Birsa Munda Information In Marathi बिरसा मुंडा हे एक महान व्यक्तिमत्व होते. ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाचे कार्य केले आहे. हे एक लोकनेते म्हणून ओळखले जातात. यांची परिस्थिती खूपच हालाखीची होती. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना त्यांच्या मामाच्या अयुभाटू या गावी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मामाच्या गावी गेल्यानंतर बिरसा आयुभाटू या गावांमध्ये दोन वर्ष राहिले व त्यांनी तेथील त्यांची प्राथमिक शिक्षण सुद्धा पूर्ण केले.

बिरसा मुंडा यांची संपूर्ण माहिती Birsa Munda Information In Marathi
बिरसा मुंडा हे एक भारतीय आदिवासी नेते होते. त्यांनी ब्रिटिश नियंत्रणाविरुद्ध लढा दिला होता.त्यांनी आपल्या जमातीच्या लोकांच्या मुक्तीसाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे. बिरसा हे रोजगार शोधत असलेले तरुण असताना त्यांच्या गावावर ब्रिटिशांकडून अत्याचार होत होती.
हे त्यांना कळल्यानंतर त्यांनी विविध समस्यांचे ज्ञान अवगत केले आणि ब्रिटिश कंपनी भारतामध्ये येऊन लोकांना अडथळा निर्माण करत होता. तसेच भारतीयांचा पैसा चोरण्यासाठी आले हे त्यांना ओळखून आले. त्यानंतर त्यांनी अशा लोकांच्या मदतीसाठी प्रयत्न केले . त्यांनी त्यांच्या तरुण मंडळींना आपल्या संगतीत घेऊन चळवळ उभी केली होती.
नाव | बिरसा मुंडा |
जन्म | 15 नोव्हेंबर 1875 |
जन्म ठिकाण | उलिहाटू खुंटी झारखंड |
वडिलांचे नाव | सुगमा मुंडा |
आईचे नाव | कर्मी हातू |
मृत्यू | 9 जून 1900 |
बिरसा मुंडा यांचा जन्म व बालपण :
बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड मधील उलिहातू खुंटी येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव सुगमा मुंडा होते. तर त्यांच्या आईचे नाव कर्मी हातू असे होते. त्यांचे बालपण खूपच हालाखीच्या परिस्थितीमध्ये गेले. त्यांचे वडील एक शेतमजूर होते.
घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे शिक्षणासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागले. बिरसा मुंडा हे त्यांच्या छोट्याशा बांबूच्या झोपडीमध्ये वाढले, लहानपणापासूनच ते त्यांच्या मित्रांसोबत खेळायचे.त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच हालाकिची असल्यामुळे बिरसा मुंडा थोडे मोठे झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबांनी त्यांना मामाच्या गावी पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर बिरसा मुंडा हे मामाच्या गावी गेले आणि तेथे दोन वर्ष राहिले आणि तेथेच त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण सुद्धा पूर्ण केले. लहानपणापासूनच त्यांना त्यांच्या परिस्थितीची जाणीव होती. लहानपणी बिरसा मुंडा गावाजवळच्या जंगलामध्ये मेंढरे घेऊन जाण्यासाठी सुद्धा जात होते.
बिरसा मुंडा यांचे शिक्षण :
बिरसा यांनी मामाच्या घरी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढचे शिक्षण त्यांनी जर्मन मिशन स्कूलमध्ये प्रवेश घेतले. बिरसा मुंडा एक उत्साही आणि हुशार विद्यार्थी होते. त्यांना शिक्षणासाठी आपला धर्म बदलावा लागला होता. कारण ख्रिश्चन शाळांमध्ये जर शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना तो धर्म स्वीकारावा लागेल असे त्यांची अट होती. त्यामुळे बिरसा हे डेव्हिड बनले आणि नंतर त्यांनी तेथे आपले शिक्षण पूर्ण केले व अनेक वर्ष तेथेच काढले.
जरी त्यांनी शिक्षणासाठी धर्म बदलला असला तरी त्यांना स्वतःच्या धर्माबद्दल खूप अभिमान होता. काही वर्ष उलटल्यानंतर त्यांनी ख्रिश्चन शाळा सोडून दिले. ख्रिश्चनच्या शाळेमध्ये आदिवासींच्या धर्माबद्दल तसेच त्यांच्या संस्कृती बद्दल खिल्ली उडवली जात होती. त्यामुळे ख्रिश्चन शाळेतील अशा प्रकारांमुळे बिरसा मुंडा हे उदास झाले. त्यांना हे कृत्य अजिबात आवडत नव्हते, लहानपणापासूनच बिरसा मुंडा सर्वांमध्ये प्रेमाने मिसळून राहत होते.
त्यामुळे त्यांनी त्यांच्या तरुण वयामध्ये त्यांच्या वयाच्या तरुण मंडळी आणि समविचारी मित्र एकत्रित करून एक संघटना उभी केली. ते लहान असताना त्यांच्या वडिलांचे जबरदस्तीने धर्मांतरण केले गेले होते. त्यामुळे बिरसा मुंडा यांच्या मनामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या आणि ब्रिटिशांबद्दल अतिशय राग होता. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या समाजातील अशिक्षित आदिवासी लोक इंग्रज सरकारकडून केला जाणारा अन्याय, अत्याचार पाहून अधिकाऱ्यांना त्यांच्या कृत्याबद्दल धडा शिकवायचा असा विचार त्यांनी केला होता.
शाळा सोडल्यानंतर ब्रिटिशांविरुद्ध पहिला संघर्ष :
बिरसा मुंडा हे एक स्वतंत्र सैनिक होते, त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याच्या जोरावर जर्मन शाळेत प्रवेश घेण्याचा आग्रह केला. बिरसा मुंडा यांचे नाव बदलून बिरसा डेविड असे करण्यात आले होते. कारण त्यांना ख्रिश्चन शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा होता. जर्मन मिशन स्कूल सोडण्यापूर्वी त्यांनी काही काळ अभ्यास केला होता. कारण सावकार आणि ब्रिटिश सरकारने केलेल्या गुन्ह्यांविरुद्ध बिरसा यांची बंडाची भावना ही लहानपणापासूनच पेटली होती.
बिरसा मुंडा यांचा तुरुंगवास :
बिरसा मुंडा यांनी गोडगेडा या ग्रामीण भागातील स्वामी आनंद पांडे यांना आपल्या गुरुच्या स्थानी मानले होते आणि त्यांच्या आशीर्वादाने व मदतीने आपल्या देशातील ब्रिटिश सरकारच्या अत्याचारा विरोधात छोटा नागपूर या प्रदेशांमध्ये 1895 मध्ये एक मोठा लढा उभा केला होता. या उभारलेल्या लढ्यामध्ये ब्रिटिश पोलिसांनी बिरसा यांना अटक केली होती. ते तुरुंगात असताना त्यांचा खूप छळ सुरू केला.
बिरसा मुंडा यांचा जडणघडणीचा काळ :
बिरसा मुंडा यांनी 1886 ते 1890 या काळात चैबासा या ठिकाणी आपले वास्तव्य केले. त्यांनी येथे चार वर्ष जर्मन आणि रोमन कॅथलिक ख्रिश्चन आंदोलनाचा सगळीकडे प्रचार केला. या कारणामुळे बिरसा यांच्या वडिलांनी ख्रिश्चन शाळेतून आपल्या मुलाचे नाव काढून घेतले होते.
हे ठिकाण त्यावेळी असलेल्या सरदारांच्या साम्राज्याच्या राजधान्यांपासून खूप जास्त दूर नव्हते. सरदारांच्या या चळवळीमध्ये ब्रिटिश शिपायांनी बिरसा यांना कारस्थान करून पकडले आणि धर्मविरोधी तसेच सरकार विरोधी त्यांच्या नावावर शिक्का सुद्धा मारला होता.
त्यानंतर 1890 मध्ये जैबासा हे ठिकाण त्यांनी सोडून दिले आणि त्यांच्या कुटुंबाने जर्मन मिशनऱ्यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी सोडून दिले. सरदारांच्या विरोधामध्ये आदिवासी लोक ख्रिश्चन होऊ लागले आणि त्यामुळे त्याकाळी चाललेल्या भारत छोडो या आंदोलनासोबतच बिरसा मुंडा त्यांच्या मूळ व पारंपारिक पद्धतीने चालत आलेल्या आदिवासी धार्मिक व्यवस्थितकडे वळले. दुसऱ्या बाजूला वाढत्या सरदार आंदोलनामुळे मुंडा यांनी कोरबेरा सुद्धा सोडला.
नवीन धर्म आणि आदिवासी चळवळ :
ब्रिटिश राजवटीमध्ये आदिवासी लोकांच्या वनसंपत्तीवर असलेल्या अधिकाराबाबत त्यांच्यावर अडथळे निर्माण करण्यात आली. आदिवासींना बेघर व्हावे लागले. आदिवासींनी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी लागणारे फळ, कंदमुळे किंवा लाकूडफाटे तसेच जनावरांसाठी जंगलातील चारा तोडल्यास त्यांना शिक्षा होऊ लागली.
आदिवासी यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे रोखण्याकरिता आदिवासींनी न्यायालयात याचिका दाखल केली परंतु त्यांची याचिका वनाधिकार प्रस्थापित करण्याची मागणी न करता सरकारने ती फेटाळली त्यामुळे आदिवासी समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता .
ब्रिटिश सरकारने आकारलेला शेतसारा माफ करून दुष्काळावर मात करण्याकरिता त्यांनी जनआंदोलने केली. हे आंदोलन जहांगीरदार व जमीनदार यांच्या शोषणाविरोधी केले होते. बिरसा मुंडा यांना समाजामध्ये अशांतता निर्माण केली, त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना जहागीरदार व जमीनदाराच्या माध्यमातून रोखण्याचा प्रयत्न केला.
1895 मध्ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षाचा तुरुंगवास सुद्धा झाला होता. त्यानंतर दोन वर्ष तुरुंगवास भरून परत आल्यानंतर त्यांनी आदिवासींच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न केले. आदिवासी समाजाला संघटित करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले व ब्रिटिश सरकार विविध स्वतंत्र लढा लढला.
बिरसा मुंडा यांचा मृत्यू :
ब्रिटिश सरकारच्या अत्याचारांमुळे 9 जून 1900 मध्ये बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला होता. त्यांनी केलेल्या कार्यामुळे बिरसा मुंडा अशा थोर क्रांतिकार मानवाला समाजाने जननायक हा किताब सुद्धा बहाल केला आहे.
FAQ
बिरसा मुंडा यांचा जन्म कधी झाला?
15 नोव्हेंबर 1875.
बिरसा मुंडा यांच्या वडिलांचे नाव काय होते?
सुगना मुंडा.
बिरसा मुंडा हे कोण होते?
आदिवासी समाजक्रांतीकारक होते.
बिरसा मुंडा यांचा मृत्यू कधी झाला?
9 जून 1900 रोजी झाला.
बिरसा मुंडा यांनी कोणते कार्य केले?
बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांकडून आदिवासी समाजावर होणाऱ्या शोषणाविरुद्ध चळवळ उभारली व लढा दिला. अन्यायाविरुद्ध आंदोलनांमध्ये सहभाग घेतला.