ब्रेड पकोडे रेसिपी मराठी | bread pakora recipe in marathi

ब्रेड पकोडे रेसिपी मराठी | bread pakora recipe in marathi

नमस्कार खवय्ये बंधुनो आणि भगिनींनो पावसाळा चालू झाला की आपल्याला चमचमीत किंवा तळलेले पदार्थ खावे असे वाटते चला तर मी आपण आज अशीच एक चमचमीत रेसिपी पाहणार आहोत. ब्रेड पकोडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहुयात.

ब्रेड पकोडे साहित्य ( bread pakora recipe ingredients ):-

 • ८ ब्रेड स्लाईस
 • ३-४ मध्यम आकाराचे बटाटे
 • १ वाटी बेसन
 • 2 कप पाणी
 • १/२ चमचा हळद
 • १/२ चमचा जिरे
 • १ चमचा लाल तिखट
 • चिमुटभर खायचा सोडा
 • मीठ( चवीनुसार)
 • कढीपत्ता फोडणीसाठी
 • २-३ हिरव्या मिरच्या
 • कोथिंबीर बारीक चिरलेली
 • आलं लसुन पेस्ट
 • तळण्यासाठी तेल

ब्रेड पकोडे कृती ( bread pakora recipe in marathi ) :-

सर्वप्रथम 3 ते 4 बटाटे शिजवून घ्यावे.
बटाटे शिजवल्यावर लगेच भाजी बनवावी म्हणजे बटाटे गरम असताना चांगल्यापद्धतीने मॅश होतात.
बटाट्याची भाजी करताना एका कढईमध्ये थोडे तेल घ्यावे व त्यात जिरे, बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता, आलं लसुन पेस्ट घालून परतुन घ्यावे.

नंतर त्यामध्ये थोडी हळद, व मीठ घालून परतावे. त्यात बारीक चिरलेले बटाटे,किंवा मॅश केलेले बटाटे घालावे आणि बारीक चिरलेली कोंथिबीर घालून परतुन घ्यावे.

डाल तडका रेसिपी मराठी | dal tadka recipe in marathi येथे वाचा

एका बाऊल मध्ये बेसनपीठ घ्यावे व त्यात हळद ,तिखट , जिरे , मीठ, खायचा सोडा , आलं लसुन पेस्ट, बारीक चिरलेली कोंथिबीर, आणि पाणी घालून पीठ भिजवत ठेवावे.
हे पीठ पातळ ही नसावे आणि एकदम घट्ट सुद्धा ठेऊ नये.

एक ब्रेडचा स्लाईस घेऊन त्यावर सुरीने त्रिकोणी आकाराचे तुकडे करून घ्यावे. नंतर एक ब्रेडचा स्लाईस घेऊन त्यावर २ ते ३ चमचे भाजी एकसमान पसरावी. त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवा.

तळण्यासाठी तेल गरम करत ठेवावे तेल जास्त तापणार नाही ह्याची काळजी घ्या नाहीतर पकोडे जळू शकतात.
बटाटा भाजी घातलेली ब्रेडचे तुकडे भिजवलेल्या पिठात घोळवून मिडीयम लो फ्लेम वर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे.
आपले ब्रेड पकोडे तयार झाले आहेत. सर्व्ह करताना पुदिना चटणी किवा टोमॅटो sauce बरोबर सर्व्ह करावे.

Leave a Comment