Anutai Wagh Information In Marathi आज काल प्रगतीच्या वाटेवर प्रत्येक जण आपल्या सह सोबत्यांना किंवा आसपासच्या लोकांना विसरत चाललेला आहे. प्रत्येक जण स्वतःचा विचार करत, आपल्या आसपास असणाऱ्या लोकांना डावलून स्वतः कसे पुढे जाता येईल याचाच विचार करत आहे. मात्र या जगामध्ये असे देखील अजूनही काही लोक आहेत, ज्यांना स्वतःपेक्षा समाजाचे हित जास्त महत्त्वाचे वाटते. त्यामुळे ते समाजाचे सेवा या क्षेत्रामध्ये उतरत असतात.
अनुताई वाघ यांची संपूर्ण माहिती Anutai Wagh Information In Marathi
भारतातील अशाच एक समजेसेवी व्यक्ती किंवा महिला म्हणून अनुताई वाघ यांना ओळखले जाते. त्यांनी आदिवासींच्या सुधारणांमध्ये मोलाचे कार्य करत आपला नावलौकिक देखील वाढवलेला आहे. १९१० यावर्षी जन्मलेल्या अनुताई वाघ यांचे जन्मस्थळ पुणे समजले जाते. त्यांनी आपले सुरुवातीचे आयुष्य शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा देऊन सुरू केले होते.
सोबतच त्यांनी शिक्षण देखील घेणे सुरू ठेवले होते. यातूनही आपण समाजासाठी देणे लागत आहोत, आणि समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या उदात्त हेतूने त्यांनी समाजसेवेचा वसा घेतला, आणि अनेक आदिवासी बंधू-भगिनींच्या जीवनासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. आजच्या भागांमध्ये आपण याच अनुताई वाघ यांच्या बद्दल माहिती घेऊन त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणार आहोत…
नाव | अनुताई वाघ |
जन्म दिनांक | १७ मार्च १९१० |
जन्म स्थळ | मोरेगाव, पुणे |
धर्म | हिंदू |
ओळख | समाज सुधारक किंवा समाजसेवक |
नागरिकत्व | भारतीय |
एक शिक्षक आणि एक स्त्री संपूर्ण समाज बदलू शकते असे आपल्याकडे नेहमी म्हटले जाते. मात्र हे दोन्ही व्यक्तिमत्व एकाच व्यक्तींमध्ये असतील तर किती मोठ्या प्रमाणावर बदल किंवा प्रगती होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून अनुताई वाघ यांना ओळखले जाते. सु
प्रसिद्ध समाजसेविका असण्याबरोबरच आदर्श शिक्षक म्हणून देखील त्यांचा गुणगौरव सर्वत्र केला जातो. मित्रांनो, आपल्या करिअरला त्यांनी १९२९ यावर्षी सुरुवात केली होती, ज्यावेळी त्या शिक्षक म्हणून नियुक्त झाल्या होत्या. त्यांनी १९४४ या वर्षापर्यंत अनेक ठिकाणी आपली शिक्षण सेवा दिलेली आहे, ज्यामध्ये चांदवड – पिंपळगाव, तसेच हुजूरपागा इत्यादी ठिकाणांचा समावेश होतो.
नोकरी करताना त्यांनी रात्र शाळेमध्ये देखील प्रवेश मिळवला होता, आणि या दरम्यान त्यांनी मॅट्रिकची परीक्षा आणि बीए ही परीक्षा उत्तीर्ण करून शिक्षण क्षेत्रामध्ये नाव कमावले होते.
पुढे एका ग्रामसेवकांच्यासाठीच्या कार्यक्रमांमध्ये त्यांची ओळख ताराबाई मोडक यांच्याशी झाली होती. या ताराबाई मोडक यांनी ग्राम बाल शिक्षण केंद्र स्थापन करून, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कार्य केले होते. अनुताई वाघ यांना देखील या क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे ताराबाई यांच्या सोबत यांचे चांगले सूत जुळले. पुढे ताराबाई यांनी अनुताई वाघ यांना मदतनिस म्हणून ठेवून घेतले, आणि या दोघींनी मिळून सुमारे १९५६ या वर्षापर्यंत या केंद्रामध्ये चांगले काम केले होते.
अनुताई वाघ यांच्या समाजसेवेला सुरुवात:
अनुताई वाघ यांनी आपल्या समाजसेवेची सुरुवात किंवा झेंडा हा पालघर जिल्ह्याचा कोसबाड या ठिकाणावरून रोवला होता. त्यांनी इसवी सन १९५६ यावर्षी या ठिकाणावर विकास वाडी हा अनोखा प्रयोग राबविला. ज्या अंतर्गत त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य केले. पुढे ग्राम बाल शिक्षण केंद्र याच्या संचालक पदी त्यांना १९७३ मध्ये नियुक्त करण्यात आले. त्या अंतर्गत लहान मुलांसाठीच्या शिक्षण संस्था, अंगणवाडी इत्यादी अनेक ठिकाणांचे व्यवस्थापन त्यांच्या निगराणी खाली आले.
आदिवासींसाठीचे कार्य:
अनुताई वाघ यांनी मुख्यतः आदिवासी व्यक्तींसाठी कार्य केलेले आहे, हे आपल्याला माहितीच आहे. त्यांनी मुख्यतः येथील महिला व लहान मुले यांच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्नपूर्वक लक्ष दिले होते. त्यांनी स्थापन केलेल्या विकास वाडी या कार्यक्रमांतर्गत लहान वयापासून अगदी १४ वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण देण्याचे कार्य राबवले होते.
