Brahmaputra River Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ब्रह्मपुत्रा या पवित्र नदी बद्दल माहिती बघणार आहोत. ब्रह्मपुत्रा हि नदी जरी भारतातून वाहत असली, तरीही त्याचे उगमस्थान मात्र भारतात नाही.
ब्रह्मपुत्रा नदीची संपूर्ण माहिती Brahmaputra River Information In Marathi
समुद्रसपाटीपासून सुमारे 5051 मीटर उंचीवरच्या चीन मधील तिबेट या ठिकाणी ही नदी उगम पावते. अर्थात तिबेट हे चीनमध्ये असले तरीही भारतीयांच्या दृष्टीने पवित्र अशा कैलास पर्वताच्या श्रेणीमध्ये ही नदी उगम पावल्याने ब्रह्मपुत्रेला पवित्र असा महिमा लाभलेला आहे.
भारतात तिला ब्रह्मपुत्रा म्हणत असले तरीही तिबेट या चीनमधील प्रदेशात मात्र तिला ‘त्सांग पो’ या नावाने ओळखले जाते. या नदीची एकूण लांबी सुमारे 2900 किलोमीटर इतकी असून, पश्चिम पूर्व या दिशेने वाहते. ही नदी बांगलादेश मधून देखील वाहते. ही जगातील 9 नंबरची नदी आहे. या नदीचे नदी प्रणाली क्षेत्र सुमारे 2 लाख 58 हजार 8 चौरस किलोमीटर इतके आहे. या नदीला समृद्ध अशा उपनद्या लाभलेल्या आहेत. यामध्ये दिबांग, लोहित, सुबनसिरी, कामेंग, धनशिरी, बेलसिरी, चंपामन, गंगाधर, रैधाह इत्यादी नद्यांचा समावेश होतो.
उगमस्थान व लांबी
आपण वर पाहिल्याप्रमाणे ब्रह्मपुत्रा नदी चीनच्या तिबेटमधील कैलास पर्वताच्या श्रेणीमध्ये उगम पावते. हे ठिकाण सुमारे 5150 मीटर उंचीवर आहे. तसेच 2900 किलोमीटर लांब वाहणारी ही नदी सुरुवातीला पश्चिम पूर्व या दिशेमध्ये तब्बल 800 किलोमीटर वाहते. जिला तिबेटी भाषेत त्सांग पो असे म्हटले जाते.
ब्रह्मपुत्रा नदी भारताच्या हद्दीतून केवळ 720 किलोमीटर इतका प्रवास करते. या नदी द्वारे जवळजवळ 8,48,488 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र जलसिंचनाखाली आलेले आहे. जलसिंचन बरोबरच सरासरी 30 मीटर म्हणजे 100 फुटाच्या आसपास खोल असणारी ही नदी जलवाहतुकीसाठी देखील महत्त्वाची समजली जाते. या नदीच्या खोलीबद्दल एक वैशिष्ट्यपूर्ण माहिती अशी की साडीया या ठिकाणी हि नदी तब्बल 135 मीटर अर्थातच 443 फूट इतकी खोल आहे.
या नदीचा खोऱ्याचा परिसर अत्यंत विस्तीर्ण आहे. यामध्ये पूर्व बाजूचा विचार करता भारत व नेपाळ सीमेची पूर्व बाजू, तिबेट पठाराचा दक्षिण-मध्य कडील भाग, गंगेच्या खोऱ्याचा वरचा भाग, तसेच तिबेटच्या दक्षिण ते पूर्वेकडील भाग, सोबत सोबतच पाटकाय-बम या टेकड्यांचा काही भाग, मेघालयाच्या टेकड्यांचा उत्तर दिशेकडील उतार, बांगलादेशचा उत्तर भाग आणि आसामचे मैदान हा भाग ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात मोडतो.
या नदीखोऱ्यात कांचनजंगा हे सर्वाधिक उंचीचे अर्थात 8586 मीटर उंचीचे शिखर आहे आहे. हा भाग उंचसखल डोंगर-दर्या यांचा असल्यामुळे या भागात पावसाचे प्रमाण चांगले आहे. परिणामी या नदीला चांगले पाणी असते.
साधारणपणे सन 1984 ते 86 पर्यंत ब्रह्मपुत्रेच्या उगमाकडील भाग फारसा कोणाला माहित नव्हता. मात्र या वर्षांपासून अन्वेषण मार्फत ब्रह्मपुत्रेच्या यर्लंग त्संगपोशी या भागाची ओळख झाली. हिंदू धर्मासाठी ब्रह्मपुत्रेच्या दक्षिणेकडील भाग अर्थातच भारतीय उपखंडातील भाग अतिशय पवित्र मानला जातो.
भारतीय उपखंडातील बहुतांश नद्यांना स्त्रीलिंगी नावे आहेत. मात्र ब्रह्मपुत्रा या नदीला दुर्मिळ असे पुरुष वाचक नाव आहे. ब्रह्मपुत्र या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये होतो ब्रह्मा चा मुलगा.
ब्रम्हपुत्रा नदीच्या खोऱ्याची वैशिष्ट्ये
आपण वर वाचल्याप्रमाणे ब्रह्मपुत्रेला उत्तम पावसाच्या नदी खोऱ्याचे प्रमाण लाभलेले आहे. तसेच हिमालयातील हिम हे वसंत ऋतु नंतर वितळते, त्याचे देखील पाणी ब्रह्मपुत्रा नदीला प्राप्त होते.
परिणामी ब्रह्मपुत्रा नदीच्या काठांवरील शहरांना आपत्तीजनक पुराचा कायम धोका असतो. या नदीचा प्रवाह सुमारे 19800मी/से अर्थातच 700000 क्यूसेक इतका आहे. मात्र पूरपरिस्थिती च्या वेळेस हा प्रवाह 1000000मी/से इतका वाढतो.
ब्रम्हपुत्रा नदीचा प्रवाह मार्ग व तिच्या उपनद्या
आसाम राज्याच्या आसाम खोऱ्यामध्ये सादिया या शहराच्या पश्चिमी दिशेस या मैदानी प्रदेशात ब्रह्मपुत्रा नदी चीनमधून भारतात प्रवेश करते. या नदी ला पुढे दिबांग व लोहित या दोन उपनद्या येऊन मिळतात. व याच संयुक्त नदीच्या प्रवाहाला ब्रह्मपुत्रा असे म्हणले जाते. पुढे जाऊन सुबंसिरी, कमिंग, बेलसिरी, धनशिरी, चंपामन, गंगाधर, रैधाह या नद्या ब्रम्हपुत्रेस येऊन मिळतात.
परिणामी या नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढतो. भारताच्या आसाम या राज्यांमध्ये ब्रह्मपुत्रेच्या विस्तार फार मोठ्या प्रमाणात बघावयास मिळतो. मोठ्या प्रवाहामुळे या नदीचे पात्र खूप रुंद झाले आहे. परिणामी या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेटे बघावयास मिळतात. त्यातीलच एक ‘माजुली’ हे बेट जगातील नदीपात्रातील सर्वात मोठे बेट समजले जाते.
याचे क्षेत्रफळ तब्बल 1225 चौरस किलोमीटर इतके आहे. अलीकडेच आसाम सरकारने या बेटाला नवीन जिल्ह्याचा दर्जा दिला आहे. या बेटावर तब्बल 1,50,000 पेक्षाही जास्त लोकसंख्या वास्तव्य करत आहे. पुढे ही नदी पश्चिम दिशेस कारो या टेकड्यांना गोलपाडा शहराजवळ वळसा घालते. व पुढे दक्षिणेकडे वाहायला लागते. पुढे इथून 270 किलोमीटर प्रवास करून ही नदी पद्मा या नदीला गोलंदो या शहराजवळ मिळते.
पुढे या नदीला पद्मा या नावानेच ओळखले जाते. पुढे जाऊन या संयुक्त पद्मा नदी प्रवाहाला एकशे पाच किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूने आसाम येथे उगम पावलेली मेघना ही नदी येऊन मिळते. शेवटी हा संयुक्त नदी प्रवाह मेघना या नावाने बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतो.
हिमालय हा उशिरा निर्माण झालेला पर्वत समजला जातो, मात्र ब्रह्मपुत्रा नदी हिमालय निर्मितीच्या प्रक्रियेच्या आधीपासून वाहत आहे असे समजले जाते. हिमालय निर्मितीच्या वेळेस ब्रह्मपुत्रेच्या उगमाचा भाग उंचावत गेला, मात्र त्या प्रमाणात खनन कार्य झाल्याने ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह व दिशा यामध्ये फारसा बदल झाला नाही. या नदीला वर्षभर पाणी असते. त्यामुळे या नदीने बराचसा गाळ वाहून आणलेला आहे. त्यामुळेच या नदीकाठी गाळाच्या जमीन ची निर्मिती झाली आहे.
हवामान बदलाचा ब्रम्हपुत्रेवर होणारा परिणाम
ब्रह्मपुत्रेच्या पाणलोट क्षेत्रात व उगम क्षेत्रात अर्थातच कैलास पर्वताच्या श्रेणीमध्ये बर्फ वितळून निर्माण झालेले पाणी हा या प्रवाहाचा मोठा स्त्रोत आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे ब्रह्मपुत्रा पाणलोट क्षेत्रात बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. परिणामी पूरस्थिती, नदी प्रवाहाचे घर्षण, व काठावरील जमिनीची धूप इत्यादी महत्त्वपूर्ण धोके उद्भवतात.
ब्रम्हपुत्रा पाणी प्रश्नावर आंतरराष्ट्रीय सहकार्य
ब्रह्मपुत्रा ही नदी आंतरराष्ट्रीय असल्यामुळे या नदीवर भारतासह चीन व बांगलादेश या देशांचाही हक्क आहे. 1990 ते 2000 या दशकात या नदीचे पाणी उत्तरेकडे वळविण्याचा दृष्टिकोनातून चीन देशाच्या ‘ग्रेट बेंड’ येथे धरण बांधण्याचा चीन चा प्रस्ताव होता, मात्र चीन सरकारने नेहमीच याबाबत गोष्टी लपविल्या आहेत.
मात्र 22 एप्रिल 2010 रोजी चीन देशाने जाहीर केले, की चीन तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर ‘झंगमू’ हे धरण बांधत आहे. परंतु चीनने त्याच बरोबर भारताला हे आश्वासन दिले की, या प्रकल्पामुळे ब्रह्मपुत्रेच्या भारताकडे येणाऱ्या पाण्यावर कुठलाही परिणाम होणार नाही.
याविरुद्ध भारताने दावा केला आहे, मात्र अजून पर्यंत हा दावा चर्चेतच आहे. अलीकडेच चीन ने ब्रह्मपुत्रा नदीवर ‘अपस्ट्रीम’ हे धरण बांधण्याचे ठरविले आहे. मात्र या प्रकल्पास आसाम राज्यातील लोकांकडून तीव्र विरोध केला जात आहे. तसेच चीन मधील जलविद्युत प्रकल्पांना योग्य असा प्रतिसाद मिळाला नसल्याने भारत सरकार चीन वर अधिकची टीका करत आहे.