा पाहण्यासाठी आपण जाऊ शकतो. उंचावरून पडणारे हे पाणी खूप मस्त दिसते. आणि ओले चिंब धबधब्याची थंडगार अशी फवारी आपल्या अंगावर उडते.
हिरण्यकेशी नदीचा उगम : आंबोली येथे गेल्यानंतर तुम्हाला भेट देण्यासाठी आणखीन एक ठिकाण म्हणजे हिरण्यकेशी नदीचा उगम धबधब्यापासून हा नदीचा उगम तीन चार किलोमीटर अंतरावर आहे तसेच येथे एक गुहा आहे आणि या भूमीतून या नदीचा उगम पाऊल पुढे वाहत जाते. त्याच्या उगमस्थानी एक महादेवाचे मंदिर आहे तसेच मंदिराच्या बाजूला जवळच एक पुण्य आहे. तेथे बाहेरून आलेले पर्यटक आंघोळ करतात. या नदीपासून थोड्याच अंतरावर नांगरतास हा धबधबा आहे.
हा धबधबा येथून पुढे आठ किलोमीटर अंतरावर आहे. चिंचोळ्या पट्टीतून वाहणारा हा पांढरा शुभ्र असा धबधबा आपल्याला प्रत्यक्ष पहावा म्हणून त्याच्याजवळ एक गॅलरी तयार करण्यात आलेली आहे. जी पर्यटक तेथे जाऊन पाहू शकतात व त्याच्या बाजूला थोडासा फुल बांधलेला आहे. या धबधब्याच्या प्रवाहामुळे नांगरासारख्या छटा आपल्याला दिसतात म्हणून या धबधब्याला नांगरतास धबधबा असे म्हणतात.
घनदाट जंगल : आंबोली घाटामधील घनदाट जंगल पाहण्याची मजाच खूप वेगळी असते. येथे तुम्ही घनदाट जंगल पाहू शकता तसेच तिथे विविध वृक्ष पाहू शकता. हे जंगल पाहून तुम्हालाही तिथे फिरण्याचा मोह आवरणार नाही. तसेच टूरला फिरण्यासाठी आणि फोटोग्राफीसाठी हे एक छान स्टेशन आहे. या घाटाची जैवविविधता ही अतिशय समृद्ध व वैविध्यपूर्ण आहे. येथे घनदाट हिरवळीची जंगले असून त्या जंगलांमध्ये अनेक प्राणी व दुर्मिळ प्रजातींच्या प्राण्यांचा समावेश आहे. तसेच पावसाळ्यामध्ये हे घनदाट जंगल आणखीनच सुंदर दिसते.
महादेव मंदिर : आंबोली घाट येथे तुम्ही जात असाल तर महादेव मंदिराला नक्कीच भेट द्या. हे मंदिर खूप सुंदर आहे तसेच मंदिराभोवतीचे वातावरण नैसर्गिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. निसर्गरम्य असे हे वातावरण मनाला मोहन टाकणारे आहे, त्यामुळे येथे गेल्यानंतर तुम्हाला शांतता मिळेल.
सनसेट पॉईंट : आंबोली घाटामध्ये एक सनसेट पॉईंट आहे. जेथे तुम्ही मावळत्या सूर्याचा आनंद घेऊ शकता व हे दृश्य आपल्या डोळ्यांनी टिपू शकता. अतिशय सुंदर असे हे नैसर्गिक सनसेट पॉईंट आहे.
कावळे शेत पॉइंट : कावळे शेट पॉईंट हे एक आकर्षक असे ठिकाण आहे. येथे निसर्गनिर्मित रम्य असे वातावरण आहे. आपल्याला येथून समोर एक मोठी दरी दिसते. तसेच समोरून येणारे ढग व त्यातून सूर्याचे येणारे किरणे दिसतात. त्यामुळे याला कावळे शेतात पॉईंट असे म्हणतात. येथून तुम्ही निसर्गनिर्मित सौंदर्य लाभलेला मनमोहक देखावा पाहू शकता.
आंबोली या घाटातील संस्कृती :
आंबोली या घाटाच्या आजूबाजूला राहणाऱ्या प्रदेशांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली जुनी संस्कृती विविध समुदायाची चैतन्यशील असे मिश्रण आढळते. तेथे मराठा संस्कृतीचा प्रभाव आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यांचे सण साजरे करताना हे लोक दिसून येतात.
त्यांच्या सणांमध्ये गणेश चतुर्थी हा सण मोठ्या धार्मिक उत्साहाने साजरा केला जातो. त्या व्यतिरिक्त आंबोली घाटाची संस्कृती, लोकनृत्य, लोकसंगीत व पारंपारिक कलाप्रकारांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे येथील लोक एक आनंददायी संस्कृतिक जीवन जगतात.
आंबोली या घाटात तुम्ही कसे जाल :
अबोली हा घाट सौंदर्य दृष्टीने नटलेला आहे त्यामुळे पश्चिम घाटांमधील विपुल जैवविविधता या जंगलांमध्ये आहे. येथे अनेक संशोधने सुरू आहेत. जर तुम्हाला येथे जायचे असेल तर तुम्हाला पुणे, मुंबई, सावंतवाडी, बेळगाव, गोवा या ठिकाणावरून आंबोली घाटात जाता येते. हा घाट महाराष्ट्र व कर्नाटकच्या रस्त्यावर आहे. त्यामुळे येथून बसेस उपलब्ध आहेत. तुम्हाला जर स्वतः कारणे जायचं असेल तर तुम्ही गोव्यावरून जाऊ शकता.
गोव्यावरून हा घाट 117 किलोमीटर अंतरावर आहे. तर बेळगाव वरून जायचे असेल तर आंबोली घाट आपल्याला 60 किलोमीटर अंतरावर पाहायला मिळतो. जर तुम्हाला सावंतवाडीतून जायचे असेल तर तिथून तीस किलोमीटर अंतरावर हा घाट आहे. येथे तुम्ही जाऊन आपल्या सहलीचा आनंद घेऊ शकता व तेथील निसर्गतः नटलेल्या अशा सुंदर देखाव्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
जेवणाची व राहण्याची व्यवस्था :
तुम्हाला आंबोली घाट पाहण्यासाठी दोन-तीन दिवस घालवायचे असेल तर त्यासाठी आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये लोक वस्ती आहे. तिथे तुम्ही मदत घेऊ शकता किंवा मग राहण्यासाठी व जेवणासाठी हॉटेल, रेस्टॉरंट काही गावाच्या बाहेर उपलब्ध आहेत. तिथे सुद्धा तुम्ही राहू शकता व आपल्या जेवणाची व्यवस्था करू शकता. येथील स्थानिक पाककृती खूप प्रसिद्ध आहे तसेच येथे कोकण विभागातील पाकपरंपरांचे पालन मोठ्या प्रमाणात केले जाते. येथे तुम्ही मालवणी खाद्यपदार्थ खाऊ शकता. येथील आहारामध्ये मुख्यता तांदूळ, नारळ व मासे यांचा उपयोग होतो.
FAQ
आंबोली घाट कशासाठी प्रसिद्ध आहे?
आंबोली घाट हा तेथे असलेले धबधबे आणि धुके यासाठी प्रसिद्ध आहे.
आंबोली घाट हा किती लांब आहे?
31 किलोमीटर.
आंबोली हा घाट कोणी बांधला आहे?
1880 मध्ये ब्रिटिश नागरिक कर्नल वेस्टॉप.
महाराष्ट्र राज्यात किती घाट आहेत?
महाराष्ट्रात एकूण 15 घाट आहेत.
पश्चिम घाट हा कोठे सुरू होतो?
गुजरात पासून सुरू होतो आणि महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ या राज्यांना व्यापून संपतो.