computer course in marathi सध्याच्या कम्प्युटरच्या युगात जवळ-जवळ सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी कॉम्प्युटरचा computer वापर केला जातो. पण ही सर्व कामे करण्यासाठी वेगवेगळ्या सॉफ्टवेअरची आणि त्या सॉफ्टवेअर बद्दल चांगली माहिती असणाऱ्या व्यक्तींची गरज असते. याबद्दल माहिती करून घेण्यासाठी किंवा या सॉफ्टवेअर वापरणे शिकण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट प्रकारचे कोर्सेस करावे लागतात. कॉम्प्युटर संबंधित सध्या खूप सारे कोर्सेस उपलब्ध आहेत. त्यापैकी काही कोर्सेस खाली दिलेले आहेत. computer basic knowledge in marathi हि सुद्धा माहिती यातून आपल्याला भेटेल.
संगणक व त्याचे कोर्सेस computer course in marathi
- MS-CIT
- टायपिंग
- वेब डिझाईनिंग
- टॅली
- सायबर सेक्युरिटी कोर्सेस
- Software and programming languages
- डिजिटल मार्केटिंग
- हार्डवेअर मेंटेनन्स
- ॲनिमेशन
- मायक्रोसॉफ्ट ऑफिस
१. MS-CIT Computer course in marathi
MSCIT हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय माहिती-तंत्रज्ञान कोर्स आहे. २००१ सालामध्ये MKCL ने याची सुरुवात केली होती. साधारणपणे दहावी आणि बारावी नंतर जास्तीत जास्त विद्यार्थी हा कोर्स करण्यास पसंती देतात. यामध्ये आपल्याला कॉम्पुटर विषयी खूप काही शिकवले जाते. जसे की कॉम्प्युटर काय असते? त्याचा वापर कुठे व कसा करायचा त्यासोबतच इंटरनेट विषयी सुद्धा खूप काही शिकवले जाते. MSCIT चा उपयोग जवळपास सर्वच ठिकाणी होतो. बऱ्याच ठिकाणी ( महाराष्ट्रात ) नोकरीसाठी MSCIT सक्तीची करण्यात आलेली आहे.
२. टायपिंग DTP Computer Course in marathi
मागील काही वर्षांपासून GCC-TBC ने मागील काही वर्षांपासून कॉम्पुटर टायपिंग सुरू केलेली आहे. यामध्ये टायपिंग सोबतच कॉम्पुटर विषयी अजून खूप काही शिकवले जाते. कॉम्पुटर टायपिंग मध्ये आपला टायपिंग स्पीड लवकर वाढतो. टायपिंग चा कोर्स पूर्ण केल्यावर सध्याच्या काळात जवळपास सर्वच ठिकाणी कॉम्पुटर चा वापर होत असल्याने आपल्याला कोणत्याही खाजगी किंवा शासकीय कार्यालयात डेटा एन्ट्री ची नोकरी सहज मिळू शकते.
३. वेब डिझायनिंग Web designing Computer course in marathi
वेब डिझाईनिंग मध्ये आपल्याला एखादी वेबसाईट तयार करण्यासाठी आणि त्या वेबसाईट च्या देखरेखीसाठी लागणारी वेगवेगळी घटके किंवा साधनांचा वापर कसा करायचा ते शिकवले जाते. वेब डिझाईनिंग साठी काही वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा वापरल्या जातात जसे की, HTML, JAVA Script, इत्यादी. या भाषा शिकण्याची संधी आपल्याला मिळते. Web designing चा एक वर्षाचा व्यवसायिक कोर्स करू शकतो, ज्यात कोर्स पूर्ण झाल्यावर आपल्याला पदविका(डिप्लोमा) सर्टिफिकेट दिले जाते. वेब डिझायनिंग मध्ये काही कमी कालावधीचे म्हणजे तीन ते सहा महिन्यांचे कोर्सेस देखील उपलब्ध आहेत. हा कोर्स पूर्ण केल्यावर तुम्ही तुमची स्वतःची वेबसाइट बनवू शकता किंवा एखाद्या नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी देखील करू शकतात.
४. टॅली Tally Computer course in marathi
Talley ERP हे एक अकाऊंटिंग शी संबंधित सॉफ्टवेअर आहे. याचा वापर मोठ्या कंपन्यांमध्ये, सरकारी वित्तीय कार्यालय किंवा बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात, आर्थिक व्यवहारांची माहिती जतन करण्यासाठी केला जातो. जर आपल्याला अकाउंटिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर आपण देखील टॅली चा कोर्स करू शकता. ज्या व्यक्तींना अकाउंट बद्दल आधीपासूनच थोडीशी माहिती आहे किंवा ज्यांनी कॉमर्समधून आपली बारावी पूर्ण केली आहे अशा व्यक्तींना टॅली खूप कमी वेळात आणि चांगल्या पद्धतीने शिकता येते. Talley ERP चा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण कुठल्याही नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी करू शकता.
५.सायबर सेक्युरिटी कोर्सेस Cyber Security course in marathi
सध्याच्या इंटरनेटच्या जगात आपण खूप सार्या गोष्टी ऑनलाईनच करत असतो, जसे की बिल भरणे, शॉपिंग खरेदी करणे किंवा बँकेचे इतर काही आर्थिक व्यवहार करत असतो. घर बसल्या ही सर्व कामे करणे लोकांना खूप सोयीस्कर वाटते, त्यामुळे याची लोकप्रियता खूप वाढत चालली आहे. पण त्यासोबतच सायबर क्राईम चा धोका देखिल दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सायबर सेक्युरिटी कोर्सेस मध्ये आपल्याला एखाद्या वेबसाईट ला ऑनलाईन सिक्युरिटी कशी करायची?, सायबर क्राईम कशापद्धतीने रोखायचे?, ऑनलाईन होणाऱ्या आर्थिक व्यवहारांना सुरक्षित कसे ठेवायचे?,याबाबत शिकवले जाते.हे कोर्सेस पूर्ण केल्यानंतर आपल्याला कुठलीही कंपनी मध्ये सायबर सेक्युरिटी साठी एक चांगली नोकरी मिळते मिळू शकते.
६. सॉफ्टवेअर अँड प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस Software and Progamming Languages course in marathi
कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी त्यामध्ये खूप सारे प्रोग्राम्स तयार करावे लागतात आणि या प्रोग्रामसाठी काही विशिष्ट प्रकारच्या भाषांचा वापर केला जातो जसे की C, C++, etc. या भाषा आपल्या सर्वसामान्य भाषांपेक्षा थोड्या वेगळे असतात. आपण कोणत्याही खाजगी संस्थेमधून या भाषांचे शिक्षण घेऊ शकतो. या भाषांचे शिक्षण किंवा कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपण स्वतः सॉफ्टवेअर तयार करू शकतो किंवा कुठल्याही एखाद्या कंपनीमध्ये नोकरीसुद्धा करू शकतो.
७. डिजिटल मार्केटिंग Digital Marketing Computer Course in marathi
दिवसेंदिवस डिजिटल मार्केटिंग ला मागणी खूप वाढत चालली आहे कारण सध्या सर्व व्यावसायिक डिजिटल मार्केटिंग वर जास्त भर देत आहेत. भविष्यात डिजिटल मार्केटिंग केलेल्या व्यक्तीला खूप चांगल्या पगाराच्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
८ हार्डवेअर मेंटेनन्स Hardware and Manitenence Computer course in marathi
जेवढ्या जास्त प्रमाणात कॉम्प्युटरचा वापर केला जातो तेवढ्या जास्त प्रमाणात त्याला मेंटेनन्स ची सुद्धा गरज पडत असते. यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही प्रकारच्या मेंटेनन्सचा समावेश होतो. हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर मेंटेनन्स चा कोर्स केल्यानंतर आपण स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मेंटेनन्स ची कामे करू शकतो किंवा एखाद्या आयटी कंपनीमध्ये हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर मेंटेनन्स नोकरी करून सुद्धा करू शकतो.
९. ॲनिमेशन Animation Computer course in marathi
या कोर्समध्ये 3D तंत्रज्ञान, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, ग्राफिक्स, इत्यादी. प्रकारचे वेगवेगळे टॉपिक्स शिकवले जातात. सध्याच्या काळात ॲनिमेशन चा वापर करून खूप सारे चित्रपट तयार केले जात आहेत आणि ते खूप लोकप्रिय देखील होत आहेत. हा कोर्स पूर्ण केलेल्या व्यक्तींना चित्रपट सृष्टी मध्ये किंवा न्यूज चॅनल्स मध्ये खूप जास्त प्रमाणात मागणी आहे. ॲनिमेशन चा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही स्वतः देखील काही फिल्मस् तयार करू शकता किंवा एखाद्या चित्रपट इंडस्ट्रीमध्ये काम करू शकता.
१०. मायक्रोसॉफ्ट ऑफिस Microsoft Office Computer Course in marathi
सध्याच्या काळात जवळजवळ सर्वांनाच मायक्रोसॉफ्ट ऑफिस बद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये एम एस वर्ड, एम एस पावर पॉइंट, एम एस एक्सेल, इत्यादी प्रकारचे वेगवेगळे टूल्स आहेत. ज्यांचा वापर हा दैनंदिन जीवनामध्ये खूप वेळा करावा लागतो. त्यामुळे जवळजवळ सर्वच सर्वांनाच यांचा वापर करता आले पाहिजे.