चना मसाला रेसिपी | chana masala recipe in marathi

चना मसाला रेसिपी | chana masala recipe in marathi

नमस्कार खवय्ये बंधुनो आज आपण एकदम साधी सोपी रेसिपी म्हणजे चना मसाला ची रेसिपी (chana masala recipe in marathi ) पाहणार आहोत.ही एकदम साधी सोपी रेसिपी आहे.ही आपण रोजच्या डब्याला देखील बनवू शकतो सगळे मोठे लहान ही भाजी आवडीने खातात.

चना मसाला रेसिपी साहित्य ( chana masala recipe ingredients in marathi ):

एक वाटी चना
2 वाटी पाणी
3 ते 4 तमालपत्र
एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
3 ते 4 चमचे तेल
अर्धा चमचा जिरे
कढीपत्ता
2 वाटी बारीक चिरलेला कांदा
एक मोठा चमचा आले लसूण पेस्ट
एकं चमचा गोडा मसाला
एक चमचा लाल तिखट
मीठ चवीनुसार
गारनिशिंग साठी कोथिंबीर बारीक चिरून

चना मसाला रेसिपी कृती ( chana masala recipe steps in marathi ):

एक वाटी चना हा भाजी करण्याच्या आधल्या रात्री भिजवून ठेवावा. भिजू घालताना गरम पाणी वापरले तरी चालेल.
भाजी बनवायच्या आधी हा भिजवलेला चना चांगला धुवून घ्यावा व कुकर मध्ये शिजायला घालवा. शिजवताना त्यात थोडे मीठ घालावे.

चना शिजवताना त्यात तमालपत्र, टोमॅटो,मीठ व हळद घालावे. चना शिजण्यासाठी 7 ते 8 शिट्या काढाव्यात.
कुकर गार होईसपर्यंत भाजीसाठी फोडणी देऊन घ्या.

बासुंदी ची रेसिपी | basundi recipe in marathi येथे वाचा

एका कढईत तेल गरम करून घ्यावे.व त्यात जिरे घालावे जिरे चांगले तडतडले की त्यात कढीपत्ता घालावं,चांगली फोडणी बसली की त्यात 2 वाटी कांदा घालावा.कांदा चांगला लालसर होईसपर्यंत परतून घ्यावा ,कांदा लाल झाला की त्यात गोडा मसाला,आलं लसूण पेस्ट,लाल तिखट, घालून चांगले परतून घ्यावे.

तुम्हाला जर गोडा मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा घरगुती मसाला देखील वापरू शकता. मसाल्याला चांगले तेल सुट्सपर्यंत परतून घ्यावे.त्यांनतर त्यात उकडलेला चना घालावा व चांगलं मीठ घालून परतून घ्यावे.

आवडीनुसार तुम्हला भाजी कितपत घट्ट हवी त्यावर त्यावर पाणी टाकून एक उकळी काढून घ्या.
भाजी हवी तितकी घट्ट झाली की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व पोळी, भात किंवा नान सोबत सर्व्ह करावी.

Leave a Comment