Chandrapur Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण चंद्रपूर जिल्ह्याची सखोल माहिती पाहणार आहोत .चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात मोडणारा जिल्हा असून ,चंद्रपूरला आधी “चांदा” या नावाने ओळखलं जात होतं.
चंद्रपूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Chandrapur Information In Marathi
पूर्वी चंद्रपूर ही गोंड राजाची राजधानी होती व नंतर सतराव्या शतकापासून नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर जिल्हा ताब्यात घेतला व इसवी सन 1981 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातून नवा गडचिरोली जिल्हा निर्माण करण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या कोळशाच्या खाणी आहेत यातून प्रचंड प्रमाणात कोळसा निर्मिती आणि उत्खनन केले जाते, म्हणूनच चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी असेदेखील संबोधण्यात येते. कोळश्या बरोबरच इथे प्रचंड प्रमाणात चुना देखील सापडतो म्हणून चंद्रपूर जिल्हा हा खनिज संपत्तीच्या दृष्टीने समृद्ध समजले जातो.
चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर सीमेबाबत विचार करता नागपूर भंडारा आणि वर्धा या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. तर पश्चिमेकडून यवतमाळ पूर्वेकडून गडचिरोली आणि दक्षिणेकडून आंध्र प्रदेश अर्थातच अदिलाबाद हा जिल्हा आहे. भौगोलिक दृष्ट्या विचार करता वर्धा आणि वैनगंगा या दोन नदीपात्राच्या दरम्यान चंद्रपूर स्थानापन्न आहे या दोन नद्या चंद्रपूर जिल्ह्याच्या पश्चिम आणि पूर्व सीमा ठरवितात.
हवामानाचा विचार करता चंद्रपूर उष्णकटिबंधीय क्षेत्रात मोडते व या ठिकाणी विषम प्रकारचे हवामान बघावयास मिळते विषम प्रकारचे हवामान म्हणजे हिवाळा अधिकच थंड तर उन्हाळा अधिकच खडक. येथे किमान तापमान 7.1 डिग्री सेंटीग्रेड तर कमाल तापमान 47.2 डिग्री सेंटीग्रेड इतके नोंदविले जाते. पावसाच्या दृष्टीनेदेखील हा जिल्हा बराचसा सदन मानण्यास हरकत नाही .
हवामानाचा विचार करता चंद्रपूर उष्णकटिबंधीय क्षेत्रात मोडते व या ठिकाणी विषम प्रकारचे हवामान बघावयास मिळते विषम प्रकारचे हवामान म्हणजे हिवाळा अधिकच थंड तर उन्हाळा अधिकच खडक. येथे किमान तापमान 7.1 डिग्री सेंटीग्रेड तर कमाल तापमान 47.2 डिग्री सेंटीग्रेड इतके नोंदविले जाते. पावसाच्या दृष्टीनेदेखील हा जिल्हा बराचसा सदन मानण्यास हरकत नाही .
इथे वार्षिक पर्जन्यमान सुमारे त1398 मिलिमीटर इतके असते .येथे उन्हाळा पावसाळा व हिवाळा हे तिन्ही ऋतू बघावयास मिळतात .उन्हाळा कालावधीने मोठा व कडक तर त्या मानाने हिवाळा कालावधीने छोटा मात्र सौम्य असतो .या ठिकाणी हवामानानुसार खरिपात तांदूळ हे पीक मुख्यत्वे घेतले जाते. त्याचबरोबर कापूस ,गहू, सोयाबीन, तूर ,मुग, मिरची, आणि उडीद ही पिके देखील मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.
हैदराबाद राज्यातील आदिलाबाद जिल्ह्याचा एक भाग असलेल्या राजुरा तहसीलची नांदेड जिल्ह्यात बदली झाली आणि त्यानंतर १९५९ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा बदली झाली.
त्यानंतर मे १९६० मध्ये चंद्रपूर जिल्हा निर्मिती झाल्यापासून हा जिल्हा महाराष्ट्राचा भाग झाला. प्रशासकीय ओझे कमी करण्यासाठी १९८१ मध्ये जिल्हा पुन्हा चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये विभागला गेला.
चंद्रपूर जिल्ह्यात आता चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, मूल, गोंडपिपरी, पोंभुर्णा, सावली, राजुरा, कोरपना, जिवती आणि बल्हारपूर तहसील आहेत.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्हा 10490 चौरस किलोमीटर इतका विस्तीर्ण असून, इथे प्रामुख्याने मराठी भाषा बोलणारे लोक राहतात. मराठीबरोबरच कोलामी, गोंडी ,आणि हिंदी या भाषा बोलणारे लोक देखील बरेच आहेत. इथे सुमारे 20 लाख 71 हजार 101 लोक राहतात.
आपण वर बघितल्या प्रमाणेच चंद्रपूर खनिज संपत्तीने समृद्ध असा जिल्हा आहे. त्यामुळे येथील उद्योग धंदे देखील खनिजसंपत्ती वरच आधारलेले आहेत.
इथे कोळसा खाणी, अल्ट्राटेक ,अंबुजा, माणिकगड आणि एसीसी इत्यादी सिमेंट कंपन्यांचे कारखाने देखील आहेत.
तसेच या जिल्ह्यात बल्लारशहा कागद निर्मिती उद्योग देखील आहे. महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळंबाबत बोलायचे झाल्यास इथे बाबा आमटे यांनी सुरू केलेला आनंदवन हा आश्रम आणि महाराष्ट्राचे वैभव असणारा ताडोबा व्याघ्र प्रकल्प देखील आहे. पर्यटनाच्या दृष्टीने देखील या जिल्ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.
इथे सर्वपरिचित जुनोना आणि रामाळा ही दोन तलावे पर्यटकांचे आकर्षण ठरतात .येथे घोडाझरी प्रकल्प ,श्री महाकाली माता मंदिर चंद्रपूर ,नागभीड येथील सात बहिणी तपोवन, चिमूरचे रामदेगी ,ब्रह्मपुरी येथील अड्याळ टेकडी, सावलीतील आसोला मेंढा तलाव, अंधारी येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, आणि राष्ट्रीय उद्यान प्रकल्प आहेत.
भद्रावती येथील लेणी व गवराळा गणपती हे चंद्रपूरचे पर्यटनाच्या दृष्टीचे महत्त्वाची आकर्षण केंद्रे आहेत.
हा जिल्हा विस्ताराने देखील मोठा आहे. यामध्ये भद्रावती, वरोरा, चिमूर, चंद्रपूर, शिंदेवाही, ब्रह्मपुरी, मुल, नागभीड, राजुरा, गोंडपिंपरी, सावली, कोरपना, पोंभुर्णा, बल्लारपूर, आणि जिवती इत्यादी 15 तालुके आहेत.
चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक दृष्ट्या देखील फार महत्त्व आहे. त्याचबरोबर चंद्रपूर कोळशाच्या प्रचंड मोठमोठ्या खाणी आणि सुपर थर्मल पावर स्टेशन यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे सिमेंट निर्मिती साठी लागणारा कच्चामाल म्हणजे चुनखडी मोठ्या प्रमाणात सापडते.
येथील ताडोबा नेशनल पार्क बद्दल अधिक माहिती घ्यायची झाल्यास महाराष्ट्रासह अखिल भारताचे वैभव असणाऱ्या वाघ या प्राण्यासाठी ताडोबा नेशनल पार्क हे प्रसिद्ध आहे. या पार्कला भेट देण्यासाठी लांबलांबून अनेक पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. वाघांना अगदी काही मीटरच्या अंतरावरून बघणे हा एक वेगळाच अनुभव असतो.
नुकतेच वाघांची जनगणना करण्यात आली, त्यानुसार आज मितीस ताडोबा येथील व्याघ्र प्रकल्पात तब्बल 88 इतके वाघ आहेत. तसेच उघड्या जीपमधून अर्थातच जिप्सी मधून वाघाचे दर्शन करण्याची सोय असणारा हा व्याघ्र प्रकल्प सातही दिवस पर्यटकांसाठी खुला असतो. हा व्याघ्र प्रकल्प अतिशय विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेला असून, याचे क्षेत्रफळ सुमारे 623 चौरस किलोमीटर इतकी आहे.
चंद्रपूरच्या जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणापासून हे ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प केवळ 45 किलोमीटर अंतरावरच आहे. येथील प्रमुख आकर्षण वाघ असला तरीदेखील, विशिष्ट प्रकारात लावण्यात आलेले बांबूचे झाड पर्यटकांचे मन वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. याचबरोबर चंद्रपूर चितळ, मगर, नीलगाय, हरीण, वाघ, चित्ता, अस्वल, आणि कोल्हा याबरोबरच अनेक नानाविध पक्षी यांचे माहेरघर समजले जाते.
नोव्हेंबर पासून जूनपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात भेट देण्याकरिता उत्तम कालावधी समजला जातो. दूरवरून आलेल्या पर्यटकांसाठी व्याघ्र प्रकल्पात रेस्ट हाऊस अर्थातच निवासालय बांधलेले आहे. नागपुरातून ताडोबा अभयारण्य भेट देण्याकरिता वाहतुकीचे जवळपास सर्वच पर्याय उपलब्ध आहेत.
या ठिकाणचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील श्री महाकाली मंदिर. हे पुरातन काळापासून अस्तित्वात असणारे मंदिर भक्तांमध्ये फारच प्रसिद्ध आहे.
या ठिकाणी मंगळवारच्या दिवशी फार गर्दी असते. येथे लाखो भाविक चैत्र महिन्यातल्या पौर्णिमेस जमुन यात्रा साजरी करतात. यादरम्यान दर्शन करण्याकरिता भक्तगणांच्या लांबच लांब रांगा बघावयास मिळतात. या मंदिराला चंद्रपूर शहराचे धार्मिक प्रतीक मानले जाते.
देवीच्या मंदिराबरोबरच या मंदिर परिसरात भगवान हनुमंत, शनिदेव आणि आराध्याची दैवता श्री गणेश यांचेदेखील मंदिर आहेत. आठ खिडक्यांचे आणि चार दरवाजे असणारे हे मंदिर तब्बल पन्नास फूट उंच आहे. येथे भक्तणांसाठी प्रसादालय आणि निवासालय याची देखील सोय आहे.
मंदिराचे सुशोभीकरण करण्यासाठी येथे कुठलीही कमी ठेवण्यात आलेली नाही. मंदिराच्या बाहेरील भागात हत्ती आणि वाघासह इतरही प्राण्यांची शिल्पे मंदिराचे सौंदर्य अजूनच वाढवतात. या मंदिराबाबत मनोरंजक अशी एक आख्यायिका सांगितली जाते.
देवांचे देव महादेव यांच्या सोबत भांडण झाल्यानंतर, देवी चंद्रपूर येथील गुफा मध्ये येऊन झोपल्याचे येथील स्थानिक आणि जाणकार लोक सांगतात. म्हणूनच की काय येथील देवी मातेची मूर्ती निद्रावस्था मध्ये आहे. येथे देवीच्या एकूण तीन मुर्त्या आहेत, मात्र त्यातील एकच मूर्ती निद्रावस्थेत आहे.
चंद्रपूरला बाबत काही तथ्य सांगावयाचे झाल्यास,चंद्रपूर या शहराचे पूर्वीचे नाव चंदा होते मात्र सन 1964 साली याचे नाव चंद्रपूर असे करण्यात आलेले आहे.या शहराची जीवनदायिनी असणारी वर्धा नदी येथून वाहते.याला खनिजसंपत्ती ची विपुल प्रमाणात संपत्ती लाभलेली असून त्यामुळेच तिथे सुपर थर्मल पावर प्लांट आणि खाणी आहेत. कोळसा खाणीमुळेच हे शहर ब्लॅक गोल्ड म्हणून देखील ओळखले जाते.
इथे साक्षरता मात्र कमी आहे साक्षरतेचे टक्केवारी 59.5% इतकी कमी आहे.या शहरातून ६,९,२३३, आणि २४३ हे चार महामार्ग जातात.इथे स्त्री आणि पुरुष यांचे प्रमाण 1000:961 इतके आहे.ताडोबा येथील नॅशनल पार्क चंद्रपूरच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे, कारण यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पर्यटकांचा ओढा मोठा असतो, आणि त्याच मुळे पर्यटनावर आधारित उद्योग अनेक लोकांचे उपजीविकेचे साधन बनलेले आहेत.
धन्यवाद!!