भरली वांगी मराठी रेसिपी Bharli Vangi Recipe in Marathi रेसिपीवांग्याची कोणतीही भाजी म्हटली की, तोंडाला पाणी सुटते कारण वांग्याची भाजी खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व खमंग अशी लागते. त्यातच भरली वांगी केली तर जेवणाची मजाच वेगळी राहते. दररोजच्या जेवणामध्ये सततच्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येत असतो, त्यामुळे काही नवीन विशेष पदार्थ तयार करून खावा असा वाटतो. तर आम्ही तुमच्याकरता चटपटीत खमंग अशी भरली वांग्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी करण्यासाठी अत्यंत सोपी व कमी वेळात होते. तसेच रेसिपी तयार करण्यासाठी दुसरे कोणत्या वस्तू विकत आणाव्या लागत नाहीत. सर्व घरांमध्येच उपलब्ध असणारे साहित्य असते. तर चला मग बघूया रेसिपी विषयी सविस्तर माहिती.
भरली वांगी मराठी रेसिपी Bharli Vangi Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
भरली वांग्याची भाजी ही रेसिपी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. गावानुसार त्याची चव बदलते. आज-काल रेस्टॉरंट मध्ये भरली वांगी, मसाला वांगी अशी रेसिपीज आवर्जून तयार केल्या जातात. वांगे लोणचे, भरली वांगी, मसाला वांगी, भरीत ठेचा, टोमॅटो वांगी अशा वेगवेगळ्या पद्धतीने वांग्याची भाजी रेसिपी तयार केली जाते. भरली वांगी ही रेसिपी खाण्यासाठी अत्यंत चटपटीत व खमंग लागते. वांग्याची भाजी तयार करण्यासाठी अत्यंत सोपी व कमी वेळात तयार होणारी रेसिपी आहे. तर चला मग पाहूया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती.
ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार होणार आहे?
ही रेसिपी आपण 6 व्यक्तींसाठी तयार करणार आहोत.
पूर्व तयारी करता लागणारा वेळ :
या रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
रेसिपी कटिंग करण्याकरता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
वांग्याचे भरीत रेसिपी पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकूण वेळ हा 25 मिनिटे लागतो.
साहित्य :
1) अर्धा किलो जांभळी कोवळी वांगे
2) चार कांदे भाजून घ्या
3) अर्धी वाटी शेंगदाणे पावडर
4) अर्धी वाटी तिळाची कूट
5) एक चमचा लसूण पेस्ट एक चमचा आलं पेस्ट
6) एक छोटा गुळाचा तुकडा
7) एक चमचा काळा मसाला
8) एक चमचा लाल तिखट
9) पाव चमचा हळद चिमूटभर हिंग
10) चवीनुसार मीठ
11) दोन चमचे तेल
12) पाव चमचा मोहरी
पाककृती :
- कारल्याची भाजी रेसिपी मराठी
- भरली वांग्याची भाजी तयार करण्यासाठी लागणारा मसाला सर्वप्रथम तयार करून घेऊया.
- सर्वप्रथम भाजलेले कांदे, लसूण मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पेस्ट करून घ्या.
- नंतर त्यामध्ये दाण्याचे कूट, तिळाचे कूट काळा मसाला, तिखट, हळद, मीठ आणि गूळ घालून मिक्सरमध्ये फिरून घ्या .
- दाण्याचं किंवा तिळाचं खूप जास्त बारीक करायचं नाही वांग्यामध्ये भरायचा मसाला अशाप्रकारे तयार करून घ्या.
- आता वांगी स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्या. नंतर त्या वांग्याला सुरीने काम करून त्यामध्ये तयार झालेला मसाला भरून तयार करून घ्या.
- नंतर एका कढाई मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा तेल गरम झाले की, त्यामध्ये मोहरी घालून छान तडतडून द्या. नंतर त्यामध्ये थोडा हिंग घालून घ्या.
- नंतर त्यामध्ये भरलेली वांगी घाला छान हलवून घ्या अगदी मंद आचेवर झाकण ठेवून ही वांगी छान शिजेपर्यंत परतून घ्या. अशाप्रकारे भरली वांगी रेसिपी तयार आहे.
- आता ही भरली वांग्याची रेसिपी तयार आहे. गॅस बंद करून त्यावर थोडा कोथिंबीर घाला.
- भरली वांग्याची भाजी पोळी, तंदुरी रोटी, ज्वारी, बाजरी, तांदूळ, पुरी त्यांच्यासोबत छान लागते तुम्ही हे भरीत रेसिपी तयार करून बघा व आम्हाला नक्की कळवा.
पोषक घटक :
वांग्यामध्ये विटामिन के, व्हिटॅमिन सी, विटामिन बी 6, थायमिन, नियासीन, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस, पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नीज इत्यादी घटक आढळतात. तसेच कोलेस्ट्रॉल देखील आढळते. तसेच मुबलक प्रमाणात खनिजे व विटामिन्स असतात. जे आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतात.
फायदे :
वांगी आपल्या शरीरासाठी पोषक असतात कारण वांग्यामध्ये बरेच पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.
वांगी चुलीवर भाजून खाल्ल्यामुळे खोकला बरा होण्यास मदत होते तसेच कफ बाहेर पडतो.
भरली वांग्याची भाजी खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते व भूक शांत होते.
वांग्याचे नियमित सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते, तसेच कर्क रोगापासून बचाव होतो.
तोटे :
वांग्यामध्ये बरेच पोषक घटक असतात परंतु वांग्याचे अति सेवन केले तर ते आपल्या करता हानिकारक ठरू शकते. म्हणून वांग्याची भाजी प्रमाण आपण प्रमाणात खाल्ली पाहिजे.
पोटाशी संबंधित कोणत्याही प्रकारची तुम्हाला जर समस्या असेल तर वांगी खाणे टाळावे. कारण यामुळे आपल्याला पोटदुखी, गॅसेस, अपचन व उलट्या अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची एलर्जी किंवा डोळ्यांचा त्रास असेल तर तुम्ही वांगी खाणे टाळावी. यामुळे तुमचा त्रास आणखीन वाढू शकतो.
तर मित्रांनो, तुम्हाला भरली वांग्याची भाजी हे रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.