अनुश्री माने यांची संपूर्ण माहिती Anushree Mane Information In Marathi

Anushree Mane Information In Marathi आज काल काय व्हायरल होईल याचा नेम नाही. मध्यंतरीच्या काळात टिक टॉक हे ॲप्लिकेशन फार गाजलं, आणि या टिक टॉक मुळे सामान्य समाजातील तरुण-तरुणींना आपल्यातील कलागुणांना वाव देण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे अनेक नवोदित कलाकार तयार होण्यास मदत मिळाली. तसेच चांगला अभिनय करणाऱ्या लहानांपासून मोठ्या कलाकारांना देखील विविध शॉर्ट फिल्म, वेब सिरीज, आणि अगदी मूवी यामध्ये देखील कामे मिळाली.

Anushree Mane Information In Marathi

अनुश्री माने यांची संपूर्ण माहिती Anushree Mane Information In Marathi

आजच्या भागामध्ये आपण अशाच एका टिक टॉक स्टार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या आणि शाळा या वेब सिरीज ने संपूर्ण देशभर प्रसिद्ध झालेल्या अनुश्री माने या सोशल मीडिया इन्फ्लोअन्सर आणि इंस्टाग्राम मॉडेल बद्दल माहिती घेणार आहोत…

आपल्या गोड हसण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आणि तितक्याच सुंदर दिसणाऱ्या या अनुश्री मानेला सोशल मीडियावर अनेक फॉलोवर आहेत. तिला अभिनयाबरोबरच प्रवास करणे, व्लॉगिंग करणे, मॉडेलिंग करणे, आणि नृत्य करणे इत्यादी गोष्टींमध्ये सुद्धा आवड आहे. चला तर मग आजच्या भागामध्ये आपण अनुश्री माने बद्दल माहिती बघूया…

नावअनुश्री माने
टोपण नावेअनु, निलू, अनी
जन्म दिनांक२५ सप्टेंबर २००१
वय२२ वर्षे
जन्म स्थळवाई, सातारा, महाराष्ट्र
सध्या वास्तव्यसातारा, महाराष्ट्र.
लिंगस्त्री
राष्ट्रीयत्वभारतीय
धर्महिंदू
व्यवसायअभिनेत्री, सोशल मीडिया इन्फल्युइन्सर, आणि माजी टिक टॉक स्टार
प्रसिद्धीशाळा वेबसिरीज मधील निलू हा रोल

टिक टॉक या अँप वरून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे अनुश्री माने होय, लीप सिंक आणि शॉर्ट व्हिडिओज बनवून टिक टॉक वर तिने आपले असंख्य फॉलोवर्स बनवले होते, मात्र मध्यंतरी या ॲपवर बंदी आली. त्यामुळे तिने जोश या ॲपद्वारे पुन्हा आपले नव्याने करिअर सुरू केले.

तिने आपल्या उच्च माध्यमिक शिक्षणाकरिता साताऱ्यातील अनंत इंग्लिश स्कूल या शाळेची निवड केली. तेथे प्रवेश घेतल्यानंतर तिने डीजी असे नाव वापरून नोंदणी केली. आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने साताऱ्यातीलच एका वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन वाणिज्य शिक्षण सुरुवात केली. तिच्या उच्च शिक्षणाबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही…

अनुश्री माने यांचे कौटुंबिक जीवन:

अनुश्री माने यांना आपली आई अतिशय जवळची आहे. त्यांच्या आईचे नाव सुरेखा माने असे असून, अनुश्री माने यांचे इंस्टाग्राम अकाउंट त्यांच्या आईच्या फोटोंनी गच्च भरलेले आहे. त्यांच्या आईचे स्वतःचे असे दुसरे इंस्टाग्राम अकाउंट देखील आहे, मात्र अनुश्री माने यांच्या वडिलांबद्दल फारशी माहिती नाही. त्यांचे कुटुंबीय त्यांना अनु या प्रेमळ नावाने हाक मारतात.

अनुश्री माने यांच्या भावंडा बद्दल सुद्धा माहिती आढळून येत नाही. शक्यतो अनुश्री माने त्यांच्या आई-वडिलांच्या एकुलत्या एक मुलगी असाव्यात, असे प्रथमदर्शनी वाटते.

अनुश्री माने यांचे वय २२ वर्षे असून त्यांची उंची पाच फूट चार इंच इतकी आहे. त्यांनी आपले शरीर अतिशय योग्य रित्या मेंटेन ठेवलेले आहे, त्यामुळे त्यांचे वजन ५५ किलो ग्रॅम इतके आहे.

अनुश्री माने यांच्या करिअर बद्दल माहिती:

अनुश्री माने यांनी आपले करिअर टिक टॉक या अँपच्या माध्यमातून सुरू केले होते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी अभिनय क्षेत्रात आपल्या अभिनयाने फार मोठा ठसा उमटवलेला आहे. २०१८ मधील मिस टीना सातारा या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. किशोरवयीन मॉडेल्स मधील त्या एक उत्तम आणि लोकप्रिय मॉडेल ठरत आहेत…

त्यांनी शाळा या वेब सिरीज मधून आपल्या अधिकृत अभिनय क्षेत्रास सुरुवात केली. जी वेब सिरीज इसवी सन २०१९ मध्ये सुरू झाली होती. या वेब सिरीज मध्ये नीलू ही त्यांची भूमिका फारच गाजली होती. आदिनाथ जाधव या किशोरवयीन अभिनेत्यासोबत त्यांनी शालेय प्रेमाबद्दल या वेब सिरीज मध्ये काम केले होते.

यामध्ये त्यांना कौशल आणि आदिनाथ जाधव या अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी शाळा या वेब सिरीज नंतर तंतर या नावाची दुसरी वेब सिरीज सुद्धा केली, जी एक हॉरर आणि कॉमेडी अशा दोन्ही प्रकारच्या अभिनयांचा एक मिलाप होती.

या वेब सिरीज मध्ये त्यांनी अंजली म्हणून काम केले होते. तसेच आदिनाथ जाधव यांच्यासोबत त्यांनी ‘प्रेमाची धून’ या चित्रपटात काम केले. तसेच ‘तू सांग ना’ आणि ‘लव्ह’ इत्यादी गाण्यांमध्ये देखील त्यांनी काम केलेले आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय हा अभिनय असून, त्यातून त्यांनी चांगला पैसा कमवलेला आहे. यामुळे त्यांची नेटवर्थ ही दोन बिलियन पर्यंत पोहोचलेली आहे.

निष्कर्ष:

या दुनियेमध्ये प्रसिद्ध व्हायला वेळ लागत नाही, मात्र त्यासाठी आपण प्रयत्नांची परकाष्ठा करणे गरजेचे असते. हेच उदाहरण अनुश्री माने यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. सुरुवातीला एक मॉडेल म्हणून करिअर ची सुरुवात करणारी अनुश्री माने २०१८ या वर्षी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षीच मिस टीना सातारा २०१८ या स्पर्धेमधील दुसरी उपविजेती ठरली होती.

येथून तिच्या प्रसिद्धीला सुरुवात झाली तिने टिक टॉक च्या माध्यमातून देखील अनेक चाहत्यांना आपलेसे केले. पुढे जाऊन आदिनाथ जाधव यांच्यासोबत अनुश्री माने शाळा या मराठी युट्युब वेब सिरीज मध्ये दिसली. ही वेब सिरीज शाळेतील गमतीजमतीवर आणि शाळेतील पहिल्या प्रेमावर आधारित होती. या वेब सिरीज ला आशिष आणि श्रावणी यांनी दिग्दर्शित केले होते.

शाळा वेब सिरीज पासून मात्र अनुश्री माने ही सर्वत्र प्रसिद्ध झाली. तिच्या फॅन फॉलोविंग मध्ये कमालीची वाढ झाली. आणि तेथून तिने कधीही मागे पाहिले नाही. २०२१ मध्ये तंतर या वेब सिरीज मध्ये सुद्धा अनुश्री माने दिसली. ज्या मध्ये तिने अंजली ही भूमिका साकारली होती. ही वेब सिरीज एक हॉरर आणि कॉमेडी वेब सिरीज होती. अश्या रीतीने आपलं करिअर करत आज

तिने प्रसिद्धीचे उंच शिखर गाठले आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आणि संगीत अल्बम मध्ये सुद्धा काम केलेले आहे. आज मीतीस अनुश्री माने यांची नेटवर्थ सुमारे दोन दशलक्ष डॉलर्स पर्यंत आहे.

FAQ

अनुश्री माने यांनी सर्वप्रथम कोणत्या वेब सिरीज मध्ये काम केलेले आहे?

अनुश्री माने यांनी सर्वप्रथम शाळा या वेब सिरीज मधून काम केलेले आहे.

अनुश्री माने यांना कोणकोणत्या टोपण नावांनी ओळखले जाते?

अनुश्री माने यांना अनु, निलू, आणि अनि इत्यादी टोपण नावांनी ओळखले जाते.

अनुश्री माने यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे?

अनुश्री माने यांचा जन्म महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामधील वाई या गावांमध्ये झालेला आहे.

अनुश्री माने यांचे वय काय आहे?

अनुश्री माने यांचे आज मितीस वय २२ वर्षे पूर्ण इतके आहे.

एका संगीत अल्बम साठी अनुश्री माने किती रुपये चार्ज करतात?

एका संगीत अल्बम साठी अनुश्री माने एक लाख रुपयांपर्यंत रक्कम चार्ज करतात.

आजच्या भागामध्ये आपण अनुश्री माने यांच्या बद्दल माहिती आणि त्यांचे जीवनचरित्र पाहिले. या माहितीबद्दलची आणि अनुश्री माने यांच्या बद्दलची ही तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये वाचायला नक्कीच आवडेल, तसेच अनुश्री माने यांच्या चाहत्यांना ही माहिती शेअर करण्यास विसरू नका…

 धन्यवाद…

Leave a Comment