CA Course Information In Marathi बऱ्याच विद्यार्थ्यांना दहावी बारावी पास झाल्यानंतर आपले करिअर कशामध्ये करायचे हे त्यांना कळत नाही तसेच काही विद्यार्थी आर्ट कॉमर्स सायन्स या क्षेत्रांमध्ये प्रवेश घेतात, परंतु ज्या शिक्षणामुळे आपल्या आयुष्य बदलून जाईल असे शिक्षण आपण घेणे केव्हाही फायदेशीर ठरते. असाच एक कोर्स आहे जो तुम्हाला चांगला पगार उपलब्ध करून देतो तो म्हणजे CA.
सीए कोर्सची संपूर्ण माहिती CA Course Information In Marathi
सी ए म्हणजे चार्टर अकाउंटंट ज्यांना सीए संबंधित कोर्स करायचा असतो. त्यांना पैशाची कधी कमी राहत नाही कारण हा कोर्स असा आहे, जो तुम्हाला भरपूर पैसा किंवा पगार मिळवून देतो. तुम्ही जर सीए पास झाला तर तुमच्याकडे चार्टर्ड अकाउंटंटची पदवी राहते. आजकाल हा कोर्स करण्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल दिसतो. सीए कोण करू शकतो? सीए म्हणजे काय? सीएच्या पात्रता काय आहेत ? सीए ची परीक्षा कशी असते तसेच हा कोर्स किती वर्षाचा असतो? याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
परीक्षेचे नाव | आयसीएआय परीक्षा, सीए, सीपीटी, सीए अंतिम |
परीक्षा आयोजित | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट्स ऑफ इंडिया |
परीक्षा पातळी | राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा |
परीक्षा मोड | ऑनलाईन |
परीक्षेचा कालावधी | दोन तास |
भाषा | इंग्रजी |
एका वर्षात कितीदा घेतली जाते | वर्षातून दोन वेळा |
परीक्षेचा उद्देश | प्रशिक्षण व चार्टर्ड अकाउंटंट प्रमाणित |
परीक्षा वेबसाईट | icaiexam.icai.org |
सीए म्हणजे काय?
CA म्हणजे Chartered Accountant मराठीमध्ये सनदी लेखाकार असे सुद्धा म्हणतात. चार्टर्ड अकाउंटंट हे सरकारी वित्तीय विभागाची मूल्यमापन करणारा अधिकारी असतो. आपल्याला जर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जुन्या काळामध्ये दुकानांमध्ये किंवा व्यापार करणाऱ्या छोट्या उद्योग संस्थांमध्ये मुनीमजी किंवा लेखापाल हे कंपन्यांचे हिशोबपत्र सोबत ठेवत असत किंवा तपासत असत तसेच त्यांचे व्यवस्थापन सुद्धा त्यांच्याकडून करून घेतले जात होते; परंतु आजच्या वर्तमान काळामध्ये मोठ्या कंपन्या आणि सरकारी तिजोरीची मूल्यमापन करून योग्य ताळेबंद तयार करतात, त्या व्यक्तीला चार्टर्ड अकाउंटंट म्हणतात.
सीए कसे व्हावे?
तुम्हाला जर सीए करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला काही अटी व नियमांचे पालन करावे लागते. सीए बनण्यासाठी कोणताही बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी फाउंडेशन कोर्ससाठी नोंदणी करू शकतो. नोंदणी केल्यानंतर चार महिन्याच्या आत फाउंडेशन परीक्षा घेतली जाते. या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातात.
नोव्हेंबर आणि मे या महिन्यांमध्ये या परीक्षा होतात. यामध्ये जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला इंटरमिजिएट परीक्षांमध्ये प्रवेश मिळतो आणि वाणिज्य विषयांमध्ये तुम्हाला 55 टक्के गुण मिळालेले असावे पाहिजेत. जर तुम्ही पदव्युत्तर असाल तर तुम्ही थेट फाउंडेशन कोर्स करण्याऐवजी इंटरमीजीएट कोर्सला सुद्धा प्रवेश घेऊ शकता.
या कोर्सला प्रवेश घेण्याआधी नोंदणी करावी लागते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही अंतिम अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतात. अंतिम अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाल्यानंतर त्यांची परीक्षा घेतली जाते. अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थी चार्ट अकाउंटंट होऊ शकतो.
सीए कोर्स साठी असलेल्या पात्रता :
तुम्हाला जर चार्टर अकाउंटंट हा कोर्स करायचा असेल तर काही पात्रता पूर्ण कराव्या लागतात. दहावीनंतर विद्यार्थी सीपीटीसाठी नोंदणी करू शकतात परंतु ते बारावी उत्तीर्ण झाल्यानंतरच सीपीटी परीक्षा देण्यास पात्र ठरतात.
बारावी कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी सुद्धा सीपीटी कोर्ससाठी नाव नोंदणी करू शकतात. सीए हा अभ्यासक्रम करण्यासाठी तुम्ही बारावी कॉमर्स उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. जर तुम्ही कॉमर्समधून नसाल तर तुम्हाला 55% गुणांसह उत्तीर्ण व्हावे लागेल.
जर तुम्ही पदवी घेतली असेल तर तुमच्याकडे 60 टक्के पदवी गुण असणे आवश्यक आहे. आयपीसीसी म्हणजेच इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटिन्स कोर्ससाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सीपीटीमध्ये 200 पैकी 100 गुण मिळवले पाहिजे.
परीक्षेचे स्वरूप. :
सी ए परीक्षेचे स्वरूप तीन स्तरात विभागले आहेत.
सीपीटी (कॉमन एंट्रन्स टेस्ट) :
ही परीक्षा जून व डिसेंबर या महिन्यांमध्ये घेतली जाते म्हणजेच वर्षातून दोनदा ही परीक्षा घेतली जाते. वाणिज्य शाखेचे विद्यार्थी 55 टक्के गुण प्राप्त करून किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी असेल तर ही परीक्षा देण्याची सुद्धा गरज नसते. ही परीक्षा दोन भागांमध्ये विभागली आहे. या परीक्षेसाठी दोन तासाचा वेळ देण्यात येतो.
पहिला विभाग हा फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग आणि मार्केटाइल लॉ यावर आधारित असतो. त्याला शंभर गुण असतात. तर दुसरा विभाग हा जनरल इकॉनॉमिक्स 50 व क्वांटिटेटिव एटीट्यूड 50 असे दोन्ही मिळून 100 गुणांचा पेपर असतो.
आयपीसीसी :
आयपीसीसी ही परीक्षा जेसीपीटी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात तेच देऊ शकतात. ज्यांच्याकडे पदवी आहे, ते ही परीक्षा न देता ही पुढच्या परीक्षेला पात्र ठरतात. या परीक्षेमध्ये एकूण सात विषय असतात व दोन ग्रुप मध्ये हे विभागलेले असतात. पहिल्या ग्रुपमध्ये चार विषय व दुसऱ्या ग्रुपमध्ये तीन विषय समाविष्ट असतात. प्रत्येक विषयामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळे गुण धरले जातात.
तुम्हाला शंभर पैकी 40 गुण मिळवणे आवश्यक असते तसेच सर्वच पेपरमध्ये व दोन्ही ग्रुपमध्ये उत्तीर्ण होणे सुद्धा गरजेचे असते. पहिले ग्रुपसाठी तुम्हाला कमीत कमी 200 गुण प्राप्त व दुसऱ्या ग्रुपसाठी कमीत कमी 150 गुण मिळवणे आवश्यक असते.
सीए फायनल उत्तीर्ण करण्यासाठी तुम्हाला सीएच्या सर्वच आठ पेपरमध्ये किमान 40% गुण आणि सर्व पेपरमध्ये 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक असते.
