बीएस्सी कम्प्युटर सायन्सची संपूर्ण माहिती BSC Computer Science Information In Marathi

BSC Computer Science Information In Marathi आजकाल संगणकाचे युग आहे. अगदी तुमच्यातील अनेक लोक ही माहिती वाचताना देखील संगणक हाताळत असतील. मित्रांनो संगणकाचा जसा वापर वाढत गेला, तसेच संगणक क्षेत्रातील तज्ञ लोकांची देखील गरज भासू लागली. आणि त्यासाठी बी एस सी कम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली. इंटरनेट व डिजिटलायझेशन इत्यादी गोष्टींचा परिणाम होऊन, आज संगणक हा मानवाच्या दररोजच्या जीवनामध्ये एक अविभाज्य घटक झालेला आहे.

BSC Computer Science Information In Marathi

बीएस्सी कम्प्युटर सायन्सची संपूर्ण माहिती BSC Computer Science Information In Marathi

आज प्रत्येक क्षेत्रामध्ये संगणकाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, आणि संगणकाचा होणारा वापर यामध्ये खूप मोठी व्याप्ती आहे, हे लक्षात येते. त्यामुळे अनेक विद्यार्थी संगणक क्षेत्रामध्ये विविध अभ्यासक्रम शिकण्याकडे भर देत आहेत. यामध्ये संगणक अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता, हार्डवेअर अभियंता, यांसह अनेक क्षेत्रांची निवड करताना दिसत आहेत.

यातील महत्त्वाचा कोर्स म्हणून बी एस सी कम्प्युटर सायन्स याला देखील ओळखले जाते. तुम्हाला कम्प्युटर क्षेत्रामध्ये चांगले भविष्य घडवायचे असेल, तर तुम्ही हा कोर्स करून एक चांगले करिअर करू शकता.

आजच्या भागामध्ये आपण या बी एस सी कम्प्युटर सायन्स याबद्दल माहिती बघणार आहोत…

नावबीएस्सी कम्प्युटर सायन्स
प्रकारपदवी
पात्रताबारावी उत्तीर्ण
क्षेत्रसंगणक क्षेत्र
इतर नावेबीसीएस किंवा बी एस सी सी एस
पॅटर्नसेमिस्टर पॅटर्न
सेमिस्टर ची संख्या६ सेमिस्टर
कालावधीतीन वर्ष

बी एस सी कम्प्युटर सायन्स म्हणजे काय:

हा एक पदवी अभ्यासक्रम असून, त्याचा संपूर्ण कालावधी तीन वर्षांचा असतो. प्रत्येक वर्षाला दोन सेमिस्टर मध्ये विभागलेले असून, असे एकूण सहा सेमिस्टर असतात.

आयटी क्षेत्र आणि संगणकाच्या क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरत असतो. ज्यामध्ये सिस्टम नेटवर्किंग, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, ऑपरेटिंग सिस्टम, प्रोग्रामिंग यांसारख्या विषयांच्या सखोल अभ्यासक्रम शिकवला जातो.

हा कोर्स करून तुम्ही आयटी सेक्टर मध्ये चांगल्या पदावर नोकरी करू शकता. त्याचसोबत टाटा, विप्रो, महिंद्रा, एच सी एल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, अगदी ॲमेझॉन यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये देखील कार्य करण्याची संधी मिळवू शकतात.

बी एस सी कम्प्युटर सायन्स करिता आवश्यक पात्रता:

मित्रांनो, कुठलाही अभ्यासक्रम करायचा असेल तर त्यासाठी आपण पात्र आहोत का हे बघणे खूपच महत्वाचे ठरते. या बीएससी कम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकरिता उमेदवारांनी मान्यता प्राप्त बोर्ड कडून बारावीची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केलेली असावी.

सोबतच याकरिता त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि गणित हे अनिवार्य विषय निवडलेले असावेत. या ठिकाणी तुम्ही बायोलॉजी हा विषय टाळलेला असेल तरीदेखील चालू शकते. हा एक विज्ञान शाखेतील अभ्यासक्रम आहे, याकरिता बारावीची परीक्षा किमान ४५ टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेला उमेदवार पात्र ठरतो.

मात्र तुम्ही आरक्षित गटांमध्ये असाल तर ४०% गुण तुमच्यासाठी पर्याप्त ठरतात. मात्र आजकाल सर्व क्षेत्रांमध्ये स्पर्धा वाढत चाललेली आहे, त्यामुळे याकरिता मिरीट पद्धती अवलंबली जाते. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त गुण मिळवणे क्रमप्राप्त ठरत आहे.

या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्याकरिता च्या पद्धती:

मित्रांनो, जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची मनापासून इच्छा असेल, तर सर्वप्रथम तुम्ही बारावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायला हवी. त्यानंतर तुम्हाला या प्रवेश परीक्षा साठी असणारे अर्ज भरावे लागतात.

या अर्जानुसार तुमच्या आवडीच्या महाविद्यालय मध्ये प्रवेश मिळवून, तुम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. याकरिता तुम्हाला किमान तीन वर्षांचा कालावधी द्यावा लागेल. तीन वर्षानंतर तुम्ही या अभ्यासक्रमाची पदवी मिळवण्यास पात्र ठरत असतात.

बी एस सी कम्प्युटर सायन्स साठी फी:

मित्रांनो, कम्प्युटर सायन्स करताना प्रत्येक महाविद्यालयानुसार फी बदलत असते. त्यामुळे तुम्ही कोणत्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत असाल, त्यानुसार तुमची फी वेगवेगळी असू शकते. तुम्हाला ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे, त्या ठिकाणी तुम्ही स्वतः जाऊन फी स्ट्रक्चर बद्दल चौकशी केल्यास, तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल.

मात्र सरासरी सांगायचे झाल्यास सरकारी महाविद्यालयासाठी तुम्हाला ३० हजार ते ५० हजार रुपये खर्च करावे लागतील. याउलट तुम्ही जर खाजगी महाविद्यालयांमधून शिक्षण घेत असाल, तर हा खर्च वाढू शकतो. जो सुमारे वार्षिक ९० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत देखील जाऊ शकतो.

बीएससी कम्प्युटर सायन्स साठीचे महाविद्यालय:

  • विश्वभारती विद्यापीठ, कलकत्ता
  • हंसराज कॉलेज, नवी दिल्ली
  • पटना सायन्स कॉलेज, बिहार
  • रेवेन शॉ महाविद्यालय व विद्यापीठ, उडीसा
  • कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, उडीसा भुवनेश्वर
  • कालिकत महाविद्यालय व विद्यापीठ, केरळ
  • इंद्रप्रस्थ महिला महाविद्यालय, नवी दिल्ली, सिविल लाईन

निष्कर्ष:

संगणक हे आज काल प्रत्येकाच्या हातात असणारे साधन झालेले आहे. अगदी लहान मुले देखील या संगणक चालवण्यामध्ये अतिशय तरबेज झालेली असून, लहानपणापासून संगणकाचे शिक्षण मिळाल्यामुळे मुलांना कुठल्याही गोष्टीची अडचण भासत नाही. अगदी अभ्यासापासून सर्व प्रकारच्या गोष्टी मुलांना या संगणकावर उपलब्ध असतात.

आजच्या भागामध्ये आपण या संगणकाशी संबंधित असणाऱ्या बीएस्सी कम्प्युटर सायन्स या कोर्स बद्दल माहिती बघितलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर सायन्स म्हणजे काय, यासाठी आवश्यक असणारी पात्रता काय असते, हा कोर्स करण्यासाठी काय करावे लागते, यासाठी साधारणपणे फी किती आकारली जाते, व या कोर्सचा कालावधी, याबरोबरच या कोर्स साठी उत्कृष्ट महाविद्यालयांची यादी आणि हा कोर्स केल्यानंतर करिअरच्या संधी इत्यादी बद्दल माहिती बघितली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न बघून तुमच्या शंका देखील समाधान केलेल्या आहेत.

FAQ

बी एस सी सी एस चे संपूर्ण स्वरूप काय आहे?

बीएससी सी एस चे संपूर्ण स्वरूप बॅचलर इन सायन्स फॉर कम्प्युटर सायन्स असा आहे.

बीएससी कम्प्युटर सायन्स ला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते?

बीएस्सी कम्प्युटर सायन्स ला बी सी एस, बी एस सी एस इत्यादी नावाने देखील ओळखले जाते.

बी एस सी कम्प्युटर सायन्स या कोर्स साधारण कालावधी किती असतो?

बी एस सी कम्प्युटर सायन्स या कोर्सचा किंवा अभ्यासक्रमाचा कालावधी हा तीन वर्ष असतो. ज्याला सहा सेमिस्टर मध्ये विभागलेले असते. आणि या प्रत्येक सेमिस्टरचा कालावधी हा सहा महिन्यांचा असतो.

बी एस सी कम्प्युटर सायन्स मध्ये साधारणपणे कोणकोणते विषय किंवा अभ्यासक्रम शिकवला जातो?

बी एस सी कम्प्युटर सायन्स मध्ये साधारणपणे संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्किंग, ऑपरेटिंग सिस्टीम, डेटाबेस, प्रोग्रामिंग लँग्वेज इत्यादी बाबत सखोल माहिती शिकविली जाते.

बी एस सी कम्प्युटर सायन्सला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या पात्रता पूर्ण केलेल्या असल्या पाहिजेत?

बी एस सी कम्प्युटर सायन्स घेण्याकरिता विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याकरिता त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, व गणित या तीन विषयांचा अभ्यास करणे गरजेचे असते. त्याचबरोबर किमान ४५ टक्के गुणांची आवश्यकता असते. मात्र आजच्या स्पर्धात्मक युगातील मेरीट बघता अधिकाधिक मार्क मिळवणे गरजेचे ठरते.

आजच्या भागामध्ये आपण कम्प्युटर सायन्स अर्थात बीएससी सी एस याबद्दल माहिती बघितली आहे. ही माहिती नक्कीच तुमच्या करिअरच्या दृष्टीने फायदेशीर ठरली असेल. त्यामुळे कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी फार उपयुक्त व मोलाच्या आहेत. सोबतच बारावीनंतर या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या किंवा करिअर करू इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती आवर्जून शेअर करून, या माहितीच्या प्रसाराला नक्की हातभार लावावा.

Leave a Comment