बाकरवडी मराठी Bhakarwadi Recipe in Marathi

बाकरवडी मराठी Bhakarwadi Recipe in Marathi बाकरवडी लहान पासून मोठ्यांना सर्वांनाच आवडते परंतु ही रेसिपी करायला थोडी किचकट कशी वाटते त्यामुळे बरेच लोक घरी न करता रेडीमेड बाकरवडी विकत आणतात.  बाकरवडी हे महाराष्ट्रात तसेच गुजरातमध्ये फेमस आणि पारंपारिक कुरकुरीत तेलातून तळलेला गोड आणि मसालेदार असा एक लोकप्रिय नाश्ता आहे.  तर आज आपण येथे जाणून घेऊया बाकरवडी ही रेसिपी कशी तयार करतात.

Bhakarwadi

बाकरवडी मराठी Bhakarwadi Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

बाकरवडी मध्ये छोटी बाकरवडी मोठी बाकरवडी असे दोन प्रकार पडतात तसेच बाकरवडी चे आवरण आणि त्यामध्ये लागणारे सारणामुळेच बाकरवडी मध्ये चवीला फरक पडतो.  हे एक गुजराती आणि महाराष्ट्रीयन फेमस नाश्ता आहे, जो चहा सोबत खाल्ला जातो.  तर चला मग जाणून घेऊया बाकरवडी या  रेसिपीसाठी लागणारे साहित्य  :

ही रेसिपी आपण 4 व्यक्तींकरिता बनवणार आहोत  :

पूर्वतयारी करिता लागणारा वेळ  :

बाकरवडीची पूर्वतयारी करण्याकरता आपल्याला 25 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम  :

त्याच्या बाकरवड्या आपल्याला तळाव्या लागतात.  त्यामुळे त्या तळून काढण्यासाठी  30  मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम  :

बाकरवडी रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला एकूण 55 मिनिटे एवढा वेळ लागतो.

बाकरवडी तयार करण्याचा लागणारे साहित्य  :

1)  एक वाटी मैदा

2)  1/2 वाटी बेसन

3)  हळद

4)  चवीनुसार मीठ

5) पाव चमचा हिंग

6) एक मोठा चमचा तेल

बाकरवडीच्या सारणासाठी लागणारे साहित्य :

1) 1/2 वाटी किसलेले सुके खोबरे

2)  एक मोठा चमचा खसखस

3)  हळद

4)  लाल मिरची पूड

5)  एक मोठा चमचा पांढरे तीळ

6) अर्धा चमचा धने पूड

7) अर्धा चमचा जिरे पूड

8) पाव चमचा हिंग

9) बारीक चिरलेली कोथिंबीर

10) चवीनुसार मीठ

11) एक छोटा चमचा पिठीसाखर

12) चिंचेचा कोळ

13) पाणी

बाकरवडीची पाककृती  :

 • खमंग ढोकळा कसा बनवायचा याविषयी मराठी
 • एका भांड्यामध्ये बेसन, मैदा, हळद, मीठ, हिंग व तेल घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
 • ते सर्व मिश्रण एकजीव झाले की त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून ते मिश्रण मळून घ्यावे.
 • नंतर मळून घेतलेले मिश्रण 10 मिनिटे झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यावे.
 • तोपर्यंत बाकरवडीमध्ये भरण्याची सारण तयार करून घ्यावे.
 • सर्वप्रथम एका भांड्यात किसलेले खोबरे, हळद, पांढरे तीळ, लाल मिरची पूड, धने पूड, खसखस, मीठ व साखर एकत्रित करून एकजीव करून घ्या.
 • हे सर्व मिश्रण मिक्सरला लावून थोडेसे जाडसर वाटून घ्यावे.  नंतर या मिश्रणामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
 • नंतर आपण वळलेल्या पिठाचे समान छोटे छोटे गोळे करून घ्यावे.
 • नंतर त्याची पोळीपाटावर थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यावी.
 • तयार पोळीवर चिंचेचा कोळ चमच्याने पसरून द्यावा, त्यावर सारणाची मिश्रण पसरावे व घट्ट असा रोल तयार करून घ्यावा.
 • हा रोल घट्ट झाला नाही तर सारण बाहेर पडेल.
 • नंतर सुरीने एक एक इंचाचे तुकडे करून घ्यावे.
 • नंतर एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवावे व त्यामध्ये तयार केलेल्या बाकरवडी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्याव्यात.
 • नंतर ह्या बाकरवडी थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात तुमची गरमागरम बाकरवडी रेसिपी तयार आहे.

पोषक घटक  :

बाकरवडी मध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कोलेस्ट्रॉल, सोडियम इत्यादी पोषक घटक असतात जे शरीरासाठी आवश्यकही असतात.

फायदे :

बाकरवडी सकाळी नाश्त्यामध्ये खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला एनर्जी मिळते.  त्यामुळे आपला दिवसफ्रेश जातो.

चहा उपाशी पोटी घेतल्याने हानिकारक असतो परंतु आपण जर त्याच्यासोबत बाकरवडी खाल्ली असता, ते चांगले आहे.

बाकरवडी खाल्ल्यामुळे शरीराला प्रथिने मिळतात.

तोटे   :

बाकरवडी खायला कुरकुरीत असते, त्यामुळे जास्त खाल्ल्यास पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

तसेच त्यामधील घटकांचे प्रमाण शरीरात जास्त झाल्यास आपल्याला जळजळ होऊ शकते व  कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील वाढू शकते.

बाकरवडी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली,  ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.  व ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा.

Leave a Comment