कोहळ्याची संपूर्ण माहिती Ash Guard Information In Marathi

Ash Guard Information In Marathi विविध नावांनी ओळखली जाणारी फळभाजी म्हणजे कोहळा होय. सर्वांच्या आवडीच्या असणाऱ्या या कोहळा फळभाजीला पांढरा भोपळा, लौकी किंवा पांढरा कोहळा इत्यादी नावे आहेत. संस्कृत मध्ये याला कुष्मांडा असे म्हणून ओळखले जाते. याचा मराठी अर्थ बिलकुल उष्णता नसणारे किंवा सर्वात थंड फळ असा होतो.

Ash Guard Information In Marathi

कोहळ्याची संपूर्ण माहिती Ash Guard Information In Marathi

कोहळा हे असे फळ आहे ज्यामध्ये सर्वात कमी कॅलरीज असतात, मात्र पाण्याचे प्रमाण सर्वात जास्त असते. त्याचप्रमाणे यामध्ये फायबर देखील मोठ्या प्रमाणावर आढळून येते, ज्यामुळे पोटाचे विकार असणाऱ्या लोकांसाठी ही फळभाजी अतिशय उत्तम समजली जाते.

नाव कोहळा
इतर नावे भोपळा, सफेद कोहळा, सफेद भोपळा
संस्कृत नाव कुष्मांडा
इंग्रजी नावऍश गार्ड
शास्त्रीय नाव Benincasa hispida
कुळ/कुटुंबCucurbitaceae
रंग सफेद हिरवा किंवा करडा
आकारगोल

मुख्यत्वे करून भारत तसेच दक्षिण  पूर्व आशियाई देशांमध्ये उगम पावलेले महत्त्वाचे फळभाजी पीक म्हणजे कोहळा होय. याला हिरवा भोपळा किंवा पांढरा भोपळा म्हणून देखील ओळखले जाते. ही एक वेलीवर येणारी रोजच्या वापरातील हिरवट राखाडी रंगाची भाजी आहे. पाण्याचे भरपूर प्रमाण असल्यामुळे ही भाजी लठ्ठ लोकांकडून वजन कमी करण्यासाठी खाल्ली जाते.

कोहळ्याची इतर भाषेतील नावे:

इंग्रजीPetha, white ash gourd, wax goard, winter watermelon
मराठी कोहळा
संस्कृतकुष्मांडा, कुष्मांडम
उर्दू पेठा
बंगाली कुमरा, चल कुमरा
गुजराती कोलू
आसाम कोमोरा
तामिळनिर पुसनिकाई
कन्नड बुडूगुम्बला
मल्याळमकुंभलंगा
तेलगूबडीज गुम्मदिकाया

कोहळा आणि आरोग्यदायी महत्व:

आजकाल प्रत्येक जण धावपळीच्या युगात आरोग्याची काळजी घेत नाही, परिणामी काही त्रास व्हायला लागल्यानंतर आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होते. आणि मग डायट फूडचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे कोहळ्यामध्ये असे काय पौष्टिक मूल्य आहेत ही जिज्ञासा प्रत्येकाच्या मनात उत्पन्न होतेच.

कोहळा हा कॅलरीच्या बाबतीत कमी असतो, मात्र यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असते. सोबत यामध्ये प्रथिने, कर्बोदके आणि काही प्रमाणात चरबी देखील असते. कोहळा हा फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थांचा उत्तम स्त्रोत आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये शून्य टक्के कोलेस्ट्रॉल असते, त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्या लठ्ठ माणसांद्वारे त्याचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. सोबतच यामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, जस्त, लोह, आयोडीन आणि मॅंगनीज इत्यादी प्रकारचे खनिजे आढळतात. जीवनसत्त्वांच्या बाबतीत विचार करावयाचा झाल्यास यामध्ये ए, बी, सी आणि ई ही जीवनसत्वे चांगल्या प्रमाणात आढळून येतात.

कोहळ्याचे महत्त्व:

वर आपण कोहळ्यामधील विविध घटकांचा आढावा घेतला, त्यामुळे जे लोक आहार तज्ञ असतील त्यांना या घटकांवरून कोहळ्याचे महत्व लक्षात आले असेलच.

लठ्ठपणावर उपाय म्हणून कोहळा खूप फायदेशीर ठरतो. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आहारामध्ये वारंवार कोहळा समाविष्ट करावा. काही लोक वजन कमी करण्यासाठी सकाळी कोहळ्याचा रस घेतात, कोहळ्याच्या रसाने अतिशय जलद गतीने चरबी वितळते. तुम्हाला फक्त कोहळा खाणे जमत नसेल, तर तुम्ही सकाळी डाळिंब अथवा केळी या फळांसोबत मिळून कोहळा खाऊ शकता. ज्यामुळे त्याची चव वाढण्यास मदत होईल.

कोहळ्यामधील घटक हृदयाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी मोलाचे असतात. त्यात कोहळा हा कोलेस्ट्रॉल घटकापासून पूर्णतः मुक्त आहे, त्यामुळे तुम्ही कोहळ्याचे दररोज सेवन केले असता हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यास त्याची मदत होते. तसेच हृदयाची क्रिया सुधारण्यास देखील मदत होते. उत्तम हृदय हाच दीर्घकाळ जगण्याचा एक मंत्र आहे, त्यामुळे अप्रत्यक्षपणे कोहळ्याचे सेवन तुमचे आयुष्यच वाढवत असते.

काही लोक मांसाहार आणि मद्यपान खूप मोठ्या प्रमाणात करतात, त्यामुळे त्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण फार मोठ्या पटीत वाढते. या कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणाला समपातळीत ठेवायचे असेल तर त्यासाठी आहारामध्ये कोहळ्याचे प्रमाण वाढवले जाते. मित्रांनो मद्यपान करणे आरोग्यासाठी कधीच हितावह नाही, त्यामुळे मद्यपान करून कोहळा खाणे ही काही चांगली गोष्ट नाही.

असे म्हटले जाते की भारतातील शंभर लोकांमधील दहा लोकांना मधुमेह आणि रक्तदाबाच्या समस्यांनी ग्रासलेले आहे.  या धावपळीच्या आयुष्यात या समस्यांनी ग्रस्त रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशा रुग्णांना कोहळ्याचे सेवन दिलासा देऊ शकते.

कोहळ्यांमधील फायबर्स आणि ओमेगा थ्री नावाचे फॅटी ऍसिड या दोन्ही आजारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत. तुम्हाला यातील कुठलाही आजार असेल तर तुम्हाला कोहळ्याचे सेवन करणे फायद्याचे ठरेलच, मात्र तुम्हाला हा आजार नसेल तरी देखील तुम्ही कोहळ्याचे सेवन करावयास हवे. जेणेकरून तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकाल.

ज्या लोकांना पोट साफ होण्याची समस्या असते, त्यांना तंतुमय पदार्थांचे सेवन करण्यास सांगितले जाते. आयुर्वेद असे सांगते की ज्याचे पोट व्यवस्थित साफ होते त्याला कुठलाच आजार होत नाही. बऱ्याचशा व्याधींचे मूळ हे पोट साफ होण्याची जोडले जाते.

कोहळ्यातील भरपूर प्रमाणात असणारे फायबर्स पोट साफ न होण्याच्या समस्येवर अतिशय प्रभावीपणे कार्य करते. यासोबतच भूक मंदावणे, पचन न होणे, पोट दुखणे या समस्या देखील नियंत्रणात आणल्या जातात. रोज सकाळी कोहळ्याचे सेवन केल्याने काही दिवसातच तुम्ही पोटासंदर्भातील कुठल्याही समस्येवर विजय मिळवू शकता.

कोहळ्याचा आहारात वापर कसा करावा:

खेड्यातील अनेक लोक कोहळा या भाजीशी परिचित आहेत, मात्र शहरातील बऱ्याचशा लोकांना अजून या भाजी बद्दल माहिती नाही. तुम्ही कोहळा भाजी करून, पावडर बनवून, रस करून, बर्फी बनवून, खीर बनवून, लोणचे बनवून, जॅम बनवून, किंवा कोशिंबीर बनवून खाऊ शकता.

निष्कर्ष:

आयुर्वेदात अनेक प्रकारच्या वनस्पतींची इत्यंभूत माहिती दिली आहे. त्यामध्ये कोणत्या आजारावर कुठले फळ किंवा फळभाजी, पालेभाजी गुणकारी आहे, कोणत्या वनस्पतीमध्ये कुठला घटक मुबलक प्रमाणात आढळतो, त्या घटकाचे शरीराला काय फायदे होतात, याची इत्यंभूत माहिती आढळून येते. आज आपण माहिती पाहिलेल्या कोहळ्यामध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात.

भरपूर फायबर्स आणि पाणी हे आपल्या शरीरातील अनेक रोग बाहेर काढण्यासाठी मदत करतात, तसेच आपल्या शरीराला तजेलदार ठेवण्यासाठी देखील मदत करतात. या कोहळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, विटामिन्स, इत्यादी आढळून येतात. तसेच विटामिन्स म्हणजेच जीवनसत्वाबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये विटामिन सी चा प्रचंड मोठ्या प्रमाणावर साठा आहे, त्यामुळे पोटासाठी हे फळ अत्यंत उपयुक्त समजले जाते.

FAQ

कोहळा आणि भोपळा हे दोन्हीही एकच आहेत का?

होय, कोहळा आणि भोपळा हे दोन्हीही एकाच फळ भाजीचे नाव आहेत.

कोहळ्याचे दुष्परिणाम आहेत काय?

होय, कोहळ्याचे दुष्परिणाम आहेत, सलग बऱ्याच कालावधीसाठी कोहळा सेवन केल्यास किंवा त्याचा रस प्यायल्यास छातीमध्ये कफ दाटून येऊ शकतो.

कोहळ्याचे झाड कसे असते?

कोहळा हा झाडावर येत नाही, कोहळ्याचे वेल असतात.

गर्भवती महिलांद्वारे कोहळ्याचे सेवन केले जाऊ शकते का?

गर्भवती महिलांना कोहळा खाण्यापूर्वी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले जाते.

दम्याचा किंवा श्वासोच्छवासाचा आजार असलेल्या लोकांनी कोहळ्याचे सेवन केल्यास चालू शकते काय?

ज्या लोकांना दमा अथवा श्वासोच्छवासासंबंधी समस्या असतील त्यांनी अल्प प्रमाणात कोहळ्याचे सेवन केल्यास काहीही हरकत नसते, मात्र अशा लोकांनी हिवाळ्यामध्ये कोहळा खाणे टाळावे हेच उचित असते.

आजच्या भागामध्ये आपण कोहळा ज्याला पांढरा भोपळा म्हणून ओळखले जाते या फळभाजी विषयी संपूर्ण माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये लिहून कळवा, तसेच ज्या लोकांना या माहितीची आवश्यकता असेल त्यांना ही माहिती शेअर करण्यास बिलकुल विसरू नका.

 धन्यवाद…

Leave a Comment