बटाटा रस्सा रेसिपी मराठी Batata Rassa Recipe in Marathi बटाट्याची भाजी बऱ्याच लोकांनी आवडत नाही परंतु आज आम्ही तुमच्याकरिता खास असा बटाटा रस्सा रेसिपी घेऊन आलो आहोत, जी तुम्हाला नक्की आवडेल. बटाटा रेसिपी तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तसेच बटाट्या भाजीचे प्रकारही भिन्न भिन्न आपल्याला पाहायला मिळतात.
तर चला मग आज आपण या रेसिपी विषयी जाणून घेऊया.
बटाटा रस्सा रेसिपी मराठी Batata Rassa Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
बटाटा रस्सा रेसिपी ही सामान्य व्यक्ती अगदी कमी सामग्रीमध्ये देखील तयार करू शकते यासाठी अशी कोणतीही विशिष्ट पदार्थ लागत नाही अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने आणि कमी वेळात आपण ही रेसिपी करू शकतो. बटाट्यापासून वेगवेगळ्या भाज्या तयार केल्या जातात जसे की, फ्राईज, बटाटा रस्सा, स्नॅक्स, आलू वडा, आलू चिप्स, आलू पराठा, आलू चटणी, आलू वडी इत्यादी. चला मग आज आपण या रेसिपी विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. त्यासाठी लागणारे सामग्री व पाककृती खालील प्रमाणे.
रेसिपी किती व्यक्तींकरिता आहे ?
ही रेसिपी आपण चार व्यक्तींकरिता बनवणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
रेसिपीच्या पूर्वतयारी करता केवळ 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
ही रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
या रेसिपीसाठी लागणारा एकूण वेळ हा 20 मिनिटे एवढा आहे.
बटाटा भाजी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :
1) 2 कच्चे बटाटे
2) 2 कच्चे टॉमेटो
3) चिरलेला कांदा
4) एक चमचा आलं लसूण पेस्ट
5) एक चमचा गूळ
6) चिमुटभर हिंग
7) चवीनुसार मीठ तेल
8) गोडा मसाला
9) कढीपत्त्याची पाच ते सहा पाने
10) पाव चमचा हळद
11) एक चमचा तिखट
12) अर्धा चमचा जिरे
13) हळद
14) पाव चमचा मोहरी
भाजी तयार करण्याची पाककृती :
- सर्वप्रथम बटाट्याची छान मोठे तुकडे करून एका पाण्यामध्ये भिजू घालून ठेवावेत. टोमॅटो धुवून देखील टोमॅटोचे मोठे तुकडे करून घ्या.
- एका छोट्या कुकरमध्ये तेल गरम करण्याकरिता ठेवा तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरी हिंग कढीपत्त्याची तीन-चार पाने घालून परतून घ्या.
- नंतर त्यामध्ये कांदा घालून लाल सोनेरी होईपर्यंत परतून घ्या कांदा परतून झाला की, त्यामध्ये बटाटा आणि टोमॅटोचे तुकडे घालून मिक्स करून घ्या.
- नंतर त्यामध्ये हळद, तिखट, गुड आणि गोडा मसाला तसेच चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करून घ्या.
- आता तुमच्या अंदाजानुसार त्यामध्ये पाणी सोडा रसा जाडसर होईल अति पातळ न करता थोडाफार घट्टच होईल एवढेच पाणी ओतावे.
- नंतर हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे. मसाल्याच्या मिरची पावडर सर्व व्यवस्थित मिक्स होऊन जाईल.
- त्यानंतर कुकरचे झाकण लावून घ्यावं तीन शिट्या होऊ द्या तुमची बटाट्याची पातळ रस्सा भाजी तयार आहे.
- अशाप्रकारे गरमागरम बटाटा भाजी रस्सा रेसिपी तयार आहे. आता ही रेसिपी तुम्ही पोळी, भाकर किंवा पाव ब्रेड सोबत खाऊ शकता.
पोषक घटक :
बटाटा रेसिपी झटपट होणारी रेसिपी आहे तसेच त्यामधील पोषक तत्वे असतात. जे आपल्या शरीराला आवश्यक असतात. या भाजीमध्ये व्हि़टॅमिन सी, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, झिंक, विटामिन बी 6 आणि फॉस्फरस इत्यादी पोषक घटक आढळतात.
फायदे :
बटाट्यामध्ये असलेले पोषक तत्व हे त्वचेसाठी खूपच मौल्यवान आहे अनेक महिला आपल्या त्वचा उजळण्यासाठी बटाट्याचा उपयोग करतात.
बटाट्याची भाजी आपण सालीसहित खायला पाहिजे त्यामध्ये विटामिन बी 3 मोठ्या प्रमाणात असते तसेच जीवनसत्व बी 3 आपल्या शरीरासाठी अति आवश्यक आहे. त्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.
बटाट्यामध्ये असणारी कुको-माईन्स रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.
बटाट्यांमध्ये फायबरचं प्रमाणही जास्त असतं त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढविण्यासाठीही मदत होते.
तोटे :
बटाट्याचे अति प्रमाणात सेवन केले तर आपल्या रक्तातील साखर आणि इन्सुलिनची गती वाढेल तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांकरिता हे पदार्थ हानिकारक आहेत.
बटाट्यामध्ये ग्लायसेमिक इंडस्ट्रिज जास्त प्रमाणात असतात. व बटाट्याच्या सालीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतात.
तर मित्रांनो तुम्हाला बटाटा रस्सा रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा