बी फार्मसी कोर्स संपूर्ण माहिती B Pharmacy Course Information In Marathi

B Pharmacy Course Information In Marathi विद्यार्थी जीवनात पुढे जाण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन गरजेचे असते. दहावी पास झाल्यानंतर कोणी वाणिज्य शाखेकडे वळते तर कोणी विज्ञान शाखेकडे तर कोणी कला क्षेत्र निवडतात. प्रत्येक मुलाने आपल्यासाठी काहीतरी स्वप्न बघितलेले असते. कोणाला डॉक्टर बनवायचे असते, कुणाला कवयित्री लेखक बनायचे असते, कोणाला शिक्षक बनायचे असते, तर कोणाला डॉक्टर, वकील बनायचे असते, अशा नोकरीच्या भरपूर संधी विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध असतात आणि त्या क्षेत्रात विद्यार्थी पाऊल टाकतात, जे त्यांना पसंत असतात.

B Pharmacy Course Information In Marathi

बी फार्मसी कोर्स संपूर्ण माहिती B Pharmacy Course Information In Marathi

वैद्यकीय क्षेत्रात असंख्य कोर्स आहेत, याविषयीची माहिती आपल्याला वेळेवर मिळत नाही आणि त्यामुळे आपण आपले खूप मोठे नुकसान करून बसतो. वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर फार्मसी पॅरामेडिकल कोर्स अभियांत्रिकी अशी कोर्स आहेत; परंतु हे कोर्स खूप खर्चिक असतात. मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या असतात परंतु काही अभ्यासक्रम असे सांगतात की, जे कमी खर्चिक असून मुलांना चांगल्या रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध करून देतात.

बरेच विद्यार्थी बारावी विज्ञान शाखेतून पास होतात त्यानंतर त्यांना पुढे काय करावे हे सुचत नाही परंतु त्या विद्यार्थ्यांना बी फार्मसी किंवा डी फार्मसी करायची यामध्ये बऱ्याचदा सुचत नाही नेमकं यामध्ये काय फरक आहे हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते.

बरेच विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए, सोशल नेटवर्क इत्यादी पर्याय निवडतात परंतु अनेक विद्यार्थी असे आहेत, ज्यांना फार्मसी करण्यामध्ये आजही इंटरेस्ट आहे. तर फार्मसी म्हणजे काय फार्मसी हा कोर्स कसा असतो याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

बी फार्मसी म्हणजे काय?

बी फार्मसी म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येते, ते मेडिकल किंवा औषधांची दुकान बऱ्याचदा आपल्याला वाटते की, बी फार्मसी हा कोर्स केल्यानंतर फक्त आपण औषधांची दुकान किंवा मेडिकल काढू शकतो परंतु हा आपला गैरसमज आहे. कारण बी फार्मसी केल्यानंतर आपण मेडिकल तर काढू शकतो.परंतु त्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रात सुद्धा मोठ्या पदांवर काम करू शकतो.

जसे त्यामध्ये ड्रग्स इन्स्पेक्टर, संशोधन ऑफिसर, मेडिकल ट्रान्स परीक्षा, केमिस्ट्री प्रोफेसर इत्यादी संध्या सुद्धा तुमच्यासमोर उपलब्ध होऊ शकतात. बी फार्मसी म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी हा चार वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. ज्या विद्यार्थ्यांना फार्मसीमध्ये आपली करिअर करायचे असते, त्यासाठी हा एक उत्तम फोर्स आहे.

बी फार्मसी चा फुल फॉर्म काय आहे?

Bachelor of Pharmacy फार्मसी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी आपल्या करिअरमध्ये यशस्वी होऊ शकतात. त्यांना चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

बी फार्मसीसाठी कोणकोणत्या पात्रता असतात :

बी फार्मसीसाठी तुम्हाला नाव नोंदणीसाठी किंवा 50% सहज उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तुम्ही बारावी उत्तीर्ण झाल्यावरच बी फार्मसी करू शकता. या कोर्सच्या प्रवेश पात्रता ह्या विद्यापीठ किंवा संस्थेनुसार बदलू सुद्धा शकतात. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता आपण लक्षात घेतल्या तर उमेदवारांनी मान्यता प्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण केलेली असावी.

तसेच उमेदवारांनी त्यांच्या बारावीच्या परीक्षेमध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र तसेच भौतिकशास्त्र रसायनशास्त्र किंवा गणित याचा अभ्यास केलेला असावा. उमेदवारांनी प्रत्येक विषयामध्ये किमान 50 टक्के गुण प्राप्त केलेले असावेत. राखीव वर्गाच्या बाबतीत पाच टक्के सूट दिलेली आहे.

प्रवेश परीक्षा :

उमेदवारांना बी फार्मसीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्या आधी त्यांना एक प्रवेश परीक्षा म्हणजेच एमएसटी सीईटी किंवा इतर कोणत्याही संबंधित प्रवेश परीक्षेला बसलेले असावे.

उमेदवारांनी त्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्रात बी फार्मसीला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला एमएचटीसीइटी महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निशियन कॉमन इंटरनल टेस्ट द्यावी लागते. त्यातील मार्क्सनुसार तुमची रँक लिस्ट तयार केली जाते व त्यानुसार तुम्हाला प्रवेश मिळतो.

जर तुम्ही NEET ही परीक्षा दिली असेल तरीसुद्धा तुम्हाला प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट व्हावे लागते. त्यावर्षी तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावीच लागेल.

फार्मसी हा कोर्स किती वर्षाचा आहे?

बी फार्मसी हा कोर्स चार वर्षांचा आहे. यामध्ये बारावी सायन्स असलेली विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. बी फार्मचा अभ्यासक्रम हा 8 सेमिस्टरमध्ये विभागला गेला असून प्रत्येक सेमिस्टरमध्ये फार्मसीच्या विविध पैलूंवर लक्ष दिले जाते. बी फार्म अभ्यासक्रमा समाविष्ट असलेल्या विषय वेगवेगळ्या असतात. बी फार्मचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना फार्मसीच्या विविध पैलूंची संबंधित सपोर्ट ज्ञान आणि व्यवहारी कौशल्य प्राप्त करून देते. जसे की, औषधे शोध, औषध विकास,औषध वितरण आणि रुग्णांची काळजी प्रदान करण्यासाठी डिझाईन केले आहे.

या अभ्यासक्रमामध्ये त्यांना पुढील विषय असतात.

 • मानवी शरीरशास्त्र आणि शरीर विज्ञान
 • फार्मास्युटिकल विश्लेषण
 • फार्मास्युटिक्स
 • फार्मास्युटिकल अकार्बनिक रसायनशास्त्र
 • फार्मास्युटिकल सेंद्रिय रसायनशास्त्र
 • बायोमेट्रिक
 • पॅथोफीजियोलॉजी
 • फार्मसी मध्ये संगणक अनुप्रयोग
 • फिजिकल फार्मास्युटिक्स
 • फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी
 • फार्मास्युटिकल अभियांत्रिकी
 • औषधी रसायनशास्त्र
 • औषध निर्माण शास्त्र
 • फार्माकग्नोसी आणि फायटोकेमिस्ट्री
 • बायोफार्मास्युटिकल आणि फार्माकोकिनेटिक्स
 • फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी
 • फार्मसी सराव
 • नवीन औषध वितरण प्रणाली
 • बायोस्टॅटिस्टिक्स आणि संशोधन पद्धती
 • सामाजिक आणि प्रतिबंधात्मक फार्मसी
 • फार्म विपणन व्यवस्थापन
 • संगणक सहाय्यक
 • औषध डिझाईन कॉस्मेटिक सायन्स हे विषय असतात.

बी फॉर्मची फी किती आहे?

बॅचलर ऑफ फार्मसी यासाठी वेगवेगळे कॉलेजेस किंवा महाविद्यालय त्यांची फीज अवलंबून ठेवतात. सर्वसाधारणपणे बी फॉर्म ची फी दरवर्षी 50 हजार ते दोन लाख पर्यंत असते याव्यतिरिक्त महाविद्यालयानुसार त्यांच्या फीमध्ये फरक पडू शकतो.

नोकरीसाठी संधी :

बी फार्म पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध होतात .

फार्मासिस्ट : किरकोळ किंवा हॉस्पिटल फार्मसी मध्ये काम करू शकतात. औषधी वितरित करू शकतात आणि औषधांच्या वापराबद्दल सल्ला देऊ शकतात.

फार्मासिटिकल सायंटिस्ट : हे संशोधन आणि विकास तसेच औषधे शोध आणि नवीन औषधांच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये काम करू शकतात.

रेगुलरिटी अफेयर्स प्रोफेशनल : हे औषधांची सुरक्षितता आणि परिणामकारकता सुनिश्चित करण्यासाठी अन्न आणि औषध प्राशान सारख्या नियमक संस्थांमध्ये काम करू शकतात.

वैद्यकीय लेखक : हे औषधी कागदपत्रे क्लिनिकल चाचणी अहवाल आणि नियमक दस्तऐवज यांसारखे वैज्ञानिक कागदपत्रे तयार करण्यासाठी काम करू शकतात.

FAQ

बी फार्मसी चा फुल फॉर्म काय आहे?

Bachelor of pharmacy.

बी फार्मसी हा किती वर्षाचा कोर्स आहे ?

बी फार्मसी हा चार वर्षाचा अभ्यासक्रम आहे.

बी फार्मसी हा डॉक्टरचा कोर्स आहे का?

बी फार्मसी पूर्ण केल्यानंतर तुम्ही डॉक्टर होऊ शकत नाही. डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला एमबीबीएस,बीएचएमएस किंवा बीयुएमएस इत्यादी अभ्यास करणे गरजेचे आहे.

बी फार्मसीमध्ये प्रवेश मिळिण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल?

बी फार्मसी तुम्हाला द्यायचे असेल तर त्याकरिता सीईटी ही परीक्षा द्यावी लागेल. जे वैद्यकीय क्षेत्रातील असेल आणि त्यामध्ये तुम्हाला चांगले गुण प्राप्त करावे लागतील.

मेडिकल शॉपसाठी तुम्हाला कोणता कोर्स सर्वोत्तम राहील?

मेडिकल शॉपसाठी तुम्हाला बी फार्म किंवा एम.फॉर्म पदवी प्राप्त करणे गरजेचे असते.

Leave a Comment