बेसबॉल खेळाची संपूर्ण माहिती Baseball Game Information In Marathi

Baseball Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आपल्या सर्वांना क्रिकेट हा खेळ माहीतच आहे. लहानपणापासून मोठ्या पर्यंत सगळ्या लोकांना  क्रिकेट या खेळा विषयी माहिती आहे. कारण क्रिकेट हा जगातील प्रसिद्ध व लोकप्रिय असा खेळ आहे. आज याच क्रिकेट खेळाची साधर्म्य असणारा खेळ म्हणजे ‘बेसबॉल’. आज बेसबॉल या खेळाची आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत.

Baseball Game Information In Marathi

बेसबॉल खेळाची संपूर्ण माहिती Baseball Game Information In Marathi

बेसबॉल हा खेळ सर्व जगभरात खेळला जातो. बेसबॉल हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ आहे. या खेळामध्ये क्रिकेट खेळा सारखेच बॅट व बॉल असतात. परंतु बेसबॉल या खेळातील बॅट ही क्रिकेट खेळातील बॅट पेक्षा वेगळी असते. ही बॅट दिसायला रोड सारखी असते. बेसबॉल हा खेळ इंग्लंडमध्ये 1846 मध्ये खेळला जात होता असे म्हटले जाते.

परंतु यावर असे ठोस पुरावे नाहीत. त्यानंतर अमेरिकेने या खेळात बदल घडवून आणले व नियम बनवले व बेसबॉल हा  अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ बनला. दक्षिण अमेरिका,कॅरिबियन, दक्षिण आशिया ,जपान या देशांमध्ये बेसबॉल हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. बेसबॉल हा एक सांघिक खेळ आहे. दोन संघांमध्ये हा खेळ खेळला जातो.

प्रत्येक संघात 9 खेळाडू असतात. या खेळामध्ये एक खेळ पट्टी असते या खेळपट्टीवर खेळणाऱ्या खेळाडूला पिचर असे म्हणतात. हा खेळ तसा क्रिकेट या खेळात सारखा असतो परंतु थोडा फरक असतो. या खेळात सुद्धा एक संघ बॅटिंग करत असतो. त्याचे उद्दिष्ट सुद्धा क्रिकेट सारखेच असते. जो खेळाडू बॅटिंग करतो त्याला आपल्या बेस मध्ये जाऊन आऊट न होता धावा बनवणे हे पहिले उद्दिष्ट असते. तसेच विरोधी संघ हा बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंना आउट करणे व धावा काढू न देणे हे उद्दिष्ट असते. असे काहीसे स्वरूप बेसबॉल या  खेळाचे असते.

आता आपण या खेळाचा इतिहास पाहू !! या खेळाची सुरुवात कधीपासून झाली म्हणजे हा खेळ किती प्राचीन आहे याबद्दल स्पष्ट असे मत नाही. 14 शतकात एका अहवालात याचे वर्णन आहे असे म्हटले जाते. त्याचा शोध कोणी व कुठे लागला याबाबत मतभेद आहेत. अब्नेर डौब्ले या अमेरिकन नागरिकाने शोध लावला आहे असे उपलब्ध माहितीनुसार समजते. त्यानुसार 1839 झाली या खेळाचा शोध लागला आहे असे म्हटले जाते.1992 ते 2012 या दरम्‍यान हा ऑलम्पिक खेळ म्हणून सुमारे 20 वर्षे खेळला गेला.

परंतु अमेरिका हा देश सोडला तर बाहेरील देशात हा खेळ  जास्त कोणी खेळत नव्हते म्हणून हा खेळ ऑलिम्पिक खेळातून हद्दपार करण्यात आला. पूर्वी खेळल्या जाणाऱ्या बॅट अँड बोल या खेळामधून बेसबॉल ची उत्क्रांती झाली आहे याचा शोध लावणे कठीण आहे. कारण त्याविषयी असे ठाम मत नाही .पूर्वीच्या गेम राउंडर्सचे  उत्तर अमेरिकन चा विकास हा बेसबॉल आहे.

अमेरिकन डेव्हिड ब्लॉक जो बेसबॉल इतिहासकार आहे. त्याच्या मते या खेळाचा उगम इंग्लंडमध्ये झाला आहे. या दाव्याचे समर्थन करणारे ऐतिहासिक पुरावे सापडलेले आहेत. ‘स्टूलबॉल’ व ‘टुटबॉल’ हे इंग्रजी खेळ हे या खेळाचे पूर्वज आहेत असे म्हटले जाते. जॉन नुबेरीच्या 1744मध्ये ‘ए लिटिल प्रीटी पॉकेट’ या पुस्तकांमध्ये बेसबॉल या खेळाचा उल्लेख आहे.

बेसबॉल या खेळाचा पहिलाच गेम 1749 मध्ये सरे येथे खेळला गेला .प्रिन्स ऑफ वेल्स हा त्यातील एक खेळाडू होता असे सापडलेल्या ऐतिहासिक पुराव्यात आहे. इंग्लंडच्या लोकांनी जेव्हा कॅनडात स्थलांतरित केले तेव्हा या खेळाचे प्रारंभिक स्वरूप कॅनडामध्ये आणले व कॅनडात  हा खेळ सुरू झाला. 1830 च्या दशकाच्या सुरुवातीला संपूर्ण उत्तर अमेरिकेत हा खेळ खेळला जाऊ लागला.

4 जून 1838 या दिवशी बिचवीले,ओंटोरिया  व कॅनडा येथे उत्तर अमेरिकेतील पहिला अधिकृतपणे रेकॉर्ड केलेला बेसबॉल हा खेळ खेळला गेला. 1845 मध्ये न्यूयॉर्क शहरातील  निकरबॉकर  या क्लबचे सदस्य असलेले अलेक्झांडर  कार्टराईट यांनी निकस निकरबॉकर रेगुलेशन च्या  कोडिफिकेशनचे नेतृत्व केले.

1837 मध्ये गोथम क्लबचे विल्यम आर व्हिटन यांनी लिहिलेल्या नियमांवर 1845 मध्ये नियर निकरबॉकर ने हा खेळ खेळला असे म्हटले जाते. 19 जून 1946 रोजी न्यू जर्सीच्या होबोकोण  येथे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका इतिहासातील पहिला अधिकृतपणे रेकॉर्ड केलेला बेसबॉल खेळ म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा झाली. त्या खेळात  न्यूयॉर्क नाइन ने बाजी मारली.

आता आपण पाहूयात, या खेळात वापरण्यात येणारी साधने !! या खेळातील चेंडू पांढरा किंवा लाल रंगाचा असतो. याचा परीघ 23 ते 23.5 सेंटीमीटर असून वजन 142 ते 148.8 ग्रॅम पर्यंत असते. या खेळातील बॅट ही एस लाकडापासून बनवलेली असते किंवा मेटल किंवा ॲल्युमिनियमची सुद्धा असते.

ही बॅट गुळगुळीत व गोलाकार आकाराची असते. ती मुठीकडे म्हणजे जेथे आपण बॅट पकडतो  तेथे निमुळती होत गेलेली असते. तर दुसऱ्या  टोकास ती जाड असते. त्या जाड गोलाकार भागाचा व्यास 7 सेंटीमीटर असतो म्हणजे 2 इंच असतो. त्याची लांबी जास्तीत जास्त 1.067 मीटर म्हणजे 42 इंच असते.

खेळाडूचा विशेष असा पोशाख असतो. तसे संरक्षणासाठी काही विशेष साधने ही वापरली जातात. क्षेत्ररक्षक म्हणजे कॅचर चे काम चेंडू झेलण्याचे असते. त्यामुळे चेंडू झेलन्यासाठी जाड कातडी मोजे वापरले जातात. तसेच मैदानात खेळाडूला पळताना गती नियंत्रणासाठी तळाला ठोकलेले बूट वापरतात.

तसेच बॅटिंग करणाऱ्या खेळाडूला प्लास्टिकचे हेल्मेट असते. तर चेंडू झेलणाऱ्या खेळाडूच्या चेहऱ्याच्या संरक्षणासाठी चेहऱ्यावर धातूचा जाळीदार मुखवटा असतो व छातीवर जाड कापडाने बनवलेले संरक्षण आच्छादन असते. पायावर प्लास्टिकचे पॅड वापरतात. तसेच या खेळाच्या मैदानाला इनफिल्ड किंवा आऊटफिल्ड या दोन भागात विभागलेले असते. मैदानावर चार घरे असतात म्हणजे चार बेस असतात .म्हणून या खेळाचे नाव बेसबॉल पडले आहे. मैदानाचा जो आकार असतो त्यावरून त्याला डायमंड असे म्हणतात.

चार पैकी एक बेस हा पंचकोणी असतो व इतर उरलेले तीन चौरस असतात. पंचकोनि बेस त्याला होम प्लेट असे म्हणतात. त्याच्यावर उभे राहून फलंदाज फलंदाजी करत असतो. या होम प्लेट पासून 60 फूट उंचावर पिचर प्लेट असते. त्या जागेवरून गोलंदाज बोल फेकत असतो. प्रत्येक बेस मधील अंतर 90 फुटांचे असते. प्रत्येक स्पर्धेमध्ये हे अंतर बदलत राहते.

आता आपण बेसबॉल कसा खेळला जातो व त्याचे नियम यांची माहिती पाहणार आहोत.

या खेळाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आपल्याविरुद्ध संघापेक्षा जास्त स्कोर बनवायचा. ज्या संघाच्या स्कोर जास्त असतो. तो संघ जिंकतो. 9 डावांमध्ये ज्यांचा स्कोर जास्त असतो तो संघ जिंकला जातो. बेसबॉल या खेळात दोन संघ असून प्रत्येकी संघामध्ये 9 खेळाडू असतात. तसेच या खेळात नऊ डाव असतात.

प्रत्येक संघ फलंदाजी करतो. जर 9 डाव झाल्यानंतरही दोन्ही संघात टाय झाला तर पुढे हा खेळ असाच चालू ठेवला जातो जोपर्यंत विजेता संघ मिळत नाही. या खेळात फलंदाजीचा क्रम ठरलेला असतो त्यात बदल करता येत नाही .जर काही कारणास्तव बदल करण्याची वेळ आली तर नवीन खेळाडुंनी पूर्वीच्या खेळाडूच्या प्रमाणे फलंदाजी करावी लागते.

या खेळात पिचर,कॅचेर, पहिला बेसमन मन दुसरा बेसमन आणि तिसरा बेसमन, मध्यभागी व उजवीकडे तीन आउटफील्डर्स असतात. या खेळात एक संघ फील्डिंग करत असतो. तर एक संघ फलंदाजी करतो.

फलंदाज हा  होमप्लेट वर उभे राहून गोलंदाज म्हणजेच ज्याला आपण पिचर म्हनतो त्याने फेकलेल्या बोलला फटका मारायचा असतो. पण बॉल टाकताना टप्पा न पडता फेकायचा असतो. बॉलला फटका मारल्यानंतर फलंदाज पहिल्या घराकडे धाव घेतो .अशाप्रकारे धावा काढल्या जातात. क्रिकेट या खेळात बॉल प्रेक्षकांच्या मध्ये गेल्यावर षटकार असतो. तसे या खेळात होमरन असतो.

म्हणजे बॉल प्रेक्षकांमध्ये गेला की होमरन असतो .म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला जास्तीत जास्त चार धावा मिळतात. फलंदाजाने मारलेला बॉल झेलण्याचा प्रयत्न फिल्डिंग करणाऱ्या संघाला करायचा असतो. फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचा बॉल जर फिल्डिंग करणाऱ्या संघाने  झेलला तर तो फलंदाजी करणारा खेळाडू बाद होतो.

जो बॅटिंग करतो त्या खेळाडू  चौकोनी आकाराच्या बेसबॉल डायमांडच्या  चारही बेसला क्रमाने स्पर्श करून धावा काढायच्या असतात. बॅटर होम प्लेट पासून सुरू होऊन पहिल्या बेस पासून दुसऱ्या बेसवर व तिसऱ्या बेसवर आणि रन काढण्यासाठी घराकडे जाण्यापूर्वी सुरक्षितपणे बेसवर पोहोचण्याचा प्रयत्न करतो. विरोधी संघ हा धावा होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असतो.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment