केक रेसिपी मराठी Cake Recipe in Marathi language केक लहान पासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतो. वाढदिवसाच्या कार्यक्रम असो किंवा मग कोणताही कार्यक्रम असो त्याच्या शुभप्रसंगी आपण केक हा ऍड करतोच. आज-काल केकचे एवढे कॉम्पिटिशन वाढले आहे की, बेकरीमध्ये देखील वेगवेगळ्या आकाराचे व प्रकारचे केक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु बेकरी वरून केक आणून आपल्याला जर परवडत नसेल तर तुमच्या घरातील उपलब्ध असलेल्या सामग्रीमध्ये तसेच वाजवी किमतीततुम्ही केक घरी करू शकता. आम्ही तुमच्याकरिता खास घेऊन आलो आहोत घरच्या घरी केक कसा बनवायचा ही रेसिपी.
केक रेसिपी मराठी Cake Recipe in Marathi language
केकचे प्रकार :
भारतात केक आला कोठून हा प्रश्न सर्वांना पडत असेल परंतु ब्रिटिश जेव्हा भारतात आले, तेव्हा ही रेसिपी त्यांच्यासोबतच भारतात आली. सर्वप्रथम भारतात ब्रिटिशांच्या वेगवेगळ्या बेकऱ्या अस्तित्वात आल्या. त्यानंतर हळूहळू याचा प्रसार संपूर्ण भारतातील इतर कोपऱ्यापर्यंत पोहोचला. आपल्याला केकच्या वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळतात. जसे फ्रुट केक चॉकलेट केक, पायनॅपल केक, चॉकलेट क्रंच, पिलर केक, रबडी गुलाबजाम केक, रेड वेलवेट केक मोदक केक या प्रकारामध्ये तुम्हाला कॅफेमध्ये केक उपलब्ध आहेत.
केकची पूर्वतयारी करण्यासाठी लागणारा वेळ :
केकचे मिश्रण पूर्ववत तयार करावे लागते, त्याकरिता किमान 30 मिनिटे वेळ लागतो.
बेकिंग टाईम :
केकला बेक करण्यासाठी कमीत कमी 35 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
केकची पूर्वतयारी करण्यासाठी 30 मिनिटे आणि केक ला बेकिंग करण्यासाठी 35 मिनिटे एवढा वेळ लागतो म्हणजेच एकूण वेळ 65 मिनिटे लागतो.
वाढीव :
केकची रेसिपी आपण 6 व्यक्तींकरिता करणार आहोत.
केकसाठी लागणारी सामग्री :
1) चार कप मैदा
2) 250 ग्रॅम कंडेन्सर मिल्क
3) 50 gm वितळलेलं बटर
4) 125 gm पिठीसाखर
5) अर्धा चमचा बेकिंग पावडर
6) अर्धा चमचा बेकिंग सोडा
7) अर्धा चमचा व्हेनिला इसेन्स
8) एक कप पिण्याचे सोडा वाटर
पाककृती :
- पालक पनीर रेसिपी मराठी
- सर्वप्रथम ज्या भांड्यामध्ये आपल्याला केकचा डबा ठेवायचा आहे, तो गॅसवर ठेवून आठ ते दहा मिनिटे गरम करून घ्यावा. जर आपण प्रेशर कुकर मध्ये केक बेक करत असाल तर कुकर मधील रिंग आणि शिट्टी काढून घ्यावी. त्यामध्ये पाणी टाकू नये. व प्रेशर कुकर चे झाकण लावून मोठ्या आचेवर साधारण आठ ते दहा मिनिट गरम करण्यास ठेवावा.
- नंतर आपल्याला केक साठी मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. त्यामध्ये मैदा, पिठीसाखर, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे एकत्र चाळून घ्यावे. त्यामध्ये बेकिंग पावडरचे छोटे गोळे असतील तर त्याची पावडर करून घ्यावी.
- केकच्या भांड्याला आतून बटरचे कोटिंग करून घ्यावे.
- नंतर एका मध्यम आकाराच्या बाऊलमध्ये वितळलेले बटर कंडेन्स मिल्क एकत्र करावे. नंतर हँड मिक्सरने व्यवस्थित फेटून घ्यावे. हे बॅटर एकजीव झाले की, त्यात 2 कप मैदा आणि अर्धा कप सोडा वाटर घालून
पुन्हा हॅन्ड मिक्सरच्या सहाय्याने फेटून घ्यावे पिठाच्या गुठळ्या त्यामध्ये राहू देऊ नयेत. - नंतर उरलेल्या मैद्यामध्ये उरलेले सोडा वाटर व व्हेनीला इसेन्स घालून परत फेटून घ्यावे.
- हे बॅटर केवळ जेवढी गरज आहे, तेवढेच फेटून घ्यावे.
जर हे बेटर जास्त फेटलं तर केक मध्ये भागी सिंक होतो. - आता तयार झालेले बॅटर केक डब्यामध्ये ओतून घ्यावे अतिरिक्त हवेचे बुडबुडे निघून जाण्यासाठी, केक डब्या ओट्यावर हलकेच तीन ते चार वेळा ठोकून घ्यावा.
- नंतर कुकरची आच मध्यम करावे कुकर गरम झाले असेलच त्यामध्ये झाकण उघडून पकडीच्या सहाय्याने केक डबा ठेवावा.
- नंतर झाकण लावून घ्यावे व 35 ते 40 मिनिटे हा केक बेक करून घ्यावा. केक बेकिंग करत असताना 25 मिनिटे होईपर्यंत कुकरचे झाकण अजिबात उघडायचे नाही किंवा बेकिंग करत असताना मधे-मध्ये झाकण उघडल्यास कुकरच्या आतील तापमान कमी होते व पदार्थ हवा तसा बेक होत नाही.
- 25 मिनिटे पूर्ण झाल्यानंतर कुकर चे झाकण उघडून पहावे. केक आपल्याला फुललेल्या दिसेल पण आतून तो शिकलेला नसेल. तरीपण मध्यभागी टूथ पिकणे टोचून पहावे जर ओलसर बॅटर असेल तर अजून दहा ते बारा मिनिटे केक बेक होऊ द्या.
- नंतर दहा ते बारा मिनिटांनी टूथपिकने मध्यभागी टोचून पाहावे जर टूथपिकला ओलसर बॅटर लागले नसेल तर केक पूर्णपणे बेक झाला असा समजावा. केक डबा पकडीच्या सहाय्याने बाहेर काढावा.
- 5 मिनिटांनी डब्याच्या बाहेर काढून घ्यावा. नंतर थंड झाला की चाकूने कापून सर्व्ह करावा.
केक पासून मिळणारे पोषक घटक :
केकमध्ये दूध आणि अंडी याच्या व्यतिरिक्त मैदा, साखर हे देखील घटक मिसळले जातात. त्यामुळे केक मुख्य कार्बोहायड्रेटचे उत्कृष्ट स्त्रोत बनते. दुध व अंड्यातील पोषक घटक जसे की कॅल्शियम, प्रोटीन, सोडियम, फॉलिक ऍसिड, सेलेनियम इत्यादी पोषक घटक असतात. यामुळे स्नायू मजबूत होतात.
केक खाण्याचे फायदे :
केकमध्ये दूध, अंडी, मैदा व साखर इत्यादी पदार्थ घालण्यात येतात. त्यामध्ये कॅल्शियम, ग्लुकोज, कॅलरीज अशा प्रकारचे शरीरासाठी आवश्यक घटक असतात. केक खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणतेही नुकसान होत नाही.
तुम्ही केक मध्ये फळांचा देखील उपयोग करू शकता. जसे की अननस, सफरचंद, केळी, स्ट्रॉबेरी, आंबा इत्यादी हे सर्वच फळ आपल्याला अन्नपचवण्यास मदत करतात. त्यामुळे तुमची रोगप्रतिकार क्षमता देखील वाढते.
तोटे :
केकचे सेवन जास्त प्रमाणात करणे चांगले नाही कारण वजन जास्त वाढू शकते, लठ्ठपणा येऊ शकतो.