APJ Abdul Kalam Information In Marathi एपीजे अब्दुल कलाम हे एक शास्त्रज्ञ होते तसेच ते भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून सुद्धा ओळखले जातात. त्यांनी भारताला एक स्वावलंबी व तांत्रिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र म्हणून पाहण्याचे स्वप्न पाहिले होते, त्यांनी अशा देशाची कल्पना केली होती. जिथे प्रत्येक नागरिकांना शिक्षण व उत्कृष्ट तिच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यांनी तरुणांना स्वप्न पाहण्यास सांगितले तसेच विज्ञान संशोधन आणि नवीन कल्पना या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी सुद्धा प्रेरित केले होते.
एपीजे अब्दुल कलाम यांची संपूर्ण माहिती APJ Abdul Kalam Information In Marathi
आपण जर स्वप्न पाहिले तर एक समृद्ध व विकसित असे राष्ट्र बनवू शकतो असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांनी भारतातील तरुणांना देशांना उज्वल भविष्याकडे घेऊन जाण्यासाठी व विविध क्षेत्रांमध्ये तसेच जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यासाठी स्वप्न पाहण्यासाठी सांगितले होते व हे स्वप्न केवळ पाहणे नाही तर त्यासाठी परिश्रम करून राष्ट्राच्या प्रतीत योगदान देण्यासाठी सुद्धा प्रोत्साहित केले होते.
अब्दुल कलाम यांचा जन्म व बालपण :
अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तमिळनाडू मधील रामेश्वरम या गावी झाला. हे एका सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आले होते, त्यांचे वडील हे जैनुलब्दीन होते तसेच हे एका बोटीचे मालक होते. त्यांचे वडील हे शिक्षित नव्हते परंतु कलाम यांना त्यांनी उच्च शिक्षण देण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांची आई अशीम्मा ह्या घर गृहस्थी होत्या तसेच डॉक्टर कलाम यांच्या वडिलांनी त्यांना लहानपणापासूनच कठोर परिश्रम प्रामाणिकपणा आणि दया ही मूल्ये दिली होती.
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे शिक्षण :
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना शिक्षण देण्यासाठी त्यांच्या वडिलांचा त्यांच्या शिक्षणामध्ये खूप मोठा वाटा आहे. हे रामनाथपुरम मधील उच्च माध्यमिक शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेले. तेथे त्यांनी जिज्ञासू व तीक्ष्ण मनाने अभ्यास केला. त्यांच्या शिक्षकांनी त्यांची शिक्षणाची आवड ओळखली व त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी पुढे प्रोत्साहित केले.
1950 मध्ये ते सेंट जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली येथे गेले व तेथून त्यांनी भौतिक शास्त्राची पदवी हस्तगत केली. त्यानंतर त्यांनी फायटर पायलट बनण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही आणि उपलब्ध फक्त पहिल्या आठ साठी होते; परंतु त्यांचा नंबर नव्या क्रमांकावर होता परंतु डॉक्टर कलाम यांनी न घाबरता एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.
पुढे 1954 मध्ये ते मद्रास येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून एरोनॉटिकल इंजीनियरिंग मध्ये पदवी मिळवली त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळे आणि समर्पणामुळे त्यांना एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये सर्वोत्कृष्ट ‘आउटगोइंग स्टुडन्ट’ ही पदवी सुद्धा मिळालेली आहे.
अब्दुल कलाम यांची वैज्ञानिक कारकीर्द :
एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले व भारतातील मुख्य संस्था डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन विकास संस्था येथे रुजू झाले. त्यांच्या मेहनत आणि अपवादात्मक असलेल्या गुणांमुळे त्यांना या संस्थेमध्ये लगेच एक व्यक्तिमत्व त्यांनी निर्माण केले. हावरक्राफ्ट तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये त्यांचे खूप मोठे महत्त्वाचे योगदान होते. त्यांनी भारतीय लष्करांसाठी लहान आकाराच्या हेलिकॉप्टरच्या विकासावर भर दिला व त्या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केले तसेच अभियांत्रिकी पराक्रमाने नविन्यपूर्ण विचार यामध्ये दिसून आले.
त्यांनी अंतराळ आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक विशिष्ट अशी छाप सोडली. 1660 च्या सुरुवातीला त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये म्हणजेच इस्रोमध्ये त्यांना नियुक्त करण्यात आले. जिथे त्यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमात महत्त्वाचे योगदान दिले. डॉक्टर कलाम यांनी भारतातील पहिले स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण वाहन सॅटॅलाइट लॉन्च व्हेईकल विकसित करण्यामध्ये सर्वात उत्कृष्ट कामगिरी बजावली.
त्यांनी 1980 मध्ये इंटिग्रेट गाईड डेट मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम याचे मुख्य कार्य म्हणून पाहिले त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अग्नी आणि पृथ्वी अशा विविध क्षेपणास्त्र प्रणालीचे यशस्वीपणे चाचण्या विकसित केल्या. ज्याने देशाच्या संरक्षण क्षमतांना सुद्धा बळ दिले व देशातील संरक्षण क्षमता मजबूत बनली.
