Buldhana Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण बुलढाणा या जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत बुलढाणा हे शहर अजिंठ्याच्या डोंगर रांगात वसलेले असून या भागात हे शहर थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे बुलढाणा जिल्हा हा अमरावती विभाग मध्ये असून विदर्भाच्या पश्चिम सीमेवर आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजधानी पासून ५०० कि मी अंतरावर आहे
बुलढाणा जिल्ह्याची संपूर्ण माहिती Buldhana Information In
Marathi
विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 9,680 चौरस किलोमीटर इतके आहे.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये १३ तहसील असून ५ महसूल उपविभाग आहेत. जिल्ह्याचे ठिकाण बुलढाणा असून या जिल्ह्यापासून औरंगाबाद (१५० कि मी), अमरावती(२०० कि मी), पुणे(४२५ कि मी), नागपूर(३५० कि मी) अंतरावर आहे.
मुंबई ते हावडा हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग तसेच पूर्व-पश्चिम भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या जिल्ह्यातून गेला आहे. बुलढाणा विदर्भात पश्चिमेकडे येणारा जिल्हा आहे. बुलढाण्याच्या उत्तरेला मध्यप्रदेश, पुर्वेकडे अकोला, वाशिम, आणि अमरावती जिल्हा, दक्षिणेकडे जालना आणि पश्चिमेकडे जळगाव व औरंगाबाद जिल्हा आहे.
बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास
या जिल्ह्याविषयीचा सुसंगत असा प्राचीन इतिहास फारसा आढळत नाही. येथील लोणार सरोवर व मेहेकर या ठिकाणांविषयी पुराणांतून उल्लेख आढळतात. सत्ययुगात लोणार सरोवर ‘बैरज तीर्थ‘ या नावाने ओळखले जात असे. मेहेकर गावाविषयी काही आख्यायिका प्रचलित आहेत.
या परिसरात मध्ययुगीन मंदिरांचे अवशेषही आढळतात. प्राचीन कुंतल देशात हा प्रदेश समाविष्ट होता. काही ऐतिहासिक निर्देशांकानुसार हा प्रदेश सम्राट अशोकाच्या साम्राज्यात होता त्यानंतर या प्रदेशावर सातवाहनांचे साम्राज्य आले. जिल्ह्यातील रोहनखेड येथे १४३७ मध्ये अलाउद्दीन शाह (बहमनी दुसरा) याचा सेनापती व खानदेशचा सुलतान यांच्यात आणि १५९० मध्ये बुऱ्हाण निजामशाह व जमालखान (माहदवी) यांच्यात लढाया झाल्या.
१७२४ मध्ये साखरखेर्डा येथे निजामुल्मुल्क आसफजाह (हैदराबादच्या निजाम घराण्याचा संस्थापक) व मोगल सरदार मुबारीझखान यांच्यात लढाई होऊन आसफजाहास जय मिळाला. दुसऱ्या इंग्रज-मराठे युद्धापूर्वी १८०३ मध्ये दौलतराव शिंदे व रघुजी भोसले यांचा या जिल्ह्यातील मलकापूर येथे तळ होता, असा उल्लेख आढळतो.
१८५३ मध्ये बुलढाणा हा प. बेरार विभागाचा एक भाग म्हणून जाहीर करण्यात आला. १८६४ मध्ये याला स्वतंत्र जिल्हा म्हणून मान्यता मिळाली व १८६७मध्ये बुलढाण शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण झाले.
बुलढाणा जिल्ह्याचा भूगोल
महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागातील एक जिल्हा. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९,७४५ चौ. किमी. आहे. लोकसंख्या १५,०६,९५६ (१९८१). बुलढाणा शहर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.
उत्तरेस मध्यप्रदेश राज्य असून ईशान्येस अमरावती, पूर्वेस अकोला, दक्षिणेस परभणी व जालना नैर्ऋत्येस औरंगाबाद व पश्चिमेस जळगांव या महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यानी बुलढाणा जिल्हा सीमित झाला आहे.
बुलढाणा जिल्हा तापी व गोदावरी नद्यांच्या खोऱ्यात वसलेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील निम्मा भाग ‘पयान घाट‘ (तापीच्या पूर्णा उपनदीचे खोरे), तर दक्षिणेकडील उरलेला भाग ‘बाला घाट‘(गोदावरीच्या पैनगंगा उपनदीचे खोरे). या नावांनी ओळखला जातो.
भूरचनेच्या दृष्टीने मात्र या जिल्ह्याचेचार भाग पडतात. (१) उत्तरेकडील गाविलगडचे डोंगर, (२) पयानघाट किंवा पूर्णा नदीखोरे, (३) मध्यवर्ती अजिंठा डोंगररांग व (४) दक्षिणेकडील बालाघाट किंवा बुलढाणा पठार.
प्रशासनाच्या सोयीसाठी जिल्ह्याचेएकूण १३ तालुके करण्यात आले आहेत.ते पुढील प्रमाणे:-
जळगांव, संग्रामपूर, मोताळा, मलकापूर, नांदुरा, खामगांव, शेगांव, चिखली, देऊळगांव राजा, मेहेकर, बुलढाणा, सिंदखेड राजा व लोणार
बुलढाणा नावाची उत्पत्ती
अजिंठ्याच्या डोंगरावर वसलेले भिल्लांचे वसतिस्थान म्हणजे ‘भिल्लठाणा.’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन बुलडाणा हे नाव पडले असावे, असा इतिहासकारांचा अंदाज आहे.
या जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात अश्मयुगीन अश्मास्त्रे व जोर्वे या ताम्र पाषाणयुगीन संस्कृतीची मृदभांड्यांचे अवशेष व बृहदाश्मयुगीन अवशेष सापडल्याने या भागात इतिहासपूर्व काळापासून मनुष्याचा वावर असल्याचे स्पष्ट होते. महाभारत काळात बुलडाना जिल्हा ‘कुंतल’ देशात समाविष्ट होता. त्यानंतर य प्रदेशावर सातवाहन, यादव व त्यानंतर बहामनी मराठ्यांचे राज्य होते.
बुलढाणा जिल्ह्याची लोकसंख्या
२०११ च्या जनगणने नुसार जिल्ह्याची लोकसंख्या २५,८८,०३९ असून लिंग प्रमाण 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण 928 आहे तसेच तसेच साक्षरता दर शेकडेवारी प्रमाण ८२.०९% आहे.
जिल्ह्यातील जंगल व्याप्त व डोंगराळ भागात अदिवासी लोक राहतात. येथील आदिवासींत ⇨ बंजारा, ⇨कोरकू, ⇨पारधी, नीहाल इ. प्रमुख जमाती आहेत. ह्या जिल्ह्यातील जळगाव तालुक्यात कोरकू व नीहाल आणि मेहेकर व चिखली तालुक्यात बंजारा जमातीची वसती आढळते.
बुलढाणा जिल्ह्यातील नद्या
बुलढाणा जिल्हा तापी व गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे.ह्या जिल्ह्याचा उत्तरेकडील निम्मा भाग पयान घाट व दक्षिणेकडील निम्मा भाग हा बाला घाट म्हणून ओळखला जातो.
भूरचनेच्या दृष्टीने मात्र या जिल्ह्याचेचार भाग पडतात. (१) उत्तरेकडील गाविलगडचे डोंगर, (२) पयानघाट किंवा पूर्णा नदीखोरे, (३) मध्यवर्ती अजिंठा डोंगररांग व (४) दक्षिणेकडील बालाघाट किंवा बुलढाणा पठार.
उतवळी नदी, खडकपूर्णा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, पूर्णा नदी, पैनगंगा नदी, बाणगंगा नदी, बोर्डी नदी, मन नदी, मास नदी, वाण नदी, विश्वगंगा नदी, ज्ञानगंगा नदी, आमना नदी ह्या नद्यांचा प्रवाह बुलढाणा जिल्ह्यातून जातो.
जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेने वाहणाऱ्या आहेत व त्या तापी नदीला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत.
प्रमुख पिके
कापूस व करडई ही बुलढाणा जिल्ह्याची महत्वाची पिके आहेत.कापसबरोबर इथले शेतकरी मूग ,तूर,भुईमुग, इत्यादी जारीपाची पिके पेरतात व गहू हरबरा ही रब्बीची पिके देखील मोठ्या प्रमाणात घेतली जातात.
मोठ्या प्रमाणात असलेल्या जलसिंचनाच्या सोयीमुळे या जिल्ह्यात संत्री,ऊस,मिरची यांसारखी पिके देखील मोठ्या प्रमाणात घेतली जातात.
उद्योग धंदे व व्यवसाय
बुलढाणा ह्या जिल्ह्यात खामगाव ,देऊळगाव राजा,मलकापूर आणि बुलढाण्यात आख्या बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.बुलढण्या जिल्ह्यात कापसाचे उडपदान जास्त प्रमाणात असल्यामुळे येथे जास्त प्रमाणात हातमाग व यंत्रमाग उद्योग आहेत.
खामगाव येथे हिंदुस्थान लिव्हर कंपनी चा संबंनिर्मिती करणारा कारखाना आहे. बुलढाणा ह्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तेल गिरण्या आढळून येतात.येथील कार्डईचे तेल हे जगप्रसिद्ध आहे.
दळणवळण
बुलढाणा जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग ६ गेला आहे व मुंबई-कोलकाता हा प्रमुख महामार्ग देखील ह्या जिल्ह्यातून जातो.या लोहमार्गावर बुलढाणा जिल्ह्यतैल मलकापूर,नांदुरा,खुमगाव बुर्ती, जलंब जंकशन ,शेगांव अशी प्रमुख रेल्वे स्थानक आहेत.
बुलढाणा जिल्ह्याची वैशिष्ट्ये
- बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. तसेच या सरोवराजवळ जागतिक भौगोलिक अभ्यासाचे केंद्र आहे.
- बुलढाणा शहरातील हवामान आरोग्यदायी असल्यामुळे येथे क्षयरोग निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. खामगाव येथे कुष्ठरोग निवारण केंद्र आहे.
- शेगाव येथे श्री गजानन महाराजांची समाधी आहे. या ठिकाणी आनंदसागर हे पर्यटनस्थळ निर्माण करण्यात आले आहे. या ठिकाणाला भेट देण्याकरिता दुरून लोक येतात.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे सिंदखेडराजा हे जन्मस्थळ असून, येथे त्यांचे वडील लखुजी राजे जाधव या जिजाबाईच्या वडिलांची समाधी आहे.
- विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून बुलडाणा जिल्ह्यास ओळखले जाते.
- बुलढाणा जिल्ह्यामध्ये अंबरवरवा, ज्ञानगंगा व लोणार ही अभयारण्ये आहेत.
- बुलढाणा जिल्ह्यातील करडईचे तेल प्रसिद्ध आहे.
- बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे सर्वांत उंच हनुमानाची मूर्ती आहे.
- बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे पौराणिक काळात ‘बैरजतीर्थ’ म्हणून ओळखले जात असे.
- सिंदखेडराजा तालुक्यातील बाणखेडा, कोठली, सातगाव या गावातून अश्मयुगीन अश्मास्त्रे सापडलेली आहेत.
- बुलढाणा हे शहर अजिंठ्याच्या डोंगररांगांत वसलेले असून या भागात हे शहर थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे.
- बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाची व एकमेव औद्योगिक वसाहत खामगाव येथे आहे.
- खामगाव येथे हिंदुस्थान लिव्हर कंपनीचा साबणनिर्मिती करणारा कारखाना आहे.
- देऊळगाव येथे असलेले प्रसिद्ध बालाजी मंदिर हे येथील विदर्भातील सर्वात संपन्न देवस्थान म्हणून ओळखले जाते.
- जामोद हे गाव येथील प्राचीन जैन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. आहे. जामोद हे ठिकाण विड्यांच्या पानांच्या उत्पादनासाठीही प्रसिद्ध आहे.
हे सुद्धा अवश्य वाचा :-
मी पंतप्रधान झालो तर… मराठी निबंध
मी डॉक्टर झालो तर… मराठी निबंध
मी शिक्षणमंत्री झालो तर…मराठी निबंध