कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? | artificial intelligence information in marathi

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? – artificial intelligence information in marathi

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स .विकिमत्र च्या सर्व वाचकांचे हार्दिक स्वागत ,वाचकहो आजच्या या लेखात आपण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (artificial intelligence) बदल काही माहिती करून घेणार आहोत.

आर्टिफिशिअल intelligence चा अर्थ असा होतो की,जी मनुष्यामध्ये विचार करण्याची क्षमता किंवा शक्ती असते किंवा बुद्धिमत्ता असते.ती बुद्धिमत्ता व निर्णय घेण्याची क्षमता एका मशीन मध्ये बसवणे किंवा फिट करणे.ही बुद्धिमत्ता आपण एक सॉफ्टवेअर किंवा प्रोग्रॅम च्या मदतीने त्या मशीन मध्ये फिट करू शकतो.
आपल्या आयुष्यात अनेक समस्या येत असतात आपण आपल्या बुद्धिमतेनुसार आपल्या निर्णय क्षमतेनुसार निर्णय घेतो व त्या समस्येच समाधान शोधतो.

पण कॉम्पुटर किंवा कुठल्याही मशीन ला माणसाने कमांड द्यावी लागते तरच त्यांची प्रोसेस चालू होते.आपल्याला जे काम संगणकावर करायचे आहे तशी कमांड आपण देत जातो आणि संगणक त्याच काम करत जातो.
पण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमतेमध्ये मशीन स्वतःहून निर्णय घेते आपल्या बुद्धिमतेनुसार कमांड तयार करते की पुढे काम काय व कसे करायचे आहे.
ही मशीन मधील कृत्रिम बुद्धिमत्ता मानव निर्मित असते.

Artificial intelligence चा मराठीत शब्दशः अर्थ पाहायचा झाला तर आर्टिफिशिअल चा अर्थ होतो कृत्रिम म्हणजेच मानव निर्मित,किंवा मनुष्याने तयार केलेली एखादी गोष्ट, आणि इंटेलिजन्स चा अर्थ होतो बुद्धिमता .
Artificial intelligence cha थोडक्यात AI असे देखील संभोधले जाते.

आजकाल आपण अनेक असे यंत्र पाहतो की कोणतीही वस्तू ,प्राणी,पक्षी अगदी मनुष्याचा चेहरा देखील पाहून त्याचे विश्लेषण करतात.पण या यंत्रांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणता येणार नाही.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तयार करण्यासाठी मानवाने खूप काही संशोधन केले हया आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा शोध मानवाने अश्या प्रकारे केला आहे की कोणत्याही निर्णयाक ठिकाणी सॉफ्टवेअर किंवा

प्रोग्रॅम द्वारे बनवलेल्या बुद्धिमतेने मशीन योग्य तो निर्णय घेईल.
या मशिन्स आपल्या भावना विचारांची मनुष्यासोबत देवाण घेवाण करून योग्य निर्णय घेतात.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर सध्या कार मध्ये देखील केला जातो. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ने self driving carदेखील मानवाने बनवलेली आहे.

या self driving car मध्ये काही सेन्सर्स देखील बसवले गेले आहेत.या विविध सेन्सर्स द्वारे ही कार स्वतः चालते,स्वतः वळते,रास्ता स्वतःहुन पार करते व कार मध्ये बसवलेल्या GPS द्वारे ती कार कोठे पोहोचणार आहे हे देखील त्यात सेव असते त्यामुळे आपल्या निश्चित डेस्टिनेशनवर ही कार जाऊन पोहोचते.या कार मध्ये जे सेन्सर्स बसवले असतात, त्यांच्यापासून या कारला समजते की आपल्या आजूबाजूला कोणती गाडी आहे,ती किती अंतरावर आहे,कुठे सिग्नल लागला आहे कुठे थांबायचे आहे,सिग्नल हिरवा झाल्यावर परत कार आपोआप चालू होते.

पण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा जास्त प्रमाणात वापर करणे देखील मानवासाठी धोक्याचे आहे.काही संशोधकांनी असेही भाकीत केले आहे की काही वर्षात असे दिवस येतील की रोबोट हे रस्त्यावर चालतील,स्वतः निर्णय घेतील,त्यांच्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारे भाव भावना नियमन करून दिल्यामुळे त्यांचे निर्णय हे मानवाच्या विरोधात देखील असू शकतात. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये असाही दिवस पाहायला मिळेल की जिथे मानवामध्ये आणि मशीन मध्ये युद्ध देखील होऊ शकते.
त्यामुळे या तंत्रज्ञानाचा अतिवापर करणे धोक्याचे आहे.

कृत्रिम बुद्धिमतेचे प्रकार (Types of artificial intelligence in marathi)

1.कमकुवत कृत्रिम बुद्धीमता- (weak artificial intelligence)

कमकुवत कृत्रिम बुद्धिमतेचे एक साधे सोपे उदाहरण आहे .जेव्हा आपण ऑनलाइन शॉपिंग करतो तेव्हा आपण शॉपिंग साईट्स वर जसेकी ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वर प्रॉडक्ट चेक करतो,त्याबद्दल अधिक माहिती शोधतो.जर आपण एखाद्या दुसऱ्या संकेतस्थळावर गेलो तर तेथे ही आपल्याला त्या प्रोडक्ट ची जाहिरात पाह्यला मिळते.त्यालाच कमकुवत बुद्धिमता असे म्हणतात.

2.शक्तिशाली कृत्रिम बुद्धिमत्ता- (strong artificial intelligence)

शक्तिशाली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे जसा विचार मनुष्य किंवा मानव करू शकतो तसाच विचार मशीन व रोबो देखील करू शकतो. यालाच शक्तिशाली बुद्धिमत्ता असे म्हणतात.

तर वाचकहो कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? – artificial intelligence information in marathi लेख तुम्हाला कसा वाटला तव आम्हाला नक्की कळवा.

Leave a Comment