शेतकऱ्याचे आत्मवृत मराठी निबंध Autobiography Of A Farmer Essay In Marathi

Autobiography Of A Farmer Essay In Marathi नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे पाहणार आहोत शेतकऱ्याचेआत्मवृत  वर मराठी निबंध. हा निबंध तुम्ही शेतकऱ्याचे मनोगत, शेतकऱ्याचे आत्मकथा आणि मी शेतकरी बोलतेय या विषयावर सुद्धा वापरू शकता.

Autobiography Of A Farmer Essay In Marathi

शेतकऱ्याचे आत्मवृत Autobiography Of A Farmer Essay In Marathi

शेतकरी म्हणजे  फक्त शेतात राबणारा माणूस नाही तर स्वतःच्या मेहनतीने लोकांसाठी अन्न पिकविणारा देव म्हणा. आला का तुमच्या मनात फक्त गरीब आणि कष्टाळू असा येत असेल परंतु माझ्या मनात फक्त अन्नदाता येतो.

मी शहरात राहतो .मात्र माझे आजोबा गावाकडे शेती करतात. शेतकऱ्यांचा शेती विषयी किंवा आपल्या आयुष्याविषयी काय मनोगत आहे याची माहिती घेण्यासाठी मी खास गावाला गेलो आजोबांना माहिती विचारली तेव्हा त्यांनी असे सांगितले की?

माझं नाव जगन्नाथ मी एक कोरडवाहू शेतकरी आहे. लहानपणापासून  मी माझ्या बाबांसोबत शेतीत करतो. कारण की आमच्या गावांमध्ये शाळा नव्हत्या किंवा इतर कुठल्याही सोयी नव्हत्या.

मी एक कोरडवाहू शेतकरी माझी शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाच्या पाण्याचा थेंब अन् थेंब मी उपयोगात आणतो. मी आणि माझी बायको दोघे शेतामध्ये खूप कष्ट करतो. कधी पाऊस पडतो, कधी कोसळतो ,कधी अवेळी पडतो, कधी पडतच नाही, काहीवेळा केलेली पेरणी फुकट जाते, तयार झालेले पीक वाहून जाते व कुजते या सा-या संकटांना सामोरे जावे लागते परंतु आम्हाला आता या संकटांची सवय झाली आहे. पाऊस हवा तेवढा आणि वेळेवर झाला कि आमचे पीक फुलून येते.

धान्य घरात आले की मन तृप्त होते हीच आमच्या शेतकऱ्यांची श्रीमंती. मी नेहमी आलटून-पालटून वेगवेगळी पिके घेतो, त्यामुळे जमिनीचा कस टिकून राहतो. शेता बरोबर मी छोटासा मळा ही फुलवतो.

मळ्यातील फळे -फुले विकून मला घरखर्चाला पैसे मिळतात. शेतात एखादे पीक जास्त आले की पिकाचे भाव पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. पिकावर रोग पडू नये यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. वेळेवर औषधे फवारावे लागतात.

आज शेतीत पूर्वी इतके कष्ट करावे लागत नाही, सर्व सोय आहे .आत्ता तर पहिल्या आम्ही जे नांगराने काम करत होतो ते आता ट्रॅक्टरने करतो आणि ते अगदी जलद गतीने होते. आणि जास्त काही मेहनत करावी लागत नाही. शेतकर्‍यांना आता सरकारची खूप साथ आहे.

शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे योग्य खत व बियाणे आता सरकारद्वारे पुरवले जातात. पहिले येथे पाण्यासाठी काही योग्य सोयी नव्हत्या परंतु आता पाण्याचे पंप बसवले आहेत. ज्याने आम्हा शेतकऱ्यांना खूप मदत मिळते.

वेळोवेळी आता जमिनीचे नमुने घेऊन खताचा वापर किती व कसा करावा व कोणत्या पिकाची लागवड कधी करावी याच्या सर्व सोयी सरकारने शेतकऱ्यांसाठी करून दिल्या आहेत.

आता प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या संघटना आहेत ज्याच्या सहाय्याने आम्हा शेतकऱ्यांना शेतीच्या पिकाचे योग्य मानधन मिळते. महिन्यातून एकदा या संघटनेद्वारे काही कार्यक्रम आयोजित केले जातात .ज्यामध्ये आम्हाला आधुनिक शेती कशी करायची याविषयी माहिती दिली जाते. शेतीच्या नवीन पद्धती शिकविल्या जातात या कार्यक्रमातून आम्हाला खूप फायदा होतो.

आम्ही शेतकरी शेती तर करतातच पण त्याचबरोबर गाई, म्हशी, बकऱ्या या कोंबड्या पाळतो यातून आम्हाला खूप फायदा मिळतो शेतीसाठी आम्हाला उत्कृष्ट शेणखत मिळते तसेच दूध आणि अंडी विकतो.

आता शेती आणि शेतकरी पूर्वीसारखे राहिले नाहीत त्यांच्याकडे स्वतःची गाडी, स्वतःचे घर ,माझी मुले कॉलेजमध्ये डिग्री करत आहेत आणि तेही तो संपूर्णपणे शेतीवर आता शेती हा मोठा व्यवसाय झाला आहे. आणि आणि मला शेती करायला आवडते. मला सरकारची साथ असल्यामुळे मी उत्कृष्ट शेती करतो.

आपण शेतकऱ्याला गरिबीचा रूपात न बघता अन्नदाता म्हणून बघितले पाहिजे तसेच गरिबी काय असते कष्ट काय असतात मनात काय असते दिलदार पणा काय असतो. एका शेतकऱ्याकडून शिकायला मिळते.

शेतकरी आहे म्हणून शेत आहे. आणि शेत आहे म्हणून अन्न आहे. अन्न आहे म्हणून आपण जिवंत आहे.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment