बोंबील करी रेसिपी मराठी Bombil curry Recipe in Marathi बोंबील रेसिपी खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व स्वादिष्ट लागते. बऱ्याच लोकांना मासे खायला आवडतात. त्यामध्ये बोंबील हा माशांचा एक प्रकार आहे. जी मासे प्रेमीच्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी पुरेशी आहे. आज काल बाहेर स्टॉलवर किंवा रेस्टॉरंटमध्ये आपल्याला बोंबील करी रेसिपी उपलब्ध आहे. ही रेसिपी खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरी तयार करू शकतो. ही रेसिपी रेस्टॉरंटमध्ये तर उपलब्ध आहेच. परंतु आपण आपल्या स्वतःच्या हाताने जर करून ही रेसिपी खाल्ली तर मजा वेगळीच राहते. तसेच स्वतः आपल्याला तयार करून बघायचे असेल तर ही माहिती खास तुमच्याकरिता आहे. तर चला मग या रेसिपी विषयी सविस्तर माहिती पाहूया.
बोंबील करी रेसिपी मराठी Bombil curry Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
बोंबील ही रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने तयार केली जाते. जसे बोंबील फ्राय, बोंबील करी, ग्रीन बोंबील करी, बोंबील कालवण इ. बोंबील ची रेसिपी तयार झाल्यानंतर अतिशय चविष्ट व अप्रतिम लागते. आपणही हॉटेल सारखी बोंबील करी रेसिपी घरच्या घरी तयार करू शकतो. तर चला मग जाणून घेऊया त्यासाठी लागणारे सामग्री व पाककृती.
ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार करणार आहोत?
ही रेसिपी आपण 6 व्यक्ती करता तयार करणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
या रेसिपीच्या पूर्वतयारी करताना लागणारा वेळ हा 20 मिनिटे एवढा आहे.
कुकिंग टाईम :
ही रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
बोंबील करी रेसिपी तयार करण्याकरता आपल्याला 40 मिनिटे एवढा वेळ लागतो.
साहित्य :
1) 250 ग्रॅम बोंबील
2) 1 मोठा कांदा
3) 2 मोठे टोमॅटो
4) कोथिंबीर
5) अर्धा कप ताजे किसलेले नारळ
6) एक चमचा आले-लसूण पेस्ट
7) 6 हिरव्या मिरच्या
8) 1 टीस्पून संपूर्ण धणे बियाणे
9) पाव चमचा हळद
10) दोन चमचे लाल मिरची पावडर
11) कढीपत्ता
12) कोकम रिंड
13) तेल
14) मीठ
बोंबील करी तयार करण्याची पाककृती :
- उंधीयू रेसिपी मराठी
- सर्वप्रथम आपल्याला बोंबील साफ करून घ्यायची आहे. तसेच त्याच्या पोटातील भागाकडून मध्यभागी चीर देऊन ते उघडून स्वच्छ धुऊन घ्यायचे .
- स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर बोंबील एका कोरड्या फडक्याने कोरडी करून घ्यावीत. बोंबीलला हळद आणि मीठ तसेच लिंबाचा रस चोळून लावावा व हे 10 मिनिटे असेच ठेवून द्यावे.
- बोंबीलला काही मिनिटे मीठ लावून ठेवल्यानंतर त्यातील पाणी सर्व बाहेर काढून टाकायचे आहेत. त्या करता, एका कापडावर बोंबील ठेवून वरून दुसरे कापड ठेवावे व चॅटिंग बोर्ड, कुकर किंवा पाट्यासारखी वजनदार वस्तू ठेवून 30 मिनिटे असेच ठेवून द्या. म्हणजे बोंबील मधील सर्व पाणी बाहेर पडून जाईल.
- आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आले लसूण, हिरव्या मिरच्या, धने, कांदे, टोमॅटो व किसलेले नारळ तसेच हिरवी कोथिंबीर, लाल तिखट आणि पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे.
- आता बोंबील मधील सर्वच पाणी निघून गेले असेल ती कापून घेऊ नका. तसेच ती चापट झाली असेल.
- कढईमध्ये चार चमचे तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा आता त्यामध्ये लसूणच्या अख्या पाकळ्या घाला.
यामुळे करीला चव येते. लसूणच्या पाकळ्या छान तपकिरी रंगाच्या होईपर्यंत तळून घ्या. - नंतर त्यामध्ये कढीपत्ता हळद घाला आता बारीक केलेली मसाला पेस्ट घाला.
- मसाला पेस्ट मधील सर्वच घटक कच्चे आहेत. त्यामुळे मसाला पेस्ट शिजवण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे एवढा वेळ लागेल. मसाला छान शिजला म्हणजेच करीला छान चव येईल तसेच रंगही येईल.
- मसाला तेल सोडायला लागला की, गॅस मंद करून झाकण ठेवा व छान शिजवून घ्या. अधून मधून मसाला ढवळत रहा.
- पंधरा मिनिटानंतर मसाला पेस्ट तपासून पहा. मसाला छान लाल रंगाचा झाला असेल तर छान शिजला असे समजून घ्या.
- आता यामध्ये तीन कप पाणी गरम करून घाला. गरम पाणी घातल्याने ग्रेव्हीची चव टिकून राहण्यास मदत होते तसेच त्यामध्ये चवीनुसार मीठ व कोकम टाका.
- आता करीला पाच मिनिटे शिजू द्या. छान उकळी आली की, गॅस कमी करा. व तीन ते चार मिनिटे शिजवून घ्या.
- आता गॅस मंद करून त्यामध्ये बोंबील घाला. हे मासे लवकर करीमध्ये विखुरतात त्यामुळे हलक्या हाताने मिसळा. आता गॅस बंद करा व त्यावर झाकण ठेवा.
- अशाप्रकारे गरमागरम बोंबील करी रेसिपी तयार आहेत. बोंबील वाफेवरच शिजते, त्यामुळे गॅस मोठा करण्याची गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही बोंबील करी रेसिपी भाजी, पोळी, तंदुरी रोटी किंवा भात यांच्या सोबत खाऊ शकता.
पोषक घटक :
बोंबील हा मासा अनेक पोषक घटकांनी भरपूर भरलेला आहे. त्यामुळे बोंबील खाणे पौष्टिक आहे. तसेच आपल्या आरोग्यासाठी देखील बोंबील मासा आरोग्यदायी आहे. त्यामध्ये अमेगा 3 फॅटी ऍसिड असते. कॅल्शियम जीवनसत्वे, प्रथिने, लोह हे घटक असतात. याशिवाय त्यामध्ये चरबीचे प्रमाण देखील भरपूर असते.
बोंबील खाण्याचे फायदे :
बोंबील रेसिपी खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. कारण बोंबीलमध्ये इतर माशांच्या तुलनेत अधिक लोहाचे प्रमाण जास्त असते. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते.
ॲनिमिया असणाऱ्या व्यक्तींना देखील बोंबील खाणे ही रेसिपी खूप महत्त्वाची ठरते. तसेच ही रेसिपी आरोग्यदायी आहे.
बोंबील नियमित खाल्ल्यामुळे आपले केस त्वचा चांगली राहते. बोंबीलमध्ये भरपूर प्रमाणात आवश्यक घटक असतात. त्यामुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहते.
तोटे :
बोंबील जेवढी आरोग्यदायी आहे, तेवढीच ते हानिकारकही ठरू शकते. गर्भवती स्त्रियांना बोंबील खाणे वर्ज आहे. कारण त्यामध्ये असलेले घटक लहान मुलांच्या विकासात व्यत्यय अनु शकतात.
बोंबील रेसिपी चे अतिरिक्त सेवन केल्यामुळे आपल्याला मळमळ तसेच पोट दुखी होऊ शकते.
तर मित्रांनो, तुम्हाला बोंबील करी ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.