Borghat Information In Marathi बोरघाट हा सह्याद्री डोंगरामध्ये वसलेला एक घाट रस्ता आहे तसेच रायगड जिल्ह्यातील खापोली या गावाला पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहराशी हा घाट जोडतो. हा घाट राष्ट्रीय महामार्ग चार वर आहे, त्यामुळे सामान्यतः या घटकाला खांडव्याचा घाट असे सुद्धा म्हटले जाते. खंडाला घाट हा एक प्रसिद्ध घाट आहे, यावर अनेक कविता आणि गाणे आपण ऐकले असतील. हे संगीत मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा आपण ऐकले असेल. हा घाट पुणे आणि मुंबई यांना जोडणारा आहे.
बोरघाटची संपूर्ण माहिती Borghat Information In Marathi
महाराष्ट्रातील रस्ते वाहतुकीसाठी हा एक डोंगरी रस्ता खूपच सुंदर आहे तसेच हा विविध नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. या प्रवासादरम्यान तुम्हाला अनेक सुंदर दर्या हिरवेगार असे डोंगर व 28 बोगद्यांमधून घेऊन जाणारी रेल्वेचा प्रवास तुम्ही उत्कृष्ट अनुभवू शकता. देशातील हा एक सर्वोत्कृष्ट रेल्वे मार्गांपैकी एक आहे. त्यामुळे तुम्ही एकदा तरी या घाटाला भेट द्या. तर आज आपण बोरघाट या घाटाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
बोरघाट विषयी माहिती :
महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतामध्ये अनेक प्रकारचे लहान-मोठे घाट व रस्त्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे नागमोडी वळणाकार असलेले रस्ते तसेच या रस्त्यांवरून प्रवास करण्याची मजा ही एक वेगळीच असते त्यातीलच एक घाट म्हणजे बोरघाट हा आहे. जो सह्याद्री पर्वताच्या डोंगरांमध्ये वसलेला आहे.
हा घाटकोकणातील रायगड जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यातील हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. या शहराशी जोडलेला आहे, ते म्हणजे लोणावळा जर तुम्हाला लोणावळाला रायगड वरून जायचे असेल तर हा घाट तुम्हाला दिसतो तसेच मुंबई बंगलोर राष्ट्रीय महामार्ग 4 सुद्धा या घाटावरूनच जातात.
घनदाट जंगल आणि उंच उंच डोंगरात प्रदेश असल्याने लोक या ठिकाणी छोटी छोटी खोरी करून तेथे शेती करतात. येथे पावसाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे लोक भाताची शेती येथे करतात. डोंगराळ प्रदेशाच्या उत्तरी भागात हे दृश्य आपल्याला अतिशय सुंदर दिसते.
या घाटावर पाण्यासारखी प्रसिद्ध असे स्थळे :
रायगड : रायगड हा किल्ला आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांची निगडित आहे. तेथे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा आपल्याला आठवते. रायगड शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी होती. त्यांनी त्यांच्या स्वप्नातल्या स्वराज्याचा स्वर्ग हा किल्ला म्हणजेच रायगड आहे. या गडाची निर्मिती शिवाजी महाराजांनी खूप तत्पर्तिने केली होती, कोणत्याही सुखाची तमन्ना बाळगता, त्यांनी या गडाची बांधणी केली.
रायगड या किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला. हिरोजी इंदुरकर यांनी रायगडाचे 1656 मध्ये हे बांधकाम केले. या किल्ल्याची उंची 820 मीटर एवढी उंच आहे. या गडाला 1435 एवढ्या पायऱ्या आहेत. रायगडचे जुने नाव हे राहिली आहे.
या गडाला अनेक पाहण्यासारखी प्रसिद्ध अशी स्थळे आहे. यामध्ये जिजाबाईचा वाडा, नाना दरवाजा, हिरकणी टोक, वाघ दरवाजा, समाधी देऊळ, जगदीश मंदिर, राजभवन, मेना दरवाजा, पालखी दरवाजा, स्तंभ, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, महादरवाजा इत्यादी प्रसिद्ध स्थळे आहेत.
लोणावळा : या घाटाजवळ लोणावळा हे अतिशय थंड हवेचे असे प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे पावसाळ्यामध्ये हे डोंगर माथेरान खूप कडे काढ भरलेल्या आपल्याला दिसून येतात, म्हणजेच येथे सुंदर अशी धबधबे पडताना आपल्याला दिसतात. जेथे जांभळे आणि करवंदी रंगाची लय लूट असते. डोंगरांवरून पाणी खाली धबधब्याच्या रूपाने पडताना आपल्याला हे दिसते. जे मनाला अतिशय मोहून टाकणारे दृश्य आहे. पावसाळ्याच्या दिवसात येथे अनेक पर्यटकांची गर्दी असते. तसेच तिथे टायगर पॉईंट आहे.
निसर्गाचे अद्भुत दर्शन तुम्हाला या घाटामध्ये दिसेल हिरवे डोंगरदऱ्या छोटे-मोठे धबधबे वाहतात. धबधबे आपला मार्ग शोधत खाली कोसळतात जे पाहण्यासाठी अतिशय सुंदर आणि मनोरम्य असे वातावरण आहे. लोणावळ्यातील एकविरा आईचे देऊळ हे खूप सुंदर आहे, तेथे अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.
खंडाळा : खंडाळा हा लोणावळा पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे थंड हवेचे ठिकाण आहे बोरगाव जिथे संपतो. ते ठिकाण म्हणजे खंडाळा सह्याद्रीच्या पर्वतांचा उंच पहाड आणि दऱ्या यांच्यामध्ये खंडाळा हे गाव आहे. हे गाव एक छोटीशी गाव आहे, तसेच येथे पाहण्यासारखी अनेक ठिकाणी आहेत. त्यामध्ये वाघदरी अमृतांजन पॉईंट नागफणी मंकीही भाज्या लेणी खंडाळा सनसेट पॉईंट इत्यादी. येथे सुद्धा पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मंकी हिल हे पर्यटकांचे खंडाळ्यातील सर्वात आकर्षक असे ठिकाण आहे. येथे दरवर्षी पर्यटक भेट देत असतात.
राजमाची किल्ला : हा किल्ला मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा घाट उतरून लोणावळ्याच्या दिशेने जाताना अलीकडेच डाव्या बाजूला या किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे. महामार्गापासून या किल्ल्याचे अंतर्गत जवळजवळ 16 किलोमीटर एवढे येते.
दोन ते तीन किलोमीटर पर्यंत हा रस्ता चांगला आहे परंतु ते त्यापुढे तुम्हाला बारा ते तेरा किलोमीटर चा रस्ता हा कच्चा रस्ता आहे. हा रस्ता तुम्हाला थेट किल्ल्यापर्यंत आहे. किल्ल्याच्या पायथ्याला उधेवाडी नावाचे एक गाव आहे.
या गावांमध्ये अतिशय सुंदर एक शंकराचे जुने मंदिर आहे तेथून थोडे समोर जाताना भैरवा या नाथाचे मंदिर लागते व पुढे दोन रस्ते लागतात. किल्ल्याला दोन बाले किल्ले आहेत. त्यातील एक बालेकिल्ल्याचे नाव श्रीवर्धन तर दुसऱ्या किल्ल्याचे नाव मनोरंजन असे आहे. भैरवनाथ मंदिराच्या डावीकडे जाणारा रस्ता मनोरंजन या बालेकिल्ल्याकडे जातो. तर उजवीकडे जाणारा रस्ता श्रीवर्धन या बालेकिल्ल्याकडे जातो. राजमाचीचा परिसर जणू निसर्ग सौंदर्याची एक उत्तम अशी ठिकाण आहे. या किल्ल्याची तटबंदी सुद्धा आजही चांगल्या अवस्थेत आहे.
राजमाची किल्ल्यास पूर्वी कोकणचा दरवाजा असे सुद्धा म्हटले जात होते. हा दरवाजा तसेच हा किल्ला एक निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. याची वैशिष्ट्य म्हणजे दोन बालेकिल्ले आहेत. या किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे.
पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांना 23 किल्ले मोघलांच्या स्वाधीन करावे लागले होते. या तहानुसार शिवाजी महाराजांच्या ताब्यात उर्वरित जे 12 किल्ले होते, त्यामध्ये किल्ले राजमाची चा समावेश होता. राजमाची आणि त्या लगतचे जंगल धबधबा आणि तिथे असलेली जैवविविधता ही अतिशय सुंदर आहे.
FAQ
बोरघाट हा कुठे येतो बोरगाव हा महाराष्ट्रातील
खोपोली आणि खंडाळा दरम्यान आहे तसेच हा घाट एक पर्वतीय मार्ग आहे.
बोर घाटाची उंची किती आहे?
622 मीटर उंच आहे.
बोर घाटाची लांबी किती आहे?
21 किलोमीटर लांब आहे.
बोरघाट कोणी बांधला?
पहिल्या अँग्लो मराठा युद्धामध्ये दोनदा पराभव पत्करल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने 1803 मध्ये या घाटातून रस्ता बांधण्याचा प्रकल्प सुरू केला होता.
बोरघाट हा कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे?
बोरघाट हा राष्ट्रीय महामार्ग 4 वर आहे.