चिवडा रेसिपी मराठी Chivda Recipe In Marathi

चिवडा रेसिपी मराठी Chivda Recipe In Marathi  चिवडा हा एक स्वादिष्ट आणि मसालेदार पदार्थ आहे, जो सर्वाना आवडतो.  भारतात अनेक ठिकाणी चिवडा वेग वेगळ्या प्रकारे बनवला जातो.  चिवडा हा पोहे पासून बनवला जातो.  तसेच आपल्या घरी आपण दिवाळी किंवा एखाद्या सणाला चिवड्याचा आनंद घेतो.  चिवडा आपण नाष्टा म्हणून वापरतो.  चीवड्याचे दोन प्रकार आहेत.  एक भाजलेला चिवडा आणि दुसरा तळलेला चिवडा या दोन्ही प्रकारचा चिवडा अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे.  हॉटेल किंवा बेकरीमध्ये आपण पाहिले असेल अतिशय मसालेदार आणि स्वादिष्ट चिवडा मिळतो.  काही लोकांना चिवडा खूप आवडतो.  पण ते बाहेर जाऊ शकत नाही, आणि काही लोकांना रेसिपी माहीत नाही.  अशा लोकांसाठी आज आम्ही एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने हॉटेल सारखा चिवडा कसा बनवावा याची रेसिपी घेऊन आलो आहे.  तर आपण आता चिवडा रेसिपी पाहणार आहोत.

 Chivda Recipe

चिवडा रेसिपी मराठी Chivda Recipe In Marathi

चिवड्याचे प्रकार :

चिवडा हा एक चमचमीत पदार्थ आहे.  भारतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे चिवडा बनवला जातो.  यामध्ये भाजलेला पोहे चिवडा, तळलेला चिवडा, तिखट चिवडा, गोड चिवडा, मसाले चिवडा, शेव चिवडा, शेंगदाणे चिवडा असे अनेक प्रकार चिवड्यामध्ये आपल्याला खायला मिळतात.  हे सर्व प्रकार अतिशय स्वादिष्ट आणि लोकप्रिय आहेत.

चिवड्याच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :

चिवडा तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते.  नंतर आपण लवकर चिवडा बनवू शकतो, यासाठी आपल्याला 30 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

चिवडा कुकिंग करण्यासाठी आपल्याला 1 तास वेळ लागतो.

टोटल टाईम :

चिवडा बनवण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते.  आणि नंतर कुकिंग करावे लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 1 तास 30 मिनिट वेळ लागतो.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?

चिवडा हा नाष्टा म्हणून वापरतात.  चिवडा ही रेसिपी आपण 10 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

चिवड्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहेत :

1) 1 किलो जाड पोहे किंवा दगडी पोहे.

2) 100 ग्रॅम चना डाळ. (भाजलेली)

3) 100 ग्रॅम शेंगदाणे.

4) 100 ग्रॅम खोबरे डौल.

5) 10 ते 12 हिरवी मिरची.

6) थोडा कडीपत्ता व कोथिंबीर.

7) 100 ग्रॅम काजू.

8) 3 चम्मच धनीया पावडर.

9) 2 चम्मच जीरा पावडर.

10) चवीनुसार मीठ.

11) हळद.

12) तेल.

13) थोडी साखर.

14) एक चिमूट आमचूर.

पाककृती :

  • सर्वप्रथम पोहे थोडा वेळ उन्हात वाळू घाला, आणि नंतर त्याचा उपयोग करा.
  • नंतर खोबऱ्याचे लांब बारीक तुकडे करून घ्या.  कोथिंबीर आणि मिरचीचे बारीक तुकडे कापून घ्या.
  • आता एक खोल तळाचा पॅन किंवा कढई घ्या, आणि गॅस चालू करून गॅस वरती ठेवा.
  • गॅस मध्यम आसेवरती ठेवा, आणि थोडे तेल टाकून, पोहे थोडे थोडे करून भाजून घ्यावे.
  • पोहे हलक्या हाताने ढवळत रहा, हलक्या हाताने हलवा म्हणजे पोहे सारखे भाजले जातील, आणि चमच्याने ढवळू नये.
  • 4 ते 5 मिनिट नंतर पोहे कुरकुरीत होतील.  तेव्हा आपले पोहे झाले असे समजावे, व मध्यम गॅस ठेवा.
  • अशा प्रकारे सर्व पोहे व्यवस्थित भाजून घ्या, आणि एका कागदावरती काढा म्हणजे शिल्लक तेल निघून जाईल.
  • आता पॅनमध्ये थोडे तेल टाकून गरम करा.  आणि शेंगदाणे, डाळ, आणि खोबरे तळून घेऊया.
  • नंतर गरम तेलात शेंगदाणे टाकून भाजून घ्या, शेंगदाणे थोडे लालसर झाले की काढून घ्या.
  • नंतर काजू आणि खोबऱ्याचे तुकडे तेलातून टाकून घ्या, आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
  • भाजलेली चणाडाळ काही सेकंद कुरकुरीत होईपर्यत तेलात तळा आणि बाजूला काढून ठेवा.
  • हे सर्व झालं की पॅनमध्ये 4 चम्मच तेल टाका.  आता आपण मसला तयार करूया, तेल गरम करा.
  • नंतर यामध्ये थोडा कडीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाका, मिरच्या आणि कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यत परतत राहावे, तसेच तो मंद आचेवर परतावा.
  • नंतर यामध्ये 2 चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ व एक चम्मच साखर टाका, आणि व्यवस्थित मिश्रण करून घ्या.
  • नंतर भाजलेले पोहे मसाल्यात टाका, आणि सोबतच तळलेले साहित्य शेंगदाणे, काजू आणि चणाडाळ, आणि एक चिमूट आमचूर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • नंतर गॅस बंद करा आणि गरम पॅन खाली काढा.  चिवडा आणखी 1 ते 2 मिनिटे गरम कढईच राहू द्या.
  • 2 मिनिटानंतर आपला स्वादिष्ट आणि मसालेदार चिवडा तयार आहे.

चिवड्यात असणारे घटक :

चिवडा हा एक स्वादिष्ट पदार्थ आहे.  चिवडा बनवण्यासाठी आपण जे साहित्य वापरतो.  जसे काजू, शेंगदाणे, खोबरे, पोहे यामध्ये विविध घटक असतात.  यामध्ये फॅट, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, व्हिटॅमिन ए, प्रोटीन यासारखे घटक आहेत, जे मानवी शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

फायदे :

चिवड्यामध्ये असणारे पोषक घटक कॅल्शियम, ते आपले शरीरासाठी खूप फायद्याचे आहे, त्याने आपले हाड मजबूत राहतात.

यामध्ये असणारे व्हिटॅमिन, प्रथिने आणि प्रोटीन आपल्याला थकवा किंवा अशक्तपणा देत नाही.  म्हणून हे घटक खूप फायद्याचे आहेत.

चिवडा हा पदार्थ तेलापासून बनलेला असतो.  म्हणून यामध्ये फॅट जास्त प्रमाणात असते, आपल्या शरीरावर चरबी वाढण्यासाठी हे मदत करते.

तोटे :

चिवडा हा मसालेदार पदार्थ आहे.  हा आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर आपल्याला जळ-जळ आणि पोटदुखी होऊ शकते.

चिवड्याच्या तेलकट पणामुळे आपल्याला उलटी किंवा मळ मळ होऊ शकते आणि आपण आजारी पडू शकतो.

म्हणून चिवडा हा आपण आवश्यक  तेवढाच खाल्ला पाहिजे.

तर मित्रांनो, तुम्हाला चिवडा रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment