भोगीची भाजी मराठी Bhogichi Bhaji Recipe In Marathi

भोगीची भाजी मराठी Bhogichi Bhaji Recipe In Marathi  भोगीची भाजी हे वेग-वेगळे भाजीपाले टाकून बनवली जाते. ही भाजी एक पौष्टिक आहार आहे, आणि ही एक शुध्द शाकाहारी भाजी आहे. मकर संक्रांतीला देवाला नैवेद्यसाठी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर बनवली जाते. भोगीची भाजी सर्वाना आवडते, आणि हे एक लोकप्रिय भाजी आहे. आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल एकदम स्वादिष्ट आणि चवदार भोगीची भाजी खायाला मिळते.

काही ग्रामीण आणि शहरी भागात ही भाजी सहज मिळत नाही. काही लोकांना भोगीची भाजी खूप आवडते, पण त्याचा परिसरात स्वादिष्ट भोगीची भाजी मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट भोगीची भाजी कशी बनवतात यांची रेसिपी. आता आपण भोगीची भाजी रेसिपी पाहणार आहोत.

 Bhogichi Bhaji

भोगीची भाजी मराठी Bhogichi Bhaji Recipe In Marathi

भोगीच्या भाजीचे प्रकार :

भोगीची भाजी हा एक पौष्टिक आहार आहे. भोगीच्या भाजीचे जास्त प्रकार नाही, यामध्ये आपण वेग-वेगळे भाजी-पाले टाकून भोगीची भाजी बनवू शकतो, ही खायाला चवदार भाजी आहे.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
भोगीची भाजी ही रेसिपी आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

भोगीची भाजी पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

भोगीची भाजी तयार करण्यासाठी सर्व साहित्य एकत्र करावे लागते. नंतर आपण लवकर भाजी तयार करू शकतो, यासाठी आपल्याला 30 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

भोगीची भाजी कुकिंग करण्यासाठी आपल्याला 25 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

भोगीची भाजी बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर कुकिंग करावी लागते. यासाठी आपल्याला टोटल टाईम 55 मिनिट वेळ लागतो.

भोगीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 10 ते 12 वालाच्या शेंगा.
2) 1 वाटी हिरवे हरभरे.
3) 1 वाटी शेंगदाणे.
4) कोथिंबीर.
5) अर्धी वाटी तीळ.
6) 2 ते 3 गाजर.
7) 2 बटाटे.
8) 1 वाटी मटर दाने.
9) 2 कांदे.
10) थोडे ओले खोबरे.
11) 5 ते 6 हिरवी मिरची.
12) 4 ते 5 चमचे लसण-अद्रक पेस्ट.
13) थोडा कडीपत्ता.
14) 1 चमच हळद.
15) तेल व मीठ.

पाककृती :

 • मोतीचुर लाडू मराठी
 • सर्वात प्रथम हिरवी मिरची, मटर, कोथिंबीर, वालाच्या शेंगा, गाजर स्वच्छ धुऊन घ्या.
 • नंतर हिरवी मिरची, कांदा, गाजर, वालाच्या शेंगा असे सर्व साहित्य बारीक चिरून घ्या.
 • नंतर हिरवी मिरची आणि तीळ व्यवस्थित भाजून पेस्ट तयार करा. याच बरोबर लसन-अद्रक पेस्ट तयार करा.
 • नंतर गॅस चालू करा, आणि गॅसवरती एक खोल तळाचे भांडे ठेवा, त्यात आवश्यक तेवढे पाणी टाका.
 • यामध्ये चिरेल भाज्या, मटर, शेंगदाणे त्यात थोडी हळद टाकून थोडा वेळ वाफलु द्या, दुसऱ्या बाजूनं एक कढई ठेवा.
 • त्यामध्ये आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा. त्यामध्ये प्रथम कढीपत्ता आणि बारीक कांदा टाका.
 • कांद्याचा कच्चा वास निघे पर्यत परतवत रहा. नंतर यामध्ये लसन-अद्रक पेस्ट टाका आणि चांगला लालसर होऊ द्या.
 • नंतर यामध्ये बारीक खोबरे आणि तीळ हिरवी मिरची पेस्ट टाकून चांगले होये, पर्यत परतवत रहा.
 • हे सर्व झाले की यामध्ये थोडी मिरची पावडर, आणि गरम मसाला टाका, आणि पूर्ण एकजीव मिश्रण तयार करा.
 • मसाला झाला की सुगंध येणार, आणि शिल्लक तेल बाहेर येणार तेव्हा मसाला झाला समजावे.
 • आवश्यक असल्यास थोडे पाणी टाका, नंतर यामध्ये वाफलेल भाज्या आणि सर्व साहित्य मसाल्यात टाका.
 • नंतर यामध्ये आवश्यक तेवढे मीठ टाकून, 5 मिनिट सर्व साहित्य चांगले शिजू द्या.
 • नंतर यामध्ये थोडी बारीक कोथिंबीर टाका,
  आता आपली स्वादिष्ट आणि चवदार भोगीची भाजी खाण्यासाठी तयार आहे.
 • आपण थोडा कांदा, लिंबू, भाकर किंवा पुरी सोबत भोगीची भाजी खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

भोगीच्या भाजीमध्ये असणारे घटक :

भोगीची भाजी ही विविध भाजीपाल्यापासून बनवली जाते. यामुळे यामध्ये विविध पौष्टिक घटक आहेत. जसे कॅल्शियम, फॉस्फरस प्रथिने, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, प्रोटीन, चरबी, संतुप्त चरबी हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.

फायदे :

भोगीची भाजी खाल्ल्याने आपल्याला व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, आणि कॅल्शियम सारखे पौष्टिक घटक मिळतात.

यामुळे आपले डोळे, हाड, आणि त्वचा चांगली राहते. हे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.

यामध्ये असणारे प्रोटीन, चरबी आणि प्रथिने हे सर्व घटक आपल्याला निरोगी ठेवतात, आणि मासपेशीत वाढ करतात.

तोटे :

भोगीची भाजी ही विविध भाजीपाले वापरून बनवली जाते. यामुळे आपण हे जास्त प्रमाणात सेवन केली तर आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

यामध्ये असणारे विविध पौष्टिक घटक आपल्या शरीरात जास्त झाले तर आपण आजारी पडू शकतो.

म्हणून भोगीची भाजी आपण योग्य प्रमाणात सेवन केली पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला भोगीची भाजी रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment