बासुंदी ची रेसिपी | basundi recipe in marathi

By Wiki Mitra

Published On:

Follow Us
बासुंदी ची रेसिपी | basundi recipe in marathi

बासुंदी ची रेसिपी | basundi recipe in marathi

नमस्कार खवय्ये बंधुनो आणि भगिनींनो आज आपण एक अत्यंत लोकप्रिय अशी स्वीट डिश म्हणजेच बासुंदी ची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मी पाहुयात

वेळ: साधारण दीड तास

५ ते ६ जणांसाठी खालील दिलेल्या समग्रीपासून तुम्ही बासुंदी बनवू शकता.

बासुंदी ची रेसिपी साहित्य ( basundi recipe in marathi ingredients ) :

  • ४ लिटर दुध
  • १/४ वाटी बदाम, पिस्ते (मीठ नसलेले)
  • २ चमचे चारोळी
  • ३/४ ते १ वाटी साखर
  • १ चमचा वेलची पूड

बासुंदी ची रेसिपी कृती ( basundi recipe in marathi steps) :

१) सर्वप्रथम बदाम आणि पिस्ते ३ तास भिजत घालावेत.
त्यानंतर सोलून पातळसर काप करून घ्यावे.

२) एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये दुध उकळत ठेवावे. वरती जी साय जमेल ती कालथ्याने मोडावी. किंवा ढवळून टाकावी. कालथा उकळत्या दुधात ठेवून द्यावा म्हणजे दुध उतू जाणार नाही. दुध तळाला चिकटून करपू नये म्हणून तळापासून कालथ्याने हलवावे. दुध निम्म्यापेक्षा कमी होईपर्यंत आटवून घ्यावे.

चना मसाला रेसिपी | chana masala recipe in marathi येथे वाचा

३) दुध आटले कि त्यात बदाम-पिस्त्याचे काप, चारोळी घालावी. तसेच साखर घालावी व हलवून घ्यावे.
आधी १/२ वाटी साखर घाला,व चव पाहून उरलेली साखर घालावी.

४) अजून १० मिनिटे उकळी काढावी व गॅस बंद करून वेलची पूड घाल

५) बासुंदी गार होवू द्या म नंतर फ्रीजमध्ये किमान ३ ते ४ तास ठेवा. थंड झाली कि बासुंदी दाट होईल.

बासुंदीबरोबर, पुरी, बटाटा भाजी अस तुम्ही सर्व्ह करू शकता तर आपली स्वीट डिश तयार आहे.

Wiki Mitra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment