बिस्किट रेसिपी मराठी Biscuit Recipe In Marathi

बिस्किट रेसिपी मराठी Biscuit Recipe In Marathi सकाळी चहासोबत बिस्कीट खाणे खूप लोकांची आवड आहे. वेगवेगळ्या बिस्कीट कंपन्या आहेत, ज्या वेगवेगळ्या फेवर्सचे बिस्किट निर्मितीचे कार्य करतात. परंतु बाजारात मिळणाऱ्या बिस्किटा -सारखेच बिस्किट आपण आपल्या घरी तयार करू शकतो. तेही बाहेर मिळणाऱ्या बिस्किटापेक्षाही टेस्टी व चविष्ट. बाहेरून जाणाऱ्या बिस्किटांमध्ये वेगवेगळ्या पदार्थाचे रसायन टाकले जाते. जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. तर चला मग जाणून घेऊया बिस्किट या रेसिपी विषयी सविस्तर माहिती.

 Biscuit Recipe In Marathi
Biscuit Recipe In Marathi

बिस्किट रेसिपी मराठी Biscuit Recipe In Marathi

रेसिपी प्रकार :

बिस्किट हा इंग्रजांबरोबर भारतामध्ये आला आणि भारतात चांगलाच रुजला लहान पासून मोठ्यांपर्यंत बिस्किट रेसिपी सर्वांनाच आवडते. बिस्किटच्या अनेक कंपन्या भारतात रुजू झाल्या. जसे पार्ले जी, पतंजली, क्रीम बिस्कीट, कोकोनट, टायगर इत्यादी बिस्किट बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. चॉकलेट बिस्कीट, मैदा बिस्कीट, गव्हापासून देखील बिस्किट तयार केले जातात. कंपनीमध्ये तयार केलेले बिस्कीट खूप दिवसांपासून तयार होतात. जे आपल्या शरीरासाठी हानिकारकही ठरू शकतात. म्हणून आपण बिस्किट ही रेसिपी ताजी तयार करून खाऊ शकतो. तेही स्वच्छ व विना केमिकल युक्त. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती.

ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार होणार आहे ?
ही रेसिपी आपण आठ व्यक्तींकरता तयार करणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

या रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

बिस्किट कुकिंग करण्याकरता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

बिस्किट रेसिपी पूर्ण तयार करण्याकरता आपल्याला एकूण 40 मिनिटे एवढा वेळ लागतो.

बिस्किट रेसिपी तयार करण्याकरता लागणारी सामग्री :

1) 100 ग्रॅम बटर
2) 1 वाटी पिठीसाखर
3) पाव चमचा व्हॅनिला एसेन्स
4) 1 वाटी मैदा
5) पाव वाटी न गोड केलेला कोको पावडर
6) पाव चमचा बेकिंग पावडर
7) 3 तीन चमचे दूध
8) साखर
9) 25 ग्रॅम मऊ लोणी
10) 1 चमचा आयसिंग शुगर

पाककृती :

 • सर्वप्रथम एका भांड्यामध्ये लोणी घ्या हे लोणी पिठीसाखर घालून छान फेटून घ्या.
 • हे मिश्रण जेवढे हलके व मऊसर होईल तेवढे छान मिश्रण तयार होईल. नंतर त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून पुन्हा हे मिश्रण मिक्स करून घ्या.
 • मैदा, गोड न केलेला कोको पावडर व बेकिंग पावडर काढून घ्या व छान मिसळून घ्या.
 • हे मिश्रण छान एकत्रित मिसळल्यानंतर यामध्ये दूध व मैदा घालून छान मळून घ्या.
 • हे मिश्रण फ्रीजमध्ये 30 मिनिट ठेवायचे आहे. त्यानंतर पीठ घेऊन त्याचे समान दोन भाग करून घ्या.
 • नंतर बटर पेपर किंवा प्लास्टिक शीट घेऊन. त्यावर पिठाचा एक भाग ठेवा व दुसऱ्या बटर पेपरने झाकून घ्या.
 • नंतर थोडे पातळ चकतीमध्ये रोलिंग पिनने मिश्रण चांगले रोल करा व खूप जाडे रोल करू नका.
 • आता त्याच्या कडा कापून घ्या. कडा कापल्यानंतर तुम्हाला ते एकसारखे बनवायचे असेल तर पुन्हा रोल करा.
 • आता त्याचे आयताकृती तुकडे करून घ्या व त्यावर दूध पिकनिक स्केअर स्मार्ट करा. तुकडे एका बेकिंग ट्रेमध्ये ठेवा.
 • दोन तुकड्यांमध्ये काही अंतर सोडा जेणेकरून ते चांगले विस्तारू शकतील.
 • प्रत्येक तुकड्यावर थोडी साखर पसरवून घ्या व थोडी दाबून द्या.
 • आता 180 डिग्री सेंटीग्रेटवर बिस्किट सुमारे दहा ते पंधरा मिनिटे बेक करण्यासाठी ठेवा.
 • हे बिस्किट तुम्ही फ्री-हीट कुकरमध्ये देखील बेक करू शकता.
 • आता बिस्किटसाठी क्रीम बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मऊ लोणी घ्या आयसिंग शुगर घालून ते छान मिक्स करून घ्या.
 • न गोड केलेला कोको पावडर घालून छान मिसळून घ्या. आता त्यामध्ये दूध घालून घट्ट पेस्ट बनवा.
 • आता बिस्किटासाठी क्रीम तयार आहे. हे कुठेच पूर्णपणे थंड झाल्यावर त्यावर क्रीम पसरवून घ्या व दुसरे बिस्कीट त्यावर बंद करण्यासाठी ठेवा.
 • अशाप्रकारे बोर्बन बिस्कीट तयार आहे. आपण ताजी बिस्किट घरी तयार करून खाऊ शकतो. ज्यामुळे आपले हेल्थ चांगली राहू शकते.

बिस्किटमधील पोषक घटक :

क्रीम बिस्किटामध्ये किंवा इतर कोणत्याही बिस्किटांमध्ये साखर, फॅट, प्रोटीन, व्हिटॅमिन व कोलेस्ट्रॉल असते.

फायदे :

बिस्किट खाण्याचे तसे पाहिले तर आपल्याला जास्त फायदे मिळत नाहीत. परंतु बिस्किट खाल्ल्यामुळे सकाळी आपल्याला फ्रेश वाटते.

बिस्किट खाल्ल्यामुळे आपल्याला ग्लुकोज म्हणजेच एनर्जी मिळते ज्यामुळे आपण बऱ्याच वेळ जेवण न करता राहू शकतो.

बिस्किट खाल्ल्यामुळे आपल्याला भूक लागत नाही व आपले काम होईपर्यंत आपण बिनधास्त काम करू शकतो.

तोटे :

बिस्किट खाल्ल्यामुळे आपल्याला ऍसिडिटी, अपचन, दमा, मूळव्याध, मधुमेह यासारखे आजार होऊ शकतात म्हणून बिस्कीट खाताना प्रमाणात खावे.

बिस्किटांमध्ये इमल्सीफायर्स, प्रिझर्व्हेटीव्हज् , खाण्याचे रंग तसेच अनेक विविध रसायनांचा वापर केलेला असतो तसेच बिस्किटे टिकून राहण्यासाठी त्यामध्ये विविध रसायनांचा देखील वापर केलेला असतो. जी आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात.

बिस्किट तयार करण्याकरिता सल्फाइड सारख्या पदार्थांचा वापर होतो. जे आपल्या रक्ता संबंधित विकारांना कारणीभूत ठरू शकतात.

तर मित्रांनो, बिस्किट या रेसिपी विषयी माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment