बासुंदी रेसिपी मराठी Basundi Recipe In Marathi

बासुंदी रेसिपी मराठी Basundi Recipe In Marathi  बासुंदी हे दूध व साखरेपासून बनवले जाणारे एक मिष्टान्न आहे. जे खायला अतिशय चवदार आणि स्वादिष्ट असते. बासुंदी अनेक नावाने ओळखली जाते, हिंदू धर्मात खोजागिरी पौर्णिमेला दूध घोटून बासुंदी तयार केली जाते. तरच मुस्लिम धर्मात ईदच्या सणाला खीर खूरमा बनवला जातो, हे खायला अतिशय गोड आहे. भारतात तसेच काही राज्यात बासुंदी ही अतिशय प्रसिद्ध पदार्थ आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर अशा अनेक ठिकाण आपल्याला हॉटेल मध्ये आपल्याला हे खायला मिळते. घरी कोणी पाहुणे आले तर आपण त्यांना बासुंदी सहज बनून देऊ शकतो. काही लोकांना गोड खूप आवडते, आणि ज्यांना बासुंदी खावशी वाटते पण ते बाहेर जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी आम्ही एकदम सोप्या पद्धतीने हॉटेल सारखी स्वादिष्ट बासुंदी कशी तयार करतात. आता आपण बासुंदी रेसिपी कशी तयार करतात पाहणार आहोत.

basundi recipe

बासुंदी रेसिपी मराठी Basundi Recipe In Marathi

बासुंदीच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :

बासुंदी तयार करण्यासाठी आपल्याला पहिले पूर्वतयारी करावी लागते. काजू, बदाम, दूध आणखी सामान एकत्र करावे लागते. त्याचे व्यवस्थित बारीक करावे लागते, यासाठी आपल्याला 20 मिनिट लागतात.

कुकिंग टाईम :

बासुंदी कुकिंग करण्यासाठी आपल्याला एकून 30 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

बासुंदी तयार करण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते. त्यामुळे आपली बासुंदी लवकर तयार होते, आणि कुकिंग करायला वेळ लागत नाही. पूर्वतयारीसाठी 20 मिनिट आणि कुकिंग करिता 30 मिनिट लागतात, असा बासुंदीसाठी एकूण 50 मिनिट वेळ लागतो.

बासुंदीचे प्रकार :

बासुंदी हा एक गोड पदार्थ आहे. जो मिस्तान म्हणून वापरला जातो. हे दुधापासून तयार केली जाते. बासुंदी ही वेग वेगळ्या ठिकाणी अलग अलग प्रकारे बनवली जाते. यामध्ये खीर खुरमा, साबुदाणा बासुंदी, खजूर बासुंदी, फळापासून सुध्दा बासुंदी तयार केली जाते, बासुंदी हे सर्वाच्या आवडीचा पदार्थ आहे.

वाढीव :

बासुंदी ही आपण 6 व्यक्तीकरिता बनवणार आहोत.

बासुंदी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 2 लिटर दूध.
2) एक चिमूट केसर.
3) 100 ग्रॅम साखर.
4) 50 ग्रॅम काजू.
5) 50 ग्रॅम बदाम.
6) एक जायफळ.
7) 5 ते 6 इलायची.
8) थोडा पिस्ता.

पाककृती :

 • बासुंदी तयार करण्यासाठी चांगले दूध असणे आवश्यक आहे. त्यामुळे बासुंदी चांगली आणि स्वादिष्ट बनते.
 • सर्वात प्रथम तुम्ही काजू, बदाम, पिस्ता व्यवस्थित मध्यम बारीक करून घ्यावा, आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
 • नंतर इलायची आणि जायफळ बारीक करून घ्या. बारीक होत नसेल तर मिक्सरमध्ये थोडी सागर टाकून बारीक करावे.
 • एक खोल तळाची कढई किंवा पॅन घ्या. त्याला गॅस वरती ठेवा, आणि गॅस चालू करा.
 • यामध्ये संपूर्ण दूध टाकून द्यावे, नंतर त्याला एक उकळी येऊ द्यावी. तो पर्यत गॅस मध्यम आसेवरती ठेवा.
 • दूध जळू नये किंवा खाली लागू नये, यासाठी त्याला वारंवार घोटत/ढवळत रहा, असे 20 ते 25 मिनिट करत रहा.
 • बासुंदी तयार करत असताना. दुधावरीती मलाई किंवा कापड येऊ देऊ नका, ते सतत ढवळत राहा.
 • नंतर यामध्ये आपण बारीक केलेले जायफळ आणि इलायची टाका, आणि पूर्ण मिश्रण करून घ्या.
 • पुढे आवश्यकते नुसार साखर टाका, आणि एक चिमूट केसर टाका. यामुळे आपली बासुंदी सुगंधित आणि चवदार होणार.
 • नंतर आपण मध्यम बारीक केलेले काजू, बदाम आणि पिस्तचे बारीक तुकडे यामध्ये टाका. आणि व्यवस्थित मिश्रण करून घ्या.
 • काही वेळानंतर आपण तयार करत असणारे दूध थोडे घट्ट होणार, म्हणजे आपली बासुंदी तयार झाली आहे.
 • आता गॅस बंद करून बासुंदी खाली काढून घ्यावी. आता आपण बासुंदी छोट्या वाटीत किंवा ग्लास मध्ये घेऊन, त्यावर कोरड्या गुलाबाच्या पाकळ्या आणि बारीक काजू, बदाम टाकून सजवू शकतो. अशा प्रकारे आपली एकदम स्वादिष्ट बासुंदी तयार आहे. थोडी थंड करून ही आपण आता खाऊ शकतो.

बासुंदीमध्ये असणारे घटक :

बासुंदी तयार करत असताना आपल्याला अनेक पौष्टिक घटक असणारे पदार्थ वापर लागतात. जसे दूध, काजू, बदाम, पिस्ता यामध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम, फॅट, शुगर असेल अनेक घटक आहेत. जे आपल्या शरीरातील आवश्यक आहेत.

फायदे :

बासुंदी हा दुधापासून तयार केलेला पदार्थ आहे. जो सर्वाना आवडतो. ही खाल्ल्याने आपल्याला अनेक फायदे होतात.

यामध्ये जास्त दूध वापरल्या जाते, ज्यामधून आपल्याला कॅल्शियम मिळते. जे आपल्या शरीरातील खूप फायद्याचे आहे.

आणखी बासुंदीमध्ये काजू, बदाम, पिस्ता यासारखे पौष्टिक आहार वापरला जातो. यातून आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक मिळतात.

तोटे :

बासुंदी हा एक गोड पदार्थ आहे. जो जास्त प्रमाणात सेवक केलं तर आपल्याला मळ मळ होऊ शकतो. पोटदुखी सुध्दा होय शकते. म्हणून आपण हे योग्य प्रमाणात खाल्ली पाहिजे.

यामध्ये विशिष्ट घटक असतात, जे आपण रोज सेवन करत नाही. त्यामुळे जास्त सेवन केल तर आपण आजारी पडू शकतो.

तर मित्रांनो, तुम्हाला बासुंदी रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment