बासा मासाची संपूर्ण माहिती Basa Fish Information In Marathi

Basa Fish Information In Marathi कोकण म्हटलं की पाहुणचाराला हमखास माशाचा बेत हा असतोच. तुमच्या ओळखीतील कोणी कोकणातील असेल तर या गोष्टीची तुम्हाला पुरेपूर जाणीव असेलच. काही लोकांना मांसाहार चालतो मात्र मासे खात नाहीत, काहींना मासे खाता येतात मात्र माशांबद्दल काहीही माहिती नसते. आजच्या भागामध्ये आपण बासा या माशाची माहिती बघणार आहोत.

Basa Fish Information In Marathi

बासा मासाची संपूर्ण माहिती Basa Fish Information In Marathi

कॅट फिश प्रकारातील असणारा हा मासा पंगासीअस बोकोर्टी या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. त्याला सामान्य भाषेमध्ये रिव्हर, कोबलर, व्हिएतनामी, मोची, पंगासीअस किंवा स्वाई इत्यादी नावांनी ओळखले जाते. हा मासा जरा कमी प्रमाणातच खाल्ला जातो,  मात्र त्याचे आरोग्यदायी फायदे खूपच आकर्षक आहेत.

मित्रांनो, या माशाचे सेवन मुख्यत्वे पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केले जाते. याच्या सेवनाचा सर्वात मुख्य फायदा म्हणजे हृदय निरोगी आणि मजबूत राहते. तसेच हृदयविकाराचा धोका देखील मोठ्या प्रमाणावर कमी होतो. चला तर मग आजच्या भागामध्ये आपण या बासा या माशा बद्दल माहिती बघतानाच त्याचे विविध पौष्टिक मूल्य आणि आरोग्यदायी फायदे देखील जाणून घेऊयात…

नावबासा
प्रकारमासा
उपप्रकारखाद्य मासा
शास्त्रीय नावपंगासीयस बोकोर्डी
कॅलरी१५८ कॅलरीज
फॅट्सकेवळ ०७ ग्राम
प्रोटिन्सतब्बल २२.५ ग्राम
कोलेस्ट्रॉल ७३ मिलिग्राम
कर्बोदकेनाहीत
सोडियम८९ मिलिग्राम

बासा मासा म्हणजे काय:

मित्रांनो, खाद्य प्रकारातील माशांची एक प्रजाती म्हणून बासा माशाला ओळखले जाते. पंगासीडे या कुटुंबातील हा मासा कॅटफिशीचा एक प्रकार असून, दक्षिण पूर्व आशियामधील मेकाँग नदीच्या आणि चाओ फ्राया या दोन नद्यांच्या खोऱ्यामध्ये हे मासे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. संपूर्ण जगभर हे मासे खाल्ले जात असल्यामुळे त्यांची बाजारपेठ देखील सर्वत्र उपलब्ध आहे.

बासा माशाला कसे ओळखावे:

मित्रांनो, आपण दैनंदिन स्वरूपात जे मासे खातो ते आपल्याला सहजासहजी ओळखता येतात. मात्र हे मासे आपण कायम कायम खात नसल्यामुळे यांना ओळखणे फार कठीण आहे, मात्र अवघड बिलकुल नाही. या माशाचे शरीर हे मोठे आणि विशाल असते. त्याच्या तोंडाखाली एक पांढरी पट्टी असून, त्याचे डोके हे गोलाकार मात्र थोडेसे रुंद असते.

सर्वात लांब प्रजाती सुमारे १२० सेंटीमीटर पर्यंत सापडू शकते. हे वनस्पती खाणारे मासे असून पूर येण्याच्या सुरुवातीस ते अंडी देतात, जेणेकरून त्यांची अंडी सर्व दूर पोहोचून त्यांची लोकसंख्या विस्तारित झाली पाहिजे. या अंड्यांमधून जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत साधारणपणे पाच सेंटीमीटर लांबीची पिल्ले बाहेर येतात.

हृदयविकारांमध्ये बासा माशाचे फायदे:

मित्रांनो, बहुतेक मासे हे हृदयविकाराचा झटका कमी करण्यामध्ये फायदेशीर ठरत असतात. त्यातीलच एक मासा म्हणजे बासा मासा होय. मित्रांनो असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीला पहिला हृदयविकाराचा झटका आला असेल तर दुसरा झटका हा येतोच येतो.

मात्र वैद्यकशास्त्राने या गोष्टीची पुष्टी केलेली नाही. पहिल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर योग्य खबरदारी घेतल्यास दुसरा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणावर कमी होते. बासा मासा खाल्ल्यामुळे हृदय अतिशय निरोगी राहण्यास मदत होते. या माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे मोठे प्रमाण असते, जे हृदयविकाराचा धोका कमी करते. तसेच हृदयाला काही इजा झालेली असेल तर त्याची देखील भरपाई करण्याचे कार्य करते.

सोबतच या माशामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राखण्यात मदत मिळते, त्यामुळे हृदयविकार आणि या माशाचे मांस यांचे खूप चांगले असे नाते आहे. आपल्या परिचयातील कुणाला हृदयविकाराचा झटका आलेला असेल आणि ते मांसाहार करत असतील तर त्यांच्यासाठी ही माहिती तुम्ही शेअर करू शकता, किंवा तुम्ही स्वतः देखील त्यांना या माशाच्या मांस खाण्याबद्दल सुचवू शकता.

बासा माशाचे मांस खाण्याचे फायदे:

मित्रांनो, या माशांमध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी प्रमाणावर असते. त्यामुळे लठ्ठपणा देखील वाढत नाही. ज्या लोकांना कमी कॅलरीचा आहार आवश्यक असतो त्यांच्यासाठी हा मांसाहाराचा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल आणि शरीर देखील निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही नक्कीच बासा मासा खायला हवा.

या माशांमध्ये केवळ पाच ग्रॅम इतकेच चरबीचे अर्थात फॅट्सचे प्रमाण असते, मात्र त्यातही ओमेगा थ्री प्रकारचे फॅटी ऍसिड जास्त प्रमाणात असते त्यामुळे शरीरासाठी फायदाच होतो.

मित्रांनो, तुम्हाला दिवसभर सक्रिय राहायचे असेल, तसेच मेंदू देखील सक्रिय ठेवायचा असेल तर ओमेगा थ्री हे फॅटी ऍसिड तुमच्या शरीरामध्ये असणे आवश्यक ठरते. आणि या माशाच्या सेवनामुळे हा घटक तुम्हाला सहजतेने मिळतो. त्यामुळे माणूस दिवसभर ॲक्टिव्ह राहण्यास मदत मिळते.

तसेच ज्या लोकांना मधुमेहाची समस्या जाणवत असेल त्यांच्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण देखील या माशाच्या सेवनामुळे नियंत्रणात राहते. आणि आज सर्वात महत्त्वाची भेडसावणारी समस्या म्हणजे रक्तदाब, हा रक्तदाब देखील प्रमाणात नियंत्रणात राहण्यास मदत होते.

मित्रांनो, आजकाल वजन वाढीची समस्या फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. अनेक लोक बैठ्या कामामुळे लठ्ठ होत चाललेले आहेत. त्यातही व्यायामाचे प्रमाण कमी झालेले आहे, मात्र ज्या लोकांना शारीरिक कष्टाची काम नाही आणि ते व्यायामही करीत नाहीत, सोबतच त्यांचे वजन देखील फार वाढलेली आहे अशा लोकांना या माशाचे शिळे मांस खाण्यास देऊ नये अन्यथा त्यांना त्रास होऊ शकतो.

निष्कर्ष:

मासा खाणे अनेक ठिकाणी चांगले असते असे सांगितले जाते. माशामुळे अनेक जीवनसत्वे आणि पोषक घटक शरीराला मिळत असतात. जे सहसा इतर आहारातून मिळत नाहीत. तसेच विविध प्रकारच्या माशांमध्ये मानवी आजार बरे करण्याचे देखील गुणधर्म सापडलेले आहेत.

आजच्या भागामध्ये आपण बासा या माशा विषयी माहिती बघितली. यामध्ये तुम्हाला हा मासा नेमका कसा ओळखावा, त्याचा हृदयविकारावर होणारा उपयोग, हा मासा खाण्याची पद्धत, तसेच फायदे, त्याच्याबद्दल इतर माहिती, आयुष्यावर होणारा परिणाम, प्रथिनांचे स्वरूप, तसेच हा मासा खाणे चांगली आहे की नाही, अर्थात सुरक्षित आहे का आणि या माशाच्या सेवनाचे तोटे इत्यादी गोष्टींवर माहिती बघितली.

FAQ

बासा मासा स्वस्त असतो का महाग, आणि का?

मित्रांनो, बासा हा मासा अतिशय स्वस्त असतो कारण त्यांची वाढ खूप झपाट्याने होते. आणि त्यांना पकडणे देखील खूपच सोपे असते. अगदी शेततळ्यांमध्ये देखील या प्रकारचे मासे पाळले जाऊ शकतात. तसेच खोल समुद्रामध्ये शिरून मासेमारी करण्याची गरज भासत नसल्यामुळे हे मासे स्वस्त असतात.

बासा हा मासा कोणत्या प्रकारातील आहे?

भाषा हा मासा खाद्य प्रकारातील असून पंगासीअस बोकोर्टी हे त्याचे शास्त्रीय नाव आहे.

बासा या माशाला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते?

या माशाला स्वाई, व्हिएतनामी मोची, रिव्हर कोबलर इत्यादी नावांनी ओळखले जाते.

बासा या माशाचा उगम कुठला असल्याचे सांगितले जाते?

मित्रांनो, या माशाचा उगम दक्षिण पूर्व आशियामधील असल्याचे सांगितले जाते. येथे मेकाँग नदीमध्ये आणि त्या आसपासच्या परिसरात टाक्या किंवा तलावांमध्ये या माशाचे पालन केले जाते.

बासा या माशाचे सेवन करण्यामधील महत्त्वाचा तोटा काय आहे?

मित्रांनो, हा पांढऱ्या मांसाचा मासा असल्यामुळे त्यामध्ये कॅलरी कमी आणि भरपूर प्रथिने असतात. मात्र हा मासा लठ्ठ व्यक्तींना शिळा झाल्यावर दिल्यास त्यांना त्रास उद्भवू शकतो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बासा या माशा विषयीची माहिती बघितली. या माहिती विषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवतानाच नवनवीन ठिकाणी जाऊन आणि वेगवेगळ्या प्रकारचा मांसाहार करण्याबरोबरच माशांची तीव्र आवड असणाऱ्या तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती अवश्य शेअर करा.

धन्यवाद…

Leave a Comment