त्यांनी विविध मंदिरे, महाविद्यालय, आणि समाजाच्या माध्यमातून आदिवासी मुलांकरिता शिक्षण सुरूच ठेवले. त्यामुळे आदिवासी लोकांनी अनुताई वाघ यांना आपले नेते समजले होते. पुढे ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांची महिला जागृती समिती मध्ये अध्यक्षपदी देखील निवड करण्यात आलेली होती.
अनुताई वाघ यांचे सन्मान:
आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य केल्यामुळे अनुताई वाघ यांना अनेक ठिकाणी सन्मानित करण्यात आले होते. भारताचे एक प्रतिष्ठित नेते असणारे ए डी एन वाजेपेई यांनी अनुताई वाघ यांना महान समाज सुधारक म्हणून निर्देशित केले होते. त्यांना जमनालाल बजाज हा पुरस्कार देखील मिळाला होता त्याचे वर्ष होते १९८५.
त्याचबरोबर त्यांना इचलकरंजी फी फाउंडेशन, आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्याचबरोबर एक आदर्श शिक्षक, दलित मित्र, मातोश्री पारखे स्मृती आदर्श महिला, सावित्रीबाई फुले पुरस्कार, जानकीदेवी बजाज पुरस्कार, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार, यांसारखे प्रचंड महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत.
अनुताई वाघ यांनी आपले एक आत्मचरित्र देखील लिहिलेले आहे, ज्याचे नाव मराठीमध्ये कोसबाडच्या टेकडीवरून असे आहे. या पुस्तकांनंतर खऱ्या अर्थाने अनुताई वाघ खूपच प्रसिद्ध झाल्या होत्या.
अशा या संपूर्ण हयात समाजासाठी व्यतित करणाऱ्या अनुताई वाघ यांचे निधन २७ सप्टेंबर १९९२ या दिवशी झाले. त्यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत आदिवासी समाजासाठी कार्य केलेले आहे.
निष्कर्ष:
समाज हा कोणी एकट्या व्यक्तीचा मिळून बनलेला नसतो. समाज एकत्र बांधण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे योगदान महत्त्वाचे असते, यातील प्रत्येक व्यक्ती हा सारखाच असेल असे नाही. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक या प्रत्येक दृष्टीने प्रत्येकामध्ये उन्नीसबीस किंवा चढ उतार दिसून येत असतात.
त्यातील आजकाल आर्थिक बाब ही खूपच महत्वाची ठरत आहे. आणि अनेक गरीब आपल्या आसपास आपल्याला दिसून येत असतात. मात्र आपण प्रगतीच्या वाटेवर इतके वेगाने धावत आहोत, की आपल्या समाज बांधवांकडे लक्ष देण्यासाठी आपल्याकडे वेळ उरत नाही.
यासाठी मोठ्या काळजाने अनेक लोक प्रयत्न करत असतात, ज्यांना समाजसुधारक म्हणून ओळखले जाते. आजच्या भागामध्ये आपण अनुताई वाघ या एका स्त्री समाजसुधारकाबद्दल माहिती बघितलेली आहे. त्यांनी अगदी अलीकडच्या काळामध्ये आदिवासी बांधवांसाठी समाज सेवा करत त्यांच्या जीवनाला वेगळी कलाटणी दिलेली आहे.
या माहितीमध्ये त्यांनी केलेल्या समाजसुधारणा व कार्य, त्याचबरोबर कोसबाड येथील विकासवाडी, आदिवासी बांधवांसाठी केलेले कार्य, त्यांच्या कामाबद्दल त्यांना मिळालेली प्रतिष्ठा, आणि पुरस्कार इत्यादी माहिती बघितली आहे…
FAQ
अनुताई वाघ यांचा जन्म कोणत्या दिवशी आणि कोणत्या ठिकाणी झाला होता?
अनुताई वाघ यांचा जन्म दिनांक १७ मार्च १९१० या दिवशी पुण्याच्या मोरेगाव या गावी झाला होता.
अनुताई वाघ यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे?
अनुताई वाघ यांनी समाजसेवा, त्यातही आदिवासींसाठीचे मोलाचे कार्य या क्षेत्रामध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.
आदिवासींना मदत करताना त्यांनी कोणाच्या क्षेत्राला मुख्यतः लक्ष केले होते?
अनुताई वाघ यांनी आदिवासींना त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी कार्य केले होते, यातही त्यांनी शिक्षण हे क्षेत्र महत्त्वपूर्णरित्या लक्षित केले होते.
कोणत्या प्रसंगामुळे अनुताई वाघ यांच्या जीवनामध्ये अमृता बद्दल घडून आला?
एकदा १९४५ या वर्षी ग्रामसेवकांसाठीच्या प्रशिक्षण शाळेचे आयोजन केले होते. हे प्रशिक्षण बोरिवली येथे असल्याने तेथे त्यांना ताराबाई मोडक यांच्याशी भेटण्याचा योग आला, आणि त्यांना भेटल्यापासून अनुताई वाघ यांच्या जीवनामध्ये फार मोठा अमूलाग्र बदल दिसून आला.
ताराबाई मोडक यांनी कोणते महत्त्वपूर्ण कार्य केले होते?
ताराबाई मोडक यांनी ग्राम बाल शिक्षण केंद्र हे पालघर जिल्ह्याच्या बोर्डी या ठिकाणी स्थापन केले होते, यामुळे अनुताई वाघ यांना मोठी प्रेरणा मिळाली होती.