Arjuna Award Information In Marathi आपण केलेल्या कुठल्याही कामासाठी आपल्याला शाबासकी किंवा पुरस्कार मिळाला की आपल्याला खूप चांगले वाटते. तसे प्रत्येक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला देखील वाटत असते, याला खेळाडू देखील अपवाद नाहीत. अनेक खेळ खेळून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मान गर्वाने उंचावणाऱ्या अनेक खेळाडूंना काही पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये अर्जुन पुरस्काराचा देखील समावेश होतो.

अर्जुन पुरस्कारची संपूर्ण माहिती Arjuna Award Information In Marathi
मित्रांनो, भारत सरकारकडून देण्यात येणारा हा अर्जुन पुरस्कार खेळाच्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रदान केला जातो. सर्वप्रथम १९६१ यावर्षी देण्यात आलेला हा पुरस्कार कांस्य धातूपासून बनवलेल्या ट्रॉफी आणि सन्मानपत्रासह रोख रकमेच्या स्वरूपात असतो.
मित्रांनो, हल्लीच्या काळामध्ये या पुरस्काराची व्याप्ती काहीशी बदललेली असून, त्यास अधिक विस्तृत स्वरूप देण्यात आलेले आहे. हल्ली हा पुरस्कार गत तीन वर्षांमध्ये खेळाच्या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या, तसेच खिलाडू वृत्तीने खेळणाऱ्या, तसेच मैदानावर शिस्त दाखवत नेतृत्व गुण करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार प्रदान केला जात आहे.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण अर्जुन पुरस्कार काय आहे, व त्याच्याबद्दलच्या विविध प्रश्नांबद्दल माहिती घेणार आहोत.
नाव | अर्जुन |
प्रकार | पुरस्कार |
प्रथम पुरस्कार वितरण | इसवी सन १९६१ यावर्षी |
पुरस्काराचे स्वरूप | मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम |
पुरस्काराची रक्कम | १५ लाख रुपये रोख |
आजपर्यंत दिले गेलेल्या पुरस्कारांची संख्या | ८८१ व्यक्तींना व एका संघाला |
मित्रांनो, खेळाडूंना दिला जाणारा मानाचा पुरस्कार म्हणून अर्जुन पुरस्कारकडे बघितले जाते. पूर्वी कांस्य धातूपासून बनवलेले पदक अर्थात मानचिन्ह आणि मानपत्र, यासोबतच रोख रक्कम ०५ लाख रुपये दिले जात असे. मात्र हल्ली या रकमेमध्ये बदल करून ती १५ लाख रुपये करण्यात आलेली आहे.
अर्जुन पुरस्कार कोणाला प्रदान केला जाऊ शकतो:
जे खेळाडू राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये विजयी ठरतात, तसेच चांगली कामगिरी करून आपल्या अनेक गुणांचे दर्शन घडवितात अशा खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करिता हा अर्जुन पुरस्कार दिला जात असतो. ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या आहेत, असेच खेळाडू या पुरस्कारासाठी पात्र ठरतात. त्या खेळातील त्यांची कामगिरी उंचावून दाखवण्याकरिता त्यांना हा पुरस्कार दिला जातो.
अर्जुन पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती:
मित्रांनो, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या द्वारे दिला जाणारा हा अर्जुन पुरस्कार राष्ट्रीय खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रदान केला जातो. या पुरस्काराची स्थापना १९६१ या वर्षी झालेली असून, या पुरस्काराची पात्रता हल्ली देशी खेळ आणि शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती यांच्यापर्यंत देखील वाढवण्यात आलेली आहे.
हल्ली नुकतेच सरकारने अर्जुन पुरस्कार योजनेमध्ये समायोजित केलेले आहे. त्यामुळे हल्ली आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ जिंकणे इतकीच या पुरस्काराची व्याप्ती मर्यादित नसून, तीन वर्षांपर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळामध्ये चांगली कामगिरी आणि मैदानावर शिस्त, हिम्मत, नेतृत्व यासारख्या गुणाची उधळण करणाऱ्या खेळाडूंनाच हा पुरस्कार प्राप्त होतो.
महिलांमध्ये मीना शाह, ही बॅडमिंटन पटू खेळाडू तर पुरुषांमध्ये तिरंदाजी साठी ओळखला जाणारा कृष्ण दास हा खेळाडू या अर्जुन पुरस्काराचे प्रथम मानकरी ठरले होते.
अर्जुन पुरस्कार बद्दलची काही महत्त्वाची तथ्य:
मित्रांनो, अर्जुन पुरस्कार हा मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम अशा तिहेरी स्वरूपामध्ये असतो. यातील मानचिन्ह हे ब्रांझ किंवा कांस्य या धातूपासून बनलेले असते, तर या रोख रकमेचे स्वरूप सुमारे १५ लाख रुपये इतके असते. प्रथम वर्षी १९६१ यावेळी हा पुरस्कार वितरित केला गेला. सर्वात पहिल्यांदा हा पुरस्कार १९ खेळाडूंना देण्यात आला होता.
दुसऱ्या वर्षी अर्थात १९६२ मध्ये ०९ खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला. असे असले तरी देखील तिथून पुढे प्रत्येक तीन वर्षांनी सात खेळाडूंना हा पुरस्कार दिला जात असे.
अर्जुन पुरस्कार हा वैयक्तिक स्वरूपाचा असला, तरी देखील अपवादात्मक परिस्थितीमध्ये एकदा हा पुरस्कार एका संघाला देखील देण्यात आलेला आहे. तो संघ म्हणजे टीम एव्हरेस्ट होय. या संघाला १९६५ मध्ये या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
आजकाल प्रत्येक वर्षी १५ अर्जुन पुरस्कारांचे वितरण करण्यात येते, मात्र २०१० यावर्षी १९ खेळाडूंना, तसेच सुरुवातीच्या १९६१ या वर्षी देखील १९ खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला होता.
हा पुरस्कार मिळवण्यासाठी उमेदवार अतिशय शांत व्यक्तिमत्त्वाचा असावा लागतो, कारण या पुरस्काराच्या पातळीमध्ये त्याचे मैदानावरील नेतृत्व गुण, संयम, शांतता यांसारखे अनेक गुण तपासले जातात. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेते झालेले उमेदवार या पुरस्कारासाठी आपले नामांकन दाखल करू शकतात.
हे नामांकन औषध चाचणी विभाग यांच्याकडे जमा केले जाते, त्यानंतर उमेदवारांची पडताळणी करून योग्य उमेदवार या पुरस्कारा करिता निवडले जातात. डोपिंग किंवा तत्सम आरोप असलेले खेळाडू या पुरस्कारासाठी पात्र ठरत नाही. तसेच ज्या खेळाडूंची चौकशी सुरू आहे, असे देखील खेळाडू यातून बाद करण्यात येतात.
दरवर्षी अनेक नामांकने बाद केली जातात, हे काम निवड समिती करत असते. निवड समिती ही युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्याकडे यादी पाठवण्यापूर्वी अनेकदा पडताळणी करत असते. अर्जुन पुरस्कार हा दरवर्षी २५ सप्टेंबर या दिवशी दिला जात असून, आजपर्यंत भारत सरकारने या पुरस्कारासाठी तब्बल ३५ कोटींपेक्षा ही अधिक रक्कम खर्च केलेली आहे .
निष्कर्ष:
मित्रांनो, अर्जुन पुरस्कार हा असा पुरस्कार आहे ज्याला मिळवण्यासाठी अनेक खेळाडू स्वप्न बघत असतात. खेळ क्षेत्रातील अतिशय मानाचा समजला जाणारा हा अर्जुन पुरस्कार आजपर्यंत अनेक लोकांना मिळालेला आहे. तसेच एका संघाला देखील मिळालेला आहे.
आजच्या भागामध्ये आपण या अर्जुन पुरस्काराबद्दल माहिती बघितलेली आहे. ज्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी वाचायला मिळाल्या असतील. जसे की अर्जुन पुरस्कार म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आहे, हा पुरस्कार कोणाला प्रदान केला जातो, तसेच हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील आहे, या पुरस्काराचा इतिहास काय आहे, तसेच आजपर्यंत हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे, तसेच अर्जुन पुरस्काराबद्दलची काही तथ्य आणि थोडेसे प्रश्न उत्तरे या स्वरूपामध्ये आपण ही माहिती बघितलेली आहे.
FAQ
पहिला अर्जुन पुरस्कार कोणाला व कोणत्या वर्षी देण्यात आला होता?
मित्रांनो १९६१ मध्ये सुरू झालेला हा पुरस्कार सर्वप्रथम सहा व्यक्तींना देण्यात आला होता. ज्यामध्ये पहिली महिला मीना शाह ठरली होती, जी बॅडमिंटन खेळामध्ये सहभागी होती. तसेच कृष्णा दास यांना देखील पुरुषांमधील पहिला पुरस्कार मिळाला होता, जो धनुर्विद्या या प्रकारातील खेळाडू होता.
२०२० मध्ये दिल्या गेलेल्या अर्जुन पुरस्काराचे मानकरी कोण ठरले होते?
२०२० च्या अर्जुन पुरस्काराचे मानकरी ईशान शर्मा हे ठरले होते.
२०१८ मध्ये अर्जुन पुरस्कार कोणाला मिळाला व त्याचे वैशिष्ट्य काय होते?
मित्रांनो २०१८ चा अर्जुन पुरस्कार नीरज चोप्रा यांना मिळालेला असून, त्यांनी भालाफेक स्पर्धेमध्ये भारताला सर्वप्रथम पदक मिळवून दिले होते.
अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तींची संख्या किती आहे?
आजपर्यंत सुमारे ८८१ व्यक्ती आणि एक संघ अशा ८८२ वेळा हा पुरस्कार देण्यात आलेला असून, या बक्षिसांसाठी सुमारे ३५ कोटींपेक्षा अधिक रक्कम आजपर्यंत वाटली गेलेली आहे.
अर्जुन पुरस्कार पटकावणाऱ्या मानकरी व्यक्तीला किती रक्कम दिली जाते?
मित्रांनो, अर्जुन पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व मानचिन्ह आणि रोख रक्कम असे असून पूर्वी ०५ लाख रुपये दिले जायचे, मात्र हल्ली ते १५ लाख रुपये दिले जातात.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण अर्जुन पुरस्कार विषयीची इत्यंभूत माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुमच्या खेळ आवडणाऱ्या खेळाडू मित्राला पाठवा, आणि तुम्ही दोघेही मिळून याबाबतच्या प्रतिक्रिया आम्हा पर्यंत अवश्य पोहोचवा.
धन्यवाद…