बीएसएफ दला विषयी संपूर्ण माहिती BSF Force Information In Marathi

BSF Force Information In Marathi प्रत्येक देशाला त्याची विशिष्ट अशी सीमारेषा असते आणि या सीमारेषेवरून अनेक देशांमध्ये वाद-विवाद देखील होत असतात. या सीमांचे रक्षण करण्याकरिता प्रत्येक देशाचे एक सुरक्षा दल असते त्याचप्रमाणे भारताचे देखील असे एकच सुरक्षा दल असून त्याला बीएसएफ अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणून ओळखले जाते.

BSF Force Information In Marathi

बीएसएफ दला विषयी संपूर्ण माहिती BSF Force Information In Marathi

आपल्या देशाच्या सीमेवर शत्रूंना घुसखोरी करू न देणे हे त्यांचे प्रमुख कार्य समजले जाते. बीएसएफ मध्ये नोकरीस असणे हे एक प्रतिष्ठेचे लक्षण असून येथे काम करणाऱ्या व्यक्तींना उच्च पगार देखील मिळत असतो त्याचबरोबर सर्वत्र त्यांना मानसन्मान देखील प्राप्त होत असतो.

ज्या तरुणांच्या मनामध्ये देशभक्ती जागृत असेल तसेच त्यांना देशासाठी काहीतरी करून सेवा बजवायची असेल त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी समजली जाते. आजच्या भागामध्ये आपण या बीएसएफ दलाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.

नावबीएसएफ
संपूर्ण रूपबॉर्डर सिक्युरिटी फोर्स
स्थापना दिनांक१ डिसेंबर १९६५
कार्यक्षेत्रपोलीस दल
ब्रीदजीवन पर्यंत कर्तव्य
मुख्य कार्यालय नवी दिल्ली
सध्याचे सेनापतीराकेश अस्थाना

देशाच्या सीमा या फारच महत्त्वाच्या असतात ज्यामुळे देशाला एक नकाशा प्राप्त झालेला असतो. या सीमांचे रक्षण केले नाही तर शेजारील राष्ट्र त्यावर अतिक्रमण करू शकतात आणि हळूहळू राष्ट्राच्या भूसंपत्तीला त्याचा धोका निर्माण होतो. भारत स्वतंत्र झाल्यानंतर या सीमांचे रक्षण करण्याची गरज निर्माण झाली होती.

ते कार्य पोलीस बटालियन यांना देण्यात आले होते मात्र १९६५ पर्यंत पोलिसांनी हे कार्य सांभाळलेले असले तरी देखील या सीमांचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र दल असावे अशी गरज भासू लागली होती त्यातूनच १ डिसेंबर १९६५ या दिवशी बीएसएफ ची स्थापना करण्यात आली.

आपल्या देशाच्या शेजारील राष्ट्रांमध्ये पाकिस्तान व चीन सारख्या वाईट प्रवृत्तीच्या देशांचा समावेश होतो. या देशांपासून भारताच्या सीमा वाचवायच्या असतील तर योग्य त्या दलाच्या हातात ही कार्य सोपवली पाहिजे असे सर्वानुमते ठरले आणि यातूनच या दलाची निर्मिती झाली होती.

त्याचबरोबर पोलीस दलाला इतरही कामे असल्यामुळे सीमा सांभाळण्याच्या कार्याला ते योग्य न्याय देऊ शकत नसत. आज मीतिला १९२ बटालियन सज्ज असलेली बीएसएफ जगभरातील उत्कृष्ट सीमा सुरक्षा दलामधील एक आहे.

सीमा सुरक्षा दलाची भूमिका व कार्य:

कुठल्याही देशाची सीमा म्हटलं की त्यातून बेकायदेशीर स्थलांतर किंवा अवैध घुसखोरी इत्यादी गोष्टींना उधाण आलेले असते. मुख्यत्वे देशाच्या सीमा सांभाळतानाच त्या गोष्टींवर देखील लक्ष ठेवणे व अशा काही गोष्टी होताना दिसल्यास त्याला प्रतिबंध करणे हे देखील जवानांचे कार्य असते.

त्याचबरोबर शत्रूंनी आक्रमण केल्यास सीमेवर त्यांना झोपविणे तसेच अधिकेची कुमक मागवून या हल्ल्याला परतवून लावणे, देशाच्या प्राकृतिक नकाशाला स्थिर ठेवणे, शत्रूंवर लक्ष ठेवणे, त्यांना विठीस धरणे आणि घुसखोरी करणाऱ्या लोकांवर योग्य ती कार्यवाही करणे इत्यादी कार्य लागतात.

बीएसएफ मध्ये सहभागी होण्यासाठीच्या पात्रता तसेच भरती प्रक्रिया:

बीएसएफ मध्ये सहभागी व्हायचे असेल तर शैक्षणिक पात्रता फारशी कठीण नाही. दहावी किंवा बारावी उत्तीर्ण आणि कुठल्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना यामध्ये सहभागी होता येते मात्र वयाच्या दृष्टीने विचार केल्यास कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त २३ वय इथे ग्राह्य धरले जाते.

या वयोमर्यादांमध्ये आरक्षित गटांना सूट देण्यात आलेली असून उंची देखील येथे गरजेचे असते. साधारणपणे १७० cm उंची असलेला आणि छाती ८० ते ८५ cm दरम्यान असलेला उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरत असतो. यासाठी उमेदवार अर्ज करून विविध पदावर भरती होऊ शकतो.

त्यामध्ये असिस्टंट हेड कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर इत्यादी पदांचा मुख्यत्वे समावेश होत असतो. यासाठी तुम्हाला लेखी परीक्षा, वैद्यकीय तपासणी, शारीरिक तपासणी सह मुलाखत अशा चार टप्प्यातून पार पडावे लागते.

बीएसएफ मध्ये सहभागी झाल्यानंतर उमेदवार २५ ते ३० हजार रुपये पगार मिळू शकतो. मात्र पुढे जाऊन तो वाढू देखील शकतो जो एक ते दोन लाख दरम्यान देखील असतो.

आपल्या स्थापनेनंतर बीएसएफ या दलाने परकीय आक्रमण हाणून पाडण्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे. १९९९ मध्ये कारगिल युद्ध झाले त्यावेळेस बीएसएफ जवानांनी भारताला संरक्षित केले होते. त्याचबरोबर बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ इत्यादी देशांमधून होणाऱ्या घुसखोरींना अळा घालण्याचे कार्य देखील या बीएसएफ जवानांनी केलेले आहे त्यामुळे या जवानांची ऊर्जा वाढावी तसेच त्यांना योग्य तो सन्मान मिळावा याकरिता दरवर्षी १ डिसेंबरला बी.एस.एफ स्थापना दिवस साजरा केला जातो.

स्थापन झाल्याच्या वेळी अवघे २५ बटालियन असलेली ही सेना आज १९२ बटालियन ने सज्ज असून अडीच लाख सैनिकांपेक्षा देखील अधिक सैनिक येथे सेवा करत आहेत. कच्छचे रणरणीत वाळवंट असो की कश्मीर सारखा थंड प्रदेश बीएसएफ जवान नेहमीच कार्यासाठी तत्पर असतात आणि देशातील संपूर्ण नागरिकांचे रक्षण करत त्यांची काळजी घेत असतात अशा या जवानांना सॅल्यूट.

निष्कर्ष:

इंग्रजांनी आपल्या देशावर सुमारे १५० वर्षांपेक्षा देखील जास्त राज्य केलेले आहे  हे आपल्याला माहीतच आहे मात्र आता भारत स्वतंत्र असला तरी देखील या भारत देशाची सुरक्षा करणे तितकेच गरजेचे ठरते अन्यथा इतर शेजारी राष्ट्र किंवा परकीय देश सहस्त्रित्या आक्रमण करून भारताला जळकोट करू शकतात. आज भारताची सेना अतिशय मजबूत असून या सेनेचे विविध प्रकार पडत असतात.

सेना भारताला आतून आणि बाहेरून अशा दोन्ही प्रकारे सुरक्षित ठेवण्याचे कार्य करत असते. सेनेमुळे सर्वसामान्य माणूस देशांतर्गत अतिशय मुक्तपणे वावरू शकतो व आपल्या दैनंदिन कार्याला सहजरित्या पूर्ण करू शकतो. असाच एक भारताची सीमारेषा सांभाळणारा गट किंवा दल म्हणून बीएसएफ जवानांना ओळखले जाते. आजच्या भागाबद्दल आपण या बीएसएफ दलाबद्दल माहिती घेतलेली आहे.

 यामध्ये त्याची स्थापना, त्याची कार्य व भूमिका या दलामध्ये सहभागी होण्यासाठीची प्रक्रिया किंवा भरती प्रक्रिया तसेच या ठिकाणी सहभागी व्हायचे असेल तर शैक्षणिक व शारीरिक पात्रता काय आवश्यक असते इत्यादी माहिती बघितली आहे. सोबतच बीएसएफ जवानांना मिळणारा पगार देखील जाणून घेतलेला आहे.

FAQ

बी.एस.एफ या दलाचे संपूर्ण स्वरूप काय आहे?

बी.एस.एफ या दलाचे संपूर्ण स्वरूप बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असे आहे ज्याला मराठीमध्ये सीमा सुरक्षा दल असे म्हणून ओळखले जाते.

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात सीमा सुरक्षा दलाची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली होती?

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात सीमा सुरक्षा दलाची स्थापना १ डिसेंबर १९६५ या दिवशी करण्यात आली होती.

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स चे ब्रीदवाक्य कोणत्या वाक्याला समजले जाते?

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स चे ब्रीदवाक्य हे जीवन पर्यंत कर्तव्य या वाक्याला समजले जाते.

बी.एस.एफ चे सद्यस्थितीतील मुख्यालय कोठे आहे व त्याचे सध्याचे सेनापती कोण आहेत?

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स चे मुख्यालय सध्या नवी दिल्ली येथे असून आज मीतिला त्याचे सेनापती म्हणून राकेश असताना यांना ओळखले जाते.

आज भारतीय सीमा सुरक्षा दलाबद्दल बघितले तर यामध्ये किती सैनिकांचा समावेश झालेला आहे?

आज भारतीय सीमा सुरक्षा दलाबद्दल बघितले तर त्यामध्ये सुमारे दोन लाख ५७ हजार ३६३ सैनिकांचा समावेश झालेला आहे.

Leave a Comment