एपीजे अब्दुल कलाम यांनी 1980 मध्ये भारताच्या पहिल्या उपग्रह रोहिणीच्या यशस्वी प्रक्षेपण सुद्धा यशस्वीरित्या पार पडले. त्यांच्या परिश्रमामुळे भारताने आपला पहिला उपग्रह सुद्धा यशस्वीपणे पाठविला व त्यामुळे भारताला उपग्रह प्रक्षेपण क्षमता असलेल्या इतर देशांमध्ये एक नवीन स्थान मिळाले.
पूर्ण नाव | अउल फकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम. |
जन्म ठिकाण | तमिळनाडूमध्ये रामेश्वरम |
आईचे नाव | आशीअम्मा |
मृत्यू | 27 जुलै 2015. |
कलाम यांची राष्ट्रपती कारकीर्द :
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे 11 वे राष्ट्रपती 2002 मध्ये बनले होते. त्यांनी नम्रता आणि जबाबदारी खोल पणे जाणून आपले अध्यक्ष पद स्वीकारले होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी तीन महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामध्ये युवा विकास शिक्षण आणि राष्ट्रीय विकास त्यांनी देशभरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास केला व विद्यार्थी व्यवसायिक आणि सर्व स्तरातील नागरिकांना संबोधित केले.
हे एक लोकांचे राष्ट्रपती या नात्याने सर्वांपर्यंत पोहोचले. त्यांनी लोकांमध्ये आशा आणि उत्सवाची भावना निर्माण केली. त्यांची भाषणे बऱ्याचदा प्रेरणादायी सुद्धा असत. त्यांची भाषणे सर्व वह्या गटातील श्रोत्यांच्या कानामध्ये गुंजत होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद येथे त्यांचे सर्वात अवस्मरणीय असे भाषण झाले होते. जिथे त्यांनी विद्यार्थ्यांना स्वप्न आणि नवीन शोध तसेच भारताला विकसित राष्ट्र बदलण्यासाठी कसे कार्य करावे यासाठी प्रोत्साहित केले होते.
एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार :
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे केवळ शास्त्रज्ञ आणि एक नेते नव्हते. तर ते एक तत्त्वज्ञानी आणि महान असे विचारवंत सुद्धा होते. त्यांची भाषणे आणि लेखनात शहाणपण तसेच जगभरातील लोकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या प्रेरणादायी विचार भरलेले होते. त्यांच्या लेखनातून समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता सुद्धा होती.
डॉक्टर कलाम यांनी तरुण मनाचे पालन पोषण करून त्यांच्यामध्ये शिकवण्याची नवनिर्मितीची आणि देशसेवेची आवड निर्माण करणे गरजेचे आहे असे म्हटले आहे. त्यांनी एकदा त्यांची प्रसिद्ध अशी म्हण म्हटली होती. स्वप्न स्वप्न स्वप्न स्वप्न विचारात रूपांतरित होतात. या विचारांचे परिणाम कृतीत होतात मोठी स्वप्न पाहणे आणि ती स्वप्न साध्य करणे त्यासाठी अथक परिश्रम करून त्याचे तत्वज्ञान अंतर्भूत करणे गरजेचे आहे असे त्यांच्या विचारातून प्रकट होते.
डॉ. कलाम यांना मिळालेले पुरस्कार :
एपीजे अब्दुल कलाम यांना भारत सरकार द्वारे अनेक पुरस्कार व सन्मान मिळालेले आहे. 1981 मध्ये भारत सरकारचा पद्मभूषण, 1990 मध्ये भारत सरकारचा पद्मविभूषण, भारत सरकारचा भारतरत्न हा पुरस्कार त्यांना 1997 साली मिळाला तसेच 1997 मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. वीर सावरकर पुरस्कार, रामानुज पुरस्कार, मानव डॉक्टर ऑफ सायन्स या व्यतिरिक्त त्यांना बरेच असे पुरस्कार व सन्मान मिळालेला आहे.
एपीजे अब्दुल कलाम यांचा मृत्यू :
एपीजे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन तसेच जनतेचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जाते. त्यांचा मृत्यू 27 जुलै 2015 रोजी झाला होता. त्यांच्या निधनामुळे देशाला खूप मोठा धक्का बसला आणि सर्वांनी आपले दुःख व्यक्त केले. त्यांचा मृत्यू हा आयआयएम शिलॉंग मध्ये एका भाषण स्थळी झाला होता.
FAQ
एपीजे अब्दुल कलाम यांच्या आईचे नाव काय होते
आशीअम्मा.
एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म कोठे झाला?
तमिळनाडूमध्ये रामेश्वरम येथे.
एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय?
अउल फकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम.
एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते?
11 राष्ट्रपती होते.
एपीजे अब्दुल कलाम यांचा मृत्यू कधी झाला?
27 जुलै 2015.