कोबीच्या भनोळ्यांची रेसिपी Cabbage bhanole Recipe in marathi

कोबीच्या भनोळ्यांची रेसिपी Cabbage bhanole Recipe in marathi नमस्कार शेतकरी बंधुनो आज आपण एक खमंग खुसखुशीत अशी एक रेसिपी पाहणार आहोत. चला तर मी पाहुयात कोबीच्या भनोळ्यांची रेसिपी.
खरपूस खमंग कोबीचे भानोळे

काही लोक कोबीचे भानोळे म्हणतात तर काही भानोले किंवा भानवले…  पदार्थांमधील घटक, शिजवण्याची पद्धत आणि परंपरेच्या प्रमाणे अप्रतिम चवीचा पदार्थ आहे.

हा पदार्थ अगदी गरम वाफाळता असतानाच खाल्ला तर त्याची चव खूप छान लागते.
हा पदार्थ उकडीच्या मोदका प्रमाणे स्टीम केला जातो.

 Cabbage bhanole

कोबीच्या भनोळ्यांची रेसिपी Cabbage bhanole Recipe in marathi

कोबीच्या भनोळ्यांची रेसिपी साहित्य

5 ते 6 लोकांसाठी ह्या साहित्यामध्ये हा पदार्थ बनवला जातो.

एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कोबी.

 • 2 वाट्या खवलेला ओला नारळ.
 • 2 वाट्या नारळाचे दूध
 • 3 मोठे कांदे बारीक चिरलेले
 • 2 वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर
 • 3 चमचे आलेलसूण पेस्ट
 • 3 ते 4 वाट्या तांदळाचे पीठ
 • 1 वाटी बेसन पीठ
 • 3 ते 4 मिरच्या बारीक चिरलेल्या
 • 1 चमचा लाल तिखट
 • 1 चमचा हळद
 • मीठ चवीनुसार
 • 2 ते 3 चमचे गरम मसाला
 • 2 चमचे धने पावडर
 • 2 चमचे जिरे पावडर
 • 2  ते 3 चमचे तेल
 • 1 चमचा काश्मिरी मिरची पावडर

कोबीच्या भनोळ्यांची रेसिपी कृती ( cabbage bhanole recipe steps ):

कोबी, कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून त्यात आलं लसणाची पेस्ट घालावी व खवलेला ओला नारळ, मिरचीचे बारीक तुकडे, चवीनुसार मीठ, सर्व साहीत्यातील मसाले , हळद, धणे पावडर, जिरे पावडर,
घालून मिक्स करून घ्यावे व बाजूला ठेवावे.
10 ते 15 मिनिटांनी पाणी सुटल्यावर मिश्रण ओलसर होईल व त्यात त्यांनतर
तांदळाचे पीठ, बेसन पीठ, तेल घालून मिसळावे व आपल्या अंदाजानुसार पीठांचे प्रमाण कमी जास्त करू शकता.
गरजेनुसार नारळाचे दूध घालावे व मिश्रण मळून घ्यावे.
मिश्रण खूप घट्ट आणि खूप पातळ होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
नारळाच्या दुधाऐवजी तुम्ही पाणी देखील वापरू शकता.
एक जाड बुडाचे पातेले घ्यावे. त्याच्या बुडाला केळीची पाने ठेवावे व केळीच्या पानाला हलक्या हाताने तेल लावावे.
त्यावर हे मिश्रण हलकेच थापून घ्यावे.
खूप जाड थर नका लावू नाहीतर आतून वडी कच्ची राहील.
वरून पुन्हा केळीच पान लावाव.
व हे कोबीचे भानोळे स्टीम करून घ्यावे.
तुम्ही कोबीचे भानोळे हे शॅलो फ्राय देखील करू शकता.
तुकडे पाडून गरमागरम खायला सर्व्ह करा.