सीए अभ्यासक्रम :
CA अभ्यासक्रम दोन वर्षात पूर्ण करावा लागतो त्यामध्ये तीन विभाग आहेत. सीपीटी : यामध्ये फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग, मार्केटिंग, लॉ, जनरल इकॉनॉमिक्स, क्वांटिटेटिव एटीट्यूड.
आयपीसीसी : यामध्ये लेखांकन व्यवसाय तोटा नीतिशास्त्र आणि दळणवळण, खर्च हिशोब आणि आर्थिक व्यवस्थापन, कर, ॲडव्हान्स अकाउंटिंग ऑडिटिंग आणि इन्शुरन्स माहिती तंत्रज्ञान आणि रणनीतिक व्यवस्थापन.
फायनल सीए : आयसीआय अंतिम अभ्यासक्रमासाठी जुन्या योजनेमध्ये बदल केलेला असून काही नवीन पेपर जोडले आहे. ज्यामधून विद्यार्थी कोणताही विषय स्वतः निवडू शकतात.
कोर्स करण्यासाठी लागणारी फीज :
सीए कोर्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 27 हजार रुपये पासून पुढे फीज लागते. यामध्ये तुमचे रजिस्ट्रेशन फी लेख प्रसार शुल्क माहिती तंत्रज्ञान शुल्क यांचा सुद्धा समावेश असतो. तुम्हाला जर कोचिंग क्लासेस लावायचे असेल तर पन्नास हजार रुपये पासून ते दोन लाख रुपये पर्यंत खर्च लागू शकतो.
पास झाल्यानंतर तुमच्या समोर रोजगाराच्या संधी :
सीएची परीक्षा पास झाल्यानंतर तुमच्याकडे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. तुम्ही मल्टिनॅशनल कंपनीमध्ये जॉब करू शकता तसेच तुम्हाला मोठ्या पॅकेजवर हा जॉब मिळू शकतो. ऑडिटिंग आणि इंटरनल ऑडिटिंग स्पेशल ऑडिटसह चेअरमन, फायनान्स अकाउंट आणि टॅक्स डिपार्टमेंट मध्ये तुम्ही फायनान्स मॅनेजर पद मिळवू शकता तसेच सीईओ फायनान्स डायरेक्टर इत्यादी पदांवर तुम्ही काम करू शकता.
सीएचा पगार किती असतो?
तुम्ही सीए केल्यानंतर तुम्हाला चांगला पगार उपलब्ध होतो. त्यामुळे नऊ ते दहा घंटे कंपन्यांमध्ये तुम्हाला काम करावे लागते. तुमचे काम खूप जिम्मेदारीचे असते. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला 20 ते 25 हजार रुपये पासून पेमेंट लागू होते तसेच पुढे हे पेमेंट वाढत जाते. जेवढा अनुभव असेल तेवढा हे पेमेंट वाढत जाते व शेवटी एक लाख रुपये महिना सुद्धा तुम्ही कमवू शकता.
FAQ
CA चा फुल फॉर्म काय आहे?
चार्टर अकाउंटंट.
CA कोण करू शकतो?
बारावी पास कोणत्याही शाखेतील विद्यार्थी CA करू शकतो.
CA होण्यासाठी किती वेळ लागतो?
सीए होण्यासाठी तुम्हाला चार ते पाच वर्ष एवढा वेळ लागतो.
CA चा पगार किती असतो?
सीएचा पगार 50 हजार ते एक लाख रुपये पर्यंत असतो.
सीए केल्यानंतर कोणत्या रोजगार संधी उपलब्ध होतात?
ऑडिटिंग आणि इंटरनल ऑडिटिंग, स्पेशल ऑडिटसह चेअरमन, फायनान्स अकाउंट आणि टॅक्स डिपार्टमेंटमध्ये तुम्ही फायनान्स मॅनेजर पद मिळवू शकता तसेच सीईओ फायनान्स डायरेक्टर इत्यादी पदांवर तुम्ही काम करू शकता.