ब्रेड पकोडा रेसिपी मराठी Bread Pakoda Recipe in Marathi सकाळच्या नाश्त्याला रोज काही ना काही नवीन पदार्थ बनवायचे असतात परंतु आपल्याला ते सुचत नाहीत एकच एक पदार्थ बनवून आणि खाऊन रोजच कंटाळा येतो. म्हणून नवीन पदार्थ करून खावे असे आपल्याला वाटत असेल तर तुमच्याकरिता खास ब्रेड पकोडा ही रेसिपी आम्ही घेऊन आलो आहोत.
ब्रेड पकोडा ही रेसिपी अतिशय झटपट होणारी असून त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे पाव, बेसन, आलू व तेल मुख्य सामग्री असून कमी वेळात तयार होणारी रेसिपी आहे. तसेच या रेसिपी साठी लागणारे साहित्य देखील आपल्या घरातच उपलब्ध असतात. तर चला मग या रेसिपी विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
ब्रेड पकोडा रेसिपी मराठी Bread Pakoda Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
ब्रेड पकोडा ही रेसिपी एक नाश्त्याचे प्रकार असून खूप लोकांचा आवडता पदार्थ आहे. अनेकांना चहा सोबत सँडविच, ब्रेड, पोहे, उपमा खाण्यासाठी खूप आवडतात. परंतु या नाष्टाप्रमाणेच ब्रेक पकोडा तयार करण्यासाठी आपल्याला कमीच वेळ लागतो. ही रेसिपी आठवड्यातून एकदा तरी ट्राय करून बघायला हरकत नाही. ब्रेड पकोडा ही रेसिपी आलू पकोडा, बेसन पकोडे, मिरची पकोडा या रेसिपींपैकीच एक आहे. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती.
ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार होणार आहे ?
ही रेसिपी आपण 4 व्यक्तींकरता तयार आहोत.
ब्रेड पकोडा रेसिपीच्या पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
ब्रेड पकोडा या रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला पंधरा मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
ब्रेड पकोडे आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळावे लागतात. त्यामुळे त्यांना तळण्यासाठी आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
ब्रेड पकोडे रेसिपी पूर्ण तयार करण्याकरता आपल्याला 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.
ब्रेड पकोडा तयार करण्याकरता लागणारे साहित्य :
1) 8 ब्रेड स्लाईस
2) 4 मध्यम आकाराचे आलू
3) एक वाटी बेसन
4) दोन वाटी पाणी
5) अर्धा चमचा हळद
6) अर्धा चमचा जिरे
7) एक चमचा लाल तिखट
8) चिमूटभर खाण्याचा सोडा
9) चवीनुसार मीठ
10) कढीपत्ता
11) तीन हिरव्या मिरच्या
12) बारीक चिरलेला कोथिंबीर
13) आलं लसूण पेस्ट एक चमचा
14 पकोडे तोडण्यासाठी तेल
पाककृती :
- सर्वप्रथम आपल्याला चार बटाटे तीन शिट्ट्या होऊन शिजवून घ्यायचे आहेत. बटाटे शिजल्यानंतर आपल्याला त्याची लगेच भाजी बनवावी लागेल.
- बटाटे गरम असताना चांगल्या पद्धतीने मॅश करून घ्या.
- बटाट्याची भाजी करण्यासाठी एका कढईमध्ये थोडे तेल घ्या व त्यात जिरे, बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता, आलं लसुन पेस्ट घालून छान परतुन घ्या.
- नंतर त्यामध्ये थोडी हळद, व मीठ घालून परतावे. त्यात मॅश केलेले बटाटे घालावे आणि बारीक चिरलेली कोंथिबीर घालून परतुन घ्यावे.
- नंतर तयार झालेले आलूची भाजी थंड होण्यासाठी ठेवून द्या.
- तोपर्यंत एका बाऊलमध्ये बेसन पीठ घेऊन त्यामध्ये हळद, तिखट, जिरे, मीठ, खाण्याचा सोडा, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाणी घालून हे पीठ मध्यम असे भिजवून घ्यावे.
- पीठ भिजवत असताना अति पातळही नसावे व अति घट्ट सुद्धा ठेवू नये.
- नंतर ब्रेडचा एक स्लाईट घेऊन त्यावर सुरीने त्रिकोणी आकाराचे तुकडे करून घ्यावे.
- नंतर एका प्लेटचा स्लाईट घेऊन त्यावर तीन चमचे आलू भाजी पसरवून घ्यावी व दुसरा ब्रेड स्लाईस त्यावर ठेवावा.
- अशाप्रकारे सर्व ब्रेडमध्ये आलू भाजी भरून तयार करून घ्या.
- नंतर एका कढईमध्ये तेल गरम करण्याकरिता ठेवा तेल जास्त तापणार नाही याची काळजी घ्या नाहीतर पकोडे जळू शकतात.
- आता आलू भाजी घातलेली ब्रेडचे तुकडे भिजवलेल्या बेसन पिठामध्ये बुडवून मिडीयम लो फ्लेमवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
अशाप्रकारे सर्वच ब्रेड पकोडे तयार करून घ्या. आता तुम्ही हे ब्रेड पकोडे पुदिना चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करू शकता. खाण्यासाठी अतिशय चविष्ट व पौष्टिक अशी ब्रेड पकोडे तयार आहेत.
पोषक घटक :
ब्रेड पकोड्यामध्ये प्रथिने, चरबी, कर्बोदके, कॅलरीज,
फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम इत्यादी पोषक घटक असतात. जे आपल्या शरीराला एनर्जी देतात व भूक भागवतात.
फायदे :
ब्रेड पकोडा खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला एनर्जी प्राप्त होते तसेच ऊर्जा मिळते.
ब्रेड पकोडा खाण्यासाठी अत्यंत चविष्ट लागतो, त्यामुळे आपले उत्सुकता देखील वाढते व काम करण्यासाठी आपले मन लागते.
ब्रेड पकोड्यांमध्ये फायबर असतात, जे आपले पचन क्रिया सुरळीत करतात.
तोटे :
ब्रेड पकवडी जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे पोटदुखी किंवा उलट्यांचा त्रास होऊ शकतो. ब्रेडमध्ये इतर हानिकारक पदार्थ असल्यामुळे हा त्रास आपल्याला होऊ शकतो.
ब्रेड पकोड्यामध्ये शुगरचे प्रमाण असते. जे लोक जास्त ब्रेड पकोडे खातात. ते खाल्ल्याने त्यांना लठ्ठपणा येऊ शकतो व कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील वाढू शकते.
तर मित्रांनो, तुम्हाला ब्रेड पकोडा ही रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हो इतरांनाही शेअर करा.