एरंडेल तेलाची संपूर्ण माहिती Castor Oil Information In Marathi

Castor Oil Information In Marathi रानावनामध्ये किंवा शेताच्या बांधावर अगदी जीर्ण वाटणारी वनस्पती म्हणून एरंडी ओळखली जाते. ही आफ्रिकन उगमाची असली, तरी देखील भारतात मोठ्या प्रमाणावर आढळून येते. या वनस्पती पासून तेल निर्माण केले जाते, जे अनेक आजारांसाठी फायदेशीर ठरते. अगदी पोट स्वच्छ करण्यापासून शरीराच्या बाह्य अवयवांना दुःखमुक्त करण्यासाठी या तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आजच्या भागामध्ये आपण या एरंडेल तेलाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

Castor Oil Fort Information In Marathi

एरंडेल तेलाची संपूर्ण माहिती Castor Oil Information In Marathi

नाव एरंड तेल
इंग्रजी नावकॅस्टर ओईल
उगमआफ्रिका
आढळस्थानभारत व आफ्रिका
शास्त्रीय नावरिसीनस कम्युनिस
वैशिष्ट्यदाहक विरोधी गुणधर्म व आणखी बॅक्टेरियल गुणधर्म
वापरसाबण बनविणे, सौंदर्यप्रसाधने, कापड, मसाज क्रीम बनविणे
ओळखपोट स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर

एरंड वनस्पतीच्या बियांपासून काढले जाणारे तेल म्हणजे एरंडेल तेल होय. अतिशय तेलकट असणारे हे तेल शरीरावर मालिश करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्याचबरोबर पोट दुखत असेल किंवा पोट साफ होण्यास प्रॉब्लेम येत असेल, तर अशावेळी देखील या तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र जास्त प्रमाणात घेतल्यास यापासून जुलाब सारख्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात.

साबण तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या तेलाचा वापर केला जात असतो. त्याचबरोबर विविध प्रकारच्या वाहनांमध्ये वापरले जाणारे तेल देखील याच एरंडेल तेलापासून तयार केले जाते. कारण अतिशय तेलकट स्वरूप या तेलाला प्राप्त झालेली असते. त्याचबरोबर बद्धकोष्टता, मान दुखी, पाठ दुखी, पोट दुखी, डोकेदुखी यांसारख्या आजारांवर देखील खूपच फायदेशीर ठरत आहे.

एरंडेल तेलाचे विविध प्रकार:

एरंडेल तेल बनवण्याच्या प्रक्रियेनुसार या तेलाचे अनेक प्रकार पडत असतात. मात्र त्यातील तीन प्रकार मुख्य समजले जातात. त्यामध्ये ऑरगॅनिक तेल, ब्लॅक तेल आणि हायड्रोजनेटेड तेल याचा समावेश होतो.

कोल्ड प्रेस ऑरगॅनिक एरंडेल तेल म्हणजे लाकडी घाण्याच्या साह्याने तयार केले जाणारे तेल होय. यामध्ये कुठल्याही प्रकारे उष्णतेचा वापर केला जात नाही. त्यामुळे यामध्ये सर्व पोषक घटक तसेच शिल्लक असतात. याचा रंग पिवळसर स्वरूपाचा असतो.

जमाईका ब्लॅक एरंडेल तेल बनवण्याकरिता सर्वप्रथम या बिया भाजून घेतल्या जातात, व कोल्ड प्रेस पद्धतीनेच याचे तेल काढले जाते. मात्र या तेलामध्ये बिया भाजल्यामुळे काळसरपणा जाणवत असतो. हा तेलाचा प्रकार गुणवैशिष्ट्यांनी ऑरगॅनिक प्रकारासारखाच असतो, मात्र त्यामध्ये काहीसा खारटपणा आढळून येतो.

या तेलाचा तिसरा प्रकार हा रासायनिक पद्धतीने तयार केलेला असतो. ज्याला हायड्रोजननेतेड तेल म्हणून देखील ओळखले जाते. हे पाण्यामध्ये विरघळू शकते, तसेच त्याला कुठल्याही प्रकारचा वास देखील येत नाही. मुख्यतः हे तेल सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरले जाते.

एरंडेल तेलातील विविध घटक:

एरंडेल तेलामध्ये असणारे घटक त्याला आरोग्यदायी बनवण्यामध्ये फायदेशीर असतात. यामध्ये मुख्यतः फॅटी ऍसिड्स चे प्रमाण जास्त असते, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणून रिसिनोलिक ऍसिड ला ओळखले जाते. यामुळे हे तेल दाहविरोधी बनण्यास मदत होते, आणि शरीरावर लावले असता वेदना व जळजळ कमी करते. या तेलामध्ये असणारे विविध घटक शरीरावर येणाऱ्या पुरळ, त्वचा कोरडी पडणे, उन्हामुळे त्वचा काळवंडणे इत्यादी आजारांमध्ये खूपच फायदेशीर ठरत असतात.

एरंडेल तेलाचे उपयोग:

एरंडेल तेलाचे त्वचेवर उपयोग केल्यामुळे त्वचा ही तजेलदार बनते. त्याचबरोबर चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करणे, त्वचेचे वृद्धत्व कमी करणे, यांसारखे फायदे देखील होतात. या तेलामध्ये असलेले विविध घटक कोलेजन आणि इलास्टीन यासारख्या त्वचेतील घटकांच्या निर्मितीस चालना देते. ज्यामुळे त्वचा अधिकध तजेलदार आणि गुळगुळीत होण्यास मदत होते.

अनेक लोकांना मुरुम किंवा फुटकुळ्या यांची समस्या जाणवत असते. अशा लोकांसाठी देखील एरंडेल लावल्यास त्वचेवरील छिद्र बंद करण्यास मदत होते. परिणामी या छिद्रांमध्ये कुठलीही घाण जात नाही ,आणि मुरूम फुटकळ्या येण्याचे प्रमाण कमी होते.

एरंडेल तेल हे अतिशय तेलकट स्वरूपाचे असते. त्यामध्ये रिसिनोलिक आम्ल देखील आढळून येते. जे एक स्निग्ध प्रकारचे असून, त्वचेला मॉइश्चरायझर म्हणून उपयुक्त ठरत असते. यामुळे त्वचा अतिशय मऊ आणि तेलकट होण्यास मदत मिळत असते.

त्वचेवर मुरूम किंवा फुटकुळ्यामुळे आलेले डाग कमी करण्यामध्ये देखील एरंडेल तेल अतिशय फायदेशीर असून, पोटावरील किंवा शरीराच्या इतर भागावरील स्ट्रेच मार्क, गरोदरपणा नंतर पोटाला आलेला  बेढबपणा दूर करण्याकरिता या तेलाचा वापर केला जातो. यासाठी ज्या ठिकाणी असे स्ट्रेच मार्क्स किंवा डाग असतील तेथे या तेलाने १५ २० मिनिटे मालिश करण्याचा सल्ला दिला जातो.

केसांच्या आरोग्यामध्ये देखील एरंडेल तेल खूपच फायदेशीर ठरते.

एरंडेल तेलाचे तोटे:

  • हे तेल अति प्रमाणात वापरल्यास हगवण लागू शकते.
  • गर्भवती महिलांनी याचे सेवन केल्यास गर्भपात होऊ शकतो, किंवा वेळे आधीच बाळाचा जन्म देखील होऊ शकतो.
  • ज्या लोकांना या तेलाची एलर्जी असेल अशा लोकांना खाज देखील येऊ शकते.
  • या तेलाच्या वासाने काही लोकांना चक्कर येणे, मळमळ होणे, किंवा उलट्या यासारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते.

निष्कर्ष:

आपल्या आयुर्वेदामध्ये अनेक गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. ज्यामध्ये जवळपास निसर्गात आढळणाऱ्या सर्वच वनस्पती बद्दल काही ना काही तरी औषधी गुणधर्म हे आढळून येत असतात. त्याला एरंड ही वनस्पती तरी कशी अपवाद ठरेल?. या वनस्पती पासून मोठ्या प्रमाणावर तेल बनवले जाते.

कुठेही लावली जात नसली तरी देखील भारतीय जमिनीवर शेताच्या कोपऱ्यामध्ये किंवा इतर पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर या एरंडी वनस्पतीचे अस्तित्व आढळून येत असते. अतिशय उग्र दर्प येणारी एरंडी होळीच्या दिवशी देखील धार्मिकदृष्ट्या फार महत्त्वाची समजली जाते.

आजच्या भागामध्ये आपण या एरंडी पासून बनवण्यात येणाऱ्या तेलाबद्दल अर्थात एरंडेल तेलाबद्दल माहिती बघितली आहे. त्यामध्ये तुम्हाला एरंडेल तेल म्हणजे काय, त्याचे कोणकोणते प्रकार पडत असतात, त्याचबरोबर या तेलाच्या वापराने होणारे विविध फायदे, शरीराच्या अंतर्गत व बाह्य अशा दोन्ही प्रकारसाठी उपयुक्त असणारे तेल, या तेलाच्या अतिवापराने होणारे तोटे, लहान मुलांना एरंडेल वापरासाठी देताना घ्यावयाची काळजी, इत्यादी गोष्टी बघितल्या आहेत. तसेच नेहमी विचारले जाणारे प्रश्न बघितल्यामुळे एरंड वनस्पती बद्दल तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व शंकाही दूर झाल्या असतील अशी आशा आहे.

FAQ

एरंडेल तेल ज्या वनस्पती पासून बनवले जाते, त्या एरंड वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे?

एरंडेल तेल ज्या वनस्पती पासून बनवले जाते, त्या वनस्पतीचे शास्त्रीय नाव रिसीनस कम्युनिस असे आहे.

एरंडेल तेलाला इंग्रजी मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

एरंडेल तेलाला इंग्रजी मध्ये कॅस्टर ओईल या नावाने ओळखले जाते.

एरंडीला तेलाचा वापर  कोण कोणत्या ठिकाणी केला जातो?

एरंडेल हे तेल अनेक ठिकाणी वापरले जाते, ज्यामध्ये सौंदर्यप्रसाधने तयार करणे, शरीरासाठी वंगण म्हणून वापरणे, पाठदुखी, पोटदुखी, पोट साफ न होणे, डोकेदुखी इत्यादी समस्यांवर औषध म्हणून वापरणे, इत्यादी वापर आहेत.

पोटातून अति प्रमाणात एरंडेल तेल सेवन केले असता कोणता परिणाम दिसून येतो?

पोटातून अतिप्रमाणात एरंडेल तेल सेवन केले असता व्यक्तीला अमांश किंवा अतिसार यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्याचबरोबर मळमळ होणे, पोटदुखी, उलट्या इत्यादी लक्षणे देखील दिसू शकतात.

एरंडेल तेल न वापरण्याचा सल्ला कोणाला दिला जातो?

गर्भवती महिलांना एरंडेल तेल वापरू नये असा सल्ला दिला जातो. मात्र स्तनदा माता डॉक्टरांच्या सल्ल्याने हे तेल काही प्रमाणात वापरू शकतात.

Leave a Comment