Bank Loan Rejected Reason : मित्रांनो घर, गाडी खरेदी करणे किंवा अन्य कोणत्याही महत्त्वाच्या गरजेसाठी बँकेकडून कर्ज घेणे हे आजच्या घडीला सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. सरकारी, खासगी तसेच इतर वित्तीय संस्था विविध प्रकारची कर्जे सहज उपलब्ध करून देतात. मात्र कर्ज मिळवताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेतल्या नाहीत, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या सिबिल स्कोअर वर होतो. सिबिल स्कोअर खराब असेल तर कर्ज मिळण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.
सिबिल स्कोअर म्हणजे काय?
सिबिल स्कोअर हे एखाद्या व्यक्तीचे क्रेडिटविषयक वर्तन दर्शवणारे संख्यात्मक मूल्य आहे. बँका व वित्तीय संस्था कर्ज देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचा सिबिल स्कोअर पाहून त्याची कर्जफेड क्षमतेचा अंदाज घेतात. चांगला सिबिल स्कोअर असलेल्यांना कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते, तसेच व्याजदरही तुलनात्मक कमी असतो. याउलट स्कोअर कमी असेल, तर कर्ज नाकारले जाण्याची शक्यता अधिक असते किंवा जास्त व्याजदर आकारला जातो.
चांगला सिबिल स्कोअर राखण्यासाठी लक्षात ठेवाव्या योग्य बाबी
1) जर तुम्ही कोणतेही कर्ज घेतले असेल आणि त्याचा ईएमआय भरत असाल, तर तो नेहमी वेळेत भरावा. उशीर झाल्यास सिबिल स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो.
2) क्रेडिट कार्ड वेळेवर फेडणे फार महत्त्वाचे आहे. विलंब झाल्यास क्रेडिट स्कोअर कमी होतो, ज्याचा परिणाम भविष्यातील कर्ज अर्जांवर होतो.
3) एकापेक्षा अधिक किंवा मोठी कर्जे घेतल्यास तुमच्या कर्ज फेडण्याच्या क्षमतेबद्दल शंका निर्माण होते. त्यामुळे नवीन कर्ज घेणे कठीण होते.
4) तुम्ही तुमच्या उपलब्ध क्रेडिट लिमिटच्या तुलनेत किती खर्च करता, याचा सिबिल स्कोअरवर प्रभाव पडतो. शक्यतो 30% च्या आत युटिलायझेशन ठेवण्याचा प्रयत्न करा.
5)आपला क्रेडिट अहवाल वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. कोणतीही चूक, चुकीची माहिती आढळल्यास ती दुरुस्त करणे आवश्यक असते.
टीप — वरील माहिती ही सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कोणतीही आर्थिक गुंतवणूक अथवा निर्णय घेण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल.