अंडाकरी रेसिपी मराठी Anda Kari Recipe in Marathi

अंडाकरी रेसिपी मराठी Anda Kari Recipe in Marathi  अंडा करी बऱ्याच लोकांची आवडती रेसिपी आहे.  आपण हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये गेलो तर अंडा करी मागवत असतो परंतु हीच अंडा करी जर आपण आपल्या स्वतःच्या हाताने घरी केली तर किती छान वाटेल, कारण आपण त्यामध्ये आपल्याला हवी तशी ग्रेव्ही, तिखट याचं प्रमाण व्यवस्थित ठेवू शकतो. आणि तेही कमी वेळात तसेच हॉटेल किंवा रेस्टॉरंट सारखीच चविष्ट.  अंडा करी ही भाजी आपण खूपच कमी वेळात बनवू शकतो.  आपल्याला जर ऑफिसमध्ये टिफिन न्यायचा असेल किंवा मग कॉलेजला जायचे असेल तर पटापट अंडा करी रेसिपी तयार करून सोबत घेऊन जाऊ शकता.  अंडा करी रेसिपी ही आपण पोळी, तंदुरी रोटी, भाकरी किंवा भात यांच्यासोबत खाऊ शकतो.  तसेच त्यामध्ये ग्रेव्ही आपण कमी जास्त प्रमाणात बनवू शकतो.  तर चला मग जाणून घेऊया अंडा करी ही रेसिपी कशी बनवायची.

Anda Kari

अंडाकरी रेसिपी मराठी Anda Kari Recipe in Marathi

रेसिपी प्रकार  :

आपण अंडाकरी रेसिपी विषयी बोलत आहोत.  अंडे हे अतिशय पौष्टिक असे अन्न आहे.  एक पूर्ण अंड म्हणजे संपूर्ण पोषण जगभरात बरेच लोक सकाळी अंडा, ऑम्लेटची न्याहरी करतात. कारण त्यातून शरीराला न्यूट्रिशन मिळतात.  अंडी खाल्ली तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्या शरीराला होतो.  अंडाकरी बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे.  त्यामध्ये टोमॅटो ग्रेव्ही अंडा करी, ग्रीन ग्रेवी अंडा करी, अंडा भुर्जी, अंडा बिर्याणी इत्यादी अनेक पदार्थ अंड्यापासून तयार केले जातात.  तुम्ही सुद्धा खालील माहितीच्या आधारे घरच्या घरी स्वादिष्ट अशी अंडाकरी बनवून बघा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.  तर चला मग जाणून घेऊया अंडा करीसाठी लागणारी सामग्री.

ही रेसिपी किती जणांकरिता आहे ?

ही रेसिपी 5 जणांकरिता बनवणार आहोत.

पूर्वतयारीकरिता लागणारा वेळ  :

अंडाकरी रेसिपी तयार करण्याकरिता आपल्याला पूर्वतयारी करावी लागते व यापूर्वतयारी करिता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम  :

अंडा करी शिजवण्यासाठी आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम  :

अंडाकरी रेसिपी तयार करण्याकरता आपल्याला एकूण 25 मिनिटे एवढा वेळ लागतो.

अंडाकरीसाठी लागणारी सामग्री  :

1)  अंडी: 6

2) दोन कांदे बारीक चिरलेले

3) चार हिरव्या मिरच्या

4) दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट

5) दोन टोमॅटोची पेस्ट

6) अर्धा चमचा गरम मसाला

7) अर्धा चमचा जिरे

8) पाव चमचा हळद

9) दीड चमचा मिरची पावडर

10)  कोथिंबीर

11) एक चमचा धने पावडर

12)  एक चमचा गरम मसाला

13) मीठ चवीनुसार

14) एक वाटी तेल

15) पुदिन्याची सहा पाने

अंडाकरी बनवण्याची पाककृती  :

 • चिवडा रेसिपी मराठी
 • सर्वप्रथम आपल्याला अंडी बॉईल करून घ्यायची आहे व ती सोलून त्याचे मधून काप करून घ्यायचे आहेत.  जेणेकरून अंडी तळत असताना तेलामध्ये फुटणार नाहीत.
 • नंतर गॅसवर एक पॅन ठेवा व त्यामध्ये तेल टाका.
 • तेल गरम झाले की, मिरची हळद मिरपूड आणि मीठ टाका.  नंतर त्यामध्ये अंडी टाकून थोडा वेळ अंडी परतून घ्या.
 • आता त्याच तेलामध्ये जिरे आणि गरम मसाला टाका नंतर त्यामध्ये कांदा घालून तपकिरी होईपर्यंत परतून घ्या.
 • नंतर त्यामध्ये आले लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, हळद, मिरची पूड टाकून भाजून घ्या.
 • नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून थोडा वेळ पुन्हा शिजवून घ्या.  टोमॅटो व्यवस्थित शिजल्यावर त्यातील पाणी टाकून ग्रेव्ही बनवून दोन मिनिटे शिजवून घ्या.
 • नंतर किसलेल्या ओल्या नारळाची मिक्सरमधून पेस्ट करून घ्या.  यामुळे भाजीची चव बदलते व खायला चवदार लागते.
 • नंतर ही पेस्ट ग्रेव्हीमध्ये टाका.  आता त्यामध्ये तळलेली अंडी टाका आणि थोडा वेळ शिजवून घ्या.
 • आता त्यामध्ये गरम मसाला आणि कोथिंबीर टाका व गरमागरम अंडाकरी रेसिपी तयार आहे.
 • ही भाजी एका सर्विंग भांड्यात काढून ती तंदुरी रोटी पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.

पोषक घटक  :

अंडा करीमध्ये असणारे पोषक घटक आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी आहेत.  अंड्यामध्ये विटामिन डी, विटामिन ई, विटामिन के, विटामिन बी 6, झिंक, कॅल्शियम, प्रथिने, फॅट्स व कॅलरीज यांचा समावेश असतो.  त्यामुळे अंडे हे पोषक तत्त्वांनी असा परिपूर्ण पौष्टिक आहार आहे.

फायदे  :

अंडाकरी खाण्याचे फायदे पुढील प्रमाणे आहेत.

अंड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे आपले वजन कमी करण्यासाठी ते मदत करतात.  अंड्याचे सेवन केल्यानंतर आपले पोट बराच वेळ भरलेले राहते.  त्यामुळे आपल्याला भूक लागत नाही.

अंडे हे आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे.  अंड्यामधून आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन प्राप्त होतात, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

जर आपण दररोज एक अंड खाल्ले तर हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉलचा धोका देखील कमी होऊ शकतो.

अंडाकरी खाल्ल्याने शरीरातील स्नायू मजबूत होतात मेंदू आणि मज्जा संस्था व्यवस्थित काम करतात.

तोटे  :

अंडी खाणे तशी फायदेशीर आहे; परंतु बऱ्याच लोकांना अंड्यांपासून एलर्जी असते, अशा लोकांनी अंडी खाणे टाळावे किंवा हे प्रमाण मर्यादितच ठेवले पाहिजे, नाही तर त्यापासून आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात.

अंडी हा उष्ण पदार्थ आहे, त्यामुळे उन्हाळ्यात जास्त अंडी खाल्ल्यास आपल्या शरीराची उष्णता वाढते.  त्यापासून पोटाचे आजार, अपचन समस्या, पोटात गॅस अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

शरीरातील उष्णता वाढल्याने जुलाब देखील होऊ शकतो.  त्यामुळे अंडी खाताना प्रमाणातच खाल्ले पाहिजे.

तर मित्रांनो, तुम्हाला अंडा करी ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना.

Leave a Comment