माऊस म्हणजे काय | computer mouse information in marathi

माऊस म्हणजे काय?  (What is mouse in marathi)

माऊस तर सर्वांनी पाहिलाच असेल, पण पण पण मी घरातल्या माऊसबद्दल बोलत नाही तर मी बोलतोय कम्प्युटरच्या माऊस बद्दल.  आज आपण कॉम्प्युटरच्या माऊसची संपूर्ण माहिती (माऊस म्हणजे काय , computer mouse information in marathi) जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण माऊस काय आहे, माऊसचा इतिहास काय आहे, माऊसचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत हे जाणून घेणार आहोत.  चला तर मग पाहूयात. 

 माऊस काय आहे  (Meaing of computer mouse in marathi)

माऊस एक इनपुट डिवाइस (Input Device) आहे जो कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर पॉइंटर ज्याला आपण कर्सर म्हणतो त्याला नियंत्रित करतो.  या पॉइंटरच्या माध्यमातून आपण कॉम्प्युटर मध्ये फाइल्स, फोल्डर्स आणि दुसरे सर्व आइटम्स उघडू शकतो किंवा बंद करू शकतो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो.  या सर्व कामामुळे याला पॉइंटिंग डिव्हाइस असं सुधा म्हटलं जातं.  कोणताही कॉम्प्युटर युजर कॉम्प्युटरला सूचना देण्यासाठी माऊसचा वापर करतो.  यामुळे माउस युजर आणि कॉम्प्युटर या दोघांमध्ये एका इंटरफेसच काम करतो.

 माऊसचा इतिहास (History of computer mouse in marathi):

1963 मध्ये Douglas Engelbart यांनी पहिला माऊस तयार केला.  त्याला त्यांनी एक्सवाय इंडेक्स असं नाव दिलं होतं.  तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की याला पहिल्यांदा चालवण्यासाठी दोन हातांची गरज पडत होती.  परंतु नंतर ते बदलले गेले आणि 1991मध्ये लॉगीटेक (Logitech)  कंपनीने वायरलेस माऊसचा (Wireless Mouse) शोध लावला.

 माऊसचे वेगवेगळे पार्टस (Different parts of computer mouse in marathi):

computer mouse information in marathi , mouse information in marathi
internal parts of mouse

 1) बटन्स (Buttons):

आज-काल वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक माउस मध्ये कमीत कमी दोन बटन तर असतातच त्यातील एक बटन म्हणजे लेफ्ट बटन आणि दुसरे म्हणजे राईट बटन.

 2) माऊस व्हील ( Mouse Wheel):

आज कालच्या डेस्कटॉप माउस मध्ये  व्हीलचा वापर केला जातो.  याचा वापर आपण पेजला खाली किंवा वर करण्यासाठी करू शकतो.

 3) सर्किट बोर्ड (Circuit Board):

माऊस द्वारे क्लिक केल्या जाणाऱ्या कृतीला कॉम्प्युटरमध्ये इनपुट करण्यासाठी एक सर्किट बोर्ड असतो.  जो एका इंटिग्रेटेड सर्किटच्या (Integrated Circuit) वापराने बनतो.

 4) केबल किंवा वायरलेस रिसिव्हर (Cable or Wirless Receiver):

कॉम्प्युटरशी कनेक्ट करण्यासाठी माऊसला केबल जोडलेली असते. आजकालच्या जास्तकरून माउस मध्ये केबल कनेक्टिविटीसाठी यूएसबी (USB) पोर्ट देण्यात आले आहेत. आणि जर तुम्ही वायरलेस माऊसचा वापर करत असाल तर त्यासाठी एका वायरलेस पोर्टची गरज पडते.

 माऊस चे वेगवेगळे पाच प्रकार( Five different types of computer mouse in marathi):

 1) मेकॅनिकल माउस (Mechanical Mouse):

या माऊसचा शोध 1972 मध्ये बिल इंग्लिश (Bill English) यांनी लावला.  हा माउस निर्देश करण्यासाठी एका बॉलचा वापर केला जात होता.  ज्यामुळे त्याला बॉल माउस (Ball Mouse) म्हटलं जातं. या बॉलला डावीकडे उजवीकडे आणि खाली- वर फिरवलं जाऊ शकत होतं.

 2) ऑप्टिकल माऊस ( Optical Mouse):

हा माऊस एलईडी (LED) आणि डीएसपी (DSP- Digital Signal Processing) डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग या तत्त्वावर कार्य करतो.  या माऊस मध्ये कोणताही बॉल नसतो. बॉलच्या जागेवर एक छोटासा बल्ब लावलेला असतो. त्यामुळे माऊसला हलवल्याने पॉइंटर हालचाल करतो. आज-काल अशाच प्रकारच्या माऊसचा वापर केला जातो. याला एका तारेद्वारे कॉम्प्युटरची जोडले जाते.  ऑप्टिकल माऊस वापरण्यास सोईस्कर असतो.

 3) वायरलेस माउस (Wireless Mouse) :

बिना तारेच्या माऊसला वायरलेस माऊस (Wireless Mouse) म्हणटले जाते. याला कॉर्डलेस माऊस (Cordless Mouse) असेसुद्धा म्हटले जाते.  हा माऊस रेडिओ फ्रिक्वेन्सी (Radio Frequency) या तत्वावर काम करतो.  मात्र याची डिजाईन ऑप्टिकल माऊस सारखीच असते.  वायरलेस माऊस चा उपयोग करण्यासाठी एका ट्रान्समीटर ( Transmiter) आणि रिसिवर (Receiver) ची गरज असते. ट्रान्समीटर तर  माऊस मध्ये असतोच पण रिसीवर आपल्याला कॉम्प्युटरला लावावा लागतो.  मुख्य म्हणजे या माऊसला चालवण्यासाठी बॅटरी ची आवश्यकता असते.

 4) ट्रॅकबॉल माउस ( Trackball Mouse):

या माऊस ची डिझाईन सुद्धा ऑप्टिकल माऊस सारखीच असते.  परंतु यात नियंत्रण करण्यासाठी ट्रॅकबॉल वापरला जातो.  कॉम्प्युटरला सूचना देण्यासाठी युजरला आपल्या बोटाने किंवा अंगठ्याने बॉलला फिरवाव लागतं. या माऊसला चालवण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो.

 5) स्टायलस माउस ( Stylus Mouse):

mouse information in marathi, computer mouse information in marathi
stylus mouse information in marathi

या प्रकारच्या माऊसला जिस्टिक (gStick) माउस सुधा म्हणतात. या माऊसचा शोध Gordan Stewart) यांनी लावला होता.  त्यामुळे जिस्टिक मधील जी म्हणजे जॉर्डन (Gordan) आहे.  हा माऊस एका पेनप्रमाणे दिसतो यामध्ये एक व्हील सुद्धा असतो.  याचा उपयोग जास्त करून टच स्क्रीन डिव्हाइसेस (Touchscreen Devices) मध्ये केला जातो.

आशा करतो की तुम्हाला माउस बद्दलची संपूर्ण माहिती माऊस म्हणजे काय , computer mouse information in marathi या पोस्ट मध्ये मिळाली असेल. ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली एक कमेंट मध्ये नक्की सांगा.  जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल किंवा माहितीपूर्ण वाटली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.  आपण भेटूयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment