छत्रपती शाहू महाराज यांची संपूर्ण माहिती Chhatrapati Shahu Maharaj Information In Marathi

Chhatrapati Shahu Maharaj Information In Marathi राजर्षी शाहू महाराज हे एक समाज सुधारक लोकहितवादी असे राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीमध्ये त्यांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. त्यांनी मागासवर्गीय जातीतील मुलांना प्राथमिक शिक्षण घेण्यास प्राधान्य दिले. जाती धर्माची त्यांनी परवाना करता सर्वांनाच प्राथमिक शिक्षण घेणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. ब्रिटिश राज सत्तेच्या काळामध्ये त्यांनी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी नेहमी प्रयत्न केले.

Chhatrapati Shahu Maharaj Information In Marathi

छत्रपती शाहू महाराज यांची संपूर्ण माहिती Chhatrapati Shahu Maharaj Information In Marathi

त्यांनी सामाजिक परिवर्तन केले आणि सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमता त्यांनी दलित व मागासवर्गीय समाजाच्या लोकांचा विकास करण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली महाराजांना राजर्षीही पदवी त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांच्या शस्त्र गुरुने दिली होती. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वारसा लाभला आहे. त्यामध्ये शाहू, फुले आणि आंबेडकर असे नाव आहेत.

शाहू महाराजांचा जन्म आणि बालपण :

शाहू महाराजांचा जन्म हा 26 जून 874 रोजी कागल येथील घाडगे या कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव हे यशवंत होते, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव त्यांना अप्पासाहेब म्हणून ओळखत असल तर त्यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते. हे कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व त्यांचे नाव शाहू असे ठेवले. त्यांनी चार वर्षात धारवाड येथे शैक्षणिक विकास झाला त्याचबरोबर त्यांनी शारीरिक विकास सुद्धा करून घेतला.

वैयक्तिक जीवन. :

शिक्षण चालू असतानाच त्यांनी 1 एप्रिल 1891 रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई मुलीशी त्यांचा विवाह झाला, त्यावेळी त्यांचे वय केवळ 17 वर्ष एवढे होते. लक्ष्मीबाईचे वय बारा वर्षाहून कमी होते. त्या काळात बालविवाह करण्याची प्रथा रूढ होती. 2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा राज्य रोहन समारंभ झाला व राज्याभिषेक झाल्यानंतर 1922 सालापर्यंत ते 28 वर्षाचे होते तेव्हा कोल्हापूर संस्थांचे राजे झाले. या दोघांना दोन मुलं आणि दोन मुली झाल्या.

जन्म26 जून 1874 रोजी.
पूर्ण नावछत्रपती शाहू महाराज भोसले
राज्याभिषेक2 एप्रिल 1894 रोजी.
राजधानीकोल्हापूर

शाहू महाराजांचा इतिहास :

छत्रपती शाहू महाराजांनी 1894 यासाठी त्यांचा अभिषेक झाल्यानंतर 1922 सालापर्यंत म्हणजेच 28 वर्ष कोल्हापूर वर राज्य केले. या काळामध्ये त्यांनी कोल्हापूरमध्ये भरपूर सुधारणा केल्यात. महाराजांनी दलित आणि मागासवर्गीयासाठी अतिशय मोलाचे कार्य केले. त्यामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना महत्त्व देणे खूप गरजेचे आहे. त्यांनी सुशिक्षित विद्यार्थ्यांना योग्य रोजगार सुद्धा मिळवून दिला तसेच तसेच राजाराम कॉलेज सुद्धा शाहू महाराजांनी बांधले.

लोकांना शिक्षण मिळवून देणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यांनी विषयातील शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक शैक्षणिक कार्य सुद्धा सुरू केले, त्यामध्ये शिंपी, चांभार, पांचल तसेच ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मासाठी सुद्धा वेगवेगळे वस्तीगृह स्थापन केले आणि त्यांना समाजातील संघटित घटकांसाठी मिक्स क्लार्क बोर्डिंग स्कूलची सुद्धा स्थापना केली. शाहू महाराजांनी बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा करण्यावर विशेष भर दिला.

त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले तसेच त्यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा यांची आज्ञा दिली. तसेच अस्पृश्यता नष्ट व्हावी. या दृष्टीने सुद्धा त्यांनी अस्पृश्यांच्या वेगळा शाळा भरवण्याची पद्धत बंद केली व गावच्या पाटलांनी कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणारी तंत्रे कौशल्य शिकवणाऱ्या शाळा अशा प्रकारचे उपक्रम त्यांनी राबवले.

जातीभेद नष्ट व्हावा याकरता दिलेला लढा :

राजर्षी शाहू महाराजांनी 28 वर्ष कोल्हापूरमध्ये राजकारभार पाहिला. त्यांनी आपल्या राज्यांमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत तर केले तसेच स्त्री शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले तसेच त्यांनी आंतरजातीय विवाहंचा पुरस्कार केला. यासंबंधी कायदा आणला आणि आपल्या कृतीतूनच त्यांनी संदेश दिला.

आपल्या चुलत बहिणीचा विवाह त्यांनी आंतरजातीय विवाह केला तसेच अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांच्या दृष्टीने अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवणे चुकीचे होईल म्हणून त्यांनी वेगळ्या शाळा भरवणे बंद केल्या.अस्पृश्य लोकांना रोजगार मिळावा तसेच त्यांना रोजगाराची नवीन संधी त्यांनी दिली.

छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक कार्य :

राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराज यांना आधीच माहित होते की, बहुजन समाज जोपर्यंत सुशिक्षित होत नाही. तोपर्यंत त्यांचा उद्धार होणार नाही, त्यामुळे त्यांच्या मागासलेपणाचे एक महत्त्वाचे कारण त्यांच्या शिक्षणाचा अभाव आहे, हे ओळखून त्यांनी बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचे ठरवले. त्यांनी मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग स्कूलची स्थापना केली.

त्यांनी कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह ची स्थापना केली. त्यांनी 1907 मध्ये कोल्हापूरच्या पश्चिम दिशेला 55 किलोमीटर अंतरावर दाजीपूर जवळ भोगावती नदीला बांधारा घालून जमिनीला पाणीपुरवठा करण्यासाठी योजना आखली तसेच ती योजना 1908 मध्ये अमलात आली व त्या बांधाला महाराणी लक्ष्मीबाई तलाव असे नाव दिले. शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी 1913 मध्ये खेड्यांमध्ये चावडी धर्मशाळा, मंदिरे बांधले या इमारतींमधून शाळेला सुरुवात केली.

1917 या साली त्यांनी पुनर्विवाह कायदा अमलात आणला तसेच 1918 मध्ये आपल्या संस्थानातील महार जातीच्या लोकांना जमीन नावावर करून रयतवारीने करून दिल्यात. अस्पृश्यांकडून वेठबिगारी पद्धतीने त्यांनी कामे करून घेण्यास कायद्याने बंद केले. आपल्या राज्यांमधून अस्पृश्यता निघून जावी, यासाठी महाराजांनी स्वतः लक्ष घातले.

अस्पृश्यांना शाळा, दवाखाने, पानवठे, सार्वजनिक विहिरी व समानतेने वागणूक देण्यासाठी आदेश काढले. त्यांनी कोल्हापूर संस्थानांमध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद भरवली तसेच त्यांनी घटस्फोटाचा कायदा सुद्धा केला.

छत्रपती शाहू महाराजांचा मृत्यू :

छत्रपती शाहू महाराज एक महान समाज सुधारक राजा होते. त्यांचे निधन यांचा मृत्यू 6 मे 1922 रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा मुलगा तिसरा राजाराम यांनी कोल्हापूरचा महाराजा म्हणून कोल्हापूरवर राज्य केले. परंतु छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेल्या सुधारणांना हळूहळू पुढे नेण्यासाठी संघर्षात्मक सामना करावा लागला.

राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा उपयोग हा रंजल्या गांजल्या करिता केला. त्यांनी शिक्षण क्षेत्र, सामाजिक क्षेत्र तसेच रस्ते, पाणी, वाहतूक, शेती, व्यापार, कला यांचा सुद्धा विकास केला. त्यांनी निस्वार्थपणे राज्य कारभार पाहला. छत्रपती

शाहू महाराजांना मिळालेले सन्मान :

शाहू महाराजांचा जन्मदिवस म्हणजे 26 जून हा महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळला जातो. त्या दिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात. कोल्हापूरच्या राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट तर्फे राजश्री पुरस्कार व रोख एक लाख रुपये आणि सन्मान चिन्ह या स्वरूपामध्ये दिला जातो.

  • छत्रपती शाहू महाराज टर्मिनस.
  • छत्रपती शाहू छत्रपती स्पिनिंग अँड मिल.
  • शाहू फुले आंबेडकर पुरस्कार दिला जातो.

FAQ

शाहू महाराज यांची मूळ नाव काय होते?

यशवंतराव.

राजर्षी शाहू महाराज कोण होते?

राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर राज्याचे राज्यकर्ते राजे होते.

राजर्षी शाहू महाराजांच्या आईचे नाव काय होते?

राधाबाई ही त्यांची जन्मदाती आई होती. आनंदीबाई दत्तक माता होत्या.

शाहू महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला

2 एप्रिल 1894 रोजी.

शाहू महाराजांचा जन्म कधी झाला?

26 जून 1874 रोजी.

Leave a Comment