बटर चिकन रेसिपी मराठी Butter Chicken recipe in Marathi

बटर चिकन रेसिपी मराठी Butter Chicken recipe in Marathi  बऱ्याचदा मासाहारी लोकांमध्ये चिकन खाण्याची किंवा बनवण्याची वेगवेगळ्या प्रकारची कॉम्पिटिशन दिसून येते.  मांसाहारी लोकांसमोर केवळ चिकनचे नाव जरी ऐकलं तरी त्यांच्यासमोर अनेक पदार्थ त्यांना दिसू लागतात.  मित्र-मैत्रिणींना भेटणं किंवा मग कोणत्याही कार्यक्रमांमध्ये, जेवणामध्ये चिकनचा एक तरी पदार्थ ते ठेवतातच.  त्यामध्ये चिकनच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपल्याला दिसून येतात.  बऱ्याचदा शाकाहारी लोकांना देखील मांसाहारी लोकांचा हेवा वाटू लागतो.  पण चिकनाची खासियत फक्त त्याच्या चवीत नसून ती चिकन खाण्याच्या फायद्यामध्ये आहे.  तर अशीच आपण रेसिपी पाहणार आहोत की, जी तुम्ही आपल्या घरी सध्या व सोप्या पद्धतीने करू शकता.

Butter Chicken

बटर चिकन रेसिपी मराठी Butter Chicken recipe in Marathi

रेसिपी प्रकार  :

चिकन रेसिपी ही वेगवेगळ्या प्रकारामध्ये बनवली जाते.  त्यामध्ये कोल्हापुरी चिकन, गावरान चिकन रस्सा, चिकन करी, तंदुरी चिकन, बटर चिकन, सुखा चिकन, चिकन खिमा, चिकन 65, चिकन लॉलीपॉप, चिकन टीका, चिकन पकोडे आणि इतर अनेक प्रकारच्या बिर्याणी देखील आपण चिकनचा उपयोग करून बनवू शकतो तर तुम्हाला वरीलपैकी कोणती रेसिपी आवडते तसेच आज आपण या पोस्टमध्ये बटर चिकन ही रेसिपी पाहणार आहोत.  तर बटर चिकन ही रेसिपी तुम्ही ही घरी नक्की बनवून पहा आणि तुमची बटर चिकन रेसिपी कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

तुम्ही रेसिपी किती लोकांकरिता आहे ?

ही रेसिपी आपण 6 व्यक्तींकरिता बनवणार आहोत.

पूर्वतयारी करताना लागणारा वेळ :

बटर चिकन रेसिपी तयार करताना आपल्याला पूर्ण तयारीसाठी 30 मिनिटे वेळ लागतो.

कुकिंग टाईम  :

चिकन शिजवण्याकरता आपल्याला 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम  :

ही रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला एक तास एवढा वेळ लागतो.

बटर चिकन रेसिपीकरता लागणारे साहित्य  :

1)  500 gm चिकन ( मध्यम आकाराचे तुकडे )

2) 500 gm टोमॅटो बारीक चिरून

3)  दोन चमचे आलं लसूण पेस्ट

4)  दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून

5)  3 छोटे चमचे लाल तिखट

6) 1/2 वाटी तेल

7) 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

8) 1/2 वाटी क्रीम

9)  एक छोटी वाटी लोणी

10)  1 छोटा चमचा गरम मसाला

11) दोन वाटी पाणी

12) मीठ चवीनुसार

पाककृती :

 • गाजर हलवा रेसिपी मराठी
 • सर्वप्रथम एका भांड्यामध्ये चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या.  त्यामध्ये एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट, एक चमचा मिरची पावडर आणि थोडं मीठ टाका व ते चांगले मिक्स करून अर्धा तास बाजूला ठेवा.
 • अर्ध्या तासानंतर गॅसवर एक पॅन ठेवा व त्यामध्ये थोडे तेल टाकून ते गरम झाले की त्यामध्ये चिकनला परतून घ्या.  चिकन परतून झाले की बाजूला काढून ठेवा.
 • नंतर त्याच पॅनमध्ये थोडे तेल टाका व कापलेला कांदा व एक चमचा लोणी टाकून हे हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
 • आता त्यामध्ये टोमॅटो आणि गरम मसाला तसेच मिरची पावडर, लसूण अद्रकची पेस्ट  तसेच सर्व मिश्रण एकत्रितपणे मिक्स करून घ्या.
 • नंतर ह्या मिश्रणात पाणी टाकून दहा ते पंधरा मिनिटे शिजू द्या टोमॅटो चांगले नरम झाले की त्या मिश्रणाला एका पातेल्यात काढून घ्या.
 • आता आपल्याला या मिश्रणाची बारीक पेस्ट करायची आहे.  ते मिक्सरच्या सहाय्याने करून घ्यावी.
 • आता त्याच पॅनमध्ये तयार झालेले मिश्रण चाळणीने गाळून घ्या आणखीन एकदा गरम करायला ठेवा.
 • तसेच त्या मिश्रणात उरलेले लोणी थोडी क्रीम आणि चिकन टाकून मिक्स करावं हे 10 मिनिटे शिजवून घ्या.
 • आता तुमचे बटर चिकन तयार आहे, त्यामध्ये थोडी क्रीम थोडी कोथिंबीर व कापलेला कांदे टाकून सजवून घ्या.
 • ही रेसिपी तुम्ही तंदुरी रोटी किंवा बाजरीची भाकर किंवा पोळीसोबत सर्व्ह करू शकता.
 • पोषक घटक  :

चिकन आरोग्यासाठी सेहत मंद आहे, तसेच त्यामध्ये असणारे विविध घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.  तर चला मग जाणून घेऊया चिकनमध्ये कोण कोणते घटक असतात.  चिकन मध्ये प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन बी 3,  व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम हे घटक असून ते शरीरासाठी पोषक असतात.

फायदे  :

चिकन खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला बरेच फायदे मिळतात ते पुढील प्रमाणे.

चिकनमध्ये प्रोटीनच्या व्यतिरिक्त कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळे दोन्हीही आपल्या शरीरातील हाडांसाठी खूपच महत्त्वाचे असतात.  जर नियमित चिकन खाल्ले तर आपल्या शरीरात गाठी होण्याचा धोका कमी होतो.

चिकनमधील प्रोटीन हे जिम करणाऱ्यांसाठी तसेच डायट करणाऱ्यांसाठी खाण्याचा सल्ला दिला जातो.  प्रोटीनमुळे आपल्या मास पेशींना ताकद मिळते.  ज्यांना शरीराची ताकद वाढवायचे असेल त्यांनी चिकन खायला सुरुवात केली पाहिजे.

चिकन खाल्ल्याने वजन देखील कमी होण्यास मदत होते.

चिकनमध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याचे अनेक गुणधर्म असल्यामुळे सूप किंवा चिकन खाणं जास्त फायदेशीर आहे.

चिकन सूप पिल्यामुळे सर्दीचा त्रास कमी होतो.

तोटे   :

चिकन खाणे तसे हिताचेच आहे; परंतु कोणत्याही प्रकारचे मास खाताना आपल्याला काही सावधानता बाळगाव्या लागतात.  नाहीतर  त्याच्या माध्यमातून शरीरात मोठ्या प्रमाणावर धोकादायक जिवाणू प्रवेश करू शकतात.

आपल्याकडे बहुतांश पोल्ट्री फार्म आणि चिकन मध्ये स्वच्छतेविषयीचे नियम पाडले जात नाही.  याचा परिणाम आपल्या ताटात येणाऱ्या चिकनच्या पदार्थावर झालेला दिसतो.

त्यामुळे स्वच्छतेच्या अभावी चिकन खाणाऱ्यांना अनेक किरकोळ आजार उद्भवण्याचा धोका असतो.

तर मित्रांनो, तुम्हाला बटर चिकन ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment