विहिरीची आत्मकथा मराठी निबंध Autobiography Of A Well’s Essay In Marathi

Autobiography Of A Well’s Essay In Marathi नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे पाहणार आहोत विहीरचे आत्मवृत्त वर मराठी निबंध. हा निबंध तुम्ही विहीरचे मनोगत, विहीरची आत्मकथा आणि मी  विहीर बोलतीये या विषयावर सुद्धा वापरू शकता.

Autobiography Of A Well's Essay In Marathi

विहिरीची आत्मकथा मराठी निबंध Autobiography Of A Well’s Essay In

Marathi

मी विहीर बोलतीये. माझे खोदकाम खूप वर्षांपूर्वी झाले आहे. ज्या वेळी माझे खोदकाम झाले त्यावेळी मला एक कलात्मक रूप प्राप्त झाले होते ज्या वेळी माझे खोत काम पूर्ण झाले त्यावेळी गावकऱ्यांना खूप आनंद झाला. आजही स्पष्ट आठवतोय मला तो दिवस. जास्त खोल नाही पण नियमित प्रमाणात माझी उंची बनविण्यात आली जेणेकरून गावातील स्त्रियांना पाणी भरण्यास सोपे पडेल. मला भरपूर पाणी असल्यामुळे गावातील भरपूर लोक माझ्याकडेच पाणी  भरण्यात येत असे.

दिवसभर गावातील स्त्रिया आणि त्यांच्या बरोबर येणाऱ्या मुलांची वर्दळ सतत माझ्या अवतीभोवती असायची त्यामुळे मी नेहमी आनंदीअसायचे. आता मी सर्वांना ओळखू लागली होती. पाणी भरण्याच्या निमित्ताने काही गावातील काही स्त्रिया एकमेकींची थट्टा-मस्करी करत असत, तर काही स्त्रिया एकमेकींना आपले सुख दुःख सांगत असे. तर काही लहान मुले आपापल्या आई बरोबर विहीर बघायला येत असत पण मी कधी कोणाही बरोबर कोणत्याही प्रकारची अघटित घटना घडून दिली नाही.  मी सर्वांना नेहमी सांभाळून घेत आली. गावकरी बोलायचे की विहिरीचे पाणी खूप थंड आणि गोड आहे.

गावात काही छोटा मोठा कार्यक्रम किंवा लग्न समारंभ, पूजा, किंवा एखादा छोटा मोठा सण किंवा गावात उत्सव असो याच विहिरीतील पाणी नेण्याचा गावकऱ्यांचा कल असे. कारण येथील पाणी शुद्ध आणि ताजे असे. गावकरी मला खूप मान देत असत. आणि मी ही सर्वांना खूप जीव लावला होता.

आनंदाने पिढ्यानपिढ्या निघून जात होत्या माझे व माझ्या गावकर यांचे नाते खूप घट्ट बनले होते. गावातील लेकी लग्न करून माहेरी आल्या की आवर्जून मला भेट देत असे आणि गावातील नवीन सुना गावातील प्रौढ स्त्रिया नवीन सुनांना कौतुकाने विहीर दाखवायला आणीत असायचे. उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे कितीही कोरड पडली असली तरी मी सर्वांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देत राहिली. मी कोणाची ही निराशा होऊ दिली नाही.

परंतु काळ लोटला, वर्ष बदलत गेली आणि त्याच बरोबर पिठीही ही बदलत गेली. आता मी सर्वांची लाडकी विहीर हळूहळू सर्वांकडून दुर्लक्षित होऊ लागली.

गावातील मुले शहरात शिकण्यासाठी जाऊ लागले . चांगले शिकून मोठ्या नोकऱ्या मिळवू लागले. यांच्या बरोबरीने काही जण आपल्या आई-वडिलांनाही घेऊन जाऊ लागले. त्यामुळे पूर्वीच्या गावकरी पाणी भरण्यासाठी येत असत ते हळूहळू कमी होऊ लागले. गावातील मुली लग्न करून शहरात स्थायिक झाल्या त्यामुळे त्याही गावी कमी येऊ लागल्या. म्हणून त्यांनी मला भेट द्यायच्या टाळू लागला.

शहरात गेलेली मुले सुट्टीत गावी येऊ लागली परंतु त्यांना आता घराच्या दारातच नळाची सुविधा मिळत असल्यामुळे आणि नवीन सुना आता डोक्यावर हंडे घेऊन महिला पायपीट करून विहिरीवर पाणी आणण्यास तयार नाही शिवाय आजकालच्या पिढीला विहिरीचे पाणी उघडे असल्यामुळे ते पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.असे आज कालच्या पिडलेला वाटते.

हळूहळू मी एकटी पडत चालली होती. मी दिवसभर सर्व गावकर्‍यांची वाट बघत असे पाणी नेत असे.

दिवस महिने आणि वर्ष अशीच निघून गेली आहे. कोणीही पाणी उपसायला येत नसल्यामुळे पाणी तसेच साठवून गढूळ झाले आहे. सर्वांचे दुर्लक्ष झाल्यामुळे मी आता पडकी आणि जुनी झाली आहे.

काळ बदलत गेला आणि माझी अवस्था ही अशी झाली आहे. या जुन्या पडक्या विहिरीत येणे ज्यांना पिढ्यानपिढ्या साथ दिली, कधी कोणाच्या घरी पाण्याची कमी जाणवू दिले नाही, कधीही कोणाला आपल्या पाण्यामुळे आजार होऊ दिला नाही. आणि प्रत्येक गावकऱ्यांना आपले मानले आणि त्यांनी मला काय दिले? माझ्या वाटेला आज फक्त दुर्लक्ष व अवहेलना आली आहे. मला या गोष्टीची खूप खंत वाटत आहे.

मला मान्य आहे आज प्रत्येकाच्या घरी न आलेल्या आहेत परंतु एखाद्यावेळेस नळाला पाणी आले नाही तर ही विहीर तुमची तहान भागवेल हे विसरू नका बाळांनो!

तेव्हा माझ्याकडे थोडे लक्ष द्या मी पडकी झाले आह.माझ्या साफ-सफाई कडे लक्ष देऊन मला ही थोडी पहिल्यासारखी बनविण्याचा प्रयत्न करा.माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे तुम्ही गावकरीच माझे कुटुंबीय आहेत आणि मी ही तुमच्या सेवेसाठी कायम तत्पर असेल.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment