बॅडमिंटन खेळाची संपूर्ण माहिती Badminton Game Information In Marathi

Badminton Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो,मनुष्याच्या जीवनात खेळाचे अनन्य साधारण महत्व आहे. चांगल्या आणि निरोगी आरोग्यासाठी खेळ खेळणे आवश्यक असते. त्यातही जर मैदानी खेळ खेळलात तर विचारायलाच नको. मैदानी खेळांचे अनेक फायदे पाहायला मिळतात. या खेळांमधून व्यायाम, चंचलता, सांघिक कार्य करण्याची वृत्ती आणि असे बरेच गुण अंगीकारता येतात.

Badminton Game Information In Marathi

बॅडमिंटन खेळाची संपूर्ण माहिती Badminton Game Information In Marathi

बॅडमिंटन एक मनोरंजक आणि सुंदर खेळ आहे. या पोस्टमध्ये बॅडमिंटन खेळाचा इतिहास, नियम आणि माहिती बद्दल आहे. हा खेळ शारीरिक क्षमता दाखवण्याचा आणि सिद्ध करण्याचा एक मार्ग आहे. बॅडमिंटन जगभरात खेळले जाते. हा खेळ भारतातही खूप लोकप्रिय आहे.

हा खेळ अठराव्या शतकापासून खेळला जात आहे बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी लागतात. आणि त्या म्हणजे रॅकेट आणि शटलकॉक. बॅडमिंटन हा खेळ बंदिस्त जागेमध्ये खेळला जातो आणि या खेळाच्या मैदानाला कोर्ट असे म्हणतात. बॅडमिंटन हा खेळ महिला आणि पुरुष दोघेही खेळू शकतात. हा खेळ ऑलम्पिक मध्ये देखील समाविष्ट आहे.

तुम्ही सायना नेहवालचे नाव ऐकले असेल जे बॅडमिंटनची मास्टर आहे. सायना व्यतिरिक्त, पी.व्ही सिंधू देखील खूप प्रसिद्ध आहे. या दोन्ही महान बॅडमिंटन खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदके देखील आणली आहेत. तसे, बॅडमिंटन हा खेळ टेनिस सारखाच आहे.

बॅडमिंटन ऑलिम्पिक व्यतिरिक्त अनेक स्पर्धांमध्ये खेळले जाते. वर्ल्डकप, उबेर कप, ऑल इंग्लैंड चैंपियनशिप ही त्याची प्रमुख स्पर्धा आहे. क्रिकेटमध्ये जसे बॅट आणि बॉल महत्त्वाचे असतात, त्याचप्रमाणे बॅडमिंटनमध्ये कॉक आणि रॅकेट महत्त्वाचे असतात.

या पोस्टमध्ये बॅडमिंटन खेळाची माहिती आणि बॅडमिंटन खेळाची नियम जाणून घेण्याचा प्रयत्न आहे.सन १९३४ च्या आसपास, “बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन” ची पायाभरणी झाली आणि या खेळाचे अनेक नियम बनवले गेले.

या महासंघाचे संस्थापक सदस्य आयर्लंड, फ्रान्स, न्यूझीलंड आणि स्कॉटलंड होते. ब्रिटिश भारत १९३६ मध्ये बॅडमिंटन स्पोर्ट्स फेडरेशनचा सदस्य झाला.आशिया आणि युरोपमध्ये बॅडमिंटन खेळ खूप प्रसिद्ध आहे. भारत, चीन, इंडोनेशिया, मलेशिया आणि दक्षिण कोरिया हे बॅडमिंटनचे प्रमुख आहेत.

भारताने बॅडमिंटनमध्ये अनेक ऑलिम्पिक पदके देखील जिंकली आहेत. सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, श्रीकांत, पुलेला गोपीचंद हे भारताचे प्रमुख खेळाडू आहेत ज्यांनी जागतिक मंचावर आपली छाप पाडली आहे.

बॅडमिंटन खेळाचा इतिहास

बॅडमिंटन बॅडमिंटन खेळाचा इतिहास फार जुना नाही. हा खेळ ब्रिटिश राजवटीत खेळला गेला. ब्रिटीश अधिकारी बॅडमिंटन सारखा खेळ खेळत असत ज्याला शटलकॉक असे म्हणतात.

बॅडमिंटन खेळाचा पूर्वीचा इतिहास नक्की काय होता है उलघडू शकले नाही परंतु काही इतिहासकारांच्या मते हा खेळ १५०० बीसी च्या काळात भारतामध्ये खेळला जायचा असे म्हंटले जाते. बॅडमिंटन या खेळाला पूर्वीच्या काळी पुना या नावाने ओळखले जायचे कारण या खेळाचा उगम हा पुणे शहरातुन झाला होता त्यानंतर भारतामध्ये असणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनी १८७० मध्ये हा खेळ भारताबाहेर नेला.

असे म्हणतात कि बॅडमिंटन हा खेळ ड्यूक ऑफ़ ब्युफर्टने हा खेळ पहिल्यांदा आपल्या मित्रासोबत खेळला होता म्हणून ड्यूक ऑफ ब्युफर्टला बॅडमिंटन या खेळाचा जनक मानले जाते.इंग्लंड येथे १८७३ साली बॅडमिंटन खेळ पहिल्यांदा खेळला गेला होता. भारतात पहिल्यांदा बॅडमिंटन हा खेळ पुणे येथे खेळण्यात आला.

या खेळात लोकर बनवलेला चेंडू वापरला जात असे. हे १८७० च्या आसपास होते. आधी हा खेळ जास्तीत जास्त ४-४ लोकांनी खेळला होता पण नंतर तो एकेरी आणि दुहेरी मध्ये बदलला गेला. सन १९३४ च्या आसपास, “बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन” ची पायाभरणी झाली आणि या खेळाचे अनेक नियम बनवले गेले.

बॅडमिंटन खेळासाठी लागणारे साहित्य

यासाठी आपल्याला एक कॉर्क आणि पक्ष्यांच्या पंखांपासून तयार केलेले फुल लागते, ज्याला शटलकॉक म्हणतात. तसेच वजनाने हलक्या आणि दोराने विणलेल्या दोन फळ्या लागतात. या फळ्यांना रॅकेट म्हणतात.

यासोबत दोन खेळाडूंच्या मध्ये बांधण्यासाठी एक जाळी सुद्धा लागेल. हे फूल कुत्रीम तऱ्हेने बनवले जाते .या फुलांमध्ये 16 पंख लावले जातात .याचे वजन फक्त 4 ते 5 ग्रॅम असते.

बॅडमिंटन खेळताना दोन रॅकेट ची आवश्यकता असते. शटल कॉक ला इकडून तिकडे मारण्यासाठी रॅकेट वापरले जाते. रॅकेट ला हलक्या धातूपासून बनवले जाते. रॅकेट ची लांबी 680 मिलीमीटर व रुंदी 230 मिलीमीटर असते. रॅकेटचा आकार अंडाकार असतो.

या खाली धरण्यासाठी एक नरम हॅण्डल असते. रॅकेट च्या ज्या भागावर शटल कॉक ठोकले जाते. तेथे मजबूत फायबर पासून बनवलेला दोरा लावला जातो. हा दोरा शटल कॉक ला अधिक गती मिळवून देण्यात मदत करतो.

बॅडमिंटन खेळाचे मैदान :

खेळाच्या मैदानाला कोर्ट असे म्हणतात. हे कोर्ट आयताकृती असून त्याची लांबी ४४ फुट आणि रुंदी १७ फुट (सिंगल्स साठी) आणि २० फुट (डबल्स साठी). तसेच कोर्टच्या मधोमध ५ फुट उंचीवर जाळी (नेट) बांधलेली असते. ही जाळी जमिनीपासून पाच फूट उंचीवर असते.

बॅडमिंटनमधील खेळाडूंची संख्या

खेळात सिंगल्स आणि डबल्स असे दोन प्रकार असतात.

१. सिंगल्स : यामध्ये दोन्ही बाजूनी १-१ असे एकूण २ खेळाडू सहभागी असतात.

२. डबल्स : यामध्ये प्रत्येक बाजूनी २-२ असे एकूण ४ खेळाडू सहभागी असतात.

बॅडमिंटन कसे खेळतात

बॅडमिंटन हा खेळ दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन संघांमध्ये खेळाला जातो. यामध्ये वैयक्तिक म्हणजे एक विरुद्ध एक तर संघांमध्ये म्हणजे एका संघात दोन व्यक्ती विरुद्ध संघात दोन व्यक्ती अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो.

यामध्ये महिला व पुरुष दोघेही हा खेळ खेळत असल्याने संघ सामन्यांमध्ये एका संघात एक पुरुष आणि एक महिला असा देखील सामना खेळवता येतो. बॅडमिंटन मध्ये एका सामन्यात एकूण 3 सेट खेळले जातात आणि जो कोणी व्यक्ती किंवा संघ तीन पैकी कमीत कमी 2 सेट जिंकेल त्याला त्या सामन्याचा विजेता घोषित केले जाते.

बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला बॅडमिंटन कोर्ट, नेट, बॅडमिंटन रॅकेट्स आणि शटलकॉक या महत्वाच्या गोष्टी लागतात. रॅकेट्स च्या सहाय्याने आपल्याला त्या शटलकॉक ला मारायचे असते.

जेव्हा आपण त्या शटलकॉक ला मारून दुरस्याच्या पार्टी मध्ये फेकतो तेव्हाच त्याला ते शटल पुन्हा आपल्याकडे त्या रॅकेटच्या साहाय्याने पाठवायचे असते.

रॅकेट्स हे सर्वसाधारणपणे कार्बन फायबर सारख्या हलक्या पण टिकाऊ मटेरिअल पासून बनवलेले असते. रॅकेट्स ला पकडायला एक लांब दांडी आणि समोर नेट विणलेले अंडाकृती जागा असते. याच नेटवर आपण शटल घेऊन त्याला मारत असतो.

शटलकॉक विषयी सांगायचे झालेच तर शटलकॉक हे देखील कमी वजनाचे असते आणि याला हवेत दिशा देण्यासाठी 16 पंख बसवलेले असतात. शटलकॉक हे खालील बाजूला पोलियुरेथिन पासून बनवलेले असते जेणेकरून त्याला मारताना सोप्पे जाते.

प्रत्येक सेट चा एक बेसिक नियम असतो आणि तो म्हणजे जो खेळाडू 21 या संख्येवर सर्वात आधी पोहोचेल तो त्या सेट चा विजेता असतो. परंतु याला देखील एक नियम आहे तो म्हणजे खेळाडू 21 गुणांवर असताना प्रतिस्पर्धी खेळाडू आणि त्यांच्यामध्ये कमीत कमी 2 गुणांचे अंतर हे असायला हवे.

म्हणजे 21 पुढे जेव्हा देखील खेळाडू मध्ये 2 गुणांचे अंतर असेल तेव्हा आघाडीवर असणारा खेळाडू हा विजेता घोषित केला जातो. आता याला एक अंत असावा म्हणून जर समजा दोन्ही खेळाडू 29-29 अंकांवर आले तर मग जो खेळाडू पहिले 30 वा पॉईंट मिळवेल त्याला त्या सेटचा विजेता घोषित केले जाते.

बॅडमिंटन या खेळामध्ये स्कोरिंग कसे असते ?

कोण सेवा देत आहे याची पर्वा न करता, जो खेळाडू शटलकॉक जेव्हा प्रतिस्पर्ध्याच्या बाजूने मजला मारतो तेव्हा गुण मिळविला जावू शकतो.

२१ गुणांपर्यंत पोहोचणारी पहिला गट खेळ जिंकते. तथापि, विजयी संघाने कमीत कमी दोन गुणांनी विजय मिळविला पाहिजे. टाय (प्रत्येक २० गुण) झाल्यास, दोन अतिरिक्त गुण मिळविणारा पहिला संघ विजेता होतो.

३० गुणांपर्यंत पोहोचनारा पहिला संघ विजेता असतो, इतर संघाने कितीही धावा काढल्या तरीही.

तीन पैकी दोन खेळ जिंकणारा पहिला संघ विजयी बनतो.

बॅडमिंटन खेळाचे नियम

  • या खेळामध्ये २ खेळाडू असतात आणि हा खेळ तीन भागामध्ये खेळला जातो. • एखाद्या खेळाडूने सर्व्ह करण्यापूर्वी आपला प्रतिस्पर्धी तयार होईपर्यंत प्रतीक्षा करणे आवश्यक आहे.
  • एका सामन्यात २१ गुणांच्या ३ सर्वोत्तम खेळाचा समावेश असतो
  • शटलकॉक कोर्टाच्या हद्दीबाहेर मारू नये.
  • खेळाडूला नेटला स्पर्श करण्याची परवानगी नसते.
  • शटलकॉकला रॅकेटने खाली मारू नये.
  • सर्व्हरने शटलकॉक मारण्यापूर्वी सर्व्हर प्राप्त करणाऱ्या गटाने कोर्टवरील रेषांना स्पर्श करू नये.
  • रॅली जिंकणारी गट त्याच्या गुणांमध्ये एक गुण जोडते.
  • २० गुणानंतर जो गट सर्वप्रथम २ गुण मिळवते तो गट खेळ जिंकतो.
  • . सर्व्ह होईपर्यंत दोन्ही खेळाडूंचे पाय स्थिर स्थितीत असणे आवश्यक आहे. यावेळी आपले पाय रेषेला स्पर्श करु शकत नाहीत.
  • प्रतिस्पर्ध्याच्या खाली येणाऱ्या स्ट्रोकला रोखण्यासाठी एखादा खेळाडू जाळ्याजवळ त्याचे रॅकेट धरु शकत नाही. वॅडमिटन या खेळामध्ये चूक (फॉल) केव्हा मनाला जातो
  • सर्व्हरचे पाय सर्व्हिस कोर्टात नसतात किंवा जर रिसीव्हरचे पाय सर्व्हरच्या विरुद्ध तिरपे असतात.
  • . सर्व्हर जेव्हा तो सर्व्ह करतेवेळी पुढे सरकतो.
  • कोर्टाच्या हद्दीबाहेर उतरणारी, नेटच्या खाली किंवा त्याद्वारे जाणारी सेवा किंवा शॉट इतर कोणत्याही अडथळ्यांना किंवा खेळाडूच्या शरीराला किंवा कपड्यांना स्पर्श करते.
  • खेळाडू किंवा कार्यसंघाकडून सलग दोनदा शटल मारणे.

बॅडमिंटन खेळण्याचे अनेक शारीरिक व मानसिक फायदे देखील आहेत:

१) शारीरिक क्षमता वाढवते

बॅडमिंटन खेळाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे हा खेळ खेळाडूची शारीरिक क्षमता वाढवतो. व्यक्तीच्या

स्नायूंना बळकट करतो. बॅडमिंटन च्या खेळात इकडून तिकडे पळत राहावे लागते. ज्यामुळे शरीराचा स्टॅमिना वाढतो.

२) हृदयरोगाचा धोका कमी होतो

बॅडमिंटनमधील लगातार हालचालीमुळे हृदय मजबूत होते. हृदयाला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होतो. ज्यामुळे व्यक्‍ती निरोगी राहून हृदयरोगाचा धोका कमी होतो.

३) मानसिक तणाव कमी होतो

बॅडमिंटन खेळण्याचे जसे शारीरिक फायदे आहेत तसेच या खेळाचे मानसिक फायदे देखील आहेत. या खेळाला खेळल्याने शरीरात ताण निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात.

४) शरीराची लवचीकता वाढते

बॅडमिंटनमध्ये उड्या मारून शटल कॉक ला मारल्यामुळे पाठीचा कणा लवचिक होतो. व यामुळे शरीराची लवचीकता वाढते.

५) डायबिटीज चा धोका कमी होता.

६) मेटाबोलिस्म वाढते.

७) हात व पायांची हाडे मजबूत व बळकट बनतात.

८) विचार करण्याची क्षमता वाढते.

९) वचन कमी करण्यात सहाय्यक आहे.

१०) सामाजिक अस्तित्व निर्माण करते.

बॅडमिंटन खेळाविषयी मनोरंजक तथ्ये

  • बॅडमिंटन हा खेळ जगातील दुसरा सर्वात लोकप्रिय खेळ आहे.
  • बॅडमिंटन हा खेळ टेनिस खेळापेक्षा तीव्रपणे खेळावा लागतो. • या खेळामध्ये आशियाई वर्चस्व आहे म्हणजे या खेळामध्ये अशीयाई खेळाडू सर्वोत्कृष्ट आहेत.
  • सुरुवातीला बॅडमिंटन खेळाडूंच्या पायाशी खेळला गेला म्हणजेच रॅकेट च्या ऐवजी शटलकॉक मारण्यासाठी पायांचा उपयोग करत होते.
  • या खेळाच्या शोधामध्ये भारताने आपली महत्वाची भूमिका बजावली आहे.
  • शटलकॉकला बऱ्याचदा पक्षी, फुल किंवा बर्डी म्हणून संबोधले जाते.
  • पहिला अधिकृत बॅडमिंटन क्लब १८७७ मध्ये युनायटेड किंगडमध्ये स्थापन झाला आणि त्यास ‘द बाथ बॅडमिंटन क्लब’ असे म्हटले जाते.
  • पुरुष आणि महिला एकेरी तसेच दुहेरी सामन्यांसाठी १९९२ मध्ये बॅडमिंटनला ऑलिम्पिक खेळ म्हणून मान्यता मिळाली.
  • बॅडमिंटन रॅकेट बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तारांची लांबी दहा मीटर लांब असते.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

बॅडमिंटनच्या मैदानाला काय म्हणतात?

कोर्ट.

बॅडमिंटन या खेळासाठी कोणते साहित्य लागते?

रॅकेट आणि शटलकॉक .

बॅडमिंटन खेळाचा जनक कोण आहे?

ड्यूक ऑफ ब्युफर्डला.

बॅडमिंटन या खेळामध्ये कोणत्या अधिकारी समाविष्ट असतात?

सरपंच, पंच, सर्विस पंच , रेषा पंच.

बॅडमिंटन खेळल्यामुळे मानसिक त्रास कमी होतो का?

होय.

Leave a Comment