आवळा कँडी रेसिपी Amla Candy Recipe In Marathi आवळा कँडी हा आवळे उकडून तयार केलेला एक स्वादिष्ट आणि गोड पदार्थ आहे. भारतात विविध ठिकाणी आवळा कँडी वेळ वेगळ्या प्रकारे बनवली जाते. आवळा कँडी हा सर्वात लोकप्रिय आणि चवदार पदार्थ आहे. कँडी हे एक औषधी सुध्दा आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, आढळून येते. जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहे. यामुळे आपले डोळे आणि पचनशक्ती चांगली राहते.
आपण हॉटेल किंवा दुकानवर पाहिले असेल किती स्वादिष्ट आवळा कँडी खायाला मिळते. काही लोकांना आवळा कँडी खूप आवळते. पण त्याचा परिसरात चवदार आवळा कँडी मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट आवळा कँडी कशी बनवतात यांची रेसिपी. आता आपण आवळा कँडी रेसिपी पाहणार आहोत.
आवळा कँडी रेसिपी Amla Candy Recipe In Marathi
आवळा कँडीचे प्रकार :
आवळा कँडी एक चवदार पदार्थ आहे. आवळा कँडीचे अनेक प्रकार पडतात, जसे आवळा कँडी, आवळा बर्फी, आवळा लोणच, आवळा ज्यूस, हे सर्व प्रकार खायाला एकदम स्वादिष्ट प्रकार आहेत.
किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
आवळा कँडी ही रेसिपी आपण 10 व्यक्तिकरिता बनवणार आहे.
आवळा कँडीच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :
आवळा कँडी तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर आपण लवकर रेसिपी बनवू शकतो, यासाठी आपल्याला 10 मिनिट वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
आवळा कँडी कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.
टोटल टाईम :
आवळा कँडी तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते. नंतर कुकिंग करावी लागते. कुकिंग झाल्यावर आवळा कँडी 5 ते 6 दिवस भिजू आणि वाळू घालावी लागते. यासाठी आपल्याला टोटल टाईम 6 दिवस 30 मिनिट वेळ लागतो.
आवळा कँडीसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) 1 किलो ताजे आवळे.
2) अर्धा किलो साखर.
3) 1 वाटी पिठी साखर.
पाककृती :
- कढी रेसिपी मराठी
- सर्वात प्रथम आवळे 2 वेळा स्वच्छ धुऊन घ्या, नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या.
- नंतर गॅस चालू करून, एक खोल तळाचे भांडे गॅस वरती ठेवा. त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी टाकून.
- त्यामध्ये आवळे उकळू घाला. गॅस मोठ्या आसेवर ठेऊन त्याला एक उकडी आली की गॅस बंद करा.
- आवळे जास्त शिजायला नको, नाहीतर त्याचा पाकळ्या वेग-वेगळ्या निघतील नाही.
- पाणी थोडे थंड झाले की, त्यातील आवळ्याचा पाकळ्या काढा, आणि त्यातील बिया वेगळ्या काढा.
- नंतर आवळ्याचा पाकळ्या आणि साखर एका मोठ्या हवाबंद डबामध्ये टाकून, व्यवस्थित मिक्स करा.
- आणि 2 ते 3 दिवस व्यवस्थित ठेऊन द्या. डब्याला अधून-मधून थोडे हलवत जा, म्हणजे साखर आवळ्यात चांगली मुरेल.
- नंतर 2 ते 3 दिवस नंतर ह्या पाकळ्या उन्हात वाळू घाला, जेवढा जास्त टाईम तुम्ही वाळू घाल तेवढा जास्त काळ आवळा कँडी टीकून राहील.
- आवळा कँडी पूर्ण कडक झाली पाहिजे, नाहीतर ते मऊ राहली तर लवकर खराब होणार.
- आवळा कँडी कडक झाली की, त्यावर 1 वाटी पिठी साखर टाकून, चांगले मिक्स करा.
- आता आपली स्वादिष्ट आणि गोड आवळा कँडी खाण्यासाठी तयार आहे. एका छोट्या वाटीत घेऊन आपण आवळा कँडी खाण्याचा आनंद घेऊ शकतो.
आवळा कँडीमध्ये असणारे घटक :
आवळा कँडी खाण्यासाठी एकदम स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. यामध्ये विविध घटक असतात, जसे कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, प्रोटीन, शुगर, फॅट, व्हिटॅमिन हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.
फायदे :
आवळा कँडीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. यामुळे आपले डोळे, त्वचा आणि केस चांगेल राहतात.
आवळा कँडीमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती व पचनक्रिया चांगली राहते. हे आपल्यासाठी खूप फायद्याची आहे.
यामध्ये असणारे व्हिटॅमिन, प्रोटीन, शुगर असे सर्व घटक आपले शरीर निरोगी ठेवते.
तोटे :
आवळा कँडी आपण जास्त प्रमाणात सेवन केली तर, आपल्याला पोट दुखी होऊ शकते.
तसेच यामध्ये असणारे पौष्टिक घटक आपल्याला शरीरात जास्त झाले तर आपण आजारी पडू शकतो.
म्हणून आवळा कँडी आपण योग्य प्रमाणात सेवन केली पाहिजे. ज्यामुळे आपण निरोगी राहू.
तर मित्रांनो, तुम्हाला आवळा कँडी